उसत्वाचा माहौल आहे. गंभीर, क्लिकबेट, चर्वित चर्वण प्रवण लेख पाडायचा विचार रहीत करून थोडी चंमतग. कष्ट न घेता अक्षरशः पोस्ट पाडल्यामुळे गोड मानून घ्यावे ( दुसरा पर्यायच नाही ) .
जास्त गांभिर्याने घेऊ नये ( हेवेसांनल ) तसेच कुणाच्या भावना दुखावल्यास क्षमा असावी.
********************
वाण्याला हिनं विचारलं
" भैय्या, रहते कहा हो ?"
" भाभीजी, यही दुकान मे रहते है "
" अकेले ?"
" नही जी, बच्चे (कामगार) होते है ना साथ मे "
" तो फिर खाना ?"
" कुछ नही भाभीजी, सामने से चपाती ले कर आते है, और आचार के साथ हम सभी खाते है, कुछ नही लगता"
" और भाभी, बच्चे ?"
"वो है ना गांव मे"
" उनको नही लाने वाले ?"
" ऐसा है ना, बीवी आ गयी तो बोलेगी आज मै ये सब्जी बनाती, वो बनाती
फिर ये लाओ , वो दो, मसाला दो, लसन दो, प्याज दो, तेल दो, मिट्टी का तेल दो, आटा दो, गेहू दो, चावल दो....
सब दो दो दो..
फिर बच्चे के अॅडमिशन के लिए पैसा दो,
पूना मे अच्छे कपडे पहनने पडते तो सारी के लिए पैसे दो, गहने दो, चूडी दो, बिंदी दो, नथनी दो
मूवी के लिए पैसे दो, टीव्ही दो, केबल दो "
ही हसायला लागली.
मी पण कंट्रोल आल्ट डिलीट करत राहिलो.
" ऐसा ही रहता, बीवी आयी तो सिर्फ दो दो दो दो दो , अभी हमको कुछ नही लगता. बस चपाती का खर्चा है "
वाणी बेरकी होता. सतत माझ्याकडे बघून बोलत होता.
माझ्या चेहर्यावरचे विलक्षण कंट्रोल केलेले भाव त्याला केव्हांच समजलेले होते. बेनी असतात ही मंडळी.
जर आता फिस्स झालं कि घरी गेल्यावर फणा काढून फिस्स होणार हे त्याला माहिती असतं..
तरीही
मी पण हिच्या कडे बघितलं.
बरेच दिवस दागिने बनवले नाहीत म्हणून शांत आवाजात धमकी आलीच होती.
बरं , गेल्याच महिन्यात चार ड्रेसेस, साड्या घेतल्या तरी कुठेही समारंभाला जाताना माझ्याकडे कपडेच नाहीत हे ऐकायला यायचंच.
पूर्वी वाटायचं ही मुद्दाम चिडवतीये.
पण जेव्हां मुलगी मोठी झाली आणि त्रागा करून बोलू लागली,
" अगं आई माझ्याकडे काहीच नाही ना घालायला "
मग तिला मॉलमधून आणलेला तो ड्रेस, ऑनलाईन मागवलेले ते कपडे , अनलिमिटेड मधे रविवारीच घेतलेले कपडे... ते कुठेहेत असे विचारता विचारता माझं शिक्षण होत गेलं.
मुलीने बापाला शिकवून सोडलं.
आता कुठे जायचं म्हटल कि आपोआप, " ड्रेस आहे कि घ्यायचाय असा प्रश्न केला जातो"
लहानपणापासून तिघेही भाऊ, शहरात येऊन न्युक्लीअर फॅमिलीत वाढल्याने स्त्री म्हणजे काय याचं शिक्षणच झालं नाही.
आता सर्वसाधारण कोणकोणते नियम स्त्री ला लागू होत नाहीत याचा अंदाज आला आहे.
तरीही सगळेच समजले असं अजाबात नाही.
रस्त्यावर पण स्त्रिया अस्तित्व ठळक करतातच.
त्यामुळं पण भरपूर शिकायला मिळतं.
स्त्री म्हणजे
( धडकन हा सिनेमा शिल्पा शेट्टीच्या साड्या बघण्यासाठी बायका जायच्या हे मला अलिकडेच समजलं. तेच म्हटलं सुनील शेट्टीला बॉयफ्रेंड दाखवलेला सिनेमा एव्हढा कसा चालला ? )
सोशल मीडीयावर
स्त्री म्हणजे
अजून बरंच काही ( भर घालाच मंडळी )
असं जरी असलं तरी
न मागता काही हवं ते घेऊन दिल्यावर गळ्यात पडणारी,
उड्या मारत आनंदी होणारी
प्रेम करायला शिकवणारी
आपण जन्माला घातलेली स्त्री म्हणजे
आद्या, चारुलता, , देविका, अदिता, आद्रिका, भाव्या, आर्वी, चन्नान, अबोली, फहीमा, इनाया, अलिशा, कॅरोलिन,दर्पाली, आशी, दीपशिखा, आशनी, धरती, आगम, धृती, आयलीन, झूनी, गार्गी, मैत्रेयी , इरा.....
