आम्ही पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. मनोगत लिहिण्याचे काम चालू असतानाच चुकीने धागा ठरलेल्या वेळेआधीच प्रकाशित झाला. आम्ही आतापर्यंत आलेल्या सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार मानतो आणि आमच्या मनोगतासह धागा पुन्हा प्रकाशित करत आहोत.
मायबोलीकरांनो, नेहमीसारखा या वर्षीही तुम्ही सर्वांनी मायबोली गणेशोत्सव २०२३ उत्सवाला भरघोस प्रतिसाद दिला.
उत्सवाची घोषणा झाल्यापासून उपक्रम आणि स्पर्धांचे धागे योग्य वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी पूर्ण संयोजक समिती प्रयत्न करत होती. सगळ्यांनी सुचवलेल्या उपक्रमातील तुम्हा सर्वाना आवडतील, सोपे होतील असे उपक्रम निवडले गेले. वेळेअभावी काही उपक्रम रद्द केले गेले. तुम्हा सर्वांच्या तयारीसाठी उपक्रम आणि स्पर्धांची घोषणा उत्सव सुरु होण्याच्या काही दिवस आधीच केली गेली. त्यात मुद्रित तपासणीचे काम अपुरे राहिले होते. मातृभाषेच्या प्रेमापोटी तुम्ही ते लक्षात आणून दिले त्याबद्दल संयोजक समिती आपले आभारी आहोत. चुकलं माकलं सांभाळून घेतलंत त्याबद्दल धन्यवाद.
उत्सव सुरु झाल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून प्रवेशिका येण्यास सुरुवात झाली आणि त्यामुळे उत्साही वातावरण तयार झाले. लेखन विभाग, पाककला विभाग, हस्तकला, चित्रकला विभाग आणि खेळ या सर्वांमध्ये तुमचा उत्साह ओसंडून वाहत होता. उत्सव यशस्वी होण्यासाठी तुम्हा सर्वांचे यामध्ये खूप मोठे योगदान आहे.
सर्व मायबोलीकरांचे आणि त्यांच्या छोट्या मंडळींचे आम्ही आभार मानतो. उपक्रमात भाग घेण्यासाठीच तुमचा उत्साह आणि तुम्हाला होणारा आनंद बघूनच संयोजन समितीला समाधान मिळते. मायबोली admin / वेमा यांनी आम्हाला संयोजनाची संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचेसुद्धा खूप आभारी आहोत.
धन्यवाद,
- मायबोली गणेशोत्सव २०२३ संयोजन समिती (गोल्डफिश, किल्ली, किशोर मुंढे, Ashwini_९९९, बोकिमाउ)
गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या.
सर्व संयोजकांचे अभिनंदन. अगदी
सर्व संयोजकांचे अभिनंदन. अगदी भरगच्च कार्यक्रम होते. ते सर्व हाताळणे व पार पाडणे ही सोपी गोष्ट नक्कीच नाही. तुम्ही सर्वांनी तुमचे तुमचे व्याप सांभाळत तुमचा बहुमूल्य वेळ इथे दिला, याबद्दल तुमचं कौतुक आहे. >> +11111
संयोजक, मनापासुन धन्यवाद व
संयोजक, मनापासुन धन्यवाद व खूप कौतुक. फोटो झब्बुचे विषय मस्त होते. शशकनी फार मजा आणली, छान वाटले एकाच वाक्यावर किती वेगवेगळे विषय सुचु शकतात हे पाहुन.
छान झाला गणेशोत्सव .
छान झाला गणेशोत्सव . संयोजकांचे कौतुक
संयोजक टीम, खूप कौतुक तुमचं
संयोजक टीम, खूप कौतुक तुमचं आणि अभिनंदन. मस्त झाला गणेशोत्सव. सगळे उपक्रम , खेळ आवडले. आता इतकं काही आहे अजून वाचायचं की बरेच दिवस पुरेल ते.
