Submitted by आशिका on 22 September, 2023 - 09:34
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.
ती....भकास चेहर्याने शुन्यात नजर लावून बसली होती. रडून सुजलेले डोळे, अंगावरच्या कपड्यांची, विस्कटलेल्या केसांची शुद्धच नव्हती तिला.... याआधी अशा अगतिक अवस्थेत त्याने तिला कधीच पाहिलं नव्हतं. त्याला तिच्याकडे पाहवेना. उठलाच तो तिरिमिरीत.... तिला समजवायला.... "उठ गं, नीट तयार हो, अशी काय बसलीस?". एक ना दोन.. तिच्याकडून कसलाच प्रतिसाद नाही. हे काय होतंय तिला? माझ्या एका शब्दानिशी खुलणारी ती आज का अशी म्लान बरं?
हळूहळू बाकीचे येऊ लागले. गाडी येण्याची वेळ झाली म्हणे, हॉर्न वाजला. सारे वळले त्या दिशेने. ही कोण अनोळखी माणसं माझ्या घरात काय घेऊन येतायत? तिने हंबरडा फोडला, त्या लोकांनी शुभ्र चादरीत गुंडाळलेलं शरीर खाली ठेवलं.......त्याचं.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बाप रे!! खतरनाक आहे ही कथा.
बाप रे!! खतरनाक आहे ही कथा.
>>>>"उठ गं, नीट तयार हो, अशी काय बसलीस?"
इथे भरुन आलं.
जमलेय
जमलेय
डेंजर
डेंजर
जमलीय अगदी !
जमलीय अगदी !
जबरी जमली आहे.
जबरी जमली आहे.
छान.
छान.
जबरदस्त
जबरदस्त
अगदी ह्रदयस्पर्शी.
अगदी ह्रदयस्पर्शी.
जमली आहे गोष्ट आशिका
जमली आहे गोष्ट आशिका
जबरदस्त परिणामकारक कथा.
जबरदस्त परिणामकारक कथा.
बापरे!
बापरे!
जमली आहे कथा.
जमली आहे कथा.
धन्यवाद सर्वांना !!
धन्यवाद सर्वांना !!
अरेरे!
अरेरे!
जमलीय!!
जमलीय!!
जमलीये, खूपच परिणामकारक.
जमलीये, खूपच परिणामकारक.
अरे बापरछान:(
अरे बापरे
माझ्या दृष्टीने हि एक नंबर शशक... अगदी फिट्ट जमली आहे दिलेल्या ओळींसाठी. धक्कातंत्र जबरी! खूप खूप छान