Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47
https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वीट माऊई!
स्वीट माऊई!
कोकोनट आणि ओड्याचे किस्से पण मस्त.
माऊई इज सो स्विट!
माऊई इज सो स्विट! त्याचा फोटो किवा व्हिडियो नाहि टाकलास बरेच दिवसात
"हे डेन्जरस आहे, आधी सोड,
"हे डेन्जरस आहे, आधी सोड, आत्ता बंद कर" असं ओरडत होता ऑलमोस्ट Lol पण हेच किंवा यापेक्षा मोठी , लाउड मशीन्स नवर्याने किंवा मुलाने हाताळली तर मात्र चालते त्याला. "हे रोजचेच आहे " असा चेहरा करून दुर्लक्ष करतो! Happy .>>>>>>>>>>> so cute .....भरपूर किसेस टू
माऊइ .
मस्त किस्से सगळे.
मस्त किस्से सगळे.
मै, अपने नाजूक हाथोंको कोई
मै, अपने नाजूक हाथोंको कोई काम ना दो असं म्हणायचं असेल त्याला. किंवा ज्याचा पसारा त्यानेच तो क्लिन करावा असा बाणेदारपणा दाखवायचा असेल त्याला.
हा हा हा, माव्या म्हणजे
हा हा हा, माव्या म्हणजे कार्टून आहे एक
आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूप जास्त लक्ष असतं त्यांचं आपल्याकडे
मुलगी होस्टेलला गेल्यावर किती बिचारा झाला असेल
च्रप्स, तुम्ही आणि ऋन्मेषने
च्रप्स, तुम्ही आणि ऋन्मेषने मिळून शाहरुख आणि त्याच्या पाळीव प्राण्यांकरता वेगळा धागा काढा ना. हा धागा माय्बोलीकर आणि त्यांच्या चार पायांच्या फॅमिलीकरता राहू देत. आम्हांला त्यांची मजा मजा वाचण्यात जास्त इंटरेस्ट आहे.
माऊई,सो स्वीट!
माऊई,सो स्वीट!
@ maitreyee - माझा मुलगापण
@ maitreyee - माझा मुलगापण हॅास्टेलला गेला, सिंबा त्याला खुप मिस करतो. रोज सकाळी वरती जाऊन त्याच्या रूम मधे चेक करतो आणी तो तिथे नाही म्हणून ऊदास होऊन परत येतो.
व्हीडीओ कॅालवर त्याचा आवाज ऐकला कि परत वरती जातो त्याच्या रूममधे.
बिचारा त्याला खुपच मिस करतोय महिना झाला तरी
हो ना फार मिस करतात ते! माउई
हो ना फार मिस करतात ते! माउई चे कोपिंग मेकॅनिजम बहुतेक तिच्या बेड मधे जाऊन झोपणे हे आहे सिंबा पण तेच करत असेल बहुतेक.
काल आम्ही डे ट्रिप केली तिच्या कॉलेज ला. माउई ला कँपस वर शिरल्यावर बहुतेक लक्षात आले असावे इथे तिला ड्रॉप ऑफ केल्याचे, कारण ती यायच्या आधीच कार च्या खिडक्यांमधे आळिपाळीने बाहेर बघत कुई कुई करायला लागला! तिला लांबून पाहिल्यावरच दोन पायावर उभे राहून दरवाजा स्क्रॅच करत लवकर उघडा अशी धडपड करायला लागला. हे पहा हॅपी रियुनियन :
हरितात्या, तुमच्या लेकाचे कॉलेज जवळ आहे का? ड्राइव्हेबल असेल तर अशी विजिट करता येते अधून मधून. फ्लाय करण्याइतके लांब असेल तर अवघड जाणार अजून.
किति क्युट
किति क्युट
पहिल्या दोन फोटोत कसला खुष
पहिल्या दोन फोटोत कसला खुष झालाय गडी, आनंद ओसंडून वाहतोय
नंतर मात्र सिरियस झालाय
पण त्यांना दिवस, कालावधी कळत नाही असं माझं निरिक्षण, म्हणजे तुम्ही दोन दिवसांनी भेटा अथवा दोन वर्षांनी, त्यांना ते सेमच असतं.
