कुठला चित्रपट बघताना कधी रडलायत का?

Submitted by छन्दिफन्दि on 16 September, 2023 - 21:13

कॉमेडी, हॉरर, ऍक्शन किंवा मसाला चित्रपटांबद्दल बऱ्याचदा लिहिलं, बोललं जात, चर्चा रंगतात.
या वेळी इमोशनल / भावनावश चित्रपटाची चर्चा करूया.
मराठी, हिंदी किंवा इंग्रजी कुठला चित्रपट बघताना कधी रडलायत का?
कुठल्या दृश्याला?
रडणे म्हणजे ओक्सा बोक्शी किंवा डोळे पुसायला रुमाल / tissues लागेल असेच नाही, डोळे भरून येणे किंवा मन हेलावणे हेही चालेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Stepmom
सुझन आणि जुलिया मधील मुलिच्या लग्नाचा डायलॉग, ती मुलीसाठी गोधडी शिवते किंवा जुलिया फोटो सेशन करते. किती तरी प्रसंग अतिशय पॉवर फुल आहेत. आणि अतिशय उत्कृष्ट अभिनय

मासुम -
जुगल हंसराज शबानाला बॉक्स बनवतो, नासिर त्याला परत हॉस्टेल मध्ये घेऊन जातो, तुझसे नाराज नाही जिंदगी गाणं, खूप प्रसंग अतिशय सुंदर घेतलेत.

लहानापणी - ४थीत किंवा त्याहून लहान असताना, 'संत ज्ञानेश्वर' सिनेमात, ज्ञानेश्वर समाधी घेतात तेव्हा रडलेले आहे. नंतर कोणत्याही सिनेमात नाही Happy
एवढीच आमची चित्रपट-साक्षरता Wink

सदमा बघताना शेवटच्या सीनला रडलो होतो.

गुंडा बघताना एकेका पात्राच्या इंट्रो सीनला रडलो होतो. काय काव्यप्रतिभा!

कल हो ना हो , आनंद बघताना रडलेले आठवतेय...

शोले मध्ये बच्चन मरतो तो सिन...

बॉर्डर मध्ये सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना साठी रडू आले होते...

ऐ गुज़रने वाली हवा बता
मेरा इतना काम करेगी क्या
मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे
मेरी गाँव में है जो वो गली
जहाँ रहती है मेरी दिलरुबा
उसे मेरे प्यार का जाम दे
उसे मेरे प्यार का जाम दे

वहीं थोड़ी दूर है घर मेरा
मेरा घर में है मेरी बूढ़ी मा
मेरे मा के पैरों को छुके
उसे उसके बेटा का नाम दे

बॉर्डर मध्ये सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार साठी रडू आले होते.>>
बॉर्डर मध्ये अक्षय कुमार पाकिस्तानच्या बाजूने लढत होता का? म्हणून दिसला नसेल कदाचित

तारें जमीन पर
उडान
मासूम
हॅमिल्टन
भाग मिल्खा भाग
ला ला लॅन्ड

सदमा- जितक्या वेळा पाहते तितक्या वेळा शेवटी नाही रडणार अस ठरवूनही रडते.
तारे जमी पर - मां गाणं आणि चिठ्ठी आयी है हे गाणं

तारे जमी पर - मां गाणं आणि चिठ्ठी आयी है हे गाणं>> +१
सदमा>> सुन्दर

एकेले हम एकेले तुम >>>
आमिरखानची हतबलता

एरिन ब्रोक्विच >>>
जुलिया म्हणते "मला भूक नाही" कारण पैसे नसतात,
ती रात्रभर काम करून सकाळी झोपली असते, आणि मुलाला ती इतकं काय आणि कुणासाठी काम करतये हे कळत तेव्हा तो मुलगा पटकन "तुझ्यासाठी काय आणू विचारतो ..?"

लहानपणी एकदा टिव्हीवर 'दो आंखे बारह हाथ' बघितला तेव्हा मी आणि माझी मावसबहीण दोघी ओक्साबोक्शी रडलो होतो. रडण्यात थोडा ड्रामा निर्माण करण्याचाही भाग असावा कारण सिनेमा बघून खूप दुःख झाल्याने आम्ही आता जेवणार नाही असा पवित्रा घेतला होता असं अंधूक आठवतंय.

