चांद्रयानाने इतिहास घडवला

Submitted by ढंपस टंपू on 23 August, 2023 - 09:09

भारताच्या चंद्रयानाचे चंद्रावर यशस्वी रित्या भूस्थिरण झाले आहे.
प्रत्येक भारतीयाला हा अभिमानास्पद क्षण आहे.
द ध्रुवावर उतरण्याचा पहिला मान मिळवून भारत आज विश्वगुरु बनला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

In 2009, a NASA instrument aboard the Indian Space Research Organisation's Chandrayaan-1 probe detected water on the moon's surface. In the same year, another NASA probe that hit the south pole found water ice below the moon's surface.

आज आपण तिथे पोचलो. पहील्या क्रमांकावरती.
आजचा दिवस निव्वळ अविस्मरणीय!!!
चंदामामा दूरके .................... नही नही ................ अभी तो बस टूरके

चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्याबद्दल आपल्या ISRO चे जितके कौतुक करावे कमीच आहे. भारतासाठी अत्यंत अभिमानाची घटना.
या निमित्ताने हर्षा भोगले चे निवेदन असलेली 'मिशन ISRO' हि पॉडकास्ट सिरीज आठवली.
नेहरू, भाभा आणि साराभाई यांनी जी पायाभरणी केली त्यात उत्तोरोत्तर उत्तम प्रगती होत गेली याचे हि ऐतिहासिक घटना उदाहरण आहे.

चांद्रयान मोहीम फत्ते झाल्याबद्दल इस्त्रो, चांद्रयान टीम आणि तमाम भारतियांचे अभिनंदन !

या व्हॉट्सॅप फॉर्वर्डचा आवर्जुन उल्लेख करतोय कारण यात इस्रोच्या यशाचं सार आहे - बेस्ट कॉम्प्लिमेंट

सम कंट्रीज हॅव मून ऑन देर फ्लॅग.. अँड सम हॅव देर फ्लॅग्ज ऑन द मून...

प्रश्न: चांद्रमोहिमांमधून देशांना नक्की काय फायदे होतात?

उत्तर (माझ्या मते):
चांद्रमोहिमांमधून किंबहुना अवकाश मोहिमांमधून अनेक थेट/प्रत्यक्ष फायदे प्रगत देशांना मिळतात व मिळालेत. मुख्यत्वे टेक्नॉलॉजी. जसे कि या मोहिमांसाठी जी उपकरणे तयार केली जातात किंवा संशोधन केले जाते त्याचा वापर नंतर सामान्य नागरिकांसाठी टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठी होतो. सौरऊर्जा यंत्रे, जीपीएस मधले संशोधन, वातावरणातील थरांचा अभ्यास इत्यादी केवळ थोडी उदाहरणे. या अभ्यासाचा फार मोठा फायदा त्यांना होतो व झालेला आहे. चंद्रावरील खनिजे किंवा अन्य स्रोत काय आहेत व त्याचा कसा उपयोग करून घेता येईल हि माहिती मिळवणे हा अजून एक थेट फायदा. शिवाय जगासमोर क्षमताप्रदर्शन Happy हा सुद्धा त्यांना थेट फायदा आहे.

पण भारतासारख्या देशाला प्रत्यक्ष पेक्षा अप्रत्यक्ष फायदे खूप सारे मिळणार आहेत. सर्वात मुख्य म्हणजे महासत्तांची गुंतवणूक जी भविष्यातील इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट साठी खूप मोलाची असणार आहे. Investors invests in capabilities. म्हणजे आपण एखादा प्रोजेक्ट करून दाखवला तरच इन्व्हेस्टर आपल्याला पैसे देतील आणि पुढील कामे मिळतात. उद्योग जगतात आपले संबंध दृढ होतात. रेप्यूटिशन तयार होते. देशांचे सुद्धा तसेच आहे. या प्रोजेक्ट साठी NASA, European agencies, France, Japan, Russia इत्यादी अनेक देशांनी आपल्याला मदत केलेली आहे. या सर्वांशी त्यामुळे चांगले संबंध निर्माण झाले. आपली क्षमता त्यांना दिसली. उद्या असेच मोठे प्रोजेक्ट करण्यासाठी मोठया प्रमाणात निधी ते उपलब्ध करून देतील. इन्व्हेस्टमेंट वाढेल. या सगळ्याचा भविष्यात आपला एकूण आर्थिक स्तर उंचावायला नक्कीच मदत होणार.

ईस्रो सारख्या संस्था उभ्या करणे, त्याला योग्य ते नेतृत्व देणे ह्यासारखी दूरदृष्टी लाभलेले नेते, इस्त्रोच्या स्थापनेपासुन आतापर्यंत अविरत कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कष्ट करणारे इस्त्रोचे संशोधक, कर्मचारी आणि त्यांना 'लीड' करणारे त्यांचे संचालक ह्यांचा ह्या श्रेयात प्रचंड वाटा आहे. ह्यसर्वांसमोर नतमस्तक !!

छान माहिती अतुल.
या व्यतिरीक्त एखाद्या ग्रहापर्यंत जाायचे कसे हे आधीच शिकलो, पण त्यावारील पर्यावरण, भूभाग विविध भागात कसे आहेत, ईतर भोैतिकी आव्हाने काय आहेत यांचा अभ्यास करुन तिथे यान कसे उतरवायचे ही Technology आत्मसात करणे हा सुद्धा एक फार महत्वाचा टप्पा आहे, तिथल्या पर्यावरणात पुढे दीर्घकाळ विवीध उपकरणांचा कसा निभाव करता येइल याचा अभ्यासही होईल.

