४ पावसाळे

Submitted by सामो on 20 August, 2023 - 13:12

आधीच्या लेखामध्ये बराचसा भर हा अन्य लोकांचे दोष गणण्यात होता. वय वाढेल तसा आलेला कटुपणा आणि इन जनरल डिस-इल्युसनमेन्ट लेखामधून रिफ्लेक्ट होत होती. दॅट रिफ्लेक्ट्स ऑन द पर्सीव्हर टू. ज्या कोणाला ही कटू भावना येते त्या व्यक्तीची नक्कीच चूक असते. त्यामुळे हा लेख काढून टाकलेला आहे.
परत टाकायचा म्हटलं तर तो आर्काईव्ह वरती उपलब्ध नाही.
पण मी पूर्वप्रकाशित लेख या जागी टाकू शकते. टाकत आहे.

------------------------ अन्यत्र पूर्वप्रकाशित -------------------------
आयुष्याच्या कॅलिडोस्कोपमध्ये वेगवेगळ्या वळणांवरती वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला भुलवतात, आकर्षक वाटतात. आता लहानपणीच पहा ना, असं मूल क्वचितच सापडेल ज्याला फुलपंखी पर्‍या, राजपुत्र-राजकन्या, आगीच्या ज्वाळा ओकणारे , आकाशात संचार करणारे ड्रॅगन यांनी मोहविले नसेल.
त्याच लहान मुला/मुलीने जरा तारुण्यात पदार्पण केले की वसंतोत्सव, बहाराचा काळ सुरु होतो.ज्या ड्रॅगनची भीती लहानपणी वाटत असते तोच ड्रॅगन जिंकावासा वाटू लागतो. "Evoke the fire within" अशा धाडसी वृत्तीचा वाटून खुणावू लागतो. जग पादाक्रांत करण्याची , इच्छा मनात लसलसू लागते.अशावेळी आपले डेस्क्टॉप वॉलपेपर, आपल्या खोल्यांमधील चित्रे , कलाकृती ह्या ओरडून ओरडून विद्रोही म्हणा अथवा त्या त्या वेळेच्या मनस्थितीचे वर्णन करतात. आपल्या त्या वेळेच्या मनस्थितीच्या त्या द्योतक असतात.
हां हां म्हणता "मिडलाईफ" उंबरठ्यावर येऊन दाखल होतं.आपणही बरेचसे निवळलेलो असतो - मान्य करा वा नका करू.केसांना केशकलप लावा वा नका लावू. बरीचशी, खरच बरीचशी स्वप्ने साकार झालेली असतात. पण अजून जबाबदारीतून पूर्ण मुक्तता झालेली नसते. एकप्रकारचा सौम्यपणा, समजूतदारपणा तुमच्या स्वभावात येऊ घातलेला असतो. आणि काय आश्चर्य डेस्कटॉपवरचा "फायरी ड्रॅगन" एके दिवशी जाऊन त्या जागी शुभ्र तेजस्वी कमळ येते. तुम्ही मनाशी म्हणता "D-I-G-N-I-T-Y" किती सुंदर शब्द आहे. मला सर्वात आवडणारा शब्द. आणि तुमच्यातल्या या बदलावर तुम्हीही चमकता. पण वेल, हा बदल फार वरचा झाला हो. आत आत खोल जो बदल होत असतो तो तर कित्येक पटीने हलवून टाकणारा असतो. या काळात तुमच्या आजवरच्या महत्त्वाकांक्षांचा, जबाबदार्‍यांचा, जोडीदार म्हणून तुम्ही निभावलेल्या नात्याचा प्रत्येक टप्प्याचा तुम्ही आढावा घेत असता. कुठेतरी टिकमार्कींग चालू असते. कधी तुम्ही "अ‍ॅबीसमली डिप्रेस" होऊनरडता कधी "एक्स्टॅटीकली" आनंदी होता. काहीच मधले नसते. यालाच "मिडलाईफ क्रायसिस" म्हणतात का?
असो. कालपरवापर्यंत फक्त "सेक्स, हॅपीनेस, सोशल लाइफ" या विषयावर इंटुक (मानसशास्त्रीय) लेख वाचणारे तुम्ही आज "एजींग" या विभागाकडे वळता. कारण तुम्हाला कुठेतरी वार्धक्याची चाहूल लागलेली असते. मग तुम्ही "वय वाढण्याचे फायदे" वगैरे लेख वाचत सुटता. मी ही वाचला. मला खूप आवडला. न आवडून करते काय. तुम्ही आतापर्यंत एक मात्र जरूर शिकलेले असता - तुमची मूठभर का होईना तत्वे जर ठाम असतील आणि तुम्ही त्या तत्वांशी तडजोडी केल्या नसतील, तुम्हाला थोडेसे का होईना मित्र-मैत्रीणी असतील, छंद असतील, आणि जर तुमचे कुटुंब तुम्हाला साथ देईल तर तुम्ही सहज या क्रायसिसमधून पार पडाल.
पण एकंदर असे आहे. This is my perspective on midlife crisis.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलं आहे . तुमच्या लेखाशी डायरेक्ट रिलेटेड नाही हे पण - कधीकधी प्रश्न पडतो - माणसांना आतून कधी आपण मोठे झालो आहोत असं खरं खरं वाटतं का की वयाने मोठे लोक जसं गंभीरपणे वागतात ते बघून बघून आपण तसे वागायला लागतों , आत आपण अजून लहान मूलच आहोत हे कोणाला कळू नये म्हणून मोठं झाल्याचं सुरेख नाटक वठवतो ? एक एटिकेट्स , आपसात , समाजात कसं वागायचं , कसं बोलायचं याचे नियम बघून शिकतो स्वतःही तसंच वागायला ? कारण मोठ्या माणसांनी तसं वागणं अपेक्षित आहे हे आपल्याला दिसत असतं .. मग कदाचित हळूहळू तसंच वागणं अंगवळणी पडतं ? आतून ऍडल्ट झाल्यासारखं न वाटणारे , 10 - 12 वर्षं वय असल्यासारखे लोक नक्की मूठभर आहेत की खूप आहेत की सगळेच ? जराशी भीती वाटते ... सगळीच्या सगळी जर अडल्ट असल्याचं प्रिटेन्ड करणारी लहान मुलं असली तर .

