लेखन स्पर्धा-२ - फिटे अंधाराचे जाळे... -- ऋन्मेऽऽष
लाखो करोडोंच्या गर्दीत मी एकटा होतो. ना पुरेशी हवा होती ना धड प्रकाश होता, अश्या रस्त्यावरून वाट फुटेल तिथे धावत होतो. सोबत धावणारे माझे भाऊबंद नाहीत तर स्पर्धक आहेत हे समजायला एक काळ जावा लागला. ना मी त्या सर्वात वेगवान होतो, ना सर्वात सशक्त होतो. नशीबवान तर बिलकुल नव्हतो. पण तरीही एक गुण होता माझ्यात. तो म्हणजे चिकाटी. ती मी शेवटपर्यंत सोडली नाही, आणि अखेरीस फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश म्हणत मी या जगात जन्माला आलो

...
पण आयुष्याचा संघर्ष ईथे संपला नव्हता तर सुरू झाला होता. माझाच नाही तर तुम्हा आम्हा सर्वांचाच ईथे सुरू होतो.
बालपणीचा काळ सुखाचा असे म्हणतात. माझ्या आयुष्यातील देखील तो सर्वात सुंदर काळ होता. पण त्यालाही संघर्षाची झालर होतीच.
दक्षिण मुंबईतील चाळीतले आयुष्य जगताना मी जी धमाल केली त्यावर शेकडो लेख लिहिले तरी त्याची शब्दांत मोजदाद होणार नाही. लिमिटेड रिसोर्सेस असूनही प्रोजेक्ट सक्सेसफुल केल्याचे समाधान वेगळेच असते. आयुष्याचेही असेच असते. हे सुख समाधान अनुभवायचे असेल तर तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येऊ नये. मी अगदी सोन्याचा नसला तरी चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेलो. एकुलता एक मुलगा. आईवडील दोघेही चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीत. चाळीतील शेजारच्या पाजारच्या लोकांपेक्षा सुखवस्तू म्हणावे असे घर.. पण फार काळ हे सुख टिकले नाही.
बालपणीचा जो काळ आपल्याला जेमतेम आठवतो तोपर्यंत आमची घरची आर्थिक परीस्थिती चांगली होती. पण वडिलांना नऊ ते पाच सरकारी नोकरीत रस नव्हता. व्यवसाय नेहमी खुणावत राहायचा. त्यासाठी जे गुणकौशल्य अंगी लागतात त्यातले काही त्यांच्याकडे होते. पण आयुष्य म्हटले की सगळेच कुठे मनासारखे घडते? बघता बघता डोक्यावर कर्जाचा डोंगर चढला. जो उत्पन्न आणि मालमत्तेपेक्षा वरचढ होता. त्यातून बाहेर पडायला कित्येक वर्षे जावी लागली. हा संघर्ष खरे तर माझ्या आईवडीलांचा. पण आता ते मायबोली सदस्य नसल्याने यावर लिहू शकत नाहीत आणि मी ते सविस्तर लिहिणे ऊचित होणार नाही. पण या सगळ्याची झळ माझ्या बालपणाला देखील बसली होती.
मारुती गाडीची तेव्हा मला फार क्रेझ होती. रस्त्याने मारुती जाताना दिसली की मी मोठ्याने मारुतीsss म्हणून ओरडायचो. घरची सुबत्ता पाहता लवकरच ती आपल्या घरात येईल अशी चिन्हे खुणावत होती. पण त्याच काळात परिस्थिती बदलू लागली आणि स्वतःचे खाजगी वाहन घेणे दूर, टॅक्सी परवडत नाही म्हणून तास दिड तास वेळ गेला तरी बसच्या रांगेत प्रतीक्षा करणे नशिबात आले. त्यातही अर्ध्या तासाचे अंतर असेल तर चालत जाऊन बसचे पैसे देखील वाचवावेत हे अंगवळणी पडले. कॅडबरी चॉकलेट आणि फ्रूटी वगैरे जंक फूड आहे, त्याचा हट्ट करू नये हे संस्काराचा भाग झाले. दिवाळी आणि वाढदिवस हे आयुष्यात नवीन कपडे मिळावेत म्हणूनच येतात ही आपली संस्कृती वाटू लागली. खेळणी हा प्रकार आयुष्यात मग कधी आलाच नाही. ज्याची बॅट त्याला एक्स्ट्रा बॅटींग दिली की आपल्याला फुकट खेळायला मिळते हा व्यावहारीकपणा समजला.