इतक्या वर्षांत पहिल्यांदाच
इतक्या वर्षांत पहिल्यांदाच असं झालं असेल की मी गणेशोत्सव ग्रूपचं सभासदत्व घेतलं नाही आणि त्यामुळे गणेशोत्सवातलं काहीही वाचलं नाही.
पण वेळ मिळताच वाचणार आहे सगळं.
संयोजक टीम चे अभिनंदन. छान
संयोजक टीम चे अभिनंदन. छान झाला गणेशोत्सव
गणेशोत्सवाच्या यशस्वी
गणेशोत्सवाच्या यशस्वी संयोजनाबद्दल संयोजकांचे आभार आणि अभिनंदन !!! +11
खूप मेहनत घेतलीत संयोजक.
खूप मेहनत घेतलीत संयोजक. भरगच्च कार्यक्रम होता आणि उत्तमप्रकारे हाताळलात. खूप कौतुक आणि मोठ्ठी शाब्बासकी!
यंदाचे विशेष म्हणजे पाकृ स्पर्धा मला चांगल्या वाटल्या. >>> मुख्य म्हणजे चोखंदळ पाकृकर्त्यांनी बारीकसारीक शंका विचारल्या नाहीत. संयोजकांनी यंदा ती संधी नाकारल्यामुळे त्यांचा निषेध.
इतक्या वर्षांत पहिल्यांदाच
इतक्या वर्षांत पहिल्यांदाच असं झालं असेल की मी गणेशोत्सव ग्रूपचं सभासदत्व घेतलं नाही आणि त्यामुळे गणेशोत्सवातलं काहीही वाचलं नाही. >>> टिळकांची आठवण करून दिलीस.
यावेळी कोणी एकस्ट्रा टाईम
यावेळी कोणी एकस्ट्रा टाईम मागितला नाही का? पाकृवाले स्पर्धक मागतात सहसा..
ज्याची त्याची लाईफ, ज्याची
ज्याची त्याची लाईफ, ज्याची त्याची चॉईस, यात काही चूक किंवा बरोबर नसते >>> करेक्ट
छानच आयोजन व स्पर्धा, उपक्रम
छानच आयोजन व स्पर्धा, उपक्रम संयोजक कमिटी चे हार्दिक अभिनंदन व धन्यवाद. मी सहभाग घेण्यासाठी ह्या उपक्रमांची वाटच बघत असते. इट इज अ हाय पॉइन्ट ऑफ द इअर.
मायबोली,
मायबोली,
मायबोली गणेशोत्सव २०२३ संयोजन समिती (गोल्डफिश, किल्ली, किशोर मुंढे, Ashwini_९९९, बोकिमाउ) या सर्वांचं अभिनंदन आणि कौतुक.
छान झाला उपक्रम . खूप ऍक्टिव्हिटीज होत्या , त्याही भारी . .
गणपती बाप्पा मोरया !
खूप छान प्रकारे संयोजक
खूप छान प्रकारे संयोजक समितीने हा उपक्रम आखला आणि पारही पाडला. त्याबद्दल खूप अभिनंदन. खरंच खूप मजा आली, त्याबद्दल आभार. पुढच्या वर्षाच्या प्रतीक्षेत
सर्व संयोजकांचे अभिनंदन आणि
सर्व संयोजकांचे अभिनंदन आणि आभार!
गणपती बाप्पा मोरया!
छानच आयोजन व स्पर्धा, उपक्रम
छानच आयोजन व स्पर्धा, उपक्रम संयोजक कमिटी चे हार्दिक अभिनंदन व धन्यवाद.
अतिशय छान झाला उत्सव
अतिशय छान झाला उत्सव
संयोजक आभार
आयोजक, संयोजक, सहभागी, वाचक
आयोजक, संयोजक, सहभागी, वाचक आणि इतर अश्या सगळ्यांचे धन्यवाद
सर्व समितीचं (गोल्डफिश,
सर्व समितीचं (गोल्डफिश, किल्ली, किशोर मुंढे, Ashwini_९९९, बोकिमाउ) अभिनंदन. उपक्रम छान झाला, सर्व कथा आणि लेखन स्पर्धा वाचायला मजा आली.रेसिपीज सुद्धा.
