२ कप ताज्या टोमॅटोंचा रस (प्युरे), २ कप खवलेला नारळ, पावणे-दोन कप साखर, पाव कप खवा किंवा मावा पावडर
२ चमचे तुपावर नारळाचा चव भाजून घ्यावा. छान खमंग वास सुटला की त्यात टोमॅटोचा रस, साखर, मावा पावडर घालून एकजीव मिश्रण करावे. मध्यम आंचेवर आटवत ठेवावे. साखर सुटायला लागली गॅस बंद करून मिश्रण जरा गार होउ द्यावे. थाळ्याला तुपाचा हात लावून त्यावर मिश्रण एकसारखे थापावे. उचटण्यानं वड्या आखून घ्याव्या. पूर्ण गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.
१. चांगले लाल झालेले टोमॅटो कच्चेच, न सोलता, न शिजवता, बिया न काढता मिक्सरध्ये घालायचे आहेत. नाकं तेवढी काढून घ्यावीत.
२. खवा घालणार असल्यास आधी थोड्या तुपावर भाजून घ्यावा.
३. मूळ कृतीत एकास एक प्रमाण आहे. मला पुढच्या पिढीचा अतीशहाणपणाचा वारसा चालवणं भाग असल्यानं पाव कप का होइना साखर कमी घालते.
४. आंतरजालावर इतर काही पाककृती आहेत ज्यात टोमॅटो शिजवून, सालं काढून, तो लगदा चाळणीतून गाळून घेतला आहे. पण आपण टोमॅटो कच्चेच, न सोलता, न शिजवता, बिया न काढता मिक्सरध्ये घालायचे आहेत. आणि हो, नाकं तेवढी काढून घ्यावीत.
वा वा आली का रेसिपी?
वा वा आली का रेसिपी?
भारी दिसतोय रंग - चव मला इम्याजिन करता येत नाहीये, तेव्हा करून बघणं भाग आहे.
त्या काढून टाकलेल्या नाकांनी कांदे सोलता येतील ना? म्हणजे उगा वाया जायला नकोत!
सुरेख दिसतायत.
सुरेख दिसतायत.
छान
छान
छान.
छान.
टोमॅटोच्या वड्या..
टोमॅटोच्या वड्या.. इंटरेस्टिंग.. कधी खाल्ला ऐकला नव्हता हा प्रकार.. छान दिसतेय
कातील कलर. छान वेगळी रेसिपी.
कातील कलर. छान वेगळी रेसिपी.
टोमॅटो आवडीच आहे, भारी रेसिपी
टोमॅटो आवडीच आहे, भारी रेसिपी.
भारी दिसतोय रंग - चव मला इम्याजिन करता येत नाहीये, तेव्हा करून बघणं भाग आहे.
>>>> +१
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
काढून टाकलेल्या नाकांनी कांदे सोलता येतील ना >>> तेवढ्यासाठीच तर नाकं वेगळी काढायची आहेत
मस्त दिसतोय फोटो, चव खरंच
मस्त दिसतोय फोटो, चव खरंच इमॅजिन नाही करता येत.
छान आहे रेसिपी. करून बघेन.
छान आहे रेसिपी. करून बघेन.