>>>>>फालतू, गर्विष्ठ, बाताड्या, अहंकारी, मॅनरलेस अशा विविध लोकांना आणि शेवटचे वाक्य stay non-judgemental हे जरी एका श्वासात लिहीलेले असले आणि विरोधाभासी असले, तरी त्याबद्दल माझ्या मनात एक नितळता ( क्लॅरिटी) आहे आणि ती ही की आपण स्वतःला खूप हार्शली जज करत असतो. किंबहुना सतत स्वतःला नॅग करतो, टोचूनही बोलतो. हा जो नकारात्मक संवाद आहे त्याचा उपयोग तर काही नसतोच वरती तोटाच असतो. इन्ट्रोस्पेक्शन (अंतर्मुख होणे) वेगळे, रिफ्लेक्शन वेगळे. आणि स्वतःला कोसणे हे वेगळे.
तेव्हा नॉन जजमेन्टल हे स्वतःच्या संदर्भात लिहीलेले वाक्य आहे. शिवाय शक्य तेवढे अन्य लोकांच्या बाबतीत सुद्धा झाल्यास आपल्यालाच मनःशांती मिळते हे खरे आहे.

>>>>सगळीच्या सगळी जर अडल्ट असल्याचं प्रिटेन्ड करणारी लहान मुलं असली तर .
Happy खरच.
राधानिशा आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

चांगला आहे लेख.
माझ्या मुलाचे एक पेटंट वाक्य आहे: Enjoy the process.
तुम्ही एकदा संपूर्ण विचार करून एखादी गोष्ट ठरवली तर नंतर ' जर तर ' करीत न बसता जे घडवलं जातंय त्या क्रियेचा आनंद लुटा. शंकेखोर आणि नकारात्मक होऊ नका.
लेख मनापासून आवडला.

