(इथे वावरणाऱ्या समस्त स्त्रीवर्गास (आयडींसकट) आणि त्यांच्यासह सौजन्याने वागणाऱ्या समस्त पुरुषवर्गास समर्पित)
स्त्री असणं म्हणजे.....
सौंदर्यवती अप्सरा बनून कधी एखाद्या ऋषींचा तपोभंग..
कधी 'स्वयं' वर निवडण्याची मुभा, तर कधी जबरदस्तीचा संग!
'मर्यादा पुरुषोत्तमा'वर केलेली अमर्याद माया...
किंवा लड्डुगोपालावर धरलेली कौतुकाची छाया...
पतिनिष्ठा असूनही पावित्र्याची अग्निपरीक्षा उत्तीर्ण होण्याची अपेक्षा,
पाचांपैकी एकाकडे अधिक ओढा म्हणून स्वर्गाप्रत न जाण्याची शिक्षा!
तिसऱ्याच्या अपराधाबद्दल दीर्घकाळ शिळारुपाने साहिलेली उपेक्षा..
पुराणांतरी नि घरोघरी, सातत्याने(अनिच्छेने?) स्वीकारलेली तितिक्षा..
हेच आणि एवढंच आहे का स्त्री असणं..
जरा इथेही डोकावून बघूयात म्हणजे समजेल..
स्त्री असणं म्हणजे...
धैर्यशौर्यानं शत्रूंना जरब बसवणारी वीरवनिता - विश्पला..
आत्मबळावर इच्छामरणीं लय पावलेली मुक्ता- चित्कला..
आरोग्यसंवर्धन - रक्षणासाठी कटिबद्ध आनंदी - धन्वंतरी
आकांक्षेचे पर लेवुन झेपावलेली कुशल कल्पना - दिगंतरी
जीवरसायनतज्ज्ञ धीमती कमला विज्ञानविशारदा..
अनाथांची माय बनलेल्या शेकडो अन्नदा..
सेवाभावी काळजीवाहू अशा अनेक दाई..
निसर्गदत्त ममतेसह स्त्री जीवनगीत गाई....
आणखीन थोडं.. माझ्यापुरतं ..
स्त्री असणं म्हणजे :
बालपणी कधीकधी 'कुमारिका' म्हणून धार्मिक- कौतुक मिरवणं..
चतुर्भुज झाल्यावर जोडीदाराच्या समर्थ सोबतीवर सैलावणं..
कधीमधी 'लेडीज स्पेशल' ची मौजही गवसणं...
या साऱ्यातूनच स्वतःचा थांग लागत जाणं..
आणि
आईपणाचा अनुपम अवकाश अळुमाळू अनुभवणं ..
(संदर्भ - वैदिक वाङ्मय ते सद्यकालीन भारतीय कर्तृत्ववान / प्रसिद्ध / अवतीभवती असणाऱ्या स्त्रियांंसकट)
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
क्या बात है!!! अगं काय सुरेख
क्या बात है!!! अगं काय सुरेख आणि समर्थ चित्र चितारलयस प्राचीन. एकेक तासलेला पैलू.
>>>>आकांक्षेचे पर लेवुन झेपावलेली कुशल कल्पना - दिगंतरी
आहा!!
>>>> अळुमाळू अनुभवणं
नि:शब्द!
प्राचीन ही तुझी स्पर्धेतली
प्राचीन ही तुझी स्पर्धेतली एन्ट्री आहे ना?
"लेखन स्पर्धा-१" - असे हवे ना?
फारच सुंदर!
फारच सुंदर!
मला वाटतं स्त्री असण्याचे सर्व कंगोरे अचूक टिपलेत.
पुराणातील स्त्री पासून ते आधुनिक शास्त्रज्ञ त्या त्या काळातील आणि क्षेत्रातील एक एक मह्त्वपूर्ण स्त्री डोळ्यासमोर तरळून गेली.
>>>>स्त्री असण्याचे सर्व
>>>>स्त्री असण्याचे सर्व कंगोरे अचूक टिपलेत.
+१
मलाही सर्वजणी आवडल्या आणि कळल्या. फक्त कमला आणि विश्पला कळली नाही.
एवढा सुंदर धागा का मागे पडलाय
एवढा सुंदर धागा का मागे पडलाय?
सगळी गर्दी पाकृ वरती आहे
सगळी गर्दी पाकृ वरती आहे सध्या
होय. छान छान पाककृती येतायत.
होय. छान छान पाककृती येतायत.
बदल सुचवल्याबद्दल धन्यवाद गं
बदल सुचवल्याबद्दल धन्यवाद गं सामो. केलाय बदल शीर्षकात.
ममो, सामो, अज्ञानी आणि छन्दिफन्दि - धन्यवाद.
>>> वैदिक वाङ्मय ते सद्यकालीन
>>> वैदिक वाङ्मय ते सद्यकालीन भारतीय कर्तृत्ववान / प्रसिद्ध : अवतीभवती असणाऱ्या स्त्रियांंसकट
वा!
आनंदी जोशी, कल्पना चावला, कमला सोहोनी, सिंधूताई सपकाळ आणि 'सेवाभावी काळजीवाहू' म्हणजे मदर तेरेसा? - आधुनिक प्रातःस्मरणीय पंचकन्याच या.
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
मस्त
मस्त
स्वातीचाही प्रतिसाद फार आवडला
स्वातीचाही प्रतिसाद फार आवडला.