कुंडलीत चंद्र आणि शुक्र हे 'इन्टरपर्सनल' ग्रह मानलेले आहेत. आपल्या वागणुकीवर प्रभाव करणारे असे हे ग्रह. पैकी चंद्र हा मनाचा कारक असल्याने, आपल्या भावना तसेच आपल्या उस्फूर्त प्रतिसादांवर, प्रतिक्रियांवर तो अधिराज्य गाजवतो. शुक्र हा सोशल ग्रह आहे. हा ग्रह आपल्याला काय आकर्षक वाटेल, आपल्याला कोणत्या पैलूंची भुरळ पडे, काय मोहवेल ते दर्शवितो. जर ग्रह म्हणजे ज्योत असे मानले तर ही ज्योत ज्या स्फटिकपात्रात तेवते आहे, ते स्फटीकपात्र म्हणजे राशी. उदाहरणार्थ - मेषेचा शुक्र हा मेष राशीचा रंग घेइल, तशा प्रकारे तो स्वत:ला व्यक्त करेल तर कर्केचा शुक्र स्वत:ला कर्क राशीच्या गुणावगुणांत अवगुंठीत करेल. म्हणजे काय तर - शुक्र हा पीपल प्लीझिंग ग्रह असल्याने, कर्क राशीचा शुक्र, अन्य लोकांना कसे प्रेम दाखवेल, कसे आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल तर - खाऊ पीऊ घालून, त्यांच्यावर अनकंडिशनल मायेचा वर्षाव करुन. लग्न आणि चंद्ररास तसेच शुक्राची रास साऱ्याचे आपण एक संमिश्र रसायन असतो.
----------------------------------------------------------------
https://www.youtube.com/watch?v=450p7goxZqg
You're my end and my beginning
Even when I lose, I'm winning
हे गाणे सकाळपासून मनात रुंजी घालतय. उत्कट!
.
I want to devour you!
होय, मला तू फक्त हवीयेस असे नव्हे तर मला तुझ्या डोळ्यातून हे जग पहायचय मला तुझ्या डोळ्यातून मला स्वतःला न्याहाळायचय. मला तुझं शरीरच पुरेसे नाहीच नाही पण तुझे तुझे विचार, मूडस सग्गळ मला अनुभवायचय. यु आर माय अल्फा, माय ओमेगा. माझ्याकरता प्रेम सुरुही तुझ्यात होतं आणि संपतही तुझ्यात.
Give your all to me
I'll give my all to you
You're my end and my beginning
कसं सांगू नव्हे न सांगताच तुला कळेल फक्त माझ्या नजरेत. माझ्या डोळ्यातूनच तुला ही इन्टेन्सिटी माझ्या प्रेमाची उत्कटता, दाहकता कळू शकेल. बोलणार तर मी काहीच नाही, चकार शब्द नाही आणि तुला कळल्यावाचून तर रहाणार नाही. दॅट्स द मॅजिक .... अ स्कॉर्पिओ मॅजिक.
Cards on the table, we're both showing hearts
Risking it all, though it's hard
असं मन उकलून दाखवणं, प्रेम मागणं ही रिस्क तर आहेच. पण ती फक्त तू आहेस म्हणुन, ती रिस्क घ्यायची माझी तयारी आहे, आहेस तू ही तयार?
तूळेचं प्रेम मोहक असेल तर वॄषभेचं प्रचंड earthy, शारीरी असेल. सिंहेचं पॉम्पस आणि रॉयल असेल , मेषेचं संयम नसलेलं असेल. कन्येचा शुक्र रुक्ष असेल, कर्केचा हळवा आणि होमली पण वॄश्चिकेचा शुक्र आहे डीप वाईन रंगाचा हृदयाच्या आकाराचा लोलक. मोहक पण अप्राप्य आणि मिळाला तरी सांभाळण्यास कठीण. नॉट फॉर फेंट हार्टेड. जर वॄश्चिकेच्या हातात हात घालून, धोक्यातून वाट काढत काढत जाण्याची हिंमत असेल त्यानेच या प्रेमात पडावे. बी रेडी टू गेट स्टॉक्ड. एकदा तुला माझं म्हटलं की मग तू सर्वस्वाने माझी झालीस.बी रेडी तू गेट स्कॉर्चड विथ जेलसी. झेपेल असं ऑल कन्झ्युमिंग प्रेम? सतत परीक्षा घेतली जाईल, परीक्षेत उत्तीर्ण होशील? बघ आताच वेळ आहे, पळून जा. नाहीतर पस्तावशील पण जर कसोटीला उतरलीस तर मग असं प्रेम अजुन कुठलीच रास तुला देउ शकणार नाही. हां मिथुन शुक्र तुझ्याशी गंमतीजंमतीच्या गप्पा मारेल, धनु शुक्र तुझ्याशी पुस्तके, दूरदूरचे देश याबद्दल तासन तास बोलू शकेल, कुंभेचा शुक्र त्याच्यासम तोच. पण कोणालाही वृश्चिकेच्या एकाग्र एकनिष्ठतेची सर नाही. सूर्यप्रकाशात भिंग धरलयस कधी. काय होतं मुंगी, कागद, वाळकं पान जळून जातं. तितकं एकाग्र प्रेम आणि अटेन्शन मिळेल तुला. आर यु विलिंग टु बर्न?
