लेखन उपक्रम 3- नमनाला घडाभर - धाग्या

Submitted by धाग्या on 27 September, 2023 - 13:49

शाळेची सहल जाणार म्हणून तो खूप आनंदी होता. त्याने कधी नव्हे ते आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच...
त्याने उठून मायबोलीवर लॉगिन केले तर त्याला नवा शशक उपक्रम आलेला दिसला. क्षणभर तो उत्साहित झाला खरा... मग त्याने शब्द मोजून पाहिले तर शंभरातले सव्वीस शब्द संयोजकांनी सुरवातीवरच खर्च केलेले. आता पाऊणशे शब्दांत काय डोंबल कथा लिहिणार असा विचार त्याच्या मनात आला. मग त्याने पुन्हा शब्द मोजले तर आता तेराच शब्द उरलेले त्याला दिसले. मग त्याने फोन मिटला आणि गाऊ लागला...
एक दो तीन चार पाच छे सात आठ नौ दस ग्यारा बारा तेरा....

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol फिलॉसॉफिकल आहे कथा.

Lol

२६ Lol

शाळेची सहल जाणार म्हणून तो खूप आनंदी होता. त्याने कधी नव्हे ते आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच... (२६)

शाळेची सहल असल्याने त्याने आदल्या रात्रीच सर्व तयारी करुन ठेवलेली. परंतु सकाळ उजाड़ताच... (१३)

करा आता पूर्ण पुढची कथा... तुम्हाला ५०% स्पेशल डिस्काउंट

२६ शब्द संयोजकांनीच खर्च केले Lol

परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच.......

लगोलग दुसरा किरण पडला... Lol
काय करणार .. प्रकाशाचा वेगच एवढा असतो. मध्ये काही करायचा चान्सच नाही मिळाला Lol

जमलं जमलं अखेर,
अनेक शब्द संयोजकांनी खाल्ले
अखेर माधुरीचे गाणे उपयोगी आले Lol