खरे तर भारतातील दारिद्र्य रेषेखालील जनता पाहिली तर त्या तुलनेत मी काही हलाखीचे जीवन जगत नव्हतो. पण तरी बालपणी जेव्हा समज येऊ लागली तेव्हा आर्थिक परिस्थिती डोळ्यासमोर बदलताना बघत होतो. तिच्यासोबत जुळवून घेत होतो. आणि त्याचमुळे वयाला न शोभणारा समजूतदारपणा अंगी येत होता.
केळा वेफर माझ्या फार आवडीचे. पण ते आईच्या पगाराच्या दिवशीच यायचे. ईतर दिवशी सुका खाऊ म्हणून परवडावे अशी एक सुकी भेळच उरली होती. जी मला फार आवडायची नाही. पण ओली भेळ जास्त किंमतीची असल्याने ती आवड मनातच ठेवायचो, आणि मला सुकी भेळच जास्त आवडते असे दाखवायचो, अन्यथा आपल्या एकुलत्या एक मुलाची आवड आपण पुर्ण करू शकत नाही याचे आईवडिलांना वाईट वाटले असते. माझ्यातील समजूतदारपणा दहा-बारा वर्षांचे असतानाच या लेव्हलला गेला होता
खाऊ असो वा कपडे, खेळणी किंवा गोष्टींची पुस्तके, वा मित्रांसोबत पिकनिकला जाणे, पार्टी करणे.. जिथे जिथे पैसा लागतो ते मी स्वेच्छेने टाळू लागलो. पण यात कुठेही माझे मन मारले जात नव्हते. अश्या प्रकारे आपण आपल्या आईवडिलांना मदतच करत आहोत असे वाटून एक वेगळाच आनंद मिळत होता. त्याचवेळी मित्रांसोबत खेळताना, चाळीतले सण उत्सव साजरे करताना, जी मजा येते ती विनामूल्य असूनही अमूल्य असते हे देखील उमगले होते.
जेव्हा कर्जाचा आकडा उत्पन्नापेक्षा जास्त असतो तेव्हा ते फेडायला काहीतरी चाकोरीबाहेरचे अन वेगळे करावे लागते. कधी ते जमते तर कधी फसते. आमचे फसले. यात वडिलांनी नोकरी काही काळासाठी सोडली. आईच्या पगारावर घरखर्च आणि कर्ज दोन्हींचा भार आला. स्वस्थ कसे बसणार म्हणून तिने उत्पन्नाचा अतिरीक्त सोर्स म्हणून शिवणकाम सुरू केले. कुठलेही काम छोटे किंवा मोठे नसते ही शिकवण त्या दिवशी जरी मला आईकडून मिळाली असली तरी ती फार काळ टिकली नाही. कारण यावरून घरात खडाजंगी झाली. कारण माझ्या आजीचे म्हणने असे होते की आपल्या घरात आजवर कोणी असे काम केले नाही. हे आपल्या घराण्याच्या प्रतिष्ठेला शोभत नाही. आधीच कर्जदार दारात आल्याने प्रतिष्ठा धुळीला मिळाली होतीच. त्यात अजून हे नको होते.
घराण्याची ती तथाकथित प्रतिष्ठा आईवर लादली गेली आणि ते काम सुरू होताच बंद झाले. वडिलांचे हातपाय झाडणे चालू होतेच. पण दर महिन्याचे ठराविक असे उत्पन्न नव्हते. कधी पैसे आले तर मेजवानी, आणि नसले तर उपवास. मोठे घर आणि पोकळ वासे म्हणावे तसे एकदा खरेच घरात खायला अन्नाचा दाणा नव्हता. विभागात दंगलींमुळे कर्फ्यू लागला होता. तरीही आई वडिलांना जीव धोक्यात घालून मामाकडे चालत जाऊन जेवण घेऊन यावे लागले होते.
हे सर्व घडत असताना माझ्या कैक मित्रांना वाटायचे की याचे आईवडील दोघे छापताहेत आणि हा एकुलता एक. याची तर ऐश आहे. माझे टापटीप राहणे आणि चेहर्यावर न दिसणारी गरीबी याला दुजोरा सुद्धा द्यायची. त्या मित्रांचे समज कायम ठेऊन आयुष्य जगायची सवय मला झाली होती.
