वृश्चिकेचा शुक्र

Submitted by धनश्री- on 11 September, 2023 - 16:37

कुंडलीत चंद्र आणि शुक्र हे 'इन्टरपर्सनल' ग्रह मानलेले आहेत. आपल्या वागणुकीवर प्रभाव करणारे असे हे ग्रह. पैकी चंद्र हा मनाचा कारक असल्याने, आपल्या भावना तसेच आपल्या उस्फूर्त प्रतिसादांवर, प्रतिक्रियांवर तो अधिराज्य गाजवतो. शुक्र हा सोशल ग्रह आहे. हा ग्रह आपल्याला काय आकर्षक वाटेल, आपल्याला कोणत्या पैलूंची भुरळ पडे, काय मोहवेल ते दर्शवितो. जर ग्रह म्हणजे ज्योत असे मानले तर ही ज्योत ज्या स्फटिकपात्रात तेवते आहे, ते स्फटीकपात्र म्हणजे राशी. उदाहरणार्थ - मेषेचा शुक्र हा मेष राशीचा रंग घेइल, तशा प्रकारे तो स्वत:ला व्यक्त करेल तर कर्केचा शुक्र स्वत:ला कर्क राशीच्या गुणावगुणांत अवगुंठीत करेल. म्हणजे काय तर - शुक्र हा पीपल प्लीझिंग ग्रह असल्याने, कर्क राशीचा शुक्र, अन्य लोकांना कसे प्रेम दाखवेल, कसे आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल तर - खाऊ पीऊ घालून, त्यांच्यावर अनकंडिशनल मायेचा वर्षाव करुन. लग्न आणि चंद्ररास तसेच शुक्राची रास साऱ्याचे आपण एक संमिश्र रसायन असतो.
----------------------------------------------------------------
https://www.youtube.com/watch?v=450p7goxZqg

You're my end and my beginning
Even when I lose, I'm winning
हे गाणे सकाळपासून मनात रुंजी घालतय. उत्कट!
.
I want to devour you!
होय, मला तू फक्त हवीयेस असे नव्हे तर मला तुझ्या डोळ्यातून हे जग पहायचय मला तुझ्या डोळ्यातून मला स्वतःला न्याहाळायचय. मला तुझं शरीरच पुरेसे नाहीच नाही पण तुझे तुझे विचार, मूडस सग्गळ मला अनुभवायचय. यु आर माय अल्फा, माय ओमेगा. माझ्याकरता प्रेम सुरुही तुझ्यात होतं आणि संपतही तुझ्यात.
Give your all to me
I'll give my all to you
You're my end and my beginning
कसं सांगू नव्हे न सांगताच तुला कळेल फक्त माझ्या नजरेत. माझ्या डोळ्यातूनच तुला ही इन्टेन्सिटी माझ्या प्रेमाची उत्कटता, दाहकता कळू शकेल. बोलणार तर मी काहीच नाही, चकार शब्द नाही आणि तुला कळल्यावाचून तर रहाणार नाही. दॅट्स द मॅजिक .... अ स्कॉर्पिओ मॅजिक.
Cards on the table, we're both showing hearts
Risking it all, though it's hard
असं मन उकलून दाखवणं, प्रेम मागणं ही रिस्क तर आहेच. पण ती फक्त तू आहेस म्हणुन, ती रिस्क घ्यायची माझी तयारी आहे, आहेस तू ही तयार?
तूळेचं प्रेम मोहक असेल तर वॄषभेचं प्रचंड earthy, शारीरी असेल. सिंहेचं पॉम्पस आणि रॉयल असेल , मेषेचं संयम नसलेलं असेल. कन्येचा शुक्र रुक्ष असेल, कर्केचा हळवा आणि होमली पण वॄश्चिकेचा शुक्र आहे डीप वाईन रंगाचा हृदयाच्या आकाराचा लोलक. मोहक पण अप्राप्य आणि मिळाला तरी सांभाळण्यास कठीण. नॉट फॉर फेंट हार्टेड. जर वॄश्चिकेच्या हातात हात घालून, धोक्यातून वाट काढत काढत जाण्याची हिंमत असेल त्यानेच या प्रेमात पडावे. बी रेडी टू गेट स्टॉक्ड. एकदा तुला माझं म्हटलं की मग तू सर्वस्वाने माझी झालीस.बी रेडी तू गेट स्कॉर्चड विथ जेलसी. झेपेल असं ऑल कन्झ्युमिंग प्रेम? सतत परीक्षा घेतली जाईल, परीक्षेत उत्तीर्ण होशील? बघ आताच वेळ आहे, पळून जा. नाहीतर पस्तावशील पण जर कसोटीला उतरलीस तर मग असं प्रेम अजुन कुठलीच रास तुला देउ शकणार नाही. हां मिथुन शुक्र तुझ्याशी गंमतीजंमतीच्या गप्पा मारेल, धनु शुक्र तुझ्याशी पुस्तके, दूरदूरचे देश याबद्दल तासन तास बोलू शकेल, कुंभेचा शुक्र त्याच्यासम तोच. पण कोणालाही वृश्चिकेच्या एकाग्र एकनिष्ठतेची सर नाही. सूर्यप्रकाशात भिंग धरलयस कधी. काय होतं मुंगी, कागद, वाळकं पान जळून जातं. तितकं एकाग्र प्रेम आणि अटेन्शन मिळेल तुला. आर यु विलिंग टु बर्न?
'Cause all of me
Loves all of you
Love your curves and all your edges
All your perfect imperfections
Give your all to me
I'll give my all to you
.
अरे हे गाणं तर वॄश्चिकेच्या शुक्राचं. आणि आज मी जॉन लेजंडची पत्रिका खास आवर्जून पाहीली आणि - Lo!! He happens to be a Scorpio Moon. दॅट एक्स्प्लेन्स इट ऑल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला ई-मेल्स येत नाहीयेत आणि माझ्या जात नाहीयेत.

काही मूडस शब्दात मांडताच येत नाही -
https://www.youtube.com/watch?v=lkOg15y3uqk
"सलोना सा सजन है और मै हूं" गे गाणे तसेच - ओंजळभर मोगर्‍याची टपोरी फुले उधळून देण्याचा मूड.
अशरीरी आकर्षण असूच नये का? फक्त डोळे पाहून धुंद होउच नये का?
.
तुम्हारे रुप की छाया मे साजन
बडी ठंडी जलन है और मै हूं

.
कोणाची काय फँटसी असते कोणाच काय.
आपले स्वप्न कोणाला तरी पडावे आणि आपल्याकरता कोणी पागल असावे अशी फँटसी असूच नये का! होय वेडे नाही. पागल असावे. आपल्या स्वप्नाच्या धुंदीत कोणाचा तरी दिवस मस्त मस्त जावा.

अर्धमात्रा स्थिता नित्या यानुच्चार्या विशेषतः" हा मूड कोणाला कसा पटवायचा, सांगायचा, शब्दात मांडायचा. दॅट ट्रान्सेन्डेन्टल मोमेन्ट .
कोणाच्या तरी डोळ्यात विरघळून जाण्याचा क्षण. दॅट सस्पेन्डेड मोमेन्ट ....... नो वर्डस कॅन डु जस्टिस.

हम ने देखी है इन आँखों की महकती खुशबू
हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो
सिर्फ़ एहसास है ये रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो

परत वाचले हे आज. तुम्ही तुळेच्या शुक्राला अनुल्लेखाने मारले आहे हे लक्षात आले Happy

Happy

तुळेचा शुक्र बली असे ऐकतो. एका प्रियपात्राचा शुक्र गुरु समवेत तुळेत आहे म्हणून थोडे कुतुहल.

तूळेचा शुक्र स्वगृही आहे. मीनेचा शुक्र उच्चीचा आहे.
तूळेचा डिसेन्ट, बॅलन्स्ड, रिफाइन्ड असावा.
मीनेचा प्रेमाला कम्प्लीट ट्रान्सेन्ड करणारा असावा. म्हणजे अध्यात्मात जे समर्पण, शरणागती व डिव्होशन लागते ते प्रेमाचे हायर ऑक्टेव्ह (उच्च पातळी) म्हणजे मीनेचा शुक्र. भौतिकाक्डुन अध्यात्माकडे वाटचाल करवणारा मग भलेही खर्‍या प्रेमात निराश करेल. फक्त अध्यात्म नाही कलेमध्येही एनर्जी चॅनलाइझ करेल.

थँक्यू. तुळेचा शुक्र = डिसेन्ट, बॅलन्स्ड, रिफाइन्ड हे पूर्ण जुळतयं.

गुरू+शुक्र दोन्ही तिकडेच म्हणजे war of titans होत नाही का ? Conflicting देवगुरु x दानवगुरु ? (बालिश प्रश्न असेल तर ignore करा, ही ऐकीव त्रोटक माहिती)

मला कंपनीत सगळे टरकून असतात मी लोकांना तोंडावर काय वाट्टेल ते बोलत असतो. सगळे मला थरथर कापतात. त्यात भर म्हणजे ज्योतिषाने मला मंगळाची अंगठी घालायला दिले. कंपनीत गेलो तेव्हा लोकानी घाबरत घाबरत विचारलं की मंगळ शक्तिशाली करायची अंगठी आहे की सौम्य करायची? मी बोललो शक्तिशाली करायची तसे सगळे सैरावैरा पळू लागले. बोलले तू सगळ्याना काहीपण बोलायचास आता तर पकडून मारशील. दोन दिवस झालेत कंपनीत कोणीही नाही. एकटाच जाऊन भूतासारखा बसतो. मालकाला ताप आलाय.

वृश्चिक माझी आवडती रास. कारण ती माझी रास आहे. विंचू कधी कुठे दिसले तर लाडाने माझ्याजवळ येतात. मी पण त्यांच्यावर प्रेमाने हात फिरवतो. डॉगीसारखे उताणे होऊन माझ्याकडून पोट खाजवून घेतात. मी बोलतो जा आता घरी कोणाला चाऊ नका संभाळून.

आजचा मूड -
बटरफ्लाईज इन द स्टमक + पेन्सिव्ह मूड + वैताग आणि निराशा.
काल रिशी नित्यप्रग्या यांच्या डिव्होशनल गाण्यांवर हाय ( https://www.youtube.com/watch?v=zLTjj5_wTR0&list=PLPMB_AjaOHWGp2z5pUfdyy... ) झाल्यामुळ, आज लो मूड अपेक्षितच होता. पीक्स & व्हॅलिज.

ज्योत्स्ने परी कांती तुझी,
मुख रम्य शारद चंद्रमा,
उजळे तुझ्या हास्यातुनी,
चारी युगांची पौर्णिमा,
तुझिया कृपेचे चांदणे,
नित् वर्षु दे अमुच्या शिरी....
- शांता शेळके...

आस्वाद मला पत्रिका बघता येत नाही. मी ललित लिहीण्यापुरता ज्योतिष वाचते.

तुमच्या सप्तम स्थानाचा स्वामी बुध असून तो करीअर व रेप्युटेशनच्या म्हणजे १० व्या घरात आहे. सहसा माझ्या वाचिक (असा शब्द आहे का?) माहीतीप्रमाणे, तो त्या घराचे म्हणजे १० व्या घराचे गुणधर्म व तेथिल फळे , सप्तम स्थानाला पास करेल. बहुतेक हां.

म्हणजे कदाचित जोडीदार रेप्युटेड, उत्तम प्रसिद्धी असलेला वगैरे असेल. जोडीदाराच्या पराक्रम स्थानात मंगळ आहे,तेव्हा धडाडीचा असेल. गुरु ग्रह, जोडीदाराच्या अष्टमात (वडीलोपार्जित धन बहुतेक) असल्याने सधन असेल.

पण हे सर्व नसूही शकते Happy कारण मला पत्रिका बघता येत नाही.

कोणालाही उद्देश्युन नाही.
वादळी अंधारुन आलेल्या संततधार पावसानंतर फुटलेला कोवळा रेशिमलडीचा किरण आहेस तू. क्राउनिंग ग्लोरी ऑफ प्युअर गोल्ड. इट्स क्राईम टु बी सो प्रिस्टिन.

पुनर्वसु - माझे सर्वाधिक आवडते नक्षत्र. वादळानंतरची प्रकाश फुटी. किती आशादायी, चैतन्यमयी. सर्व मळभ विरुन जाते.

निसर्गाने काही पडदे अगदी कठोरपणे ठेवलेले आहेत. पैकी एक हा की आपले विचार आपल्याला १००% कळतात आणि अन्य व्यक्तीचे ०%. नाही ९९-१ नाही की ९८-२ नाही हाच रेश्यो आहे १००-०. आपले १००% आणि अन्य व्यक्तीचे ०%. देअर इज नो ट्रेस्पासिंग. आणि हे प्रचंड तगमग करणारं आहे. 'ही/शी लव्हज मी - ही/शी लव्ह्ज मी नॉट' हा सनातन प्रश्न असावा. पशु-पक्ष्यांनाही हा प्रश्न पडत असेल का देवच जाणे.
पण सांगायचा मुद्दा हा की देअर इज नो ट्रेस्पासिंग. लेखात मह्टल्याप्रमाणे देअर इज नो - ' मला तुझ्या डोळ्यातून मला स्वतःला न्याहाळायचय. मला तुझं शरीरच पुरेसे नाहीच नाही पण तुझे तुझे विचार, मूडस सग्गळ मला अनुभवायचय.' थिंग. खरोखर हे जे ऑब्सेशन आहे त्याचे नाव आहे वृश्चिकेचा शुक्र.

तुमचा बाह्य जगावर कंट्रोल आहे, नियंत्रण आहे, हे किती निखालस खोटे आहे, या ज्ञानाशी परत परत आणुन पोचवणारी रास आहे वृश्चिक. देव सेडिस्ट मूडमध्ये असणार जेव्हा त्याने ही रास, कुंडलीतले आठवे घर बनविले तेव्हा.

हे ललितात बदललेले वाचिक ज्ञान!

“You know what charm is: a way of getting the answer yes without having asked any clear question.”
— Albert Camus (Sun in Scorpio)

सध्या शुक्र वृषभेत आहे - १ महीना. म्हणजे माझ्या १२ व्या घरात. फार अनीझी वाटतय. अन्य कोणी मिथुन 'लग्न' जातक आहेत का? त्यांना हा अनुभव येतोय का?

आज वाचून तूळेच्या शुक्रा बद्दल लिहीण्याचा प्रयत्न करते. तूळ माझीही आवडती रास आहे. फक्त I am in awe. These ppl are very refined and clever, diplomatic व सुसंस्कृत

मला वाटतं तूळ शुक्र स्त्रीस स्टिम्युलेटिंग, इन्टरेस्टिंग कॉन्व्हरसेशन आवडेल, वाईन आणि छान पदार्थ आवडतील. त्यातही ती पदार्थ सुंदर सजवत असेल. तिला स्वीट टुथ असू शकतो (गोडाची मनापासून आवड). मला वाटतं ती कंपॅनिअनशिपशिवाय फार मिझरेबल (दु:खी) होइल. कोणतीही कृती एकट्याऐवजी दुकट्याने, आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर करणे तिला आवडेल. सोशलाइझ करेल ती पण मिथुन राशीसारखी सोशल बटरफ्लाय नाही तर सगळं संतुलित असेल. ग्रेसफुल, कपडे, मेक अप भडक नाही. क्लासी ब्युटी असेल असे मला वाटते. स्वभावानेही शांत आणि गोड असेल. उगाच वादावादी ताणणारी, डिसहार्मनी करणारी नसेल. येस शी विल एन्जॉय अ हेल्दी डिबेट. नक्कीच. आणि ती वेगवेगळ्या अंगानी विचार करणारी असेल.
शुक्र वॄषभ राशीवरही राज्य करतो. माझ्या २ मैत्रिणी आहेत वॄषभ चंद्र वाल्या. एक फार गोड आहे दिसायला अक्षरक्षः खव्याची बर्फी. दुसरी ओबीस आणि अति सामान्य आहे. पण दोघी फार अ‍ॅट्रॅक्टीव्ह आहेत. मला माहीत नाही कसा काय पण त्या सामान्य मैत्रिणीचा ऑरा सुद्धा खूप सेन्श्युअल आहे. तिच्या लिपस्टीकचा रंग, कपडे अगदी व्हिनसिअन. प्रचंड आकर्षक आणि सुती कपडे. वॄषभेला ५ इंद्रियांचे सुख व्यवस्थित लागते. मग स्पर्श सुती कापडाचाच आवडणार वगैरे.
पण वॄषभ आणि तूळ फरक आहे. वॄषभ सेन्श्युअल तर तूळ मला ग्रेसफुल आणि क्लासी वाटते. दोन्ही आवडतात. बट आय फील आय कॅन हँडल वृषभ . तूळ मला कोडे आहे. कदाचित पाणी-जमिन ( वृषभ) सख्य असतं त्यामुळे आणि पाणी-वायु(तूळ) एकमेकांकडे ढुंकुनही पहात नाहीत, उदासीन असतात त्यामुळे असेल. नव्हे होच.

Pages