आम्ही पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. मनोगत लिहिण्याचे काम चालू असतानाच चुकीने धागा ठरलेल्या वेळेआधीच प्रकाशित झाला. आम्ही आतापर्यंत आलेल्या सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार मानतो आणि आमच्या मनोगतासह धागा पुन्हा प्रकाशित करत आहोत.
मायबोलीकरांनो, नेहमीसारखा या वर्षीही तुम्ही सर्वांनी मायबोली गणेशोत्सव २०२३ उत्सवाला भरघोस प्रतिसाद दिला.
उत्सवाची घोषणा झाल्यापासून उपक्रम आणि स्पर्धांचे धागे योग्य वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी पूर्ण संयोजक समिती प्रयत्न करत होती. सगळ्यांनी सुचवलेल्या उपक्रमातील तुम्हा सर्वाना आवडतील, सोपे होतील असे उपक्रम निवडले गेले. वेळेअभावी काही उपक्रम रद्द केले गेले. तुम्हा सर्वांच्या तयारीसाठी उपक्रम आणि स्पर्धांची घोषणा उत्सव सुरु होण्याच्या काही दिवस आधीच केली गेली. त्यात मुद्रित तपासणीचे काम अपुरे राहिले होते. मातृभाषेच्या प्रेमापोटी तुम्ही ते लक्षात आणून दिले त्याबद्दल संयोजक समिती आपले आभारी आहोत. चुकलं माकलं सांभाळून घेतलंत त्याबद्दल धन्यवाद.
उत्सव सुरु झाल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून प्रवेशिका येण्यास सुरुवात झाली आणि त्यामुळे उत्साही वातावरण तयार झाले. लेखन विभाग, पाककला विभाग, हस्तकला, चित्रकला विभाग आणि खेळ या सर्वांमध्ये तुमचा उत्साह ओसंडून वाहत होता. उत्सव यशस्वी होण्यासाठी तुम्हा सर्वांचे यामध्ये खूप मोठे योगदान आहे.
सर्व मायबोलीकरांचे आणि त्यांच्या छोट्या मंडळींचे आम्ही आभार मानतो. उपक्रमात भाग घेण्यासाठीच तुमचा उत्साह आणि तुम्हाला होणारा आनंद बघूनच संयोजन समितीला समाधान मिळते. मायबोली admin / वेमा यांनी आम्हाला संयोजनाची संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचेसुद्धा खूप आभारी आहोत.
धन्यवाद,
- मायबोली गणेशोत्सव २०२३ संयोजन समिती (गोल्डफिश, किल्ली, किशोर मुंढे, Ashwini_९९९, बोकिमाउ)
गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या.
संयोजक चमू
संयोजक चमू
गोल्डफिश, किल्ली, किशोर मुंढे, Ashwini_९९९, बोकिमाउ
या सर्वांनी घेतलेल्या कष्टाबद्दल मंडळ आभारी आहे. सोसायटीच्या बॉडीवर न गेलेल्यांकडे उत्तम सूचना असतात पण तिथे काम करायला गेल्यावर मती कुंठित होते, तसंच संयोजन समितीचं आहे. त्यामुळे समितीने आखलेले उपक्रम, ते राबवण्यासाठी दिलेला वेळ हे सगळे पडद्यामागेच राहणार. समितीत न जाता काहीही सुचू शकेल. अनेक सूचना मी पण केल्या असतील. त्या अगदी शांतपणे स्विकारायच्या, चांगले ते बदल लगेच करायचे हे सगळे दिसून आले.
या वेळी काही स्पर्धा मायबोलीकरांना त्यांच्या वैयक्तिक गोष्टी मोकळेपणाने शेअर करायला लावणार्या होत्या. आता इतकी वर्षे झालीच आहेत, किती काळ लपवायचा तो चेहरा, म्हणून माबोकरांनी या वेळी मोकळेपणाने शेअर केल्या या गोष्टी. घराच्या आजूबाजूचा परीसर सुद्धा चहाडखोरच की.
पण आता अनामिक राहण्याचा कंटाळा आला. दे देणादण शेअर केले सर्वांनी. पूर्वी आयडीला फारसे डायमेन्शन्स नसायचे. या वेळी ते दिसले.
