भारतीय सिनेसृष्टीत बेस्ट डान्सर कोण ?

Submitted by ढंपस टंपू on 17 August, 2023 - 22:22
file picture

तुमच्या मते बॉलीवूड, टॉलीवूड, मॉलीवूड, कॉलीवूड मधल?/ मधली बेस्ट डान्सर कोण ?

आजवरचं भारतीय चिसृष्टीतल बेस्ट कोरीओग्राफ केलेलं आयटम सोंग कुठलं ?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी अपवादात्मक 12-15 मराठी सिनेमा वगळता मराठी सिनेमाच्या दूर दूर वाटेस जात नाही. ग्रामीण मराठी सिनेमा तर अजिबात नाही आणि तमाशापट पाहणे तर केवळ अशक्य.......... पण 'एक होता विदुषक ' आवर्जुन पाहिला होता. आणि तेव्हापासून माझ्यासाठी उत्कृष्ठ नृत्य म्हणजे मधू कांबीकर. ' भरलं आभाळ ' गाण्यात बैठकीची लावणी आहे. बाईंनी almost बसुन फक्त चेहऱ्याचे विभ्रम आणि शरीराची लवचिकता यावर ते गाणं एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे की पुन्हा असं नृत्य करणे कोणाला अवघडच. https://youtu.be/99p2SsnvpBw

गौतमी पाटील नावाची so called तमाशा नृत्यांगना controversy वाचनात आल्यामुळे शोधुन तिचं नृत्य पाहिलं. आता reels , youtube, insta सगळीकडे ती माझा पिच्छा करते आहे. या बाईने एकदाच मधु कांबीकरांचा डान्स पहावा. ती स्टेजवर जे काही करते ते पुन्हा कधी करणार नाही.

Srd ते ईथे ह्या धाग्यावर अध्याॠत नसावे. तसा मेन करता करविता परमेश्वर वगैरे पोहोचता येइल Wink
हल्के घ्या!

कारण आमची नाचाची शैली मिळती जुळती आहे Lol
,>>>>

यात काय हसण्यासारखे.>>> रनबीर चा दिल्ली वाली गर्ल्फ्रेंड चा सुपर डान्स आठवला आणि तुझा मार डाला वाले जमिनीवर सरपटणे आठवले. भयाण तुलना वाचून आपसूक हसू आले. एक डाव मापी द्याव सर!

भरलं आभाळ ' गाण्यात बैठकीची लावणी आहे. बाईंनी almost बसुन फक्त चेहऱ्याचे विभ्रम आणि शरीराची लवचिकता यावर ते गाणं एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे की पुन्हा असं नृत्य करणे कोणाला अवघडच.>>> मी वसंतराव या चित्रपटातील बैठकीची लावणी पण एकदा पहा. "पुनव रातीचा लखलखता".
पडद्यावर अभिनेत्री कोण आहेत ते नाही माहिती पण त्या बाईंनी केवळ चेहरा आणि हात वापरून सुरेख अदाकारी केली आहे. उतारवय, मेकअप नाही, जुनेर साडी आणि एकाच जागेवर बसायचे एवढ्या मर्यादा असतानाही बघणार्याला खिळवून ठेवेल अशी अदाकारी आहे.

मूळात बेस्ट डान्सर म्हणजे काय हे नक्की क्लीयर करायला हवा. वाट्टेल तो डान्स करू शकणारे कि डान्स आपल्याला हवा तसा करत पण इंजॉय करणारे कि अंगातच लय असल्यामूळे नुसते चालले तरी पदन्यास केल्याचे फिलिंग देणारे ?

अंगातच लय असल्यामूळे नुसते चालले तरी पदन्यास केल्याचे फिलिंग >> किशोरकुमार! पांच रूपैय्या बारा आना, इक लडकी भीगी भागे सी, हम थे वो थे और समा रंगीन

यांच्या नावाने ऊ तास वीस मिनिटे सलग कथ्थक नृत्य करण्याचा विश्वविक्रम नीज बुक मध्ये नोंदवला आहे. अद्याप तरी हा विक्रम अबाधित आहे.
FB_IMG_1692916217599.jpg

हम आपके मधे त्या वाह वाह रामजी गाण्यात ' सूनो जिजाजी ' हे कडव सुरू व्हायच्या आधी रेणुका शहाणेवर कॅमेरा आहे. त्यात ती डोळे मिटुन दोन्ही हात पुढं करून पोज देते (माधुरी तिच्या हाती पूजेची थाळी देणार आहे) आणि एकदम कमरेत jerk बसून ती पुढे हात करते. डोक्यावर पदर, डोळे मिटलेले, हात पुढे , कमरेत jerk , दोन्ही हात समोर, पूजेची थाळी हातात...काय अचाट चोरिओ ग्राफी आहे : P स्टेप ऑफ मिलेनियम आहे. बघाच. मी गेले चार दिवस तेच परत परत बघून हसत आहे.

वैजयंती माला व वहीदा रेहमान
दोघींचे हावभाव, अदा कमाल असतात. अवघड नॄत्यांतही, चेहर्‍यावर कमालीचा गोडवा असतो, अभिनय असतो.

<<<<मला नाही दिसले ते उचकी/मुंगी प्रकरण>>>>

मला पण नाही दिसले.. मानवची लिंक बघून पण फार काही विनोदी नाही दिसले. " ती पारखी नजर" नाही बहुतेक माझ्याकडे...

एकंदरीतच काय choreography आहे!
माधुरी दीक्षित "मेरे दीदी ने.." म्हणताना करत असलेले हातवारे, मग ती रेणुका शहाणे कडे बोट दाखवते तेव्हा मागच्या extra चा नाच.. "चुचु चुचु" हे कोणीतरी तोंडाने म्हणतेय हे दाखवण्याच्या नादात त्या पात्रांची ऍक्शन विनोदी वाटतेय.

पूर्वी पाहिलं तेव्हा जे लक्षात नव्हतं आलं ते आता लंपनच्या पोस्ट नंतर लक्षात येतंय.

उचकी/ढेकर आल्यासारखी ती मूव्ह आहे.
माधुरी आणि नाचणार्‍या सगळ्या मुलींच्या कपड्यांचे रंग भयानक आहेत.
>>> अगदी अगदी.
माधुरीचा पूर्ण कपडेपट विचित्र आहे या पिक्चरमध्ये - सगळ्यात टुकार तो 'जुते दे दो, पैसे ले लो' वाला हिरवा ड्रेस, लेसी फ्रॉक्समध्ये पण ती थोराड दिसते. फक्त ती जांभळी साडी छान आहे आणि 'मुझसे जुदा हो कर' गाण्यातला पिस्ता कलरचा पंजाबी ड्रेस. या दोन कपड्यात ती गोड दिसते.

रेणुका शहाणेच्या साड्याही खास नाहीत. अजून छान साड्या देता आल्या असत्या तिला.

करन जोहर चित्रपटांनी नंतर येऊन बेंचमार्क उंचावला कपड्यांचा.. त्यामुळे आता हे कपडे बोर वाटतात. पण तेव्हा वाटले नव्हते.

करन जोहर चित्रपटांनी नंतर येऊन बेंचमार्क उंचावला कपड्यांचा.. त्यामुळे आता हे कपडे बोर वाटतात. पण तेव्हा वाटले नव्हते.
>>>>
नाही बडजात्यांच्याच 'विवाह' चित्रपटात अमृता रावचे कपडे बघा, नॉर्मल लोकांसारखे आणि तरीही छान आहेत.

तेच तर..
विवाह नंतर आला ना..
बाकी मी तो पाहिला नाहीये..
कसा आहे? बघू का? मला हम साथ साथ है सुद्धा आवडलेला..

कसा आहे? बघू का? मला हम साथ साथ है सुद्धा आवडलेला..
>>>>
बडजात्या स्टाईल गोग्गोड आहे. भाबडी स्टोरी आहे. माझ्या एमपीमधून आलेल्या मैत्रिणीला आवडला होता कारण तिला तो रिऍलिस्टिक वाटला होता.
सीमा विश्वासचे पात्र आणि काम उत्तम आहे.
हम साथ साथ है आवडला असेल तर हा त्यापेक्षा चांगला वाटेल नक्कीच.

हम साथ साथ है पहिल्यांदा बघितला तेव्हा मी काय पिक्चर आहे, काही स्टोरीच नाही म्हणून हसलेलो..
पण का माहीत नाही त्यानंतर चार वेळा तरी बघितला...

Pages