हळूहळू वडिलांच्या प्रयत्नांना यश मिळू लागले तसे थोडेफार उत्पन्न वाढू लागले. पण ईतके नव्हते की आयुष्य स्थिरस्थावर होईल. दोन वेळच्या जेवणाची ददात मिटली असली तरी भौतिक सुखांपासून दूर होतो. डोक्यावरचे कर्ज अजूनही कायम होते. पण डोक्यावर हक्काचे छप्पर नव्हते. मुंबईत हक्काचा निवारा नव्हता. त्यासाठी जमवलेले पैसे केव्हाच खर्च झाले होते. जे एका घरात गुंतवलेले ते देखील कर्ज फेडायला काढून घ्यावे लागले. जे चाळीतले घर होते ते आजी-आजोबांचे होते. एकेक करत त्या दोघांनी या जगाचा निरोप घेतला. आणि त्याचसोबत आमच्यावर त्या घराचा निरोप घ्यायची वेळ आली. कारण आता त्या घराच्या आठ भावंडांमध्ये आठ वाटण्या होणार होत्या. पाच भावांच्या, तीन बहिणींच्या..
जानेवारी महिना संपत आला होता. माझी बारावीची बोर्डाची परीक्षा जवळ आली होती. मी डोंगरावर अभ्यासाला जायचो. एके दिवशी अभ्यास करून घरी आलो आणि घराला टाळे दिसले. घरचे सारे पोलिस स्टेशनला. रात्री कधीतरी ते टाळे उघडले आणि घरात प्रवेश मिळाला.
जोडून दोन रूम होत्या आमच्या. त्यापैकी एकीचे टाळे कायम ठेवले गेले आणि एका रुममध्येच प्रवेश मिळाला. तो देखील केवळ तीन महिन्यांपुरता. त्या मुदतीत घराच्या किंमतीईतके पैसे जमवायचे होते. ईतर सात भावंडांना त्यांच्या वाटण्या द्यायच्या होत्या. तरच घर ताब्यात येणार होते.
जे एवढे वर्षे दोन खोल्यांमध्ये राहत होतो तो संसार एका खोलीत आला होता. महिन्याभराने तो देखील रस्त्यावर येतो का अशी परिस्थिती होती. ज्या चाळीत आयुष्य गेले तिथून अशी सामानाची बांधाबांध करून जाणे सोपे नव्हते. वडिलांचे टेंशन त्यांनाच ठाऊक. त्यांनी काही टोकाचा निर्णय घेऊ नये हे आईचे टेंशन. माझ्या डोक्यावर बारावीचे टेंशन. आधीच मी एक वर्ष अभ्यास केला नव्हता म्हणून गॅप घेतली होती. दुसर्या वर्षातही मी अभ्यासाची टाळाटाळ केली होती. पोरगा चारचौघांपेक्षा हुशार म्हणून वडिलांच्या आशा माझ्यावर होत्या. त्या मी धुळीला मिळवणार होतो हे तेव्हा मला एकट्यालाच ठाऊक होते. माझे बारावीचे वर्ष म्हणून त्यांचे पैश्यांचे टेंशन ते कधी माझ्यापर्यंत येऊ द्यायचे नाहीत. दिवसभर तंगडतोड करून जेव्हा ते घरी यायचे, रात्री दबक्या आवाजात आईशी बोलायचे, तेव्हा एक वाक्य नेहमी माझ्या कानी पडायचे. ते म्हणजे विष खायलाही पैसे नाहीत.. आणि हे असे ऐकल्यावर माझ्या छातीवर येणारे दडपण मलाच ठाऊक.. त्या काळात कसले टेंशन नसलेच तर ते खोटी प्रतिष्ठा जपायचे नव्हते..
पुढचा महिना फार अवघड होता. रोज थोड्याफार फरकाने हेच चित्र होते. चाळीतली शेजारधर्माची संस्कृती म्हणून एक चांगले होते. शेजारचे लोकं चर्चेला यायचे, त्यांच्याशी बोलून मन मोकळे करता यायचे. हा आयुष्याचा शेवट नाही, यातूनही काही मार्ग निघेल असा ते धीर द्यायचे. वकिलाशीही बोलणे होत होते. बँकेच्या फेर्या होत होत्या. पण नुसते दिवस पळत होते. गरजेपुरते पैसे जमत नव्हते.
आणि मग अश्यावेळी बहिणी मदतीला धावून आल्या !