या प्रोजेक्ट साठी NASA, European agencies, France, Japan, Russia इत्यादी अनेक देशांनी आपल्याला मदत केलेली आहे

परंतू विक्रमचे यशस्वी लँडिंग झाल्यावर भारताकडून त्यांचे आभार मानल्याचे कुठे आढळले नाही. NASA आणि ESA ने भारताचे आभार मानताना, ह्या मिशनमध्ये भागीदार असल्याने आम्हाला आनंद झाला असे म्हटले आहे.
त्यांची यंत्रणा वापरल्याने विक्रमचे लँडिंग सुरळीत होऊ शकले. अर्थात हे फुकट होत नसते. आपल्याला त्यांना डेटा शेअरिंग करावा लागतो. रशियाने त्यांच्या चांद्रयान मोहिमेत असे करण्यास नकार दिला होता. त्यात अपयश आल्याने रशियाला नक्की कुठे चूक झाली हे शोधून काढण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील. आठवा चांद्रयान २ मध्ये चंद्रावर कोसळलेले विक्रमचे ठिकाण नासाने शोधून दिले होते.

आपण भारतीय लोक तशी खूप भावनिक आणि विचित्र स्वभावाचे आहोत.
देश अभिमान म्हणजे काय हेच नक्की माहीत नसल्या मुळे कोणत्या ही गोष्टी कडे बोट दाखवून हे देश अभिमान असे मीडिया नी सांगितले की 140 कोटी त्याच मार्गाने जातात.
आणि मूळ समस्या च विसरून जातात.
पाकिस्तान क्रिकेट मध्ये हरणे म्हणजे देश अभिमान .अग त्याच क्रिकेट मधील विजयात देश अभिमनची लहर येते आणि बाकी हल्ली बोलत खेळाडू न ची काय अवस्था आहे हेच लोक विसरतात.
खेळ आहे कोणी तरी जिंकणार कोणी तरी हरणार ह्या मध्ये देश अभिमान कुठेच येत नाही.
आता चांद्रयान .
यान चंद्रावर पाठवणे ही एक योजना आहे.त्याचा काही तरी हेतू हा असावाच लागतो.
संशोधक, देशाचे प्रशासक ह्यांचं महत्व आहे .
पण चंद्र यान चंद्रावर उतरवले म्हणजे आपण जगात भरी झालो,.
चांद्रयान चंद्रावर उतरले म्हणून.
झोपपट्टीतील घरात आज पासून डास येणार नाहीत असे नाही.
एक किलोमीटर प्रवास करण्यास जो एक तास लागतो तो प्रवास 5 मिनिटात पूर्ण होणार नाही.
ही घटनेची झिंग सामान्य लोकांना येतेच कशी.
चंद्रावर अनेक देशांची माणसं जावून आलेत पण सामान्य जनता त्या देशातील त्या घटनेला प्रमाण बाहेर महत्व देत नाही.
ती घटना देश अभिमान शी ती लोक जोडत नाहीत.

मग

भारतातील इस्रो च्या इंजीनियर्स नी जीवाचे रान करून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान यशस्वीरित्या उतरवले .
या बद्दल शहरातील , खेड्यापाड्यातील गोरगरीब आणि श्रीमंतांनी आपापल्या परीने आनंद व्यक्त केला .
कोणी फटाके फोडले तर कोणी मिठाई वाटली .
तो सुवर्णक्षण पाहण्यासाठी घरी वेळेवर न पोहचू शकणाऱ्यासाठी गणेश मंडळ , शाळा कॉलेज नी रस्त्यावर / सभागृहात मोठ्या स्क्रीन वर पाहण्याची व्यवस्था केली होती आणि त्याला भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे व्हिडिओ पाहायला मिळाले .
तमाम पब्लिक ने भारताने वर्ल्ड कप जिंकल्या प्रमाणेच हा आनंद साजरा केला . या चांद्रयान मोहिमेतून भारतातील गरीब लोकांच्या जीवनमानात काडीचा फरक पडणार नाही हे माहीत असताना ते देखील या विजयोस्तावात सामील झाले होते ......
अपवाद फक्त @ हेमंत चा !
भारताने इतके मोठे निर्भेळ यश मिळवले तरी हा माणूस दुःखी का ?
मोठ्ठा प्रश्न पडलाय ......

"चांद्रयान मोहीम फत्ते झाल्याबद्दल इस्त्रो, चांद्रयान टीम आणि तमाम भारतियांचे अभिनंदन !"

अगदी हेच.

अतिशय आनंद झा ला. खूप अभिमानाची गोष्ट आहे.

आनंदाचीच गोश्ट आहे. सर्वांचे अभिनंदन.

माझ्या ऑफिसच्या शेजारी शिव मंदिर आहे. त्या लँडिग च्या दिवशी दिवस भर डीजे चेकिन्ग चालू होते. आमचे लोकल एम एल ए ह्यांनी भोला भक्ती डे डिक्लेअर केला होता. मी बाहेर पडले तेव्हा पाहिले मंदिरच्या बाहेर मोठा स्क्रीन लाव्ला होता. व मजबूत इलेक्ट्रिक रोषणाई. आत खूपच गर्दी होती व मुले माणसे बायका डिजे बरोबर काहीतरी गाणे म्हणत होते व झेंडे फिरवत होते. देशाचा झेंडा तिरंगा. ट्राफिक अडू नये म्हणून गर्दी ला हटवत होते. खूपच उत्साही वाता वरण.

तिथून मी भाजी फळे घ्यायला गेले तिथे भाजी घेताना भाजीवाल्याने टोमाटो के रे ट कम हो गये हे आणि शेजारी एक माणूस उभा होता त्याने लेंडिन्ग झाले हे उत्सा हाने एकदमच कळवले. एकदम आनंदी वातावरण होते. मस्त वाटले.