एप्रिलमध्ये जुने घर सोडून नव्या घरी रहावयास आलो. जुन्या घराने इतका जीव लावला होता की, जणू काही जीवाभावाच्या मैत्राला सोडून आल्यासारखे वाटले. त्या घराला जीव लागण्याच्या अनेक कारणापैकी एक कारण म्हणजे चवदाव्या मजल्यावरच्या, या घराच्या बाल्कनीमधुन दिसणारा सताड अगदी क्षितिजापर्यंत जाणारा रस्ता. अगदी 'वॉल्ट व्हिटमनच्या' सॉन्ग ऑफ द ओपन रोड' या कवितेतील रस्त्यासारखा. अक्षरक्षः तसाच -
Afoot and light-hearted I take to the open road,
Healthy, free, the world before me,
The long brown path before me leading wherever I choose.
जरा खाली उतरले की पाय फुटेल तिकडे जावे आणि गर्दीमधील एकांत उपभोगावा असे आमचे लोकेशन होते. गावाच्या बरोब्बर केंद्रस्थानी. जिकडे जाउ तिकडे रोमांचक दुकाने. कुठे नाना दगड, स्फटिक, खडे विकणारी दुकाने, कुठे पुस्तकांची दुकाने तर कुठे बागा, कुठे स्टारबक्स सारखे जगप्रसिद्ध कॅफे, तर कुठे स्थानिक टुमदार कॅफे, पिझ्झा रेस्टॉरंटस. बरं फक्त फेरफटका मारायचा असेल तर दहा पावलांवरती हडसन नदीचा किनारा. लांबच लांब पसरलेला. १०,०००-१५,००० पावले काठाकाठाने, सहज चालता येइल असा. उन्हाळ्यात, हेमंतात, या नदीवर उतरलेले गीझ, त्यांची पिल्ले. तर नाताळात किनार्यावरील मॉल मध्ये केलेली भव्य आणि अतिशय सुंदर, रंगीबेरंगी रोषणाई. हा सगळा जंतर मंतर सोडून कुठे दुसरीकडे जावयास माझ्या मनाची अजिबात तयारी होत नव्हती. अगदी दोन पावलांवरती गावचे वाचनालय. जुन्या घराने खरच भरभरुन दिले. जाता जाता म्हणजे अगदी शेवटच्या दिवशी नवर्याने लिहीलेला लेख एका जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला, ते जर्नल पोस्ट पेटीत, येउन पडले होते जे आम्ही घेतले व त्या घराला फॉरेव्हर म्हणजे अगदी कायमचा रामराम ठोकला. जाता जाताही घराने आशीर्वादच दिले. अर्थात नवर्याच्या जागलेल्या रात्रीच्या रात्री आणि मेहनत होतीच.
.
पण 'अन्नासाठी फिरविशी दाही दिशा' या उक्तीनुसार घर तर सोडावेच लागणार होते. नव्या घरात आलो खरे पण हे घर फारच वेगळे वाटले. एक तर शांत शांत. घरासमोरच 'ब्रह्मकुमारी लोकांचे ग्लोबल हार्मनी टेंपल', अक्षरक्षः दहा पावलांवरती त्या गावतील मोठ्ठे मेडिटेशन सेंटर. बसेसची मस्त सोय असल्यामुळे, अमेरीकेमधील सर्वात जुन्या गणपतीच्या देवळात जायला अक्षरक्षः बसची फक्त अर्ध्या तासाची जर्नी. ट्राफिकच्या फास्ट लेनमधुन एकदम एक्झिट घेउन कंट्री रोड ला लागल्यासारखे झाले. पहीले काही दिवस जरा चुकचुकल्यासारखे वाटले खरे. पण हळूहळू फायदेही दिसू लागले. आसपास दुकाने फार नसल्यामुळे, अचानक होणार्या, अनप्लॅनड खर्चांवरही नियंत्रण आले. आसपास, पायी फिरण्याकरता बागा सापडल्या. इथेसुद्धा अगदी घराजवळ वाचनालय सापडले. घर मोठे असल्यामुळे, अनेक रोपे आणली गेली - स्नेक प्लँट, तुळस, फुलांची रोपे, बांबूची रोपे. घर एकदम हिरवे गार होउन गेले. भरपूर खिडक्या असल्यामुळे, सूर्यप्रकाश व हवा खूप लाभली. हळूहळू घराशी गट्टी होत गेली. माबोवरच्या एका मैत्रिणीशी गाठभेट झाली. काही कारणांनी, मुलगीही आमच्याकडेच रहायला आल्याने, तिचा सहवास लाभू लागला. एकंदर झाला तो बदल स्वागतार्हच होता. पण अजुनही २ ट्रेन्स करुन, जाउन, जुन्या घरापाशी रेंगाळणे काही कमी होत नाही.
.
लहानपणी एका ज्योतिषाने हात पाहून सांगीतलेले की खूप घरे फिरणार ही. ते तंतोतंत खरे घडले. विवाहोपरांत गृहप्रवेश केलेले आमचे मुंबईचे घर, ज्या घरात माझी मुलगी रांगायला शिकली, 'एक पाय नाचीव रे गोविंदा, घागरीच्या छंदा' करत दुडूदुडू चालायला शिकली. तर एक घर जिथे ती लहानाची मोठी झाली. एक घर जिथे तिचे टीनेज गेले, एक घर असेही होते जिथे माझे आजारपण गेले, त्या घराचे तर फक्त भकास पांढरे फट्ट छतच आठवते आणि बाहेर सिकाडा किटकांच्या पायांचा होणारा भेसूर आवाज. तर आता हे घर - न जाणो माझा गुणाचा जावई इथे या घरातच आम्हाला भेटायला पहील्यांदा येइल. यु नेव्हर नेव्हर नो. अजुन तरी कशातच काही नाही. पण मनात मांडे रचायला काय हरकत आहे. सगळी शेखचिल्लीची स्वप्ने. माझी खात्री आहे - खूप काही मस्त मस्त हे घर पाहीलही. आमेन!! किती तरी आठवणी घराच्या चार भिंतीत बहरलेल्या असतात. आपल्या सुखदु:खाच्या क्षणांचा घर हे साक्षी असते. खरोखर वास्तू जागती, असते. आणि माझी खात्री आहे वास्तुपुरुष हा तथास्तु म्हणत असतो. तेव्हा वास्तूत, नेहमी शुभ बोलावे, शुभ विचार करावे.