ओड्याचा आजचा किस्सा
ओड्याचा आजचा किस्सा
आमचे मेन लोखंडी गेट कुणीतरी जाताना उघडं ठेवलं आणि दुपारी भटक्या भूभूंची गँग आत शिरली. ते आले ते आमच्या घरापाशी येऊन आत डोकावायला लागले. ओड्या इतका एक्साईट झाला, लगेच येऊन मला म्हणाला, बाबा माझे फ्रेंड्स आलेत माझ्याशी खेळायला, त्यांना आत घेऊया का मी बाहेर जाऊ?
म्हणलं दोन्ही होणार नाहीय. गुपचूप बसायच आणि त्यांनी बाहेर जायचं. त्यांना हुसकलं तरी जात नव्हते, मग प्रत्येकाला एक दोन बिस्कीटांची लालूच दाखवत बाहेर काढावं लागलं. दोन बिस्किटे आमच्या बाळाने पण हादडली तेवढ्यात.
मला चाललं असतं खेळू द्यायला पण सध्या सगळे हिटवर आहेत आणि त्यांचे खेळ म्हणजे एकदम ए सर्टीफिकट वाले सुरु होतात, त्यामुळे बिग नो
आणि तुम्ही त्यांचं सेन्सॉर
आणि तुम्ही त्यांचं सेन्सॉर बोर्ड.
म्हणाला, बाबा माझे फ्रेंड्स
म्हणाला, बाबा माझे फ्रेंड्स आलेत माझ्याशी खेळायला..... अरे देवा,एक मिनिट खरंच वाटले.
तुम्ही त्यांचं सेन्सॉर बोर्ड.....
तुम्ही त्यांचं सेन्सॉर बोर्ड
तुम्ही त्यांचं सेन्सॉर बोर्ड
काय करणार, लक्ष ठेवावं लागतं मुलावर
देवा,एक मिनिट खरंच वाटले.>>>
खरंच म्हणाला तो असं, बाकीच्यांना फक्त भौ भौ ऐकू येतं, बाळाच्या आई बाबांना बरोबर कळतं ते काय म्हणत आहेत ते
@maitreyee दोन तासावर आहे
@maitreyee दोन तासावर आहे कॅालेज, पण रोजचं भेटणं आणी कधीमधी यात त्याच्यासाठी खुप फरक आहे.
@आशुचँप - हिट असो वा नसो, पण ईतर गोष्टी जसे की फ्लीज यांचा मोठा त्रास होऊ शकतो भटक्यांमुळे तेव्हा त्यांच्यात नकोच
नाही ऐकत ते, माझी गाडी दिसली
नाही ऐकत ते, माझी गाडी दिसली की पळत येतात
त्यातल्या काळ्या आहे तो फारच लाघवी आहे
मी एकदा असाच आलो बाहेरून तर पळत आलं लांबून, म्हणलं नाहीये ओड्या तर माझ्या मागे जाऊन शोधायला लागला
म्हणलं आता काय खिशात ठेवणारे की मी त्याला
इतका पण बारीक नाहीये तो
मग गेला पळून
ओड्या असेल तर मग दोघेही ऐकत नाहीत, 5 मिन का होईना दोघांना भेटू द्यावं लागतं, सारख हिडीस फिदीस करायला पण नको वाटतं
टी-शर्ट वाला सिंबा
टी-शर्ट वाला सिंबा
हिरो आहे सिम्बा.
हिरो आहे सिम्बा.
मैत्रेयी, गोड किस्सा. मस्त फोटो.
आशुचॅम्प, अरे बापरे , न्युटरिंग केल्यापासून कोकोनट जवळजवळ 'संत' झाला आहे.
Cilu_atticus कुणाचं भुभू आहे? मी फॉलो करतेय.
कोकोनटला रोज सकाळी नदीकाठी गर्द जंगलातून फिरायला मजा येतेय. सगळीकडे वास घेत , हरणांना बघत , पाण्यात खेळत दोन वर्षांच्या बाळासारखं बागडतोय. घरी परत यायचं नसतं. गाडी भोवती गोलगोल फिरतो, आत उडी मारत नाही. एअरपॉडवर हलक्या आवाजात व्यंकटेश सुप्रभातम् लावून याच्यासोबत पक्ष्यांचा किलबिलाट , गर्द झाडी, जरठ वृक्षांची नदीच्या पात्रात पडलेली प्रतिबिंब, किंचित धुकं , अतिशय शांततेत रम्य नदीकाठी फिरताना अक्षरशः निर्वाणपदी जाता येते. फार वेगळी अनुभूती येते.