छान लिहिलंयस. आपलं आपलं realisation असतं. काहीजण तू म्हणतेस तसं लोकांना चाळण्या लावून जीवनातून वगळतील तर काही सर्वप्रकारच्या गुणावगुणांसकट accept करतील. अनेकजण या दोन टोकांच्या मधल्या जागेत आपली खुर्ची टाकतील. चलता है! To each her own. It's your life, you have your experiences, interpretations, thoughts, actions. No one is right, no one is wrong.

लेख आवडला , एस्पेशली उतरार्ध.

मला हल्ली वाटायला लागलं आहे, क्षमाशील बनणं is a gateway तo sort out many things, but than people start thinking आ गया ऊंट पहाड के नीचें, मग तुम्ही सांगितल्या प्रमाणे काही बाबतीत, हु केअर्स! अ‍ॅटिट्युड आलेली आहे. टेक इट ऑर लीव्ह इट. ज्यांना कोणाला आपण आवडत नाही त्यांच्या नाकदुर्‍या काढायला जायचे नाही.

आपली जशी इतरांबाबत मतं असतात तशीच इतरांची आपल्याबाबत. बरोबर कोण? कसं ठरणार? प्रत्येकाला त्याचा दृष्टीकोन प्रिय.
कबीर आठवले...
बुरा जो देखन मै चला
बुरा न मिलिया कोय
जो दिल खोजा आपना
मुझसे बुरा न कोय

हिरा यांच्या मुलांचं कौतुक त्याला हे वाक्य आवडतं...Enjoy the process.

>>>>>>>Enjoy the process.
होय म्हणुनच Life is a beautiful, exquisite, and yet ruthless beast. मनापासून धन्यवाद हीरा.
कुमार आपलेही आभार.
>>>>काहीजण तू म्हणतेस तसं लोकांना चाळण्या लावून जीवनातून वगळतील तर काही सर्वप्रकारच्या गुणावगुणांसकट accept करतील. अनेकजण या दोन टोकांच्या मधल्या जागेत आपली खुर्ची टाकतील.
मस्त गं मामी. त्रिवार सत्य. मीच कुठेतरी लिहीलेले एका कवयित्रीचे एक वाक्य सापडले की टाकते -
तुझे आभार.
>>>>>>मला हल्ली वाटायला लागलं आहे, क्षमाशील बनणं is a gateway तo sort out many things, but than people start thinking आ गया ऊंट पहाड के नीचें,
बरेचदा, चांगुलपणा आणि दुबळेपणा हा एकाच तराजूत तोलतात लोकं. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद संजीव.
>>>>>प्रत्येकाला त्याचा दृष्टीकोन प्रिय.
हे खरे आहे Happy आपल्याकरता इतरजण लोक असतात तेच इतरांकरताही आपण परकेच असतो. परके म्हणजे एक नवी तडजोड आणि दोषांचा सागर Happy दसा आभार.
>>>>>>बुरा जो देखन मै चला
बुरा न मिलिया कोय
जो दिल खोजा आपना
मुझसे बुरा न कोय
आपले सुद्धा अवगुण म्हणा किंवा मर्यादा असतातच. मला बाउंड्रीज चा सिव्हिअर इश्यु आहे. त्यामुळे मग .... खूपदा मैत्रीत वितुष्ट तरी येते किंवा माझा गैरफायदा घेतला जातो. पण हे सुधरत नाही. कोशीश जारी है|

...most of all stay non-judgemental. अवघड आहे.नॉन-जजमेंटल असणे ग्लोबल लेवल वर गुंतागुंतीचे होऊ शकते कारण नात्यांचा आवाका वाढतोय. नाते सम्बन्ध ठीकठाक असावेत असे वाटत असेल तर नॉन जजमेंटल ठीक आहे, परन्तु मग इतरांशी संवाद साधताना आपल्या कल्पना, पूर्वग्रह आणि मूल्यमापन करणे बंद करायला हवे. स्वतःचे पूर्वग्रह आणि गृहीतके बाजूला ठेवता येतात का? दुसऱ्या व्यक्तीच्या भावना समजून घेणार की नाही? स्वतःला (त्यांच्या बुटात पाय घालून) त्यांचा दृष्टीकोन, पार्श्वभूमी आणि अनुभव समजून घेता येईल का? Only wearer knows where the shoe pinches. समोरची व्यक्ती काय म्हणते ते अगदी मनापासून ऐकण्यावर भर देणार का? अर्थात् असे लक्ष दिले तर सांगणाऱ्याला तो एक प्रकारचा आदरच वाटतो. हे आपण करू शकतो का? त्या व्यक्तीचे लगेच मूल्यांकन किंवा वर्गीकरण न करता आपल्याला त्याचा दृष्टिकोन समजून घेता येईल का? माइंडफुलनेसचा सराव करावा लागतों तो आपण करू शकू का? प्रत्येक समूहाची सांस्कृतिक पार्श्वभूमी, त्यांचे अनुभव आणि मूल्ये वेगवेगळी असतात ते आपण लक्षात घेऊ शकू का? आपल्या स्वत:सह कोणीही परिपूर्ण नाही हे ओळखता येईल का? प्रत्येकजण चुका करतो आणि त्यांचे स्वतःचे काही संघर्ष आहेत ही कल्पना स्वीकारता येईल का? सर्वांचे आचरण किंवा दृष्टिकोन आपल्या मूल्यांशी जुळत नाहीत. मग असे मतभेद असतानाही त्यांच्याशी जमवून घेता येईल का? शेवटी, नॉन-जजमेंटल राहणे is a journey and not a destination. त्या साठी आपण तयार आहोत का हे महत्त्वाचे.

चिंतन आवडले.

... फक्त साखरलिंपित असत्ये लक्षातच येत नाहीत तर धादांत कपोलकल्पित बाता व्यवस्थित कळतात आणि मनातल्या मनात त्यांची सिनिकल खरडपट्टीही..... हा हा हे तर मीच लिहिलेय जणू ! बहुत खूब.

stay non-judgemental ... हे फार कठीण टास्क आहे Happy

छान लिहिलय!
>>नवीन Submitted by Revati1980 on 22 August, 2023 - 22:55>> प्रतिसाद आवडला.
हीरा, एंजॉय द प्रोसेस हे आवडले.
मामी, मी बरेचदा मधल्या जागेत खुर्ची टाकते आणि माझ्या मनस्थितीनुसार अधून मधून ती खूर्ची थोड्या वेळापूरती कधी या टोकाला तर कधी त्या टोकाला हलते .

लेख आवडला.
चाळिशी तील आणि पन्नाशी तील मी - आत्मवलोकन!
त्याला कारणीभूत
परिस्थिती, समाज, त्यातील आपले अनुभव, वाचन, मीडिया या आणि अशा बऱ्याच गोष्टी हे बाहेरील घटक असतात, तर चिंतन, परिपक्वता, हार्मोनल बदल हे आंतरिक घटक.

प्रत्येकाचा बदल, प्रवास निराळा...
पण तेच "वाढण्याची" (growth) खूण आहे.

काहीजण असेही असतात की अजिबात बदलत नाहीत... त्यांचं काय??

आवडला लेख.
बरीचशी, खरच बरीचशी स्वप्ने साकार झालेली असतात.>>अगदी खरंय.
ज्यांना कोणाला आपण आवडत नाही त्यांच्या नाकदुर्‍या काढायला जायचे नाही.>> अगदी नाकदुरया नाही काढत. पण मनातल्या मनात मात्र कुढत बसते मी..
मुख्य लोकं असं का वागतात ह्याचा खूप त्रास होत असतो..

