फ्रिज मध्ये असतील त्या भाज्या उभ्या चिरुन. मी गाजर, कोबी, झुकीनी, ढब्बु, कांदा, कांद्याची पात, मश्रूम आणि कोथिंबीर वापरले आहेत.
बटाटा, रताळ ,पालक वैगरे छान लागतात अस मैत्रीण म्हणाली.
मिठ, मिरपुड, मिरची, डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ,चमचाभर कॉर्नफ्लावर / कॉर्नस्टार्च आणि तेल.
आज नारळी पौर्णिमे निमित्त नारळी भात आणि जोडीला हे पॅनकेक केले. इन्स्टावर बघुन हे पॅनकेक करुन बघण्याचा मोह होतच होता आणि माझी अगदी जिवाभावाची एक मैत्रीण कोरियन आहे त्यामुळे तिला नीट कृती विचारली आणि थोडे फेरफार करुन हे करुन पाहीले. चवीला छान आणि अगदी पोटभरीचे होतात.
कृती साधारण आपल्या धिरड्याच्या जवळपास जाणारी आहे.भरपूर भाज्या असल्याने पोटभर आणि हेल्दी पण आहेत.
मोठ्या भांड्यात चिरलेल्या भाज्या घेऊन ( मी साधारण ५ कप भाज्या घेतल्या होत्या, जवळ जवळ १/२ कढई भाज्याच होत्या ) चवीनुसार त्यात मिठ, बारीक चिरलेली मिरची, मिरपुड घालून त्यात साधारण १ ते सव्वा कप मिक्स पिठ थोड थोड करत घातलं. ह्या पॅनकेक मध्ये भाज्या जास्त आणि पीठं नावाला घालायच आहे आणि अगदी थोडंस पाणी छान ओलसर होण्यासाठी आणि मग लगेच करायला घ्यायचे.
मी लेक नवरा आले की गरम गरम खायला करायचे म्हणून जवळ जवळ तासभर मिश्रण तसंच ठेवल्याने भाज्यांना थोडं पाणी सुटलं जे गरजेच नाहिये.
आता तव्यावर तेल लावून चमच्याने ते मिश्रण साधारण गोल पसरवायचं. भाज्याच जास्त असल्याने चमच्यानेच कराव लागतं. आपापलं पसरत नाही. एक बाजू छान कुरकुरीत झाली की पलटून दुसर्या बाजूने पण तेल लावून भाजायचे.
कोरियन रेसिपी नुसार ह्यात फक्त मैदा आणि कॉर्नफ्लावर वापरतात, आणि आवडत असेल तर अंड, सीफुड मिक्स ( हे काय असतं मला माहिती नाहीये) घालतात.
ह्या बरोबर खायला मी चिली गार्लिक चटणी केली आहे. पण पारंपारीक पद्धती मध्ये सोया सॉस + व्हिनेगर+ कांद्याची पात+तिळ घालुन मिक्स करतात आणि त्या बरोबर हे पॅनकेक खातात.
मी केलेल्या बदलाने ग्लूटेन फ्री खाणार्यांच्या साठी पण हे पॅनकेक चालतील.
इथेच मैत्रेयीने ह्याची पाकृ
इथेच मैत्रेयीने ह्याची पाकृ दिली आहे. आत्ता पाहिली साधारण सारखीच आहे मी केलेली पाकृ.
ही सेम रेसिपी दिसते आहे.
ही सेम रेसिपी दिसते आहे.
होय वरती लिहिल्या प्रमाणे मी
होय वरती लिहिल्या प्रमाणे मी आत्ता पाहिली हि साधरण सारखी रेसिपी. डाळीचे पीठ वगळता सेमच आहे. आता हा धागा डिलीट कसा करु?
हो, आपल्या पोस्ट्स पाठोपाठ
हो, आपल्या पोस्ट्स पाठोपाठ पडल्या.
तुमची तुम्हाला डिलीट नाही करता येणार - ॲडमिनना सांगावं लागेल.
मी करून पहिला. मस्त झालेला.
मी करून पहिला. मस्त झालेला.
मी binding साठी थोडे ( एकेक चमचा) मुगाचे पीठ, ज्वारीचे पीठ आणि थोडे ओट्स चे मिक्सर वरून काढून पीठ असे टाकले.
आणि ओवा, जिरे, तीळ!
<<<आता हा धागा डिलीट कसा करु?
<<<आता हा धागा डिलीट कसा करु?
नवीन Submitted by अनुश्री. >>>>
डिलीट नका करू. असू देत की. तुमचे पदार्थ सारखेच असले तरी लिखाण वेगळे आहेच. एका पदार्थाच्या दोन रेसिपी आहेत माबोवर.
पाककृती आवडली. फोटो भयंकर
पाककृती आवडली. फोटो भयंकर आवडले.
धन्यवाद सगळ्यांना
धन्यवाद सगळ्यांना
आंबट गोड, जिरे ओवा घालायची आयडिया छान आहे.
ह्या कृतीत बरेच प्रयोग होऊ शकतात. फ्रिज मधल्या भाज्या संपवायला पण हि पाकृ मस्त आहे.
छान रेसिपी , दिसतंय पण छान..
छान रेसिपी , दिसतंय पण छान..
मैत्रेयी ची रेसिपी पण वाचली होती. अनुश्री तुझ्या रेसिपी मध्ये मला सगळ्यात जास्त इंटरेस्ट तुझ्या कोरियन मैत्रिणी मध्ये आहे. त्यात तू म्हंटलंयस की ती जिवाभावाची आहे. तिच्या बद्दल लिही ना वेगळा धागा काढून. कशी भेटली आणि अशी पक्की मैत्री कशी झाली?
फ्रिज मधल्या भाज्या संपवायला
फ्रिज मधल्या भाज्या संपवायला पण हि पाकृ मस्त आहे.= हे मस्त आहे अनुश्री.
बाकी धनुडीला मम.
धनुडी, सगळ्यात आधी माझी कलिग
धनुडी, सगळ्यात आधी माझी कलिग आहे ती , साऊथ कोरिया मधली आहे. कामाच्या ठिकाणीच ओळख झाली आणि पुढे मस्त मैत्री झाली, गेली सहा वर्ष ओळख / मैत्री आहे आमची. एकत्र काम करतो. तिला आपल्या बद्दल म्हणजे भारतीयांच्या बद्द्ल फार कुतुहल आहे. आपले सगळे पदार्थ फार आवडीने खाते.. अगदी घरी येऊन पाणी पुरी पासुन कामाच्या ठिकाणी माझ्या डब्यातली कार्ल्याची भाजी सुद्धा खाऊन पाहिली आहे तिने
नक्कीच करून बघेन मी, छान
नक्कीच करून बघेन मी, छान option आहे
मस्तच अनुश्री. मी हल्ली
मस्तच अनुश्री. मी हल्ली व्हर्च्युअली कोरियातच असते असं म्हणायला हरकत नाही. एवढे k drama बघितले आहेत आणि बघते की त्यांची संस्कृती, चालीरीती समजायला लागलीये. मी पण प्रेमात आहे कोरियाच्या.