सर्व समितीचं (गोल्डफिश,
सर्व समितीचं (गोल्डफिश, किल्ली, किशोर मुंढे, Ashwini_९९९, बोकिमाउ) अगदी मनापासून अभिनंदन.
उपक्रम छान चालू आहेत/होते हे शिर्षक आणि प्रतिसादावरुन कळत होतं.
उत्सवाचे सुरुवातीचे दिवस सोडून सहल आणि प्रवासात असल्यामुळे बरेचसे धागे वाचून झालेले नाहीत. आता सुरुवात करीन.
पण सुरुवातीच्या कथा आणि लेखन स्पर्धा वाचायला मजा आली.
संयोजकांचे पुन्हा एकदा आभार आणि अभिनंदन..
उपक्रमात सहभागी झालेल्याना
उपक्रमात सहभागी झालेल्याना काही प्रशस्तिपत्रक वगैरे देणार नाही का? लेक विचारत होता.
उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व
उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व लहान मुलांना प्रशस्तिपत्रके देणार आहोत. सध्या admin / वेमा मतदानाचे धागे प्रकाशित करतील. त्यानंतर निकालाची घोषणा झाल्यावर सगळ्यांना प्रशस्तिपत्रकांचे वाटप केले जाईल.
खूपच छान झाला उत्सव! सर्व
खूपच छान झाला उत्सव! सर्व संयोजकांचे अभिनंदन आणि आभार!
उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व
उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व लहान मुलांना प्रशस्तिपत्रके देणार आहोत. सध्या admin / वेमा मतदानाचे धागे प्रकाशित करतील. त्यानंतर निकालाची घोषणा झाल्यावर सगळ्यांना प्रशस्तिपत्रकांचे वाटप केले जाईल.>>>>>> ओके, धन्यवाद.
संयोजकांचे अभिनंदन आणि खूप
संयोजकांचे अभिनंदन आणि खूप खूप आभार!!
सर्व संयोजकांचे अभिनंदन. अगदी
सर्व संयोजकांचे अभिनंदन. अगदी भरगच्च कार्यक्रम होते. ते सर्व हाताळणे व पार पाडणे ही सोपी गोष्ट नक्कीच नाही. तुम्ही सर्वांनी तुमचे तुमचे व्याप सांभाळत तुमचा बहुमूल्य वेळ इथे दिला, याबद्दल तुमचं कौतुक आहे. >> +111111
संयोजकांचे अभिनंदन!
संयोजकांचे अभिनंदन!
एक प्रश्न- उपक्रम/स्पर्धा यांची विषयवार यादी कुठे आहे का त्यानुसार वाचायला मिळेल?
म्हणजे समजा फक्त मिलेट रेसिपीज बघायच्या असतील तर त्यांची एक यादी- असं.
संयोजकांचे अभिनंदन!
संयोजकांचे अभिनंदन!
मतदानाचे धागे अजून प्रकाशित
मतदानाचे धागे अजून प्रकाशित झाले नाही का?
संयोजकांचे अभिनंदन!
संयोजकांचे अभिनंदन!
सर्व स्पर्धा आणी उमक्रम छान होते, बरच वाचन बाकी आहे ते हळूहळू पुर्ण करेल
मतदानाचा धागा दिसला नाही, मतदान होवुन निकाल लागणे आणी विजेत्याना सर्टिफिकेट असा क्रम आहे... हे लगेच होणे अपेक्षित आहे.स्पश्ट्तोक्ती बद्दल राग मानु नका पण स्पर्धेत भाग घेणार्याना उत्सुकता असते...त्यात बालचमुही असतो.
Pages