फिटे अंधाराचे जाळे हा उपक्रम काही खासगी क्षण मोकळेपणे शेअर करण्यासारखा नाही वाटला. त्यातला इतरांना प्रेरणा द्यायचा भाग आवडला. संयोजकांना तेच अपेक्षित असणार. पण आपण सामान्य माणसं. जे हृदयाच्या जवळचे हळवे क्षण असतात ते सार्वजनिक करणे मानवी पटत नाही. अनलेस त्या क्षणात जर तुम्ही एकट्याच्या कोषात असाल आणि असे क्षण सार्वजनिक रित्या शेअर करताना लोकांच्या काय प्रतिक्रिया येतील या विचाराने जर भावनिक उमाळे फुटत असतील तरच शक्य आहे ... फॅमिली, मित्र, शेजारी पाजारी, अगदी व्हर्च्युअल जगातले रोजचे आय हॅलो व्हॉट्स अॅप ग्रुप्स, फोन कॅण्टॅक्टस हीच सपोर्ट सिस्टीम असते. तिच्या प्रत्येक नाजूक,आनंदाच्या क्षणात सहभागी होणे शक्य नसले तरी आपला तो कप्पा स्वतंत्र रहाणे आवश्यक आहे.
माफ करा, वाहवत जाऊन मोठा प्रतिसाद दिला. संयोजक समितीने चूक काढली असे समजू नये. हा एका आयडीचा विचार आहे. आवडला तर पुढच्या वेळी याचा विचार केला जावा. त्या दृष्टीने उपक्रम आखताना आणखी मजा येईल असे वाटल्याने न राहवून लिहीले. क्षमस्व !
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.


आता कुठे लॉग विकेंड आला आणि गणपती बघायला बाहेर पडायचे होते.. ईतक्यात तो गेलाही
छान होते उपक्रम असे नाही म्हणणार... कारण अजून ते आठवडाभर चालतच राहतील
सर्वांनाच मजा आली असेल यंदाही सालाबादाप्रमाणे... पण मला काय गवसले हे शब्दात नाही सांगू शकत.. मनापासून पुन्हा एकदा सर्वांचे आभार
धन्यवाद संयोजक. घरच्या
धन्यवाद संयोजक. घरच्या बाप्पाचे विसर्जन झाल्यावर या मंडळाच्या अंगणात येऊन बसायला वेळ मिळाला. सगळे उपक्रम आवडले. सगळ्यात भाग जरी घेता आला नाही तरी वाचायलाही आवडले सगळेच.
यावेळी पहिल्यांदाच फोटो उपक्रमात इतक्या दणादण एंट्री टाकल्या असतील मी
याचे श्रेय झब्बूच्या विषयाला आणि ऋन्मेषलाही. त्याने स्क्रीनशॉट घेऊन शेअर करायची आयडीया दिली नसती तर असे करायचे डोक्यातही आले नसते माझ्या.
तुमचे परत एकदा कौतुक आणि आभार.
संयोजक धन्यवाद, अभिनंदन व
संयोजक धन्यवाद, अभिनंदन व कौतुक.
यंदाचे विशेष म्हणजे पाकृ स्पर्धा मला चांगल्या वाटल्या
.. पण पाकृ त्यामानाने कमी आल्या.
सालाबादाप्रमाणे मजा आली उत्सवात.
यावेळेला कार्यक्रम वेलप्लॅन्ड
यावेळेला कार्यक्रम वेलप्लॅन्ड वाटला मला. कधीही स्पर्धा, उपक्रम, खेळ अंगावर कोसळतायत असा फील आला नाही. वेळेवर स्पर्धा, उपक्रमांची यादी शेअर केली गेली. खेळही रोज एकच असल्याने ओव्हरव्हेल्म व्हायला झाले नाही.
संयोजकांचे समारोपाचे बोलही सुंदर आहेत. सर्वांनीच खूप मेहनत घेतलेली आहे. फार मजा आली.
वरील सर्व प्रतिसादांना
वरील सर्व प्रतिसादांना अनुमोदन. सुरेख नियोजन आणि अंमलबजावणीही. गणपती बाप्पाची संयोजक मंडळासकट आपणां सर्वांवर कृपादृष्टी असो.
>>>>आपला तो कप्पा स्वतंत्र
>>>>आपला तो कप्पा स्वतंत्र रहाणे आवश्यक आहे.
