१ वर्षाच्या मुलीसाठी तातडीने रक्त हवे आहे

Submitted by आईची_लेक on 13 September, 2023 - 13:32

आराध्या शिंदे ही एक वर्षाची मुलगी मुंबई ला नायर हॉस्पिटल मध्ये admit आहे.तिचे उद्या ऑपरेशन असून तिला A Negative blood ची गरज आहे.तिथे जवळपास कुठे उपलब्ध होऊ शकते ?
कुणाला काही माहिती असेल तर please सांगा.

संपर्क क्रमांक देविदास शिंदे ‪+91 83298 03729‬

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांच्याच माहितीसाठी :
http://www.listofdonors.com/
यावर रक्तगट आणि शहर निवडले की रक्तदात्यांची यादी मिळते, संपर्क क्रमांकासहित. अर्थात ही माहिती किती अद्ययावत (updated) असते ते मात्र माहित नाही.
A- donors.JPG

बरं झालं मिळालं ते . धागा आल्यापासून मनात विचार येत होते. बाळाला उत्तम आरोग्यासाठी अनेक शुभेच्छा.

विमु , धन्स !! ह्या लिस्टीत २ ओळ्खीची नावे निघाली>>> चला, म्हणजे या संकेतस्थळावरील माहिती योग्य / विश्वासार्ह आहे याची खात्री पटली!

ही लिंक न हरवणार्‍या धाग्यावर द्याल ??? >>> हे कसे करायचे???

अजून एक - मी स्वतः blood donor आणि platelet donor सुद्धा आहे. रक्तगट - O+ve
(कोणाला गरज असेल तेव्हा मला विपू करा, मग मी माझे खरे नाव, संपर्क क्रमांक आदी उघड करेन!)

>>>>>platelet donor
म्हणजे प्लाझ्मा डोनर असावे.
विस्कॉन्सिन्मध्ये प्लाझ्मा डोनेशन करणार्‍या व्यक्तीला पहील्या वेळी $२५० मिळतील - अशा जाहीराती वाचलेल्या होत्या. अर्थात पैसे घेउन कधीच केले नसते/ करणार नाही. हे जस्ट माहीती करता लिहीलेले आहे.
मी रक्तदान रेग्युलरली करते. प्लाझ्मा नाही केलेला.

>>>>>platelet donor
म्हणजे प्लाझ्मा डोनर असावे.

plasma donation मध्ये बहुतेक फक्त plasma (रक्तातील एक द्रवरूप घटक) वेगळा होतो तर platelet donation मध्ये plasma सोबत platelets (मराठीत टिकली पेशी म्हणतात; रक्तस्त्राव थांबविण्याचे महत्वाचे कार्य करणाऱ्या) सुद्धा वेगळ्या होतात. plasma हा पिवळसर रंगाचा द्राव असतो तर platelets या साधारण अबोली रंगाच्या असाव्यात; कारण मी ज्या रक्तपेढीत platelet donation करतो तेथे तीन वेगवेगळ्या कंपन्यांची मशीन्स आहेत. त्यातील एका मशीनमध्ये (कंपनीचे नाव आठवत नाही) आतील centrifuge मध्ये जो कीटचा भाग असतो त्यात procedure पूर्ण झाल्यावर अबोली रंगाचा क्रिमी थर दिसतो, ज्याला नंतर plasma सोबत मिक्स करतात.

(मी डॉक्टर, lab technician नाही, ही रक्तपेढी- blood bank मधील कर्मचाऱ्यांकडून मिळालेली माहिती आहे. डॉ. कुमार किंवा मायबोली वरील अन्य डॉक्टर मंडळींनी योग्य ती माहिती द्यावी!)

हो झाली व्यवस्था >>> छान झालं. बाळाला लवकर बरं वाटूदे. +७८६

विमु छान लिंक
मला स्वताला रक्तदान करता येतं नाही. निदान गरजूंना ती लिंक शेअर करता येईल.

Platelets मी वर्षातून एकदा डोनेट करतो. रक्तपेढीतुन फोन येतो . एकदा एकाच महिन्यात दोन वेळा करावे लागले होते

विमु
हा धागा काही काळाने मायबोलीवरील गुमनामीके अंधेरों मे खो जायेगा. नेमकी कुठल्या धाग्यावर लिंक दिली होती हे विसरले जाईल.

वेगळा धागा काढून हेडर मधे लिंक दिली तर शोधायला सोपे जाते.
एखादा धागा जो लक्षात राहील असा असेल त्यावर लिंक दिली तरी चालेल.