@रेवती अचूक लिहीलय तुम्ही. नॉनजजमेन्ट फक्त स्वतःबाबत ठेउन कसं चालेल Happy अन्य सर्वांना त्यांचे त्यांचे अनुभव,संस्कार, अनुभव,, बलस्थाने आणि मर्यादा असतात. प्रत्येकात गुणावगुण असतातच. हे असं अन्य व्यक्तीच्या बाबतीत नॉन-जजमेन्टल रहाणे फार कठीण आहे.
@स्वाती, अनिंद्य, छन्दीफन्दी व शर्मिला आपलेसुद्धा आभार.

@रेवती - हा पहा माझा एक पूर्वप्रकाशित लेख
--------------------
मला एक छान गोष्ट आठवते आहे- एक सत्शील, मेहमान-नवाज, कनवाळू गाव असतं. गावात एकदा, एक अतिशय सत्शील दंपती काही धार्मिक कार्य घालतात. सर्वांना बोलावतात, तीर्थप्रसाद व खीर-पुरीचे जेवण असा थाट असतो. पण होतं काय खीरीच्या भांड्यात पाल पडून २ ब्राह्मणांचा मृत्यु ओढवतो. सर्वच जण हळहळतात. पण त्या दंपतीविरुद्ध कोणी ब्र काढत नाही की तसे कोणाच्या मनात येत नाही.
स्वर्गात चित्रगुप्त जमाखर्च लिहीत असतो. त्याला संभ्रम पडतो की हे ब्रह्महत्येचे पातक कोणाच्या माथी लिहायचे? तो जातो देवांकडे. देव सांगतात - गावात गुप्तपणे फिर अन मला येऊन सांग या घटनेबद्दल कोण काय बोलते ते.
बरं म्हणतो. त्या गावात कोणीच त्या दंपतीला वाईट बोल लावत नसतात. फक्त नशीबाला बोल लावत असतात. प...ण एका पाणवठ्यावर २ स्त्रिया कुचुकुच बोलताना दिसतात - अशी कशी पाल पडली? नक्कीच काहीतरी मेख आहे. माझा संशय तर यजमानांवर आहे.
देव ही घटना ऐकून चित्रगुप्तास म्हणतात - ह्म्म ब्रह्महत्येचे पातक या २ स्त्रियांच्या माथी घाल.
__________

परनिंंदेविरुद्धची, ही कथा एका बुद्धिस्ट पुस्तकात वाचली.
पुढे बरच विवेचन होते की दुसर्‍याची रेघ कमी करुन आपली मोठी करु नका.
वाचिक हिंसा टाळा,
लेबलिंग टाळा,
जजमेंटल राहू नका.

हे सर्व आदर्शात ठीक आहे. पण मनुष्यस्वभाव असा आहे की परनिंदेतून एक आनंद मिळतो. त्याचे काय. अन ही धार्मिक पुस्तके असे लहान-लहान आनंद हिरावून घेतात. अर्थात लहान नाही हा आनंद, कोणाकरता तरी हार्मफुलच आहे. पण बरेचदा ऑफीसमध्ये दिसते की ४ डोकी एकत्र येतात अन गॉसिप सुरु होते, आपण भाग घेतला नाही, गप्प गप्प राहीलो तर प्रवाहाविरुद्ध पोहून लोकनिंदा ओढवण्याची भीती रहाते = दुसर्‍या वेळी लोक टाळतील.
"परनिंदा" हे "बाँडींगचे" एक टूल म्हणूनही आचरणात आणून पाहीले आहे. इन्स्टन्ट बाँडींग होते पण मग खूप गिल्टी वाटते असा अनुभव. (तसंही आम्हाला गिल्टी
वाटायला कारण लागत नाहीच. ह. पा. गिल्टी वाटतय :() अन झालेले बाँडींग टिकत नाही ते नाहीच.

पण क्वचित कुचु कुचु बोलणे ही गरज असल्याचेही जाणवले आहे.