'Cause all of me
Loves all of you
Love your curves and all your edges
All your perfect imperfections
Give your all to me
I'll give my all to you
.
अरे हे गाणं तर वॄश्चिकेच्या शुक्राचं. आणि आज मी जॉन लेजंडची पत्रिका खास आवर्जून पाहीली आणि - Lo!! He happens to be a Scorpio Moon. दॅट एक्स्प्लेन्स इट ऑल.
ज्योतिषाने सांगितलय
ज्योतिषाने सांगितलय पाण्यापासून दूर रहा.>>>
भारीच.
भारीच.
सामो, शुक्र नेपच्युन युती
सामो, शुक्र नेपच्युन युती मुळे फसवणूक झाली असावी. नेपच्युन सप्तमात असेल तरी विवाह करतांना नीट चौकशी करावी. आता घडणार आहे ते घडतेच शेवटी. या मुलीला सांगीतले होते की घटस्फोट होईल, लव्ह मॅरेज करु नकोस. पण शेवटी ते झालेच.
बोकलत, लाभातला राहु चांगल्या राशीत असला तरी तो भ्रम निर्माण करतो. पैसा अफाट देतो. लग्नी रवी पण उच्चीचाच.
लग्नेश धनात आहे. त्यामुळे एवढा धोका नाही. अष्टमेष मंगळ दशमात उच्चीचा. त्याच्या मूळ स्थानात. अगदीच तसे काही वाटत असेल ( आणी जर वृत्तीने धार्मिक असाला तरच ) तर श्री शिवलीलामृताचा ११ वा अध्याय वाचा. बाकी शुभेच्छा !
मी पत्रिका बघत नाही कारण आता अभ्यास अर्धवट सोडला. केपी फार कठिण आहे. ज्यांचे गणित चांगले आहे. गुरु, बुध , चंद्र व नेपच्युन शुभ आहेत, व यात नवपंचम योग आहेत असे लोक ज्योतिष्य शिकु शकतात. चंद्र यात मुख्य आहे, नेपच्युन अंतर्ज्ञान देतो. गुरु व बुध गुढ विद्येचे कारक आहेत.
बुध शुक्राच्या घरात आणि शुक्र
@बोकलत
बुध शुक्राच्या घरात आणि शुक्र बुधाच्या घरात. कोणता तरी 'परस्पर ...." योग असतो तो. दोघं एकमेकांच्या घरात असल्याने मला वाटतं दोघं टरकुन असावेत. कारण एकाने काही काडी केली म्हणजे घरात पसारा केला तर दुसरा लगेच इंगा दाखवु शकतो
मंगळ उच्चीचा व त्याला दिशाबळही दिसतय.
सूर्यही स्वराशीत आहे.
बाकी ज्योतिषांना ठाउक.
बुध शुक्राच्या घरात आणि शुक्र
बुध शुक्राच्या घरात आणि शुक्र बुधाच्या घरात. >>>
बलदाअलदी योग
शुक्र वृश्चिकेचा हे कुंडलीत
शुक्र वृश्चिकेचा हे कुंडलीत कुठे बघतात?
लैच बेसिक प्रश्न आहे.
सामो इंटरेस्टिंग लिहिता तुम्ही.
बोकलत मला वाटतं तुमचं करीअर
@बोकलत मला वाटतं तुमचं करीअर उत्तम आहे व धनही उत्तम असावे आणि वडीलोपार्जितपेक्षा स्वतःच्या कष्टाने मिळवलेले असावे. कारण पराक्रम स्थानाचा भावेश = बुध, धनस्थानात आहे.
काय करता तुम्ही. मला तरी वाटतं करीअरच्या दॄष्टीने मस्त आहे ही पत्रिका. आँत्रप्रिन्युअर आहात का?
>>>>>>शुक्र वृश्चिकेचा हे
>>>>>>शुक्र वृश्चिकेचा हे कुंडलीत कुठे बघतात?
