-----------------अन्यत्र पूर्वप्रकाशित--------------------------
दरवर्षी साधारण जानेवारीच्या मध्यात अन फेब्रुवारीच्या सुरवातीला, ऑफिसच्या रुक्ष वातावरणाचा एकदम कायापालट होतो. अगदी इतका की प्रकर्षाने जाणवू लागतो. म्हणजे Employee Orientation च्या काळात ऐकलेले, घोकलेले समस्त manners सर्वांचेच,एकदमच उफाळून येतात. अचानक सौहार्द (synergy) चे लोण, वणव्यासारखे पसरु लागते. सहकार्यांच्या संदर्भातील, etiquettes कडे विशेष लक्ष पुरविले जाते व सर्वजण एकदम गुण्या गोविंदाने नांदू लागतात. खरं तर ऑफिसमध्ये स्वर्गच अवतरतो.
या वातावरणातील बदलास, जेरेमी, मी अन अॅमी आमच्या त्रिकुटाचाही अपवाद नसतो. काल काल पावेतो ३६ चा आकडा असणारे, विळ्या-भोपळ्याचे सख्य असणारे आमचे त्रिकुट अगदी घट्ट मैत्री असल्याच्या अविर्भावात वावरु लागते, एकमेकांशी सौजन्य-आपुलकीने बोलू लागते, विचारपूस करु लागते.
तुम्ही विचाराल जान-फेब मधे अशी काय जादू होते?
तुम्हा झंटलमन लोकांना इतकेही ठाऊक नाही की जान-फेब मध्ये peer review आणि self appraisal चे वारे वाहू लागतात :D. Ah! talk about the joys of getting even in peer review. हे म्हणजे सहकार्यांचा वचपा काढायची, आंधळा मागतो एक डोळा , देव देतो २ अशी नामी संधी चालून येते. All those pent-up emotions, केल्या गेलेल्या अपमानाचे कढ, त्यांना मुक्त वाट करुन देण्याची सुवर्ण-संधी.
पण अर्थातच peer review मध्ये अगदी स्पष्ट हेत्वारोप करताही येत नाहीत म्हणजे सहकार्यांविरुद्ध, किती गरळ ओकायची त्यालाही दुर्दैवाने मर्यादा असतेच याची कारणे २- (१)बरेचदा त्या सहकार्याला, actual review मध्ये आपल्या comment चा feedback मिळत असतो अन तो कितीका अनामिक मिळेना, मठ्ठातल्या मठ्ठ सहकार्यालाही intuitively/logically कळून येते की कोणी ती comment दिलेली आहे. त्यामुळे पुढील जान-फेब पर्यंत आपले आयुष्य miserable होऊ शकते.
(२) मुख्य कारण हेदेखील आहे की - your comments reflect on you too
peer review नंतर येतो खरा म्हणजे actual boss ने केलेला review. यालाच दुसर्या शब्दात पोटात गोळा , पायात पेटके, डोकेदुखी असे शब्द आहेत ;). भीक नको पण कुत्रा आवर च्या तालावर पगार वाढ नको-नको पण हा torturesque review आवरा म्हणायची पाळी येते. गेल्या वर्षी (कोणाला ते विचारु नका :D) review तील अनेक सौम्य निंदा-व्यंजक नीरीक्षणांनंतर पुढील गोषवारा मिळाला होता -
This employee sets low personal standards & then consistently fails to achieve them
बिचार्या जेरेमीला तर गेल्या वर्षी review चा याहूनही विनोदी गोषवारा मिळालेला -
Since my last report, this employee has reached rock bottom & has started to dig .
असो. तर यावर्षी काय दिवे लागतात ते बघू. दिल्ली दूर नही.
बाबो
बाबो
स्पष्टवक्ते आहेत खरे साहेब.
खरंच वार्षिक किंवा सहा मासिक रिव्ह्यू मध्ये एकदम खपल्या काढून घेण्यापेक्षा सरळ रोज त्या त्या वेळी नीट झापावे.
रिव्ह्यू चर्चा कितीही सुंदर झाल्या, दोन्ही पक्ष कितीही समजूतदार असले तरी जो मानसिक थकवा येतो त्यातून वर येऊन परत कामात नीट लक्ष घालायला 2-3 दिवस लागतातच.
हो ना.
हो ना.
माझ्या रिपोर्टमध्ये "Lacks leadership qualities"
हा शेरा होता. म्हणजे मी कोणत्याही नसलेल्या टीमचा लीडर नसताना हा गुण बाळगायचा?
बरीच भटकंती करायचो पण ऑफिस पिकनिक, हॉटेल पार्टीला (कुणाच्या प्रमोशनच्या) जात नसे.
पुन्हा त्या कागदावर सही कशासाठी? पूर्वी CR होतेच. तसेच करा ना. दाखवूच नका.
360-डिग्री किंवा मल्टी-रेटर
360-डिग्री किंवा मल्टी-रेटर फीडबॅक असेल तर व्यक्तीची कौशल्ये, क्षमता आणि वर्तणुकींचा एक चांगला रिव्ह्यू मिळू शकतो. An employee may not always be underperformer all the time. Atleast स्टेक होल्डर यांच्याशी तरी तो नक्कीच चांगला वागत असावा.
माझ्याकडे तर दोन
माझ्याकडे तर दोन डिपार्टमेंट्स होती. आणी review च्या वेळी मात्र मी नं घर का नं घाट का व्हायची...
परफॉर्मन्स रिव्यु बंडल प्रकार
परफॉर्मन्स रिव्यु बंडल प्रकार आहे. मी कधीच जिंकत नाही.
स्वतःची जाहिरात करण्याची
स्वतःची जाहिरात करण्याची मुळातच सवय नसल्याने self-apprasial मध्ये फारच गोची होते. बरं केलेली कामं रंगवून न सांगणे म्हणजे आपलेच पाय आपणच जखडून ठेवण्यासारख आहे. त्याहूनही कठीण गोष्ट म्हणजे पुढील वर्षासाठीचे goals set करणं! का कुणास ठाऊक मला नेहमी ते लिहिताना पूर्ण ताकदीनिशी स्वतःची कबर खोदत असल्याचाच भास होतो.
Performance Reviews म्हणजे
Performance Reviews म्हणजे फक्त गाजर आणि पॉवर कंट्रोल गेम आहे.
त्यांना द्यायचं तेवढच देतात. बाकी सगळा मुलामा.
Peer Reviews च्या नावाखाली कोंबडे झुंजवत ठेवायचे आणि मग Management
जज झाल्याने पॉवर ने भारी ठरते.
Below Expectations (2.something) किंवा Meets Expectations (3) असा feedback मिळून सुद्धा छप्पर फाड hike होते आणि
Employee of the year Award म्हणजे performance हा फक्त टीम मध्ये नाही तर सगळ्या teams मध्ये जे बेस्ट आहेत त्यामध्ये उत्तम असून सुद्धा 2.25% hike मिळते.
मी कधीच या प्रकाराचा लोड
मी कधीच या प्रकाराचा लोड घेतला नाही. ना रिव्ह्यू वेळी ना वर्षभर..
याचा करीअरमध्ये फटका बसला असेल जोरदार. पण त्या फटक्याचाही कधी विचार करत नसल्याने बाकी आयुष्यात फार सुखी समाधानी आहे. भले माझे वागणे चुकीचे का असेना..