आणि सबकुछ !!
-
वाह!! फार मजा आली वाचताना.
वाह!! फार मजा आली वाचताना.
>>>>>फोटोवर लगट करणार्या कमेंण्ट करणार्यांना इशारे देणारी (पण लिस्टीतून कधीही न उडवणारी) कोमलहृदयी फाल्गुनी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
फु-ट-ले हो आचार्य!!! हे असं सिक्रेट फोडायचं असतं होय!
>>>>>>>जर आता फिस्स झालं कि घरी गेल्यावर फणा काढून फिस्स होणार हे त्याला माहिती असतं..
इथेही खूप धमाल आली.
>>>>बेनी असतात ही मंडळी.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्ही एक व्लॉग (vlog) सुरु करा. या अशा विसंगती टिपणारा निदान सांगणारा. खूप सब्स्क्रायबर्स मिळतील.
एकदा मी कुठेतरी लिहीलेले की
एकदा मी कुठेतरी लिहीलेले की -
मला "अभी ना जाओ" अधिक आवडतं याचे कारण एकतरगाणे कृष्ण-धवल रंगात आहे, अन दुसरे साधनाचे कानातले, साडी छान आहेतच पण तिच्या चेहर्यावरचे भाव इतके मोहक आहेत. केवळ लाजवाब! अर्थात देवानंदचे हट्टी भाव, उतू चाललेला मिष्किलपणा यांनी एकदम बहार आणली आहे. देवानंदच्या चार्मबद्दल तर विचारायलाच नको - एकदम आय-कँडी , चॉकलेट हिरो ; ) परत त्याचा चालूपणा, मॅनिप्युलेशन एकदम जीवघेणं आहे.
एका मिष्किल आय डीने ताबडतोब फक्त 'कानातले-साडी' हे शब्द उचलून मला साष्टांग नमस्काराची स्मायली प्रतिसादात दिलेली - ते आठवले.
खूप हसू आलेले. बट सम वीमेन कॅनॉट हेल्प पिकिंग अप सच डिटेल्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
न्युक्लीअर फॅमिलीत वाढल्याने
न्युक्लीअर फॅमिलीत वाढल्याने स्त्री म्हणजे काय याचं शिक्षणच झालं नाही....... Phd झाली की राव!
हा टेक आवडला, पुरुषांच्या
हा टेक आवडला, पुरुषांच्या नजरेतून![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>>>डावा सिग्नल देऊन
>>>>>>डावा सिग्नल देऊन उजवीकडे वळणारी झाशी कि रानी![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अजुन एक असच - पुश-पुल मध्ये नेहमी धांदरटपणा करणारी
रघ्वाचार्य... भन्नाट.. मस्तच.
रघ्वाचार्य... भन्नाट.. मस्तच..
आधुनिक यक्षांना पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत की तुमच्याकडे..
सामो, देवकी, अनिंद्य. आणि
सामो, देवकी, अनिंद्य. आणि अनिरुद्ध धन्यवाद
अन दुसरे साधनाचे कानातले, साडी छान आहेतच >>>
यईच तो पॉईण्ट है ना ! ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तुम्ही एक व्लॉग (vlog) सुरु करा. या अशा विसंगती टिपणारा निदान सांगणारा. >>> सूचनेबद्दल आभार. व्लॉगवाल्यांची अवस्था वाईट आहे सध्या
त्यात आणखी एक भर ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नीचे दिए गए बटन पर क्लिक करे , चॅनल पर नए हो तो सबक्राईब करे आणि त्यांची ती खतरनाक थंबनेल ! ये तो धागेका विषय बनता है.
Phd झाली की राव! >>
Phd झाली की राव! >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
इस फिल्ड मे सभी अनाडी होते है
आधुनिक यक्षांना पडणाऱ्या सर्व प्रश्नांची >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अजुन एक असच - पुश-पुल मध्ये
अजुन एक असच - पुश-पुल मध्ये नेहमी धांदरटपणा करणारी>> हे सगळेच करतात. मी पण![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
र. आ. तुमच्या पोस्ट्स बऱ्याच
र. आ. तुमच्या पोस्ट्स बऱ्याच वेळेला गमतीदार, उपहासात्मक असतात. आवडतात.
पण " स्त्री असणं म्हणजे.." मध्ये तुम्ही जे stereotyping kelay ते अजिबात रूचल , पटलं नाही.
माझ्या बघण्यातल्या ८० -९०% महिला तरी वर तुम्ही सांगितलेल्या यादीतल काहीही करत नाहीत..
ते अजिबात रूचल , पटलं नाही. >
ते अजिबात रूचल , पटलं नाही. >>> कल्पना आहे. उत्सव आहे म्हणून आधीच क्षमा मागितलेली आहे. तरीही तुमच्या म्हणण्याचा रिस्पेक्ट आहे.
वेगळा फॉर्म खूप छान!
वेगळा फॉर्म
खूप छान!