एकदा एका जंगलात

Submitted by नानबा on 16 December, 2009 - 11:45

(ही कविता लहान मुलांना अभेनिवेषात म्हणून दाखवा)

एकदा एका जंगलात सिंव्ह शिरला..
हत्तीला पाहून जोरात बोलला:
"मी तर आहे जंगलचा राजा - बोल काय द्यू तुला सजा"

पाहून एक धावलं हरण,
सिंव्ह म्हणाला 'जवळ आलं मरण!'

सिंहाला जंगलात कोल्हा दिसला
सिंव्ह म्हणाला -
"तू तर आहेस लबाड फार, देउ का तुला चाबकाचा मार?"

सिंहाला जंगलात गाढव दिसलं
सिव्ह म्हणाला "बरं झालं फसलं"
सिंव्ह ऐटीत गेला जवळून,
गाढवानं लाथ मारली मागं वळून..
सिंव्ह गेला पळून वनात
गोष्ट सांगतो मन्याच्या कानाSSSत!
~~~~ अरविंद कोठावळे (ते मायबोलीवर नाहियेत म्हणून मी टाकतीये त्यांच्या तर्फे)

(इथे मन्याच्या जागी ज्याला कविता म्हणून दाखवताय त्याचं नाव घाला)

गुलमोहर: 

झकास

छान ! Happy

छान आहे.
हरणाच्या कडव्यात - सिंह म्हणाला "आलं याचं मरण" असं ठीक वाटेल का?
(नॉनव्हेज घरातल्या मुलांसाठी 'जवळ आलं मरण' ऐवजी 'जवळ आलं मटण' म्हटलं तर त्याना ते जास्त आवडेल)