आचार्य लुक्स लाईक यु आर अ प्रायव्हेट पर्सन. आदर आहे.
मला हे असे प्रायव्हेट रहाणं जमतच नाही
आचार्य, आपला प्रतिसाद नेहमीप्रमाणेच, फार आवडला.
मला हे असे प्रायव्हेट रहाणं
मला हे असे प्रायव्हेट रहाणं जमतच नाही Happy

>>>>>>>
हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे खरे तर सामो .. यावर गणपतीची धामधूम संपल्यावर एक धागा काढतो
कारण मला देखील सोशल मिडीयावर प्रायव्हेट राहायला बिलकुल आवडत नाही. पण तेच प्रत्यक्ष आयुष्यात मला कोणासमोर आपले पत्ते उघडायला आवडत नाही.
काही जणांचे नेमके उलट असते. तर काही जण दोन्ही विश्वात सारखेच असतात.
ज्याची त्याची लाईफ, ज्याची त्याची चॉईस, यात काही चूक किंवा बरोबर नसते
>>>>> यावर गणपतीची धामधूम
>>>>> यावर गणपतीची धामधूम संपल्यावर एक धागा काढतो Happy
जरुर!
सर्व संयोजकांचे अभिनंदन. अगदी
सर्व संयोजकांचे अभिनंदन. अगदी भरगच्च कार्यक्रम होते. ते सर्व हाताळणे व पार पाडणे ही सोपी गोष्ट नक्कीच नाही. तुम्ही सर्वांनी तुमचे तुमचे व्याप सांभाळत तुमचा बहुमूल्य वेळ इथे दिला, याबद्दल तुमचं कौतुक आहे. वेळोवेळी येणाऱ्या सूचनांनाही तुम्ही उत्तरं दिलीत आणि कुठलाही अभिनिवेश न बाळगता अनुरूप बदलही केलेत. (माझ्यासारख्या) लोकांनी अमुक स्पर्धा वर काढा, तमुक उपक्रमात पुढचा धागा काढा, ढमुक धाग्याचं नावच बदला असल्या काही काही मागण्या करूनही (रॉबर्ट, इनकी मांगे मजदुरों की तरह बढ रही है - वाला अनुभव येऊनही) सर्वांचे लाड तुम्ही पुरवलेत. या दिलखुलास स्वभावामुळे आणि तुमच्या उत्साहामुळे सोहळा आनंदात पार पडला. अनेक आभार!
छान झाला उत्सव. अभिनंदन,
छान झाला उत्सव. अभिनंदन, संयोजक! वर्गणी उरली असेल तर सिनेमा बघा, समोसे खा.
शशक सगळ्याच आवडल्या. आहे त्या सुरवातीवर १०० शब्दांत गोष्ट लिहायचं कसब वेगळंच. सगळ्यांनीच अगदी स्मार्ट कथा लिहिल्या आहेत.
मला माबोवरचा गणेशोत्सव नेहमीच
मला माबोवरचा गणेशोत्सव नेहमीच आवडतो..या वर्षीचा पण आवडला...संयोजकांचे खूप आभार आणि कौतुक..
पुढल्या वर्षी लवकर या!
पुढल्या वर्षी लवकर या!
मजा आली. धन्यवाद!
आचार्य लुक्स लाईक यु आर अ
आचार्य लुक्स लाईक यु आर अ प्रायव्हेट पर्सन >> वाहत्या पानांवर करतो कि शेअर
इतके कि ते बंद पडतात. 

सोसायटी क्लबहाऊस मधे आमच्या कल्चरल क्लबचे नियमित कार्यक्रम होतात, ऑफीसचे सहकारी, जुने गिने चुने मित्र यांच्या सोबत कार्यक्रम असतात. एव्हढ्या सर्कलच्या बाहेर प्रायव्हेट !
याबाबतीत मानव पृथ्वीकरांना सा. दंडवत ! अजिबात संयम सुटत नाही. खूप वेळा म्हटलं आत्ता सुटेल संयम, फोटो टाकतील, नाव सांगतील, पण अजिबात नाही. या वेळी माझा धीर सुटला
>>>>वाहत्या पानांवर करतो कि
>>>>वाहत्या पानांवर करतो कि शेअर Happy इतके कि ते बंद पडतात.
