भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा हा हा, अगदि प्रिन्स कोको Happy

कसलं क्युट बघतंय

Simba च्या झुमीज भारी Happy

समोरून हवा फोटो.>>> लगेच डिस्ट्रॅक्ट होतो तो, फोटो काढतोय म्हणलं तर
त्याच लक्ष नसताना गुपचूप काढावा लागतो

ओड्याचा लेटेस्ट किस्सा

काल आमच्या पोळ्याच्या मावशी आल्या नव्हत्या त्यामुळे ओड्या च्या भाकऱ्या पण नव्हत्या. मी मग लाल भोपळा, बिट, गाजर वगैरे घालून मस्त पुलाव सारखा भात शिजवला त्याच्यासाठी. तर साहेबांचे नखरे, वास घेतल्यावर जाहीर केलं मी नाही खाणार हे यात चिकन नाहीये
म्हणलं रोज रोज काय चिकन, खा जरा वेगळं तर नाहीच
तासभर वाट पाहिली तर तसाच बसून राहिला
मग माझा पेशन्स संपला, बायकोला म्हणलं याला परत मस्ती आलीये आता उद्या याला ठेव उपाशी, आणि हा भात मी एअरटाईट डब्यात ठेवतो फ्रीजमध्ये, भूक लागल्यावर खाईल मग मुकाट

असे म्हणून त्याच भांडे उचललं, किचन मध्ये जाऊन ओट्यावर त्यातून भात काढून भरायला लागलो डब्यात तर मागेमागे आला आणि नाकाने माझ्या पायाला घासल
मी बघितले तर अक्षरशः त्याने त्याच्या बॉडी लँग्वेज मधून मला सांगितले की मी सॉरी आहे, मी खाईन हा भात, चिडू नकोस तू

मला तरी खात्री नव्हती की आपल्याला वाटतंय तेच हा म्हणतोय का, म्हणून मी विचारलं त्याला तू नक्की खाणारेस हा भात तर लगेच शेपटी हलवून अनुमोदन दिलं

मी तरीही शंका होती म्हणून थोडासा दिला, तो लगेच संपवला आणि अजून दे म्हणायला लागला, थोडा थोडा करत सगळा भात खाल्ला आणि मग साहेब तृप्त पोटाने बाहेर गेले

मला इतकं वाटलं ना की घरात सीसीटीव्ही असायला हवा होता, अक्षरशः त्याने मानबिन हलवत, लाडात येत मला चक्क सांगितलं त्याला काय म्हणायचं होत ते
आणि त्याही आधी त्याला मी बायकोशी काय बोललो हेही अंदाजे समजलं होतं, बाबा चिडलाय हेही त्याला कळलं होतं

खूपच टचिंग मोमेंट होती आमच्यातली ती

आमचं बाळ ताईच्या भावलीला घाबरून पळत क्रेटमधे जाऊन बसलं. भावलीला हाताने नाचवून मी 'हॅलो कोकोनट ' म्हटलं की फारच घाबरगुंडी उडाली. Wink

IMG-20230903-WA0000.jpg

मागे एकदा लेजर पपी टॉयला घाबरून सोफ्यामागे जावून बसला होता.
IMG-20230618-WA0005.jpg

बिचारा ओडिन Happy त्याचे काही चुकले नाही हो. त्यांना रुटिन चे कौतुक. सवयीचे जेवण नसेल तर कन्फ्यूज होणारच की. पण तरी त्याने शहाण्यासारखे खाल्ले. माउई तर नुसता बघत बसून राहिला असता रुटीन पेक्षा वेगळे काही केले असते तर Happy
कोकोनट फारच क्यूट!! सिंबाचे पण व्हिडिओज पाहिले इन्स्टा वर. फार स्वीट आहे!