*
*
*
*
अस्मिता सुंदर लिहीलयस. फोटोही
अस्मिता सुंदर लिहीलयस. फोटोही फार सुंदर आहेत. खरच रम्य परिसर आहे ग.
हो मी इंस्टा वर पाहिलेले,
हो मी इंस्टा वर पाहिलेले, म्हणलं कसले लकी आहेत
एकदम सुंदर परिसर मिळलाय फिरायला
अस्मिता, किती सुंदर!!
अस्मिता, किती सुंदर!!
हेलो हेलो, नॉक नॉक आम्ही
हेलो हेलो, नॉक नॉक, म्याऊ म्याऊ आम्ही पुण्याहून बोलतोय आम्हाला अडॉप्ट करणारे कोणी आहे का? आम्ही एक महिन्याचे आहोत आणि आम्ही चिकन, दही, कॅटफूड वगैरे वगैरे खातो. विशेषतः सहकारनगर, कात्रज, बिबवेवाडी, सिंहगड रोड इत्यादी भागातून कोणी असेल तर.
कसले क्युट आहेत
कसले क्युट आहेत
चौघं भावंडं एका घरी जावी.बरं पडेल.मॉम ओके आहेत का दत्तक द्यायला?
हो ती आता फार दखल घेत नाही
हो ती आता फार दखल घेत नाही त्यांची. थोडीफार काळजी घेते ते सुद्धा अजून आठ दहा दिवसांनी बंद होईल. तिला सुद्धा यांच्या सोबत घेऊन जाऊ शकत असतील कोणी तर उत्तमच आहे
(सॉरी मी आधीच्या पोस्ट न वाचता हि पोस्ट मध्येच टाकली आहे. जरा गडबडीत)
फारच गोड आहेत. पुण्यात असते
फारच गोड आहेत. पुण्यात असते तर दोन बाळं नक्की नेली असती. देताना शक्यतो दोन-दोन भावंडं एकत्र द्या. दोन बोके, दोन मांजरी आहेत का?
अस्मीता.,
अस्मीता.,
Cilu_atticus हा आमचा (मीआंणि झारा) भुभु आहे तोही कोकोनटला फॉलो करतो इन्स्टावर.
आईग्गं किती गोड पिल्लं. इथे
आईग्गं किती गोड पिल्लं. इथे असते तर खरंच घेतलं असतं. विचार सुरू आहे सॅमीला कोणीतरी कंपनी म्हणून घ्यावं का?
सिंबा कोकोनट ओडीन क्यूट!
सेन्सॉर बोर्ड. हाहा.... मुलं २ पायाची नायतर ४ पायाची असेना आई बाबा सगळ्यांचे सारखेच...
सॅमी काल इतकी मजेशीर लपली होती ब्लँकेटखाली. माझी क्लिनर आल्यामुळे वर व्हॅक्यूम वगैरे जोरदार चालू होतं त्यामुळे बाईसाहेब बेसमेंट मधे तासन तास बसल्या होत्या. ब्लँकेटमधून कान बाहेर दिसत होते आणी नजर कंप्लिटली दुसरीकडेच
Cilu_atticus हा आमचा (मीआंणि
Cilu_atticus हा आमचा (मीआंणि झारा) भुभु आहे तोही कोकोनटला फॉलो करतो इन्स्टावर.
>>>>ओह समीर, मला काही (भुभू-आयडी) लिंकच लागत नव्हती व कोणीतरी स्ट्रेंजर समजून खूपच विचार करून रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली. थॅंक्स.
बास्केट मधल्या माऊ खूप गोड.
अंजली, व्हॅक्यूम ला कोकोनटही खूप घाबरतो, थेट सोफ्याच्या मागे जातो. लहानपणी घाबरायचा नाही, खूप भुंकायचा, आता शूरवीर राहिला नाही.
थॅंक्स सामो, आशुचॅम्प व सुनिधी.
Pages