स्त्री असणे म्हणजे काय... हे पहिल्यांदा मला माझ्या आईने दाखवले. त्यानंतर आत्यांनी प्रचिती दिली. तीनही बहिणींनी मिळून आपला हिस्सा तेव्हा आम्हाला दिला. कुठलीही कागदपत्रे न करता, शक्य होईल तेव्हा फेडू या शब्दावर विश्वास ठेवून दिला. जे पैसे जमवायचे होते ते अचानक निम्मे झाले. आणि दडपण पुर्ण गेले. तेवढी तजवीज करणे देखील सोपे नव्हते, पण शक्य होते. जेव्हा जगण्याचे सारे दरवाजे बंद झाले होते आणि आयुष्य वेंटीलेटरवर गेले होते तेव्हा एका पाठोपाठ एक तीन खिडक्या उघडल्या होत्या.
आर्थिक परिस्थिती अचानक बदलली असे नाही, पण जगण्याची नवी उमेद मिळाली होती. मी मात्र आधीच माझ्या बारावीची वाट लाऊन बसलो होतो. याबद्दल सविस्तर गेल्या गणेशोत्सवात "कॉलेजचे ते मोरपिशी दिवस" या सदराखाली लिहून झाले आहे. पण तेव्हा विषय कॉलेज जीवनाचा असल्याने ते घडत असतानाची ही पार्श्वभूमी लिहिली नव्हती. घरची स्थिती अशी असताना वडिलांना माझ्याकडून शिक्षणाबाबत बरेच अपेक्षा होत्या. त्यांची मी शून्य पुर्तता करून देखील त्यांनी मला सांभाळून घेतले. कदाचित आयुष्यात जी अजून एक संधी त्यांना मिळाली तीच त्यांनी मला देखील दिली होती.
आज वेळ बदलली आहे पण पैश्याची खरी किंमत त्या त्या वेळेला असते. ज्या वेळी वडिलांना त्यांच्या बहिणींनी मदत केली त्याची परतफेड कितीही व्याज जोडले तरी पैश्यात होणार नाही. म्हणून वडील आजही कुठलाही हिशोब न ठेवता ते कर्ज फेडतच आहेत. आत्या नाही राहिल्या तरी त्यांच्या मुलांना गरजेनुसार मदत करतच आहेत.
आज त्या आठवणी उगाळून मन काही सुखावत नाही. पण आज आपण जिथे आहोत तिथे आधीपेक्षा सुखी आहोत हे जाणवते. इथून पुढे गेलो तरी पाय जमिनीवरच राहतील असा विश्वास राहतो, आणि इथून खाली घसरलो तरी तो निसर्गाचाच नियम म्हणून त्याला स्विकारण्याची हिंमत अंगी येते. आफ्टरऑल, वक्त बदलते देर नही लगती..
कुठेतरी वाचलेला, आवडलेला शेर शेअर करतो..
समय के एक तमाचे की देर है प्यारे...
फिर मेरी फकीरी क्या.. तेरी बादशाही क्या... !!
-----------------------------------------
आजच्या तारखेला देखील गेले चार महिने आयुष्यात एक टेंशन आहे. सध्या कोणाला काही सांगू शकत नाही. फक्त संबंधित व्यक्तींनाच ते ठाऊक आहे. पण टेंशन ईतके आहे की एकदा ते विचार मनात येऊ लागले की घश्याखाली घास उतरत नाही. छातीवर दडपण ईतके येते की आता फुटून जाईल असे वाटते. ईतका वाईट अनुभव आयुष्यात या आधी कधी घेतला नव्हता. टेंशन घेणे हा माझा पिंडच नव्हता. पण ही परीस्थिती वेगळीच आहे. जे मी नेहमी सहजपणे आनंदीच राहत होतो ते आता ओढून ताणून आनंदी राहायचा प्रयत्न करत आहे. स्वत:लाच फसवायचा प्रकार चालू आहे.
त्यामानाने गेले तीनचार आठवडे या दडपणाला झुगारून नॉर्मल लाईफ जगायचे प्रयत्न चालू आहेत. कधी ना कधी मी यातून बाहेर पडेन आणि सारे काही सुरळीत होईल हा विश्वास स्वतःला देत आहे. मायबोलीच्या या गणेशोत्सवाला एक स्ट्रेसबस्टर म्हणून घेत आहे, डोक्यातले विचार जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कागदावर कसे उतरवता येईल हे बघत आहे.