ओडिन शहाणं बाळ आहे.
मी कोकोनट कसा घाबरला असेल हे इमॅजिन करून हसत बसले आहे Lol

सवयीचे जेवण नसेल तर कन्फ्यूज होणारच की>>> सवयीचे चा प्रश्न नव्हता, त्यात चिकन असतं तर मिटक्या मारत खाल्लं असतं
कधीतरी आवडीचा म्हणून दहीभात खातो पण सलग दोन वेळा दिला तर नाही चालत

त्याला कळलं की आता नखरे केले तर उपास घडेल म्हणून सुतासारखा सरळ आला Happy

पण त्याने ज्या पद्धतीने माघार घेतली ती फार क्युट होती Happy
म्हणजे मला भूक लागलीये म्हणून नाही तर तू नाराज होऊ नये म्हणून मी ऍडजस्ट करतोय अशा थाटात

मागे एकदा लेजर पपी टॉयला घाबरून सोफ्यामागे जावून बसला होता.>>> ओड्या सेम, लहानपणी त्याला स्वीकी टॉय आणलं होतं त्याला घाबरून लपून बसायचा
नंतर मग त्याच्या चिंध्या केल्या ही गोष्ट वेगळी
आता तर त्या स्टफ कासवाची फक्त पाठ उरलीय आणि डोकं तरीही ते टाकून देता येत नाही, रोज ते खोक्यातून खुडबुड करून शोधून काढून थोडा वेळ खेळतोच त्याच्याशी

सिम्बा एकदम राजेशाही आहे.
ओडिन तर काय बहारदार आहेच.
कधी भेटलो त्याला , काय रे ओड्या अशीच हाक मारेल बहुतेक Lol
कोकोनट बिचारा, त्या बाहुलीकडे बघतही नाहीये.
आधी तो डॉलचा ( अनाबेल बहुतेक ) भितीदायक चित्रपट पाहिल्यावर आपण कसे बाहुली टाळू तसा काहीतरी बसलाय Happy

मला इतकं वाटलं ना की घरात सीसीटीव्ही असायला हवा होता, अक्षरशः त्याने मानबिन हलवत, लाडात येत मला चक्क सांगितलं त्याला काय म्हणायचं होत ते>> खरच आम्हालाही बघ्ता आली असती ओडूची मज्जा
बिचारा कोकोनट, कसली घाबरगुन्डी उडालिये त्याची ...असो बाळच आहेत ती, कोणे एके काळी झपाटलेल्यातल्या बाहुल्याची आपल्यालाही भिती वाटलीच होती की..खीखी
सिम्बाची लपाछपी भारी, तो खरच त्याच्या ब्रिडपेक्षा वेगळाच सॉफ्टर डॉग वाटतो.
मैत्रीणी कडे सेम ब्रिडच पिल्लु आणल होत्,सहा महिने प्रवेशबन्दी होती आलमोस्ट..

जर कोकोनट घाबरत असेल तर उगाच ती बाहुली/बाहुला दाखवुन त्याची भिती घालविण्याचा प्रयत्न करु नकोस अस्मिता. नसशीलच करणार पण एक सहज खबरदारी म्हणुन सांगीतले.

आशुचँप - तुमचे वर्णन ईतके छान असते की सगळा प्रसंग डोळ्यासमोर घडतोय असं वाटतं. मला तर ओड्या गुणी बाळच वाटतो तुमहीच त्याला त्रास देताय Happy

नारळं नेहमी प्रमाणेच एकदम गोड आहे

झपाटलेल्यातल्या बाहुल्याची >>> Happy
ॲनाबेल Lol
नाही सामो, उचलून ठेवली बाहुली. Happy
आता तर त्या स्टफ कासवाची फक्त पाठ उरलीय >>> Lol आमच्याकडेही रोज काही ना काही पिंजून ठेवतो.

मलाही सिम्बा प्रेमळ गार्ड डॉग वाटतो.