मुख्य म्हणजे, "जजमेंटल राहू नका" ला काही अर्थ आहे का? जजमेंट ही मेंदूची एक फॅकल्टी आहे, प्रत्येक क्षणी आपण कळत-नकळत जजमेंट करतच असतो.
त्यामुळे हा अतिआदर्शवाद कसा आचरणात हा प्रश्नच आहे ब्वॉ.
मला खात्री आहे हा प्रश्न अनेकांना बाळबोध वाटेल.

नवीन Submitted by सामो on 26 August, 2023 - 02:24...आवडले. बाकी लेखाचे शीर्षक तेवढे वाचायला मिळाले.

लेख वाचायला मिळाले नाही. प्रतिसाद छान आहेत.

@राधानिशा: मला वाटते बहुत करून लोक आपल्याला आतुन खरं खरं काय वाटते याचा विचार करणे सोडुन देतात/ते विचार आले तर 7दाबुन टाकतात. आपण सगळे एका मोल्ड मधुन काढल्या सारखे वागू लागतो जसजसे वाढत जातो. स्त्रियांनी पालीला घाबरले पाहिजे, पुरुषांनी अजिबात नाही, आईने असं वागलं पाहिजे, बापाने असे, मुलांनी, बहीण-भावाने असे (यात अमक्या ठिकाणच्या लोकांनी असे, अमुक वर्गातल्या लोकांनी असे वगैरे अजुन भर घालता येईल) इत्यादिचा नकळत आपल्यावर लहानपणापासून भडिमार होत असतो घरी, बाहेर, शाळेत, पुस्तकातून आणि आता टीव्ही व इतर माध्यमातून. या सर्वांची एक मिसळ होत आपण मोठे होते आणि त्यातून मोठ्यांनी कसे असावे/वागावे याची अपेक्षित भूमिका वठवत रहातो असे मला वाटते. हे चूक/बरोबर या दृष्टिकोनातून नव्हे तर फक्त एक निरीक्षण म्हणुन जे मला वाटते ते लिहिले आहे.

@रेवती नॉन जजमेंटल रहाणे एक कँटीन्युअस प्रोसेस, प्रवास याबद्दल छान लिहिले आहे, पटले.

हीरा, मामी प्रतिसाद आवडले

लेखामध्ये बराचसा भर हा अन्य लोकांचे दोष गणण्यात होता. वय वाढेल तसा आलेला कटुपणा आणि इन जनरल डिस-इल्युसनमेन्ट लेखामधून रिफ्लेक्ट होत होती. दॅट रिफ्लेक्ट्स ऑन द पर्सीव्हर टू. ज्या कोणाला ही कटू भावना येते त्या व्यक्तीची नक्कीच चूक असते. त्यामुळे हा लेख काढून टाकलेला आहे.
परत टाकायचा म्हटलं तर तो आर्काईव्ह वरती उपलब्ध नाही.
पण मी पूर्वप्रकाशित लेख या जागी टाकू शकते. टाकत आहे.

>>>>>>>>>लेखामध्ये बराचसा भर हा अन्य लोकांचे दोष गणण्यात होता.

एक मस्त सुविचार सापडला - जगात अर्धे लोक स्वतःला उत्कृष्ट म्हणून घडवायला येतात आणि अर्धे लोक इतरांना..! आपण कुठल्या वर्गात मोडायचं हा प्रत्येकाने आपले आपण ठरवायचे.

हे ब्रह्महत्येचे पातक कोणाच्या माथी लिहायचे? >> हे पूर्ण स्ट्रक्चर एकदा परत तपा सायला पाहिजे. ब्रहम हत्येचे तेवढे पातक व उच्च जातीचे लोक दलित माण साला त्याच्या फॅमिलीला, आमच्या व्हिरीतले पाणी प्यायले/ आमच्या समोर घोड्यावरून वरात काढली, चप्पल पायात घालून गेला / बायको मुलाबरोबर बाइक वरुन आमच्या घरा समोरून गेला म्हणून मारहाण करतात व प्रसंगी ह्त्या करतात त्याचे काय जस्टिफिकेशन? जन्माने असे सेग्रिकेशन करणे बरोबर आहे का त्यावर चर्चा व्हायला हवी.