गप्पांचे ऑनलाईन अड्डे

Submitted by Diet Consultant on 21 August, 2023 - 02:14

हाय
सगळ्यांना नमस्कार !
सध्याचे गप्पांचे ओनलाईन अड्डे काय आहेत ?
जनरल नव्या लोकांशी गप्पा मारणे , माहिती करून घेते विविध गप्पांच्या विषयांवर.
मला विपू मध्ये कळवा

फन एलिमेंट इन लाईफ ...

Group content visibility: 
Use group defaults

वरच्या शंका प्रथम मलाही आल्या.

पण प्रोफाइल पाहिली असता डॉ. केतकी यांचा तपशील आहे. डॉ. केतकी बहूआयामी आणि अभ्यासू व्यक्तीमत्व आहेत. त्या यशस्वी उद्योजिका आहेत. डाएटीशीएन आहेत, डाएट वर्कशॉप घेतात, लिखाण करतात, अतिशय उत्तम vocabulary आहे त्यांची. ही प्रोफाइल खरेच डॉ. केतकी यांची असेल अशी अपेक्षा Happy

गप्पांचे विविध धागे इथे आहेत. वाड्यावरच्या गप्पा, मनसोक्त गप्पा, असंबद्ध गप्पा, गप्पागोष्टी इत्यादी:
https://www.maayboli.com/node/1559

. डॉ. केतकी बहूआयामी आणि अभ्यासू व्यक्तीमत्व आहेत. त्या यशस्वी उद्योजिका आहेत. डाएटीशीएन आहेत, डाएट वर्कशॉप घेतात, लिखाण करतात, अतिशय उत्तम vocabulary आहे त्यांची. > तसे असेल तर त्यांनी त्यांच्या विषयाशी संबंधित माहिती वाचकांशी शेअर करावी. शंका निरसन करावे. पण तसे काहीच नाहीये.
चार ओळीचे काहीतरी लिहायचे आणि मला ' विपु मध्ये कळवा' असे सांगायचे हा काय प्रकार आहे? त्यांच्या बऱ्याच धाग्यांमध्ये याच प्रकारचा मजकूर दिसतो.
त्यांनीच येऊन स्पष्टीकरण द्यावे हे उत्तम.

तसे असेल तर त्यांनी त्यांच्या विषयाशी संबंधित माहिती वाचकांशी शेअर करावी.
,>>>

फुकटात सर्व माहिती द्यायची नसेल.
इट्स ओके.

<< डॉ. केतकी बहूआयामी आणि अभ्यासू व्यक्तीमत्व आहेत. त्या यशस्वी उद्योजिका आहेत. डाएटीशीएन आहेत, डाएट वर्कशॉप घेतात >>

डाएटीशीएन लोकं स्वत:पुढे डॉक्टर ही पदवी लावू शकतात? की त्यांच्यात पण PhD in diet असा काही प्रकार आहे?

Ketki S. Itraj M.Sc. RD, ND, CDE
RD = Registered Dietician
ND, CDE म्हणजे काय माहीत नाही. बहुधा Naturopath Doctor आणि Certified Diabetes Educator असा अंदाज.

>> तसे असेल तर त्यांनी त्यांच्या विषयाशी संबंधित माहिती वाचकांशी शेअर करावी. शंका निरसन करावे.

सहमत!

>> << डॉ. केतकी बहूआयामी आणि अभ्यासू व्यक्तीमत्व आहेत. त्या यशस्वी उद्योजिका आहेत. डाएटीशीएन आहेत, डाएट वर्कशॉप घेतात >>

>> डाएटीशