अंमली - भाग २१!

Submitted by अज्ञातवासी on 28 August, 2023 - 06:28

अंमली - भाग २०!

https://www.maayboli.com/node/83862

"रामायण...
लंकेचा राजा रावण, त्याने अयोध्येचा राजकुमार राम याची पत्नी सीता पळवून नेली. त्यानंतर रामाने लंकेत जाऊन युद्ध करून रावणाचा वध करून सीतेला परत आणलं. सांगा रामायण संपलं की नाही?"
"हो." सगळेजण म्हणाले.
"ही झाली कथा. पण यात प्रसंग आले, जसे काही शिवधनुष्य, जटायू, वानरसेना, सेतू, इत्यादी, तर एक पट तयार होतो,आणि हळूहळू पटकथा तयार होते. आणि त्यानंतर सुसंबद्ध अशी पटकथा जोडून, जेव्हा पात्रे एकमेकांशी संवाद साधतात, तेव्हा तयार होते स्क्रिप्ट..."
स्नेहल सांगत होती. तो ऐकत होता.
"तर मिस्टर मनिष, असा एखादा प्रसंग तुम्ही उभा करू शकाल?"
तिने अनाहूतपणे प्रश्न विचारला.
तो चमकून उभा राहिला.
"मी?" त्याने विचारले.
"हो तुम्हीच. सांगा."
तो हसला. "मी नवीन आहे, पण सांगतो चुकलं तर तुम्ही आहातच बरोबर करायला."
"नक्कीच. तुमच्या चुका सुधरवण्यासाठीच मी इथे आहे."
"थॅन्क्स मॅडम. सो काईंड ऑफ यू.
तर स्थळ आहे लंकेचा राजमहाल. पूर्ण सोन्याचा. चकाचक. रावण तिथे एकटाच बसलाय, चिंताक्रांत. त्याचे सर्व सेनानी मारले गेले आहेत...
...मंदोदरी तिथे येते, आणि म्हणते.
स्वामी मी तुम्हाला किती समजावलं, आणि विनाश टाळू पाहिला. मी सीतेपेक्षा कुठेही कमी होते का? सांगा ना? मग तरीही सीतेसाठी का हा अट्टाहास? मी तुम्हाला प्रिय नाही का?
रावण उठला. तो विषादपूर्वक हसला. त्याने तिचं मुखकमल ओंजळीत घेतलं.
माझी राणी, तू मला जगात प्रिय आहेस. प्राणप्रिय आहेस. तुझ्याविना मला काहीही प्रिय नाही. तुला की कधीही सीता बनवणार नाही. तुला कधीही मी रानावनात भटकताना बघूच शकत नाही. माझी प्रिये, आजपर्यंत मी जे काही केलं, ते फक्त तुझ्यासाठी. म्हणून आज लंकेची महाराणी त्रिभुवनात प्रसिद्ध आहे.
आणि म्हणून वचन देतो, लंकेचा राजा रावण असेल किंवा नसेल, महाराणी मंदोदरीच असेल..."
...तो थांबला...
"...अद्भुत..." एकजण उत्तरला.
सर्वजण एक मिनिट स्तब्ध झाले.
आणि टाळ्यांचा कडकडाट झाला...
तो हसला.
"चला, यावर पुढचं एक्स्टेंशन मी करते." स्नेहल कोरडेपणाने म्हणाली.
"मंदोदरीने तो हात झिडकारला, आणि ती म्हणाली. महाराज, हे पोकळ शब्दांचे बुडबुडे पुरे. तुमच्या वासनेच्या, अहंकाराच्या खेळात संपूर्ण लंकेचा विनाश झाला. लंकाच नसेल, तर महाराणी अथवा महाराज, कुणाचाही उपयोग नाही...
...सीतेला सोडा. जा..."
स्नेहल थांबली.
मात्र तिचा एवढा प्रभाव पडला नाही, हे तिलाही कळलं.
शेवटी मनिषनेच टाळ्या वाजवल्या. आणि बाकीच्यांनी त्याचं अनुकरण केलं.
तेवढ्यात तास संपला.
सर्वजण बाहेर निघाले.
मनिष नेहमीप्रमाणे थीयेटरकडे निघाला.
प्राजक्ता समोरच होती...
...तो तिच्याकडे बघून हसला.
तीही हसली.
तिच्या लयबध्द हालचाली सुरू झाल्या.
आणि तो विस्फारून तिच्याकडे बघत राहिला.
...थोड्या वेळाने सेशन संपलं.
ती त्याच्या समोर आली.
"नमस्कार लेखक महोदय."
"नमस्कार द डान्सिंग क्विन."
"मग, कसा सुरु आहे तुमचा प्रवास?"
"स्लो, आणि स्टेडी. आजकाल तू मला बघून हसतेस, आणि गप्पा मारतेस."
"मैत्रीण म्हणून मी खूप चांगली आहे मनीष, प्रेयसी म्हणशील तर मग आग... जळून जाशील."
तो हसला.
"मग मला जळायचं आहे."
"सिरियस होऊ नकोस, मी बोलणं बंद करेन."
"नको मी जगणार नाही. त्यापेक्षा एक नॉन सिरियस गोष्ट..."
"...सांगो."
त्याने वलासरूममधला प्रसंग जशास तसा सांगितला.
"तू खरच अँटीक आहेस. खरच." प्राजक्ता म्हणाली.
"म्हणजे?"
"म्हणजे असं, की सोबत प्रेम करणारी व्यक्ती असली ना, वनवास देखील स्वर्गासारखा असतो. आणि जर ती नसेल, तर स्वर्ग देखील वनवासच ना? आणि मनू, वनवासच रामाला श्रीराम बनवतो रे."
तो शांतच राहिला.
"पुढे बोल आता."
"काही नाही ग." तो शांतच राहिला.
"तुझे डोळे ना मनिष. कर काहीतरी... कारण ते काहीही लपवू नाही शकत रे."
त्याने स्मितहास्य केलं.
"बरं. उद्या मी कॉलेजला नसेन. उद्या आमचा परफॉर्मन्स आहे, सूरगाण्याला."
"सूरगाण्याला का?"
"आदिवासी भाग आहे, रात्रीचा कार्यक्रम आहे."
"जाशील कशी."
"बस असेल ना?"
"मॅडम सूरगाण्याला नाशिकहून तीन बसेस आहेत फक्त. त्यातही रात्री बस नाही परत यायला. काहीही उद्योग करू नकोस."
"मग काय करू? माझा नवरा घरी नाही उद्या. बाळाला न्यायचं नव्हतं इतक्या लांब. सांग काय करू?"
"एक सुचवू."
"बोल."
"असा एकही दिवस नाही, की मी तुझा परफॉर्मन्स चुकवला असेल. आणि उद्याचा परफॉर्मन्स तू चुकवणार नाहीस."
"म्हणजे?"
"उद्या आपण सोबत जाऊ, आणि परत येऊ."
"नाही शक्य."
"का?"
"घरी काय सांगू? की मित्र आहे, घेऊन जातोय. परत येतोय. मनिष, मलाच हे पटणार नाही."
"अग पण."
"जाऊदे. एक दिवस न गेल्याने काही नाही होत. मला खूप इच्छा होती, पण नको."
"अग ऐक तरी."
"नो मिंस नो."
"ठीक आहे."
"चल बाय, निघते मी."
"सी या." तो म्हणाला.
******
तो ऑफिसला पोहोचला, आणि विचारात गढला.
यार कसं मॅनेज करू?
स्नेहलला विचारू?
गप रे. स्नेहल एक उत्तर नीट देणार नाही.
साक्षी?
नको. टू अनप्रोफेशनल. जे तू बऱ्याच दिवसापासून वागतोय.
तेवढ्यात साक्षीच त्याच्याकडे आली.
"हॅलो सर."
तो शांतच होता. कुठल्यातरी विचारात गढलेला.
"हॅलो सर?"
"हे... हाय... सॉरी आय वॉज बीजी समव्हेर."
"येस. दिसतंय."
"ओके. बाय, गुड नाईट. खूप लेट झालं आहे ना?"
"सर यू नो व्हॉट?"
"यू टेल."
"तुमच्या स्टोरीचा पुढचा अंक ऐकल्याशिवाय मला चैन पडत नाही. खरच सांगतेय."
"तू अनप्रोफेशनल झाली आहेस साक्षी."
"सिरीयसली?" तिने डोळे मोठे केले.
"जोकिंग. तिला डान्स परफॉर्मन्स साठी जायचं आहे, बट ती जाऊ शकत नाही."
"काय? का?"
"घर, परिवार, बच्चा, उनको छोडके कहा जायेगी बिचारी. असं तिचं म्हणणं आहे. मी म्हटलं, तू नेतो, सोडतो आणतो परत. त्यात तिला ऑड वाटलं. बोल आता काय करू?"
"असं. मला एक सांगा. तिचे सासू, सासरे आणि नवरा घरी असतील. मग तिथे तुम्ही जातात. मग तुम्ही सांगाल, की आय लाईक हर. तिला माझ्यासोबत पाठवा डान्स परफॉर्मन्स साठी. बरोबर होईल ना हे."
"काहीही." तो वैतागला.
"मग?" तिने डोळे मोठे केले.
"मग काय करू मी?"
"जर तिच्या काही मैत्रिणी, तुम्ही आणि ती, ग्रुप म्हणून गेला असता तर कुणालाही काही इश्यू नसता. कळलं का सर?"
"आता मैत्रिणी कुठून शोधू?"
"मला काय माहीत?"
"जा यार तू. खरच. मला माझ्या दुःखात राहू दे."
"जाते जाते. गुड नाईट दिल तुटे आशिक..."
"गुड नाईट." तो म्हणाला.
मात्र तो विचारच करत होता.
******
सकाळी त्याच्या क्लासमध्ये.
"तर. ट्री डायग्राम आपण शिकलो. कल्पना आणि त्याचा विस्तार, हा त्याचा मूळ गाभा. किंवा सोपं, प्रश्न आणि त्याच्या उत्तराचा शोध, ही बेसिक कन्सेप्ट. तर कुणी एका प्रश्नावर एक प्रसंग फुलवू शकेल? किंवा कल्पनेवर?"
तिने सगळीकडे बघितले. मनिष दुसऱ्याच विचारात गढलेला होता.
"मनिष." तिने आवाज दिला.
"येस. मॅडम..."
"मी काहीतरी विचारलं."
"सॉरी माझं लक्ष नव्हतं."
"लक्ष देत जा."
"येस मॅडम."
त्याने लक्ष द्यायला सुरुवात केली.
क्लास सुटला. तो आज थियेटर कडे गेला नाही.
...कारण आज प्राजक्ता तिथे नव्हती.
उदास होऊन तो तिथे जवळ बसून राहिला.
"सो लेखक महोदय, आज तिकडच्या वाटेला जायचं नाही?" स्नेहल म्हणाली.
"जहा हमसफर नही, उस रास्ते जाना क्यू?" तो म्हणाला.
"वाह. कुठे गेली आहे आज?"
"घरीच आहे."
"नीट स्पष्ट शब्दात सांगशील प्लीज?"
मनिषने पूर्ण कथा ऐकवली, साक्षीच्या प्लॅन सहित.
फालतू प्लॅन आहे.
काही का होईना, प्लॅन तर आहे.
"धन्य आहेस. एक मैत्रीण आहे तुझ्याकडे."
"कोण?"
"मी. आता तू दुसरी मैत्रीण शोध. जाऊयात तिच्याकडे."
"सिरीयसली स्नेहल?" त्याने अविश्वासाने विचारले.
"हो मनिष. आफ्टर ऑल, मला गरज असताना तू असायचास नेहमी."
"मी कायम असेल स्नेहल. एक मित्र म्हणून. चल मग, दुसरी मैत्रीण मेबी रेडी असेल." तो हसला.
आणि त्याने साक्षीला फोन लावला...

क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users