-------------------------------------- अन्यत्र पूर्वप्रकाशित -----------------------------------------
"Harvest Moon: A Wisconsin Outdoor Anthology" या पुस्तकातील - "Unendangered species" या ललीत लेखाचा स्वैर अनुवाद -
.
बरेचदा राहून राहून वाटते की मानवाने , निसर्गाला गुलाम बनविण्यात काही तृटी सोडल्या आहेत. हां आता हे अगदी १००% म्हणता येणार नाही कारण हेच घ्या ना निसर्गावर अधिकार गाजविण्यात काही चांगले निष्पन्न झालेच नाही असे नाही. उदाहरणार्थ saber - toothed वाघ. या प्रजातीचे निर्मूलन झाले हे उत्तमच आहे. मला या प्राण्याचे उच्चाटन झाल्याची खंत अज्जिबात वाटत नाही कारण गरीब हरणाच्या शिकारीस सुसज्ज होउन निघालेल्या शिकार्यास या saber - toothed वाघाच्या भीतीने भोवताली पाळत ठेवावी लागत नाही हा केवढा मोठा फायदा आहे. स्व-प्रजातीचे नियमन करण्याचा मानवाचा दुसरा उपाय आहे युद्ध. वा किती कार्यक्षम अन यशस्वी उपाय आहे.
.
अर्थात लहान मोठ्या चुका ज्या झालेल्या आहेत त्या म्हणजे - दूत-कबुतरांसारखा उपयुक्त पक्षी जेव्हा धोक्यात आला तेव्हा आपले पूर्वज निव्वळ बघ्याची भूमिका घेउन बसले, काडी हलवली नाही. अजून एक तापदायक गोष्ट ही की जळवा, डास व राजकारणी यांचे निर्मूलन ना पूर्वज करू शकले ना आपल्या हातात आहे. अशा बाबी क्षुल्लक अन दुर्लक्षणीय अजिबातच नाहीत. ते एक असोच.
निवृत्ती नंतर 'नष्टप्राय होऊ घातलेल्या' व 'नष्ट झालेल्या' प्रजातीं कडे विशेष लक्ष पुरवायचे काम मी मनावर घेतले. याचे कारण केवळ हेच की जे अधिकारी या प्रजातीं चा विदा गोळा करतात, राखतात ती ही माणसच की हो. अन त्यांना मदत करणे , त्यांच्या चुका दुरुस्त करणे हे जागरूक नागरिकाचे परम व आद्य कर्तव्य असलेच पाहिजे अशी उपरती मला निवृत्ती नंतर लवकरच झाली. आपण आपल्या परीने या लोकांना विदा द्यावा, अशी इच्छा जागृत झाल्याने मी तत्काळ मनावर घेतले.
.
तुम्हाला वाटले असेल की हे काम तर सोप्पे आहे परत समाजोपयोगी असल्याने , उच्चपदस्थ अधिकारी आनंदले असतील, किमान त्यांनी सहकार्याचा हात पुढे केला असेल. पण कसचं महाराजा, हे काम अजिबातच सोपे नाही. आता २ उदाहरणेच देतो ना मग तुम्हीच ठरवा मी बरोबर होतो की ते नाठाळ अधिकारी.
.
परवाच मी "पुणे हरित वनीकरण" खात्याला फोन लावला. मी त्यांना हे सांगितले की आपल्या 'नष्ट होऊ घातलेल्या' प्रजातींची यादी मी कसोशीने नजरेखालून घातलेली आहे. अन मला त्यात एक त्रुटी आढळली आहे. ती म्हणजे "सुतार" पक्षी या यादीत नाही. तो तेवढा घाला. यावर माझे कौतुक करण्याचे सोडून, त्या फोनवरच्या माणसाने मलाच गंभीरपणे सांगितले की - "सुतार पक्षी हानष्ट्प्राय होण्याच्या मार्गावर तर नाहीच उलट या पक्ष्याच्या हजारो जोड्या ही प्रजाती चालविण्यास अविरत कार्यरत आहेत." हे ऐकून मलाच प्रश्न पडला की हा अधिकारी मला काय मूर्ख समजतो काय? मग मी उलटून त्यांनाच उदाहरण दिले की हे पहा रोज भल्या पहाटे ६ वाजता एक सुतार येउन आमच्या बंगल्याच्या पत्र्याच्या पाइपवरतॆ ट्ण्ण टण्ण टणत्कार करत बसतो अन माझी रोज झोपमोड होतेय. आता जर माझी सटकली ना तर मी माझी छर्याची रायफल घेउन अंगणात जाईन अन हा पक्षी endangered वरून एकदम extinct होउन जाइल. यावर तो अधिकारी एकदम गप्पच बसला, त्याला काय बोलावे तेच कळेना अन मग आमचा वाद बराच वेळ असाच चालू राहिला व शेवटी तो अधिकारी काकुळतीला येउन म्हणाला "अहो भाउसाहेब, सुतार पक्षी endangered नाहीये हो." मी शेवटी त्याचा नाद सोडला हां आता नष्ट होण्याआधी त्या सुताराला पूर्वसूचना देणे मी माझे कर्तव्य समजत होतो अन मी ते बजावले होते.
.