हाहाहा
संयोजक धन्यवाद, अभिनंदन !
संयोजक धन्यवाद,
अभिनंदन !
छान झाला उत्सव.
छान झाला उत्सव.
संयोजकांचे खूप आभार आणि कौतुक..
छान झाला उत्सव. संयोजकांचे
छान झाला उत्सव. संयोजकांचे आणि भाग घेणाऱ्या सर्वांचे आभार आणि कौतुक.
Btw, माबो वरचा गणेशोत्सव मला नेहमीच आवडतो.
इतके नितांत सुंदर नियोजन आणि
इतके नितांत सुंदर नियोजन आणि सुसूत्रपणे अंमल बजावणी झालीय यंदा की हेच मंडळ पञ्च वार्षिक योजना अंतर्गत राबवावे अशी आर्जवयुक्त विनंती मनापासून करायची आहे. सर्व मंडळाचे पुन्हा एकदा अभिनंदन !!
उत्सव अगदी छान साजरा झाला,
उत्सव अगदी छान साजरा झाला, संयोजक.
त्यासाठी अभिनंदन आणि आभार!
आचार्य आणि हपा यांना अनुमोदन.
>>> जे हृदयाच्या जवळचे हळवे क्षण असतात ते सार्वजनिक करणे मानवी पटत नाही
हो, आणि त्या त्या प्रसंगांत इन्वॉल्व्ड असलेल्या अन्य व्यक्तींच्या प्रायव्हसीची पायमल्ली होणंही मनाला पटत नाही. पण हा माझा विचार.
उपक्रम आणि स्पर्धा विषय खूप
उपक्रम आणि स्पर्धा विषय खूप छान होते. सर्व संयोजकांचे आभार !
((छान झाला उत्सव. संयोजकांचे
((छान झाला उत्सव. संयोजकांचे आणि भाग घेणाऱ्या सर्वांचे आभार आणि कौतुक. माबो वरचा गणेशोत्सव मला नेहमीच आवडतो.))+1
संयोजकांचे अभिनंदन, छान झाला
संयोजकांचे अभिनंदन, छान झाला उत्सव. तुम्ही भरपूर कष्ट घेतलेत. भरपूर उपक्रम, स्पर्धा. इतक्या की सगळं वाचायला अजून 15 दिवस सहज जातील
धन्यवाद आणि शुभेच्छा!
रच्याकने छायाचित्रांचे धागेही पळवले बरं का आम्ही सगळ्यांनी
त्या त्या प्रसंगांत
त्या त्या प्रसंगांत इन्वॉल्व्ड असलेल्या अन्य व्यक्तींच्या प्रायव्हसीची पायमल्ली होणंही मनाला पटत नाही. >>> खूप महत्वाचं !
छान झाला उत्सव. धन्यवाद आणि
छान झाला उत्सव. धन्यवाद आणि अभिनंदन संयोजक मंडळी.
संयोजकांचे अभिनंदन आणि
संयोजकांचे अभिनंदन आणि धन्यवाद.
धन्यवाद संयोजक, खूप छान झाला
धन्यवाद संयोजक, खूप छान झाला यंदाचा गणेशोत्सव.
गणेशोत्सवाच्या यशस्वी
गणेशोत्सवाच्या यशस्वी संयोजनाबद्दल संयोजकांचे आभार आणि अभिनंदन !!!
गणेशोत्सव उत्तम पार पडला.
गणेशोत्सव उत्तम पार पडला.
मायबोली गणेशोत्सव २०२३ संयोजन समिती (गोल्डफिश, किल्ली, किशोर मुंढे, Ashwini_९९९, बोकिमाउ) या सर्वांचं अभिनंदन आणि कौतुक.
सर्व संयोजकांचे अभिनंदन. अगदी
सर्व संयोजकांचे अभिनंदन. अगदी भरगच्च कार्यक्रम होते. ते सर्व हाताळणे व पार पाडणे ही सोपी गोष्ट नक्कीच नाही. तुम्ही सर्वांनी तुमचे तुमचे व्याप सांभाळत तुमचा बहुमूल्य वेळ इथे दिला, याबद्दल तुमचं कौतुक आहे. >> +१
संयोजकांचे अभिनंदन! मजा आली. प्रतिसादही भरघोस होते.
Pages