लेखन उपक्रम २ - आर यू रेडी? - मॅगी

Submitted by मॅगी on 26 September, 2023 - 07:21

बाकीचे अजून आले नव्हते, गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.

टीनेजर सावळी मुलगी, पिवळा स्वेटशर्ट, पाठीला काळ्या कार्टून म्हशीची कीचेन लावलेली सॅक. "आर यू रेडी टू गो?" तिने विचारले. "बसची वाट बघतोय." काही न सुचून तो म्हणाला. हल्ली स्ट्रेंजर डेंजर शिकवत नाहीत वाटतं. बसमध्ये त्याचं शेजारी लक्ष गेलं. तीच!

च्यायला! कार धड असती तर बसने यावं लागलं नसतं... "रेडी टू गो?" तिने सॅकमधली सुतळ गुंडाळत पुन्हा विचारलं.

तो वैतागून दुसऱ्या सीटवर बसला आणि स्टॉपवर उतरला. कंपनीत शिरल्यावर समोरच त्याचा फुलं, उदबत्त्या लावलेला फोटो होता. "आर यू रेडी टू गो?" तिने दारातून भराभर त्याच्याकडे येत विचारलं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भ न्ना ट !!
फिमेल यमदूत ...आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का.

चांगली जमलेय.
पण कारचा ॲक्सिडेंट वाचल्यावर कळून गेला शेवट.

अनेकदा अचानक गेलेल्या लोकांना कळत नाही म्हणतात. नेटफ्लिक्स्वरती सुनामीची एक फिल्म होती, जिच्यात, त्यांनी सांगीतलेले की जपानमध्ये अनेकदा असे लोक फिरत फिरत "घरी सोडा" असे सांगताना आढळतात. हे म्हणे सुनामीत गेलेले आत्मे असतात आणि सगळा सीनच बदलल्याने त्यांना स्वतःचे घर सापडत नसते.

मस्त!
रेड्याचं स्त्रीलिंग रेडी की काय? रेडी टू 'गो'? Lol

छान.
दुसर्‍या 'आर यु रेडी' ला समजलं. तुझा आयडी आणि लेडी यमदूत हे समिकरण पण जुळलं. म्हणजे तसं नाही... Lol तू वेगळं आणि चाकोरीबाहेरचं लिहिशील याची खात्री म्हणून हो! Proud
वावे Rofl

पहिल्यांदा म्हशीच्या कीचेनला अडखळले. नंतर त्याचा अर्थ कळला. छान आहे.

कारचा ॲक्सिडेंट वाचल्यावर कळून गेला शेवट. >>> +१

हेहे वावे, अमित.
धन्यवाद सगळ्यांना.
कविन, मामी थोडं संत्र सोलून दिलं होतं, कळतंय म्हटल्यावर बंद केलं परत Happy

>>>>>पहिल्यांदा म्हशीच्या कीचेनला अडखळले. नंतर त्याचा अर्थ कळला. छान आहे.
हे खासच होते आणि हा पॉइन्ट मी तरी ओलांडुन गेले होते म्हणजे कळला नव्हता मला.

भारी आहे Proud

पण कारचा ॲक्सिडेंट वाचल्यावर कळून गेला शेवट >>> अरे तुम्ही लोकं पॉज घेत घेत विचार करत वाचता का? मी तर भरभर वाचताना दोनचार सेकंदात पुढची दोनचार वाक्ये वाचून तसाही कळतोच शेवट Happy

अरे तुम्ही लोकं पॉज घेत घेत विचार करत वाचता का? मी तर भरभर वाचताना दोनचार सेकंदात पुढची दोनचार वाक्ये वाचून तसाही कळतोच शेवट Happy>> Lol पॉझ घ्यावा लागत नाही वेगळा

किचेन वर म्हैस हे वेगळ म्हणून नोटीस होतं आणि त्यानंतर ॲक्सिडेंट शब्द आला की किचेन म्हैस रेडी वरचा pun सगळं एकत्र फिट होतं. पुढचा शब्द वाचायच्या आत ब्रेन प्रोसेस पुर्ण करुन टाकतो नकळत Lol माझ्या ब्रेनच्या wiring चा दोष त्यात मॅगी नावाचा महिमा

मस्त! Happy

>>> रेड्याचं स्त्रीलिंग रेडी की काय? रेडी टू 'गो'?
हाहा वावे, माझ्याही डोक्यात तेच्च आलं! Lol

रेड्याचं स्त्रीलिंग रेडी >> +१ हेच डोक्यात आलं होतं. म्हशीचा उल्लेख वाचून धावत पळत आलो. छान आहे. म्हैस, बिजागरी वगैरे काही असेल तर काहीतरी नोटिफिकेशनची सोय पाहिजे.

हाहाहा ह पा!
ऋन्मेश, बदललं मी ते वाक्य.
करेक्ट सामो! म्हैस, फास, काळा रंग, पितांबर म्हणून पिवळे कपडे!
धन्यवाद सगळ्यांना Happy

मी एक मस्त पुस्तक वाचलेले. अ‍ॅनी लहानपणी एखादे नाणे लपवत असे व दूर कुठुन तरी बाण काढत "खजिन्याकडे चला" किंवा "पुढे गंमत सापडेल" असे लिहून व्यक्तीस तिथपर्यंत नेत असे. जर कोणी व्यक्ती त्या मार्गाने बरोब्बर माग काढत गेली तर त्या व्यक्तीस ते नाणे सापडे. नाणे ही काही फार मोठी गोष्ट होती अशातला भाग नाही. पण अ‍ॅनी म्हणते, अशे अनेक नाणी निसर्गात लपविलेली असतात आणि जर हे आपल्याला कळू शकले तर आपण श्रीमंत आहोत.

- अ‍ॅनी डिलर्ड यांचे २०१६ मधील नॉन्फिक्शन बेस्ट सेलर पुस्तक "टोट्ल एक्लिप्स" मधलीकल्पना आहे
.
तुमचे क्लु त्या आम्हाला असेच नाण्याकडे घेउन गेलेले आहेत.

छान (कसं म्हणायचं..) धक्कादायक आहे गोष्ट...!

माणसाला प्रत्येक गोष्टीचा मोह असतो..मग इतकी वर्षे ज्यात वास केला त्या शरीराचाही असेलच ना..?

फेसबूक वर एक क्लिप पाहिलेली. एक मुलगी अपघातात मरण पावल्यानंतर तिचे पार्थिव अंतिम संस्कारापूर्वीच्या सजावटीसाठी फ्युनरल मॅनेजर कडे येते. तेव्हा तिचा आत्मा आपण मृत झालो आहोत हे मान्य करायला तयार होत नाही. वाईट वाटते ते पाहून...

अकाली अचानक आलेले मरण इतरांना धक्का देतेच पण खुद्द त्या व्यक्तीलाही पटत नसावे .. शरीर सोडून जायला मन सहज तयार होत नसेल. तुम्ही हे ह्या कथेतून छान दाखवून दिले मॅगी !

अवांतर --
मला शिर्षक मजेशीर वाटतय Happy
आर यू रेडी? - मॅगी -- ----- > मग सारख २ मिनिटस म्हणावसं वाटत Happy दिवे घ्या .

सहीच!

“रेडी” आवडली आहे. यमाकडे आता gender neutral कामं आहेत हे बेस्टाय

म्हशीच्या बाबतीत नोटिफिकेशन यावे या हपांच्या मागणीला अनुमोदन Happy

Pages