काल राखी पौर्णिमा साजरी केली तेव्हा कोकोनटलाही ओवाळलं. त्याला औक्षण करताना आधी सुपारी मग सोनं खाऊन टाकायचं होतं, गरगर मान फिरवत होता. शेवटी नारळाला नारळ बर्फीचा तुकडा मिळाला. सगळ्यांचं (जसं जमेल तसं) रक्षण करतो म्हणून त्याला बांधावी वाटली. राखी सुद्धा खाणार होता म्हणून कॉलरला बांधली.
IMG-20230904-WA0002.jpg

मी इन्स्टापेज काढलं आहे.
हा नवा व्हिडिओ...
Coconut at the creek.
https://www.instagram.com/reel/CwTXb59oP1H/?igshid=MTc4MmM1YmI2Ng==

सिंबाची लपाछपी किती गोड आहे.
कोकोनटच्या चेहेर्‍यावर एकदम टेरिफाईड भाव दिसत आहेत.... बिचारा
ओडीन तू चुकून भूभूच्या जन्मात गेलाय...माणूसच व्हायचा खरं तर Happy

सिम्बा पपी आणि डॉग मधे खुप फरक आहे.. वेगळा दिसतोय तो मोठा झाल्यावर... खुपच क्युट आहे.
अस्मिता तुझं इन्स्टाच पेज ओपन होत नाहीये.
ऑड्या खुप गुणी बाळ आहे..

माउईचे अपडेट्सः
२ आठवड्यापूर्वी मुलगी कॉलेज ला गेली ( म्हणजे दुसर्‍या स्टेट मधे, होस्टेल वर रहाते), आम्हाला चिंताच होती माउई कसे अ‍ॅक्सेप्ट करेल. आम्ही तिला सोडायला गेलो होतो तेव्हा त्याला फार समजले नाही. पण परत आल्यावर रात्री खिडकीत जाऊन बसला वाट पहात. मग उचलून आणावे लागले. असे दोनेक दिवस केले असेल त्याने. पण त्यानंतर बहुतेक त्याला कळले ती सध्या तरी घरी येणार नाहीये. मग बाकी सगळे नॉर्मल. तरी पण आताही घरात कोणी नसेल किंवा त्याला झोप आली असेल, थकला असेल तर हमखास तिच्या रूम मधे जाऊन तिच्या बेड वर गुरफटून बसतो ! आम्हाला आता माहित झाले आहे, घरात इतर कुठे दिसला नाही तर तो तिच्या खोलीत असणार! १-२ आवडती टॉय्ज पण त्याने तिथे नेऊन ठेवली आहेत. मी मुलीला चिडवते आता, माउईने तू बाहेर पडताच तुझी रूम टेक ओवर केली आहे .
तिने फोन, व्ह्डिओ कॉल केले तर मात्र येड्याला कळतच नाही कुठे बघायचे ते Happy
अजून एक गंमत - आमच्या घरात मुलगा आणि नवरा दोघेही सतत काहीतरी बिल्ड/ असेम्बल करणे, नवनविन टूल्स हाताळणे, ठोकाठोकी असे सतत काही ना काही करत असतात. माउई ला कुतुहल असतंच. दर वेळि नविन काही बॉक्स आला की हा आधी जाऊन डोके घालतो त्यात. मग बबल रॅप किंवा तत्सम काहीतरी घेऊन पळतो. फार तर ते काय करतात ते जरा वेळ बघतो. पण त्याचा इन्टरेस्ट तेवढाच. नंतर लगोलग माझ्या जवळ खेटून बसून लांबूनच बघतो काय ते. घरात माझेच काय ते प्रेडिक्टेबल रुटीन असल्यामुळे असेल कदाचित, त्याला माझ्याच सोबत सतत रहायला आवडतं. परवा या लोकांचे काहीतरी ठाक ठोकीचे काम झाल्यावर मी कचरा साफ करायला ( कधी नव्हे तो) वॅक्यूम हातात घेतला तर माउईचे डोके फिरले, फुल्ल पॅनिक मोड मधे पूर्ण वेळ भुंकत फिरला माझ्या मागे. "हे डेन्जरस आहे, आधी सोड, आत्ता बंद कर" असं ओरडत होता ऑलमोस्ट Lol पण हेच किंवा यापेक्षा मोठी , लाउड मशीन्स नवर्‍याने किंवा मुलाने हाताळली तर मात्र चालते त्याला. "हे रोजचेच आहे " असा चेहरा करून दुर्लक्ष करतो! Happy .

Pages