हे असे उच्चपदस्थ लोक जेव्हा तर्कविसंगत वागून त्यांचे निर्णय सामान्य जनांवर लादतात ना तेव्हा खरं तर उठावाच व्हायला हवा. पण असो मी माझ्या परीने प्रयत्न चालूच ठेवला. या अनुभवानंतर मी ताबडतोब "पुणे हरित वनीकरणा" विभागाच्या ३ याद्या मागविल्या - unendangered , endangered अन extinct . त्यांचा अभ्यास करताना मला लक्षात आले की या कोणत्याही यादीत "चिंबुल" पक्षी नाही. मग मी ताबडतोब फोन उचलला अन नेमका त्याच अधिकार्याने फोन उचलला. त्यालाही मी चांगला लक्षात होतो. मी त्याला म्हटले "अहो काय हे तुमच्या तीनही यादीत "चिंबुल" पक्षी कसा नाही? हा फार ओळखीचा पक्षी असून तो कोणत्या ना कोणत्या यादीत असायलाच पाहिजे होता. यावर त्या अधिकार्याने मला निर्वाळा दिला की "जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी-घरी-बाहेर-आकाशात-पाण्यात-जमिनीवर ...... कोठेही असा पक्षी नाही. ना त्याने पाहिला आहे, ना ऐकला, ना वास घेतला, ना चव घेतली आहे."
"अरे काय हे! हेच्च अगदी हेच्च वर्णन मी "रात्री मारल्यानंतर , सकाळी येणार्या Hangover बद्दल म्हणू शकतो की. पण म्हणजे Hangover नसतो का?" यावर तो अधिकारी निरुत्तर अधिक हतबल झाला. एकदा तो गप्पा झाल्यावर मी त्याला सांगितले "काय्ये ना या पक्षाचे डोके असते शेपटीला अन शेपूट असते डोक्याला त्यामुळे तो उलटा उडतोय असे वाटते. मग त्यामुळे कोणीही शिकारी त्याची शिकार करू शकत नाही. अन फार चपळ पक्षी हो एकदम वेगाने उडून जातो की फ़ोटोत येणेही अशक्य. त्यामुळेच उघड आहे ना की ना फ़ोटोत ना भुस्सा भरलेला कोणीही हा पक्षी असा स्पर्श करून पाहिलेला नाही. पण एक सांगता येईल की याची मादी दिसते अगदी चिमणी सारखी अन नर दिसतो अगदी बुलबुलच जणू. यावर तो अधिकारी चक्रावला. मला अधिकच जोर चढला. तो विचारता झाला तुम्ही कुठे पाहिलात हा?
त्यावर मी उत्तरलो "छे छे मी कुठला पहायला बंडूने पाहीला. एकदा नाही तब्बल १२ वेळा. अहो पाषाण तलावापाशी बंडू अन मी असेच शिकारीस गेलो असताना बंड्याने ११ ते १२ वेळा हा पक्षी पाहिला. अन बंडू खोटं बोलणार नाही किंबहुना बंडू च्या प्रामाणिकपणाबद्दल ब्रह्मदेवही संशय घेणार नाही. तरी मी बंडूला म्हटले की अरे तू चिमणी किंवा बुलबुल मारताना १२ वेळा नेम चुकलास का? तर बंडू म्हणाला असा कसा नेम चुकेल तो? तेही खरय म्हणा बंडू एकदम आमच्या ग्रुपमधला नामवंत शिकारी आहे. तो नेम चुकणे केवळ अशक्य आहे. बंडू ठासून म्हणाला की तो पक्षी १२ वेळाही "चिंबुल" च होता. अन मागे मागे उडत असल्याने त्याच्यासारख्या निष्णात शिकार्या नेम चुकला. बंडू जे बोलतो त्यावर वाद घालायची आपली टाप नाही. त्यामुळे माझी तरी खात्री आहे की "चिंबुल" पक्षी आहे. अन तुम्ही तो कोणत्या ना कोणत्या यादीत घातलाच पाहिजे.
.
पुढे बर्याच दिवसांनी गप्पा मारताना आमच्या गृपमध्ये मला कोणीतरी सांगीतले की "पुणे हरित वनीकरण" अधिकार्यांनी म्हणे पुण्यातील पेन्शनर्स चा धसका घेतला आहे. खर्याची दुनियाच नाही राहीली.
अस्तित्व धोक्यात आलेल्या पक्ष्यांच्या प्रजाती आणि मी (रुपांतरीत विनोदी कथा)
Submitted by सामो on 18 September, 2023 - 06:29
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारी आहे कथा!!चिंबुल काय
भारी आहे कथा!!चिंबुल काय
तो बहुतेक त्या राजाच्या सदऱ्यासारखा फक्त पुण्यवान माणसांनाच दिसला असावा.
थँक्स अनु
थँक्स अनु
खरं तर एक कथेतील्/रुपांतरातील
.
मस्त आहे. सामो, तुम्ही परवा
मस्त आहे. सामो, तुम्ही परवा कुठेतरी हे पुस्तक सुचवलं..तर मी लगेच मागवलंय. वाचलं की सांगेन कसं वाटलं ते!
रायगड खूप आभार.
रायगड खूप आभार.
मस्त कथा आहेत यात. मिडवेस्टच्या खेड्यात राहील्याने, तेथिल लोकांच्या गप्पा ऐकून आहे. शिकारीचा सीझन कधी सुरु होणार, रेनबो ट्राऊटस पकडणे, उन्हाळ्यात बोटी बाहेर काढणे.
तुम्हाला हे पुस्तक आवडेल अशी आशा करते.
----------------------------
जमल्यास, त्याच पुस्तकातील या रुपांतरीत, कथाही वाचा -
बस्स! जास्त मागणं नव्हतं
मासेमारीचा छंद - तीन पिढ्या
Mast!
Mast!
धन्यवाद देवकी.
धन्यवाद देवकी.