चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-४ - मी पाहिलेले देऊळ

Submitted by संयोजक on 22 September, 2023 - 04:04

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू..

आजचा विषय - मी पाहिलेले देऊळ

मंडळी, आपल्याला मनःशांती हवी असेल तर आपसूकच पावले देवळाकडे वळतात. मंदिर, मग ते कोणत्याही देवतेचे असले तरी तेथे जाऊन दर्शन घेतल्यावर मनाला वेगळेच समाधान लाभते. प्रत्येक देवळासोबत एक कथा किंवा वैशिष्ट्य निगडित असते. काहींची स्थापत्य शैली खास असते, तर काही देवळे तिथल्या दैवतासाठी प्रसिद्ध असतात. तुम्ही कोणते देऊळ पाहिले आहे? इथे प्रकाशचित्र द्या आणि सोबत त्याचे वैशिष्ट्य/माहिती लिहिलीत तर उत्तमच!

खेळाचे नियम आणि अटी
१.प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचे कुलदैवत - नेवासे येथील मोहीनी राज मंदिर...

IMG_20220625_150739.jpg

bhalkateerth.jpg
भालकातीर्थ - गुजरात येथील श्रीकृष्ण मन्दीर. ज्या पिंपळ वृक्षाखाली योगनिद्रेत असतांना भगवान श्रीकृष्णाना बाण लागला आणि त्यांनी आपले अवतारकार्य संपवले, त्या वृक्षाच्या पायथ्याशी श्रीकृष्णाची त्याच योगनिद्रेतील मूर्ती स्थापन केली आहे. भालक याचा अर्थ बाण, म्हणून हे भालकातीर्थ. या पिंपळ वृक्षाच्या हिरव्या फान्द्या कळसातून बाहेर आलेल्या दिसत आहेत, अर्थात अजुन तो वाढतच आहे.

वाह मस्त विषय. मला वेगवेगळ्या मंदिरांचे फोटो काढायला फार आवडते. त्यासाठी अगदी वाकडी वाट करून जावे लागले तरी जातेच. सो भरपूर फोटो आहेत.
सुरूवातीला फलटणचे जबरेश्वर मंदिर
Screenshot_20230922_190825_Gallery.jpg

आशिका मस्त फोटो आहे. खुजेपण किंबहुना विश्वातील, आपले नगण्य स्थान दाखवून देणारे ईश्वराचे विराट रुप. खुजे शब्दाला नकारात्मक छटा आहे. त्यामुळे तो शब्द बाद केलेला आहे.

कोकणातलं आमचं ग्रामदैवत ..पुढे पाच दीपमाळा दिसत आहेत.
. ही देवळ अशीच असतात उतरत्या छपराची, घरासारखी दिसणारी ...सभोवतीची हिरवाई आणि नीरव शांतता...
FB_IMG_1695396866045.jpg

हे महाबळेश्वर चे जुने कृष्णाबाई देऊळ. महाबळेश्वर देवळाजवळ आहे. प्राचीन पण सुंदर आहे. इथे शंकराची पिंड आहे ती सुद्धा जरा वेगळीच आहे. जमिनीपासून उंचावर.
इथून दिसणार्‍या व्हॅलीचा व्ह्यू पण छान आहे.
Screenshot_20230922_200157_Gallery.jpg

वाह सुरेख प्रसन्न सर्वच.

कोकणात हेमाताईंनी लिहील्याप्रमाणे कौलारु देवळं जास्त असतात. आजुबाजुला असंच निसर्गसौदर्य असतं.

वरचं मोहीनीराज मंदीर बघितलं आहे, श्रीरामपुरला रहात असताना नेवासे इथे जाणं व्हायचं. शांतादुर्गाही एकदा बघितलं आहे. बाकी सर्व नवीन माझ्यासाठी.

कोकणात गणपतीपुळे येथेही जाणं झालंय दोन तीनदा.

मशीद ?

मग ये यथा मां प्रपद्यन्ते …… वगैरे कल्पावे Happy

हाहाहा होय.
हे पृथानन्दन ! जो भक्त जिस प्रकार मेरी शरण लेते हैं, मैं उन्हें उसी प्रकार आश्रय देता हूँ; क्योंकि सभी मनुष्य सब प्रकारसे मेरे मार्गका अनुकरण करते हैं।

आक्रमणांपासून वाचायला देवळांवर मशिदी सारखे घुमट बांधत असत ना? >> होय, कवळ्या च्या शांता दुर्गा मंदिराला ही असे मशिदी सारखे घुमट आहेत.

Screenshot_20230922_103657_Gallery.jpg

भुलेश्वर मंदिर, यवत. इथले घुमट मशिदी सारखे बांधलेले आहेत म्हणे. मंदिराचे संरक्षण व्हावे म्हणून.

मस्त फोटो सगळे. प्रसन्न वाटलं एकदम. ममो तुमचा गावातल्या देवळाचा फोटो विशेष आवडला.

IMG-20230923-WA0011.jpg

हा फोटो कदाचित विशेष नाहीये, पण हे देऊळ नक्कीच माझ्या खास जवळचं आहे. मुदुमलाई टायगर रिजर्व मध्ये एक मसिनागुडी नावाचं छोटंसं गाव आहे. गावाच्या बाहेर एक मारवाखंडी नावाचं धारण आहे, आणि त्या धरणाच्या शेजारीच गावाच्या वेशीच्या बाहेर हे एक साधंसं गणपतीचं देऊळ. या गावातल्या जवळपास अडीच-तीन वर्षाच्या वास्तव्यात हे देऊळ माझ्या रोजच्या आयुष्याचा एक भाग होतं. पहिल्या पगारातून घेतलेले पेढे याच गणपतीला अर्पण केले होते. फोटो मध्ये आलं नसलं, तरी देवळाच्या आवारात एक अतिशय जुन, मोठ्ठ पिंपळाचं झाडही होतं. अतिशय प्रसन्न आहे हे देऊळ. या धाग्याच्या निमित्ताने हे शेअर करावंसं वाटलं.

Pages