कुंडलीत, शुक्र पहायचा त्या घरात्/चौकोनात काय आकडा आहे ते पहायचे.
१ - मेषेचा शुक्र
२ - वॄषभेचा शुक्र
.
.
.
८- वॄश्चिकेचा शुक्र
.
.
. १२ - मीनेचा शुक्र.
>>>>>>>>सामो इंटरेस्टिंग लिहिता तुम्ही.
धन्यवाद झकासराव.
Ok सामो
Ok सामो
आमच्याकडे 7 आकडा आहे लिहिलेला
वृश्चिकेचा व्हायला एकने कमी
मग तो तूळेचा झकासराव,
मग तो तूळेचा झकासराव, प्रेमामध्ये रिफाइन्ड, ग्रेसफुल, रोमँटिक टू द कोअर. पार्टनरशिप function at() { [native code] }इशय लोभस वाटणारा आणि तरीही पुस्तके व इन्टेलेक्च्युअल पर्स्युटसमधेही तितकाच रमणारा. कारण तूळ वायु रास आहे ना. आहेच ती बुद्धीप्रधान.
तुम्हाला शुगरस्वीट सिनेमे आवडत नाहीत असे त्या गप्पा धाग्यावर म्हणालात. असे कसे? मला वाटतं तूळेला कोणताच इम्बॅलन्स आवडत नाही.
सामो मी जॉब करतो. जॉबच्या
सामो मी जॉब करतो. जॉबच्या ठिकाणी जास्त काम नसतं. पगार पण ठीकठाक आहे. जॉब करून माणूस श्रीमंत होत नाही कितीही पगार असू दे असं मला वाटतं त्यामुळे पगार कितीही वाढला तरी कमीच वाटतो मला. जॉबचा कंटाळा येतो. बाई दवे आँत्रप्रिन्युअर म्हणजे काय?
@बोकलत
@बोकलत
>>>>>>>आँत्रप्रिन्युअर
मला वाटले तुम्ही एखादा स्वतःचा बिझनेस करत असाल. एखादी कला किंवा कौशल्य यातूनही कमाई होत असेल. आय मस्ट बी रॉन्ग.
दुसरी कमाई काही नाही. शेअर
दुसरी कमाई काही नाही. शेअर मार्केटमध्ये पैसे टाकतो ते वाढत जातात. एकदा टाकले की शक्यतो तसेच राहून देतो. त्यामुळे तो प्रॉफिट पण अनरियलाइज् आहे.
ओके.
ओके.
सामो मी माझी पत्रिका तुम्हाला
सामो मी माझी पत्रिका तुम्हाला पाठवु का ?
निलेश मला नाही येत हो. मला
निलेश मला नाही येत हो. मला फक्त ललित लिखाणापुरता आणि अॅज अ सेल्फ अवेअरनेस टूल म्हणुन ज्योतिष आवडतं.
हायला सामो
हायला सामो
स्वपरीक्षण केलं पाहिजे कारण हे असे पटकन दिसत तर नाहीये माझ्याबाबत
ओके ओके. इतर काही
ओके ओके. इतर काही इन्फ्लुअन्सेस असतील नक्कीच. किंवा अनेक ग्रहं एकाच दुसर्या कोणत्या तरी राशीत वगैरे असतील.
माझी पण वृश्चिक रास आहे पण
माझी पण वृश्चिक रास आहे पण पुढे काही कळत नाही. ही पत्रिका
rr38 तुमच्या पत्रिकेत गज
rr38 तुमच्या पत्रिकेत गज-केसरी योग आहे. फार चांगला योग मानला जातो. तसेच अंगारका योग पण दिसत आहे. बाकी ग्रह स्थितीवरून खर्च फार होत असेल हे दिसते. उतपन्न किती जरी असला तरी खर्च नेहमी त्या पेक्षा जास्त.
@बोकलत घरा मध्ये आई किंवा वडिलांच्या नातेवाईकांमध्ये स्थावर मालमत्तेवरून कोणती केस सुरू आहे का? तुम्हाला घबाड मिळण्याची शक्यता आहे.
झंपू दामलू - माहितीबद्दल
झंपू दामलू - माहितीबद्दल धन्यवाद पण मला या दोन्ही योगांची काही माहिती नाही. खर्चाच्या बाबतीत विधान चुकीचं आहे. मी आणि माझे कुटुंब आधी saving आणि मग खर्च हे तत्त्व पूर्णतः पाळतो. खर्च होतोच, कधी कधी जास्तही पण उत्पन्नापेक्षा जास्त नाही.
बाराव्या घरातील शनि दु:ख देतो
बाराव्या घरातील शनि दु:ख देतो. क्वचित सबकॉन्शसशी रिलेटेड काही इश्युज असू शकतात. समथिंग दॅट इज हिडन & नॉट नोन. पण त्रास होतो.
नेपचून असणार ६ व्यात बहुधा. लिकी ऑरा आहे. म्हणजे थोडक्यात देवाचे करा, कवच, स्तोत्रे आदि. रोज मेडीटेट कराच. बीफ अप सेक्युरिटी. घरात दाराला फट असेल आणि कडाक्याची थंडी पडली, तर आपण ती बुजवतो किंवा तिथे कपाट वगैरे ठेवतो तत्सम.
स्वप्न सूचक किंवा अशी प्रॉमिनन्ट पडत असावीत.
माझ्यासारखाच तुम्हालाही ऑकल्ट म्हणजे ज्योतिष , टॅरॉट सारखी गूढविद्या आदिंत रुचि असावी असे वाटते. त्यात गतीही असावी म्हणजे कळत असावे.
तुम्हाला बर्याच विषयांत रुचि असावी. मिथुन लग्न म्हणजे जॅक ऑफ ऑल ट्रेडस.
राहू प्रचंड मटीरीअॅलिस्टीक ग्रहं आहे तो देतो भरभरुन पण त्या घरात तरी तहान तशीच रहाते. आठव्यात राहू म्हणजे मला वाटतं की वडीलोपार्जित धनलाभ असावा तुमच्या नशीबी.
मिथुन लग्न म्हणजे सोशल बटरफ्लाय. सगळ्यांत मिसळावं, ग्रुप्स्मध्ये, चर्चांमध्ये सहभागी व्हावं असं फुलपाखरी, लाईट व्यक्तिमत्व आहे तुमचं. पण वृश्चिक चंद्र बर्यापैकी डार्क, ब्रुडिंग, सिक्रेटिव्ह आहे तेव्हा हा त्रास तुम्हाला १००% होतो म्हणजे मिसळावसं वाटतं पण सहज मिसळता येत नाही कुठेतरी विरोधाभासामुळे, घालमेल होते. आपण किनार्यावरुन स्विमिंग पार्टी बघत बसल्यासारखं.
--------------------
सगळं वैयक्तिक ओपन करु नका पण किती टक्के जुळतय असे आपल्याला वाटते?
सामो, दुःख जन्मभराचं आहे, पण
सामो, दुःख जन्मभराचं आहे, पण त्याच्यावर काही उपाय नाही so learnt to live with that. सुदैवाने कुटुंबाची, विशेषतः पतीची भक्कम साथ आहे त्यामुळे निभावले.
देवाचं मी करते श्रद्धेपोटी. मला खरंच ज्योतिषविद्येत किंवा कोणत्याही गूढ विद्येत काही कळत नाही. Interesting वाटतं हे खरं. स्वप्नं खूपदा पडतात आणि बऱ्याचदा नंतर लक्षातसुध्दा राहतात. अर्थ काही समजत नाही.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
rr38 - आवर्जुन प्रतिसाद
rr38 - आवर्जुन प्रतिसाद दिल्याबद्दल, धन्यवाद
@बोकलत घरा मध्ये आई किंवा
@बोकलत घरा मध्ये आई किंवा वडिलांच्या नातेवाईकांमध्ये स्थावर मालमत्तेवरून कोणती केस सुरू आहे का? तुम्हाला घबाड मिळण्याची शक्यता आहे.>>> व्वा झंपूजी व्वा जबरदस्त. वडिलांकडे वाद सुरू आहे. पण मला यात काही मिळेल याची शक्यता कमी आहे आणि मी तिकडे जास्त लक्ष पण देत नाही. तरीपण तुम्ही म्हणताय तसं काही झालं तर या धाग्यावर कळवेन. पण बरोबर सांगितलंत. अजून काहीतरी सांगा जे पुढे घडणार आहे.
सामो - विपू पाहा
सामो - विपू पाहा
होय पाहीली धन्यवाद.
होय पाहीली धन्यवाद.
छान चर्चा सुरू आहे इथे.
छान चर्चा सुरू आहे इथे.
मी पत्रिका बघत नाही कारण आता अभ्यास अर्धवट सोडला. >>> ओहह रश्मि, मला वाटतं आवड असेल तर अभ्यास सोडू नये, मी समजत होते अभ्यास सुरू आहे.
सोशल बटरफ्लाय = च प ख ल सामो.
सोशल बटरफ्लाय = च प ख ल सामो..
छान माहिती मिळत आहे इथे..
तुझं लग्न आहे का गं मिथुन,
तुझं लग्न आहे का गं मिथुन, प्राचीन?
Pages