नंतरमीतरीनक्कीचजेवलेअसणार.

आनंद
नामक हराम मधील मैं शायर बदनाम
घातक मधील सनी आणि अमरीश चा हॉस्पिटल मधील सीन
शोले
शूल मधील मनोज वाजपेयी रविना चा सिन
ओंकारा चा क्लायमॅक्स
रंग दे बसंती चे लुका छुपी बहुत हुई गाणे

अर्रे 'मन हेलावणे' हे आत्ता वाचलं- हां तसं मन हेलावलय - आनंद, दो आंखे बारह हाथ, आंधीही, ज्यूलीतही टिन एज प्रेग्नन्सी हा विषय असल्याने कससच झालेलं. मासूम.

लहानपणी चित्रपट खूप कमी पाहिले, त्यात अनेकदा रडलो.
नंतर साधारण वय १३-१४ नंतर क्वचित.

अंधा कानून मध्ये अमरीश पुरी आपण मेलोय असे दाखवण्यास एका हमाली करणाऱ्याला (की तत्सम गरीब कामगाराला) खाऊ पिऊ घालून डोक्यात दगड घालून मारतो त्या सीन मध्ये.

QSQT मध्ये दलीप ताहील आमिर अजून जुहीच्या प्रेमात आहे आणि तिच्या घरी गेला होता, आणि हे गोगा कपूर त्याला फोनवर सांगुन धमकी देतो तेव्हा भयंकर संतापतो.
आलोकनाथ त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो पण हा म्हणतो "येऊ दे घरी, एवढा बडवून काढेन."..

रात्री उशिरा अमीर घरी येतो, सगळे भयंकर टेन्स. मग अमीर बाबूजी करत रडत त्याला मिठी मारतो, त्याच्याही डोळ्यात पाणी येते म्हणतो "जाओ सो जाओ, कल बात करेंगे". या सिन मध्ये.

जितेन्द्र सरांचे बरेचशे सिनेमे. दोन बायकांमध्ये बिचाऱ्याची जी ओढाताण व्हायची ते पाहून बेक्कार रडायला यायचे.

दोन ?
सात चं रेकॉर्ड आहे गाण्यात. हा घ्या पुरावा .

नाही हो ! सात वर थांबतील तर मग जितूजी कसले ?
https://www.youtube.com/watch?v=3RyAE_1Ftdo

तमाम नवरे मंडळींच्या काळजाचा ठोका चुकवणारे शब्द आहेत. थेटर मधे सगळे डोळे पुसत असतात.
कसली सिच्युएशन !!

बंदिवान मी ह्या संसारी: आशाकाळेचे हाल बघवत नव्हते.. काळजात चर्र झाले..डोळ्यात पाणी आले..

छान धागा !
मला पिक्चर बघताना रडायला खूप आवडते.
म्हणजे तितके इमोशनली जोडला जाऊन मी बघतो. त्यामुळे इथे. आलेले सर्वच पिक्चर माझ्या लिस्ट मध्ये येतील.
अगदी जवान बघताना देखील डोळ्यात पाणी आले.
माझ्याच नाही तर मुलीच्या देखील.. घरी आल्यावर स्टोरी सांगताना ती आईला तीच दृश्य पहिला सांगत होती. बरे वाटले पोरगी माझ्यावरती गेली Happy

Pursuit of Happiness, You before Me बघताना डोळे भरून आले होते.
आता हल्ली बाईपण भारी देवा बघताना अगदी हमसून हमसून रडले. सिनेमा तेवढा रडण्याजोगा नव्हता. तरीही.
बाकी करन जोहरचे सिनेमे आहेतच.

लहानपणीचा हा प्रसंग स्पष्ट आठवतोय. आजोळच्या गावी थिएटरला मॅटीनीला दोस्ती हा जुना चित्रपट लागला होता. आम्ही सगळे गेलो होतो, तेंव्हा ती "दोन मित्रांची दर्दभरी कहाणी" पाहून मी थेटरात रडून गोंधळ घातला होता Lol

हाथी मेरे साथी बघताना सुद्धा रडलो होतो

तारें जमीन पर .. हॉस्टेलमध्ये ठेवतात त्याला तेव्हा , त्याची आई गाडीत बसून रडते तेव्हा , लास्ट सीन्समध्ये

देऊळ बंद लास्ट सीनला मोहन जोशी - स्वामींना गोळी लागून रक्त येतं आणि लगेच भरूनही येते जखम , त्यावेळी पाणी आलं होतं 2 - 3 वेळा चित्रपट पाहिला होता तेव्हा .

राजाने वाजवला बाजा या बरेच स्पेशल इफेक्ट्स असलेल्या चित्रपटात वडील गेल्यावर तो छोटा मुलगा , दत्तगुरु बापूंना सांभाळा पण आम्हाला कोण सांभाळणार म्हणून रडत भिंतीवर डोकं टेकतो त्यावेळी सुरेश वाडकरांच्या आवाजात चिरंजीव अवतार दिगंबर ही ओळ बॅकग्राउंडला वाजते आणि फोटोतला एक कुत्रा अदृश्य होऊन दारात प्रकट होतो .. ऍक्टिंग , म्युजिक या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून डोळ्यात पाणी आलेलं आहे ..

बहुतेक राजाबाबू सिनेमात गोविंदा प्रचंड लाडावलेला , पार वाया गेलेला मुलगा असतो .. त्याच्या आईने त्याला डोक्यावर चढवून ठेवलेलं असतं .. कोणीतरी बाई तो त्या घराण्याचा वारस नाही , देवळाच्या पायरीवरून उचलून आणलेला ( बहुतेक ) मुलगा आहे हे त्याला सांगते , त्यानंतर त्याच्या आईची अरुणा इराणीची acting बघून डोळ्यात पाणी आलं होतं .. आता मुलगा परकेपणाने वागणार या भावनेने तिची झालेली अवस्था क्षणभर हेलावून टाकणारी होती . बाकी पिक्चर भयंकर स्टोरीमुळे पूर्ण पाहण्याची ताकद नव्हती .

कभी खुशी कभी गम मध्ये अमिताभ शाहरुखला तुम मेरे बेटे नहीं सांगतो तो सीन .. हृतिक खूप वर्षांनी पहिल्यांदा भावाला भेटतो आणि बॅग खाली टाकायच्या निमित्ताने अश्रू पुसतो तो सीन ... नंतर फरीदा जलाल हृतिकला मेरा बाबा म्हणून ओळखते तो सीन .. डोळ्यात पाणी आलं होतं .

चाची 420 मध्ये मुलगी चाचीच्या वेषात आलेल्या बापाला ओळखते तो सीन.

3 इडियट्स - जाने नहीं देंगे तुझे गाणं .. राजू वडलांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याच्या सीन मध्ये रँचोला मिठी मारून मै डर गया था , मुझे माफ कर दे .. म्हणतो तो सीन ...

माझा मावसभाऊ लहान म्हणजे 6 - 7 वर्षांचा असताना कुठल्यातरी मराठी पिक्चरमध्ये सासू सुनेला मारते आहे हे बघून रडायला लागला होता , Lol दुसरं कुणी नव्हतं त्याच्यासोबत टिव्ही बघताना .. आणि किचनमध्ये आला रडत रडत , तिला मारत आहेत सांगत .. मग ते सगळं खोटं असतं अरे वगैरे त्याची समजूत काढावी लागली होती हा किस्सा आमच्या आजीकडून समजला नंतर ..

श्वास बघताना रडलो होतो खूप

कॉलेजमध्ये असताना एका अपघातात डोळा अक्षरशः देव कृपेने वाचला होता पण महिनाभर डोळ्यांना पट्टी होती त्यामुळे त्या पोराचं दुःख काय असू शकेल हे अगदी आतपर्यंत पोचलं

त्यात अरुण नलावडे यांची काळजाला हात घालणारी भूमिका

कभी खुशी कभी गम मध्ये अमिताभ शाहरुखला तुम मेरे बेटे नहीं सांगतो तो सीन .. हृतिक खूप वर्षांनी पहिल्यांदा भावाला भेटतो आणि बॅग खाली टाकायच्या निमित्ताने अश्रू पुसतो तो सीन ... नंतर फरीदा जलाल हृतिकला मेरा बाबा म्हणून ओळखते तो सीन .. डोळ्यात पाणी आलं होतं
>>>>>

+७८६
हा पिक्चर आमच्या घरातील सूर्यवंशीम आहे..
कित्येकदा बघितला गिनती नाही..
सगळे इमोशन आहेत यात..

Pages