खूप छान वाटलं वाचायला.
खूप छान वाटलं वाचायला.
मी फारशी घरात म्हणजे वास्तूत आणि वस्तूत रमत नाही, किंवा मन गुंतवत नाही त्यामुळे मला जागा बदलायला मनाने त्रास होत नाही फक्त पॅकिंग, moving, Ani unpacking च लोड येत.
तरी तुझा लेख वाचताना आधीची घर, रंगविलेल्या भिंती बरच काही randomly आठवलं.
पहिले २४ वर्षे कायम एकच पत्ता होता तेव्हा वाटायचं, अरे काही बदलच नाही आणि नंतरच्या वीस वर्षात सहा पत्ते.
सगळीकडे फिरून शेवटी एकच पत्त्यावर जायचे.
आता हे घर - न जाणो माझा गुणाचा जावई इथे या घरातच आम्हाला भेटायला पहील्यांदा येइल.>>> सगळ्यात भारी/ गोड
वंदना आणि छन्दिफन्दि धन्यवाद
वंदना आणि छन्दिफन्दि धन्यवाद.
सामो, किती छान लिहीले आहे.
सामो, किती छान लिहीले आहे. प्रत्येक वास्तू, तिथल्या आठवणी सतत मनात येत राहतात.
- न जाणो माझा गुणाचा जावई इथे या घरातच आम्हाला भेटायला पहील्यांदा येइल हे फार गोड आहे
एप्रिलमध्ये जुने घर सोडून
एप्रिलमध्ये जुने घर सोडून नव्या घरी रहावयास आलो. ......... ही ओळच वाचली नव्हती.लेख वाचून छान म्हणून प्रतिसादही दिला होता. परत लेख वाचला.
नवीन घरासाठी अभिनंदन सामो!
ज्या ठिकाणी आपण राहतो ते
ज्या ठिकाणी आपण राहतो ते ठिकाण आपल्याला चांगलं वाटायला लागतं. कास्ट अवे पिक्चरमध्ये पण काही वर्षे निर्जन बेटावर घालवल्यावर जेव्हा हिरो ते बेट सोडतो तेव्हा इमोशनल होऊन त्या बेटाकडे पाहत असतो.
छान लिहिलं आहे , नवीन घरासाठी
छान लिहिलं आहे , नवीन घरासाठी शुभेच्छा सामो.
छान लिहलय सामो! नवीन घरासाठी
छान लिहलय सामो! नवीन घरासाठी शुभेच्छा!
छान लेख. लहानपणापासूनची सगळी
छान लेख. लहानपणापासूनची सगळी घरे आठवली.
नवीन घरासाठी अभिनंदन!
अरे वाह छान सामो
अरे वाह छान सामो
अभिनंदन आणि शुभेच्छा
घर मालकीचे असो वा भाड्याचे.. आठवणी मनात हक्काचे घर करतातच..
सर्वांचे आभार. हेही भाड्याचेच
सर्वांचे आभार. हेही भाड्याचेच आहे.
छान लिहिले आहे! नवीन घरासाठी
छान लिहिले आहे! नवीन घरासाठी शुभेच्छा!
धन्यवाद.
धन्यवाद.
मी फारशी घरात म्हणजे वास्तूत
मी फारशी घरात म्हणजे वास्तूत आणि वस्तूत रमत नाही, किंवा मन गुंतवत नाही त्यामुळे मला जागा बदलायला मनाने त्रास होत नाही फक्त पॅकिंग, moving, Ani unpacking च लोड येत.
>>>>
याला किती किती अनुमोदन देऊ? २५ वर्ष राहिलेलं घर सोडून जाताना पण मला घराबद्दल काही नव्हतं वाटलं कारण घरातली माणसं सोबत येत होती आणि आजूबाजूची आधीच निघून गेलेली त्यामुळे निघताना काहीच वाटलं नाही. माझा जीव माणसांमध्ये गुंततो आणि खूप जास्त गुंततो.
सामो, लेख फारच सुंदर! नव्या घरासाठी अभिनंदन! मजेत आनंदाने रहा.
रीया आभार
रीया आभार
छान लिहीले आहे!
छान लिहीले आहे!
नवीन घरातील वास्तव्याकरता शुभेच्छा! अगदी केऑटिक पण धमाल गजबजाटात असलेल्या घरातून अगदी निवांत नेबरहुड मधे येताना सुरूवातीला तो बदलच न आवडणे - इथपासून ते तेथे रूळल्यावर तेच आवडू लागणे इथपर्यंत प्रवास हाही इंटरेस्टिंग असतो. मी अनुभवल्यामुळे सांगू शकतो इन फॅक्ट भारतातून अमेरिकेत आल्यावर आणखी मॅक्रो लेव्हलला तसेच होते
धन्यवाद फारेन्ड.
धन्यवाद फारेन्ड.
Pages