डायलॉग फिल्मी आहे, पण विश्वास ठेवलात तर त्यामागचा अर्थ अस्सल आहे. आणि तेच माझ्या मनाला पटवून देत आहे, की खरेच बॉलीवूडच्या एखाद्या पिक्चरसारखेच आपल्या आयुष्यात देखील शेवटी सगळे चांगलेच होते. बोले तो, हॅपी एंडींग्ज..!
आणि जर चांगले झाले नाही..,
तर समजावे तो शेवट नाही..
पिक्चर अजून बाकी आहे माझ्या मित्रांनो.. आयुष्य अजून बाकी आहे !!
सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
सर्व नवीन प्रतिसादांचे
सर्व नवीन प्रतिसादांचे धन्यवाद.
प्रत्येकाचे नाव घेऊन धन्यवाद द्यायला हवे होते, पण तसेच करतोय असे समजा. कारण आजवर ईतके धागे काढले, ईतके चांगले वाईट प्रतिसाद आले, मी तर नकारात्मक प्रतिसादातही धन्यता मानायचो, पण आजवर ईतके छान कुठल्याही धाग्यावरचे प्रतिसाद बघून वाटले नव्हते.
आज काहींना प्रतिसाद देतो.
@ असामी, हो
@ असामी, हो
खरे आहे. मला शेअर करायला आवडते. मी फार विचार करत नाही पर्सनल गोष्टी शेअर करायला. पण असे प्रेजेंट टेन्स मधील चालू टेंशन कधी शेअर केले नव्हते. ते नको वाटते. कारण मला समोरून आलेले कौतुक आणि सहानुभुती दोन्हींनी संकोचायला होते. म्हणून थोड्यावेळाने मला वाटले, नसते ते लिहिले तरी चालले असते. त्यात ते कोणाला खोटे वा स्टंट वाटले असते तर त्याचा कदाचित एक वेगळा त्रास झाला असता
म्हणून मी माबो ब्रेक घ्यायचे ठरवले. जे फक्त एकच दिवस जमले. आज आलो तर ईथले प्रतिसाद वाचून छानच वाटले आणि जाणवले की मी चुकीचा विचार करत होतो. मला चुकीचे ठरवल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद
@ झकासराव,
@ झकासराव,
सध्या अपवाद आणि शाहरूख वगळता मी अरबट चरबट धागे काढणे सोडून दिले आहे. झाल्यास लेखनात जाऊन गेले वर्षभरातले धागे बघू शकता. तरी अजून सुधारणेला वाव आहे हे मान्य
@ हपा,
समस्यांचं अस्तित्व अॅक्सेप्ट करायचं बळ >>>> कर्रेक्ट आहे. समस्या असणारच. मी सुद्धा त्या ग्रुहीत धरूनच जगायचो, आणि आपण प्रत्येक समस्येला हसत खेळत घेत आनंदी राहू शकतो असे मला वाटायचे. पण सध्याच्या या समस्येने माझा अहंकार जरा दूर केला. पण ठिक आहे, प्रोसेस मी तीच फॉलो करत आहे. या समस्येला आपल्या जागी ठेवून आनंदाने जगायला हळूहळू जमतेय
@ आशूचँप, छान प्रतिसाद,
@ आशूचँप, छान प्रतिसाद,
<< पण ते दिवस जे शिकवून गेलेत त्यामुळे आजही कधी हात सोडून पैसे खर्च करायला जीव धजावत नाही. >>>
अगदी अगदी. पण बायकोने असे दिवस न पाहिल्याने ती सोडते हात सैल. त्यामुळे मला ती उधळी वाटते आणि तिला मी काटकसरी
@ केशवकूल,
स्वताच्या कौतुकाने नाही तर स्वताचाच मूळ लेख आणि ईथले प्रतिसाद वाचून बळ मिळेल येत्या काही दिवसात. जे गरजेचे आहे 
<< निवडक दहात जपून ठेवत आहे. >>>> धन्यवाद, मी स्वतः देखील हा धागा निवडक दहात घेतला आहे
@ अस्मिता,
या लेखात त्याबद्दलही लिहिणार होतो, पण हे लिहून मन शांत झाले आणि थांबलो. पण सध्या मन गुंतवायचे आहे लिखाणात, जर वाटले मनापासून लिहावे तर ते देखील लिहायचा विचार आहे 
<<< तुझ्यामुळे क्रॉन्स डिसीजबद्दल कळलं होतं>>> हो, मलाही माझ्यामुळेच या आजाराबद्दल कळले होते
सर्वांचे पुन्हा एकदा आभार
ऋन्मेऽऽष, मलाही तू लिहितोस ते
ऋन्मेऽऽष, मलाही तू लिहितोस ते सर्वच आवडते. खोडकर, टाइमपास, अरबट चरबट सर्वच.
हा लेखही आवडलाच. अगदी निखळ आणि नितळ.
इतक्या आतला ऋन्मेष आमच्याशी शेअर केल्याबद्दल थॅंक्यू.
आणि येस्स, पिक्चर अभी बाकी है दोस्त!
ऋ, खराखुरा व्यक्त होतोस
ऋ, खराखुरा व्यक्त होतोस तेव्हा काहीतरी अफाट लिहीतोस. गेल्या वर्षीच्या तुझ्या लिखाणातूनही हाच प्रत्यय आला आणि या वर्षीही.
तुझी सगळी टेन्शन्स तुझ्या उरावरून जाऊन लवकरात लवकर इथे टाइमपास करायला तू मोकळा होवोस अशी सदिच्छा करते
ऋन्मेऽऽष... खुप चांगले लिहले
ऋन्मेऽऽष... खुप चांगले लिहले आहे. खरच खुप कष्ट घेतले आहेत.
तुझी सगळी टेन्शन्स लवकरच दुर होतिल
रमड, साहिल आणि वंदना
रमड, साहिल आणि वंदना
मनापासून धन्यवाद
@ वंदना, मला देखील मी लिहीत असलेले सर्व प्रकारचे आवडते. किंबहुना त्यातून आनंद मिळतो म्हणून लिहितो. पण वाचकात प्रत्येकाची एक आवड असते. तिचा आदर करावा. बाकी इतर लिखाणातून आनंद मिळाला तरी खरे समाधान असे काही मनातले उतरवले आणि त्यावर असे प्रतिसाद आल्यावरच मिळते हे देखील तितकेच खरे
खूप रेलेटेबल आहे हे. शुभेच्छा
खूप रेलेटेबल आहे हे. शुभेच्छा!!
हा माझा दुसरा प्रतिसाद आहे.
हा माझा दुसरा प्रतिसाद आहे.
ऋन्मेष.. आधी तर वाचून मीच इतकी निराश झाले होते. पण आता इतके छान छान प्रतिसाद आणि तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच वाचून खूप बरं वाटलं. या हृदयीचे त्या हृदयी पोचले म्हणायचे..
तुम्हाला मनाला स्पर्श करणारे लिहिता येतं असेच लिहिते रहा..
दसा
दसा
धन्यवाद कवितेसाठी, अजून एक आवडता कवी.
नेहमी चांगल्या लोकांना का
नेहमी चांगल्या लोकांना का अश्या त्रासदायक पीडादायक गोष्टी वाट्याला येतात हां प्रश्न नेहमीच देवाला विचारावासा वाटतो. मग आठवते कुठेतरी वाचलेले की सहृदयी लोकांचे सर्व भोग तो परमात्मा त्या व्यक्तिस सहन करण्याची आणि लढण्याची ताकद असते तेव्हाच / तरुण वयात लवकर भोगुन संपवतो. आणि साहजिकच पुढचा सर्व जीवन काल शांति सुख समृद्धिने व्यापुन ठेवतो.
ऋ तुमच्या येणाऱ्या काळात सर्वच क्षण कायम शांती सुख समृद्धिने व्यापुन राहो हीच बाप्पा चरणी केलेली ह्यावर्षीसाठी प्रार्थना ! If you expect the unexpected all the time, nothing will disappoint you. तुमच्या लिखाणांतील निरागस खोडकरपणा असलेला बालभाव नेहमीच इतर लेखापेक्षा वेगळेपण दर्शवतो.
ऋन्मेष,खूप सुरेख लिहिलंय
ऋन्मेष,खूप सुरेख लिहिलंय.बरेचसे रीलेट झाले.
आईवडील दोघेही नोकरीत असूनही आता जसे मुलांचे लाड केले जातात तसे अजिबात झाले नव्हते.मात्र आईने सहवासाने म्हणा किंवा भावनिक आधार देऊन म्हणा भरपूर कसर भरून काढली.शाळेतून तिच्यासोबत येताना होणाऱ्या गप्पागोष्टी, साखरेपेक्षा गोड म्हणून चिकू गळ्यात मारणारा चिकूवाल्याकडचे चिकू नाहीतर चणे दाणे खात खात घरी येत असू.मात्र साहित्यासंघात होणारी जवळजवळ सर्व बालनाट्ये
आईमुळे पाहिली.घराशेजारच्या गल्लीतले मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय,बालभवन,मरीन ड्राईव्ह,चौपाटीवर जाणे , मैत्रिणींशी खेळणे याने त्यावेळचे जीवन खरंच समृद्ध होते.
खेळ वगैरे फारसे नव्हते. समोरच्या bldg मधल्या मैत्रिणीकडे कॅरम असायचा.आम्ही तिच्याकडे जायचो.त्यात donhipakshi वैषम्य वाटले नाही.पुढे माझ्या मुलाला कॅरमची ही गोष्ट सांगितल्यावर तो म्हणाला" म्हणजे आई तुम्ही गरीब होता का?" 1मिनिट चकित झाले,नंतर हसहस हसले. म्हणाले गरीब होतो की नाही माहीत नाही पण आनंदात होतो.
Sorry खूपच अवांतर झाले.
आशुचँप प्रतिसाद फार आवडला.
ऋन्मेष, होमियोपथीत स्टेस दूर करणारी औषधे आहेत.जरुर वापर.मी स्वतः बरेचदा फटकन chidayache,मी काही काळ त्यावर औषध घेतले होते. सध्याच्या विवंचनेतून लवकरच बाहेर येण्यासाठी तुला खूप शुभेच्छा !
ऋन्मेष,खूप सुरेख लिहिलंय
ऋन्मेष,खूप सुरेख लिहिलंय.बरेचसे रीलेट झाले.
आईवडील दोघेही नोकरीत असूनही आता जसे मुलांचे लाड केले जातात तसे अजिबात झाले नव्हते.मात्र आईने सहवासाने म्हणा किंवा भावनिक आधार देऊन म्हणा भरपूर कसर भरून काढली.शाळेतून तिच्यासोबत येताना होणाऱ्या गप्पागोष्टी, साखरेपेक्षा गोड म्हणून चिकू गळ्यात मारणारा चिकूवाल्याकडचे चिकू नाहीतर चणे दाणे खात खात घरी येत असू.मात्र साहित्यासंघात होणारी जवळजवळ सर्व बालनाट्ये
आईमुळे पाहिली.घराशेजारच्या गल्लीतले मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय,बालभवन,मरीन ड्राईव्ह,चौपाटीवर जाणे , मैत्रिणींशी खेळणे याने त्यावेळचे जीवन खरंच समृद्ध होते.
खेळ वगैरे फारसे नव्हते. समोरच्या bldg मधल्या मैत्रिणीकडे कॅरम असायचा.आम्ही तिच्याकडे जायचो.त्यात donhipakshi वैषम्य वाटले नाही.पुढे माझ्या मुलाला कॅरमची ही गोष्ट सांगितल्यावर तो म्हणाला" म्हणजे आई तुम्ही गरीब होता का?" 1मिनिट चकित झाले,नंतर हसहस हसले. म्हणाले गरीब होतो की नाही माहीत नाही पण आनंदात होतो.
Sorry खूपच अवांतर झाले.
आशुचँप प्रतिसाद फार आवडला.
ऋन्मेष, होमियोपथीत स्टेस दूर करणारी औषधे आहेत.जरुर वापर.मी स्वतः बरेचदा फटकन chidayache,मी काही काळ त्यावर औषध घेतले होते. सध्याच्या विवंचनेतून लवकरच बाहेर येण्यासाठी तुला खूप शुभेच्छा !
ऋ, ह्या लेखाला सगळे छान छान
ऋ, ह्या लेखाला सगळे छान छान येतायत प्रतिसाद पण टीका ही भरपूर सोसावी लागते त्याला. तो कधी चिडत नाही, लिहायचं सोडत नाही हा ही मोठ्ठा च गुण आहे त्याचा. असो. मला त्याचं लेखन नेहमीच आवडत .
सर्व नवीन प्रतिसादांचे
सर्व नवीन प्रतिसादांचे धन्यवाद,
आज सकाळी उठल्यावर हाच विचार करत होतो की कालच्यापेक्षा आज छान वाटतेय, आजच्यापेक्षा उद्या छान वाटेल.
@ मानसी,
आपल्या दुसर्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद, तो दिलात हे छान केलेत. आपल्या सुरुवातीच्या प्रतिसादांनीच मला विचारात पाडलेले की संयोजकांनी ईतका छान विषय दिला आहे, पण मोकळे आकाश ऐवजी माझा लेख अंधाराचे जाळे वर तर नाही ना रेंगाळत आहे. म्हणून ते शेवटी लिहून चुकलो का असे वाटत होते. पण पुढच्या प्रतिसादांनी आणि आपल्या पुन्हा आलेल्या प्रतिसादाने देखील उरली सुरली शंका मिटली
@ अज्ञानी,
<<< If you expect the unexpected all the time, nothing will disappoint you. >>> खरे आहे. मी सुद्धा दिवस चांगले चालू असताना नेहमी वाईटासाठी तयार राहावे असे मनाला बजावत असतो. फक्त हे बोलणे सोपे असते, अंमलात आणने कठीण. स्पेशली मनात येणार्या विचारांना आवर घालणे ईतके सोपे नसते. पण म्हणून प्रयत्न सोडू नये. माझा मूळ स्वभाव इमोशनल, सेन्सिटीव्ह आहे ज्याचा त्रास होऊ नये म्हणून मी जास्तीत जास्त प्रॅक्टीकल वागायचा, राहायचा प्रयत्न करतो.
@ देवकी,
@ देवकी,
तुमच्या प्रतिसादातील बालपणीच्या आठवणी बरेच रिलेट झाल्या.
औषधे सुचवल्याबद्दल धन्यवाद. पण स्ट्रेससाठी ती घ्यायची वेळ येऊ नये. बहुधा मी पिक पॉईट पार केला आहे त्याचा. आता काळ हेच औषध, ईतर काही चांगले घडेलच आयुष्यात, किंबहुना पोरांमुळे ते दर दिवशी घडतेच
@ ममोताई,

छान लिहिलंय
..
छान लिहिलंय
छान लिहिलंय
अगदी मना पर्यंत पोहोचले.
मी एवढेच म्हणेन की
ए बुरे वक़्त !
ज़रा “अदब” से पेश आ !!
“वक़्त” ही कितना लगता है
“वक़्त” बदलने में…
वाह निलेश, हा मी सुद्धा ऐकला
वाह निलेश, हा मी सुद्धा ऐकला होता

प्रतिसादाबद्दल धन्यवाद
सॉरी मी तुम्हाला डिस्अपॉइन्ट
सॉरी मी तुम्हाला डिस्अपॉइन्ट केलं. असं व्हायला नको होतं. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास..
यापुढे कोणालाही प्रतिसाद देताना तशी काळजी घेईन..
स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
छे हो, इतके काही नाही..
छे हो, इतके काही नाही..
आता तुम्ही फार विचार करू नका
जास्त विचार करणे (overthinking) हे बरेचदा दुःखाचे त्रासाचे कारण ठरते असे नुकतेच एकाच्या व्हाट्सअप स्टेटसला वाचलेले ते आठवले
विघ्नहर्ता तुमचे सद्य टेन्शन
विघ्नहर्ता तुमचे सद्य टेन्शन दूर करो
विघ्नहर्ता तुमचे सद्य टेन्शन
..
(No subject)
खूप प्रामाणिक लेखन आणि
खूप प्रामाणिक लेखन आणि त्यामुळेच मनाला भिडणारं !!
तुमच्या आयुष्यात आलेलं अन्धाराचं जाळं लवकरात लवकर फिटून मोकळे आकाश तुम्हा सर्वांना लाभो ही प्रार्थना.
खूप प्रामाणिक लेखन आणि
खूप प्रामाणिक लेखन आणि त्यामुळेच मनाला भिडणारं !!
तुमच्या आयुष्यात आलेलं अन्धाराचं जाळं लवकरात लवकर फिटून मोकळे आकाश तुम्हा सर्वांना लाभो ही प्रार्थना.>> खरंय.
धन्यवाद आशिका आणि प्राचीन !
धन्यवाद आशिका आणि प्राचीन !
देवकी, निलेश, माझेमन या तिघांचे प्रतिसाद डबल पडल्याने वाटत आहे की बाप्पा धाग्यावरचे प्रतिसाद वाढवत आहेत
अभिषेक, तुझ्या साऱ्या अडचणी
अभिषेक, तुझ्या साऱ्या अडचणी दूर होवोत ही बाप्पाकडे प्रार्थना!
काही गरज पडल्यास हक्काने सांग रे. मुलांना याची झळ लागू नये हि सदिच्छा
हो नक्की सामी..
हो नक्की सामी..
आणि त्यांना झळ मी लागू ही देणार नाही
खरे तर तेच स्ट्रेंथ आहेत माझी
Pages