कुंडलीत चंद्र आणि शुक्र हे 'इन्टरपर्सनल' ग्रह मानलेले आहेत. आपल्या वागणुकीवर प्रभाव करणारे असे हे ग्रह. पैकी चंद्र हा मनाचा कारक असल्याने, आपल्या भावना तसेच आपल्या उस्फूर्त प्रतिसादांवर, प्रतिक्रियांवर तो अधिराज्य गाजवतो. शुक्र हा सोशल ग्रह आहे. हा ग्रह आपल्याला काय आकर्षक वाटेल, आपल्याला कोणत्या पैलूंची भुरळ पडे, काय मोहवेल ते दर्शवितो. जर ग्रह म्हणजे ज्योत असे मानले तर ही ज्योत ज्या स्फटिकपात्रात तेवते आहे, ते स्फटीकपात्र म्हणजे राशी. उदाहरणार्थ - मेषेचा शुक्र हा मेष राशीचा रंग घेइल, तशा प्रकारे तो स्वत:ला व्यक्त करेल तर कर्केचा शुक्र स्वत:ला कर्क राशीच्या गुणावगुणांत अवगुंठीत करेल. म्हणजे काय तर - शुक्र हा पीपल प्लीझिंग ग्रह असल्याने, कर्क राशीचा शुक्र, अन्य लोकांना कसे प्रेम दाखवेल, कसे आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल तर - खाऊ पीऊ घालून, त्यांच्यावर अनकंडिशनल मायेचा वर्षाव करुन. लग्न आणि चंद्ररास तसेच शुक्राची रास साऱ्याचे आपण एक संमिश्र रसायन असतो.
----------------------------------------------------------------
https://www.youtube.com/watch?v=450p7goxZqg
You're my end and my beginning
Even when I lose, I'm winning
हे गाणे सकाळपासून मनात रुंजी घालतय. उत्कट!
.
I want to devour you!
होय, मला तू फक्त हवीयेस असे नव्हे तर मला तुझ्या डोळ्यातून हे जग पहायचय मला तुझ्या डोळ्यातून मला स्वतःला न्याहाळायचय. मला तुझं शरीरच पुरेसे नाहीच नाही पण तुझे तुझे विचार, मूडस सग्गळ मला अनुभवायचय. यु आर माय अल्फा, माय ओमेगा. माझ्याकरता प्रेम सुरुही तुझ्यात होतं आणि संपतही तुझ्यात.
Give your all to me
I'll give my all to you
You're my end and my beginning
कसं सांगू नव्हे न सांगताच तुला कळेल फक्त माझ्या नजरेत. माझ्या डोळ्यातूनच तुला ही इन्टेन्सिटी माझ्या प्रेमाची उत्कटता, दाहकता कळू शकेल. बोलणार तर मी काहीच नाही, चकार शब्द नाही आणि तुला कळल्यावाचून तर रहाणार नाही. दॅट्स द मॅजिक .... अ स्कॉर्पिओ मॅजिक.
Cards on the table, we're both showing hearts
Risking it all, though it's hard
असं मन उकलून दाखवणं, प्रेम मागणं ही रिस्क तर आहेच. पण ती फक्त तू आहेस म्हणुन, ती रिस्क घ्यायची माझी तयारी आहे, आहेस तू ही तयार?
तूळेचं प्रेम मोहक असेल तर वॄषभेचं प्रचंड earthy, शारीरी असेल. सिंहेचं पॉम्पस आणि रॉयल असेल , मेषेचं संयम नसलेलं असेल. कन्येचा शुक्र रुक्ष असेल, कर्केचा हळवा आणि होमली पण वॄश्चिकेचा शुक्र आहे डीप वाईन रंगाचा हृदयाच्या आकाराचा लोलक. मोहक पण अप्राप्य आणि मिळाला तरी सांभाळण्यास कठीण. नॉट फॉर फेंट हार्टेड. जर वॄश्चिकेच्या हातात हात घालून, धोक्यातून वाट काढत काढत जाण्याची हिंमत असेल त्यानेच या प्रेमात पडावे. बी रेडी टू गेट स्टॉक्ड. एकदा तुला माझं म्हटलं की मग तू सर्वस्वाने माझी झालीस.बी रेडी तू गेट स्कॉर्चड विथ जेलसी. झेपेल असं ऑल कन्झ्युमिंग प्रेम? सतत परीक्षा घेतली जाईल, परीक्षेत उत्तीर्ण होशील? बघ आताच वेळ आहे, पळून जा. नाहीतर पस्तावशील पण जर कसोटीला उतरलीस तर मग असं प्रेम अजुन कुठलीच रास तुला देउ शकणार नाही. हां मिथुन शुक्र तुझ्याशी गंमतीजंमतीच्या गप्पा मारेल, धनु शुक्र तुझ्याशी पुस्तके, दूरदूरचे देश याबद्दल तासन तास बोलू शकेल, कुंभेचा शुक्र त्याच्यासम तोच. पण कोणालाही वृश्चिकेच्या एकाग्र एकनिष्ठतेची सर नाही. सूर्यप्रकाशात भिंग धरलयस कधी. काय होतं मुंगी, कागद, वाळकं पान जळून जातं. तितकं एकाग्र प्रेम आणि अटेन्शन मिळेल तुला. आर यु विलिंग टु बर्न?
'Cause all of me
Loves all of you
Love your curves and all your edges
All your perfect imperfections
Give your all to me
I'll give my all to you
.
अरे हे गाणं तर वॄश्चिकेच्या शुक्राचं. आणि आज मी जॉन लेजंडची पत्रिका खास आवर्जून पाहीली आणि - Lo!! He happens to be a Scorpio Moon. दॅट एक्स्प्लेन्स इट ऑल.
इथे कोणी वृश्चिक- शुक्र +
इथे कोणी वृश्चिक- शुक्र + रेडी टु शेअर देअर वाईल्ड स्टोरीज & पर्स्युट्स?
हे दोन्ही एकत्र मिळणं म्हणजे उंबराला फूल येणं आहे. हायली सिक्रेटिव्ह साईन. अनलेस ऑफ कोर्स धनु किंवा मिथुन अॅफिलिएशन.
वृश्चिकेचा शुक्र, नेपच्युन व
वृश्चिकेचा शुक्र, नेपच्युन व गुरु ( एकत्र ) धन स्थानात असलेली मादक ललना मला युरोप दौर्यात भेटली. गोड आवाज, मादक चेहरा व स्वप्नाळु डोळे असे गोड कॉम्बीनेशन होते. साहजीक आहे, मंगळाच्या राशीत शुक्र असल्याने एक प्रेम विवाह, नंतर परत प्रेम प्रकरण पण फसवणूक असे तिच्या वाट्याला आले. चांगली ओळख झाली होती म्हणून तिच्या आईने मला पत्रिका दाखवली. आईला तिच्या लग्नाची काळजी होती. भारतीयच होती.
ती आता कुठे आहे माहीत नाही, पण तिला अमेरीकेतच सेटल व्हायचे होते. युरोप नको होता.
वृश्च्केला, वृश्चिकच बरी रास
वृश्च्केला, वृश्चिकच बरी रास आहे. तंत्र परस्परांनाच बरं जमतं. रश्मी धनस्था नी ही रास मॅग्नेटिक डोळे व आवाज देते का? तूळ लग्न. माझ्या मैत्रिणीचे आहे. वृश्चिक चंद्र , तूळ लग्न. तिच्यात आहे ब्वॉ काहीत री खेचून घेणारं.
मात्र एकदाच क्षणभराकर ता एक eerie अनुभव मला आले ला. ग्रूप मधे आमचे डोळे अचानक भिडले व एका क्षणाकरता टाइम सस्पेन्ड झालेला. I am not kidding. असो हे जस्ट अवांतर होते.
ट्स द मॅजिक .... अ स्कॉर्पिओ
ट्स द मॅजिक .... अ स्कॉर्पिओ मॅजिक.>> मॅजिक नव्हे. मारणारी शक्ती आहे ती. ज्यावर वापरली तो उध्वस्त होतो. आजुबाजूचे खलास होतात. वृस्चिक म्हटले की मी दोन हात आपण्हून दूर. मला तुमचे प्रेमही नको आणि मग नंतर येणारी उद्वस्तता ही. नो वन इज वर्थ इट. आम्ही धनू रास वृस्चिक पासून दूर. नाहीतर टापा खाली ठेचून टाकणार.
वृश्चिकेचा शुक्र लग्नी,चंद्र
वृश्चिकेचा शुक्र लग्नी,चंद्र दशमात.मी आहे.
छांदिष्ट. लहरी आणि व्यवस्थापनाशी जमत नाही. काहीही करतो. शिक्षकांना भाव देत नाही. मळलेल्या वाटेने जाणे टाळतो. केंद्रात दुसरे ग्रह नाहीत.
वृश्चिकेचा शुक्र - डार्सी
वृश्चिकेचा शुक्र - डार्सी असेल का?
ळिटल विमेन ना? मला ती
लिटल विमेन ना? मला ती व्यक्तीरेखा नाही माहीत. I faintly remember he bein a dark & broody character. May be Capricorn moon or ascendent,
माझ्या लग्न कुंडली मध्ये आहे
माझ्या लग्न कुंडली मध्ये आहे प्रथमात वृश्चिकेचा शुक्र, रवि, शनि, बुध आणी हर्षल.
ह्म्म्म रवि प्रथम स्थानी
ह्म्म्म रवि प्रथम स्थानी म्हणजे पहाटेचा जन्म असेल. बाकी हर्षल, Uranus in Scorpio (1974 to 1981) असल्याने जन्मसाल या रेंजमधील असेल. बाकी अन्य कोणी सांगू शकतील.
पहाटे आहे ६:३३ पण वर्ष चुकीच
पहाटे आहे ६:३३ पण वर्ष चुकीच आहे. १९८५ डीसेंबर
वृश्चिकेचा रवि काय सांगाल ?
वृश्चिकेचा रवि काय सांगाल ?
अनिंद्य ते सगळं पुस्तकातलच
अनिंद्य ते सगळं पुस्तकातलच बोलून दाखविण्यात काय पॉइन्ट आहे. मला तेवढेच माहीत आहे. शुक्रात मला गाणे वगैरे जोडून काहीतरी क्रिएटिव्ह लिहील्याचा आनंद मिळाला म्हणुन शुक्र घेतला.
>>>>>>> मॅजिक नव्हे. मारणारी
>>>>>>> मॅजिक नव्हे. मारणारी शक्ती आहे ती. ज्यावर वापरली तो उध्वस्त होतो.
नाण्याला दोन बाजू असतात हे खरे आहे. इट इज अॅन ऑब्सेसिव्ह, वेन्ज्फुल साइन. पण अनेक स्टर्लिंग गुण आहेत. म्हणूनच म्हणते वृश्चिकेला, वृश्चिकच बरी.
माझे वॄश्चिक सूर्य लोकांशी पटाते पण वृश्चिक चंद्राशी जरा मी जपूनच असते. एक मित्र होता/आहे. वॄश्चिक चंद्र. आमचं जमत नाही पण करमत नाही असे काहीसे आहे. आता संबंध फक्त वाढदिवसाला शुभेच्छा देण्यापुरता आहे पण त्याचा एक्सेसिव्ह सिक्रेटिव्ह स्वभाव मी जाणून आहे.
धन्यवाद शरदजी.
धन्यवाद शरदजी.
>>>>> द मॅजिक .... अ
>>>>> द मॅजिक .... अ स्कॉर्पिओ मॅजिक.>> मॅजिक नव्हे. मारणारी शक्ती आहे ती. ज्यावर वापरली तो उध्वस्त होतो. आजुबाजूचे खलास होतात. वृस्चिक म्हटले की मी दोन हात आपण्हून दूर. मला तुमचे प्रेमही नको आणि मग नंतर येणारी उद्वस्तता ही.
क-क-क-क किरण मला वाटतं वृश्चिक
शुक्राची( की मंगळाची?) नॅस्टी बाजू दाखविली आहे.आला इथे शाहरुख आला
शाहरुख़चे रियल लाईफ sun sign
शाहरुख़चे रियल लाईफ sun sign वृश्चिकच आहे, sun in Scorpio !
जगणं उत्सवमय करण्याकरता कोणता
जगणं उत्सवमय करण्याकरता कोणता शुक्र लागत असेल बरं? मला वाटतं कोणताही शुक्र चालेल. कारण शुक्रच जीवनाला सौंदर्य देतो, व्यक्तीचे जीवन उत्सवमय करतो. सौंदर्यासक्ती, जे जे काही सुंदर ते ते हवे हवेसे वाटते.
त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का,
त्या प्रकाशी तारकांच्या ओतीसी तू तेज का?
हे गाणे लिहीणार्या कविची कुंडली पहायला हवी. मीन शुक्र असेल? ह्म्म्म!!! काहीतरी मीन असेल. चं अथवा शु.
पहायला हवे.
>>>>>शाहरुख़चे रियल लाईफ sun
>>>>>शाहरुख़चे रियल लाईफ sun sign वृश्चिकच आहे, sun in Scorpio !
होय २ नोव्हेंबर वाटतं.
सूर्यकांत खांडेकर - २ एप्रिल
सूर्यकांत खांडेकर - २ एप्रिल १९२६
बुध (वाणी, लिखाण यांचा कारक) - मीन रास.
इन फॅक्ट चं वृश्चिकेचा आहे.
माझी रास सुद्धा वृश्चिक आहे
माझी रास सुद्धा वृश्चिक आहे
सामो, वृश्चिकेची माणसे व
सामो, वृश्चिकेची माणसे व स्त्रिया देखणेच असतात. अपवाद असतोच..
तुळ लग्नाची माणसे सुंदर आणी त्यात धनात वृश्चिकेत शुक्र किंवा चंद्र किंवा नेपच्युन असेल तर डोळे फार छान असतात. चंद्र डोळ्यांचा कारक आहे. वृश्चिकेतला नेपच्युन चक्क निळसर घारे डोळे देतो. पाहीलेय मी प्रत्यक्ष. आवाजाचे म्हणाल तर गोड आवाज ही चंद्र व शुक्राची देन आहे.
लिटल विमेन >>>
लिटल विमेन >>>
नाही. प्राईड ॲंड प्रेज्युडाईस…डार्क नाही म्हणता येणार, ब्रुडी येस…इंटेन्स नक्कीच.
मला वाटतं वृश्चिक = इंटेन्सिटी
अह्ह्ह ओके. होय इन्टेन्सिटी =
आह्ह्ह ओके. होय इन्टेन्सिटी = वृश्चिक
>>>>>>>एक प्रेम विवाह, नंतर
>>>>>>>एक प्रेम विवाह, नंतर परत प्रेम प्रकरण पण फसवणूक असे तिच्या वाट्याला आले.
@रश्मी, शुक्र-नेपच्यून युती होती का? ती युतीही कारणीभूत असेल किंवा आगीत तेल ओतणारी ठरली असेल. कारण प्रेमरुपी मृगजळामागे धावण्यातून तसे वाटते. युती हा अॅस्पेक्ट का कोण जाणे पण पाश्चात्य ज्योतिषी 'कठीण' आस्पेक्ट समजतात.
गुरु-नेपचून युती असेल तर कविमन असेल. कवितेची जाण असेल असा कयास आहे.
हे वृश्चिक शुक्र वगैरे काय
हे वृश्चिक शुक्र वगैरे काय प्रकरण आहे? हे कसे ओळखतात?
कुंडलीमध्ये कळते.
कुंडलीमध्ये कळते. कुंडली काढावी लागेल. आणि शुक्राची रास पाहून मग कळेल.
ही माझी कुंडली आहे.
ही माझी कुंडली आहे.
कायतरी सांगा.
कायतरी सांगा.
कायतरी सांगा.>>
कायतरी सांगा.>>
बाकी जाऊद्या पण तज्ञांनी मृत्यू स्थानातल्या वृश्चिकेचा चंद्र आणि लाभ स्थानातल्या कुंभेच्या राहू बद्दल जरूर सांगावे.
बाकी कर्म स्थानातल्या लग्नेश बद्दल अभिनंदन!
ज्योतिषाने सांगितलय
ज्योतिषाने सांगितलय पाण्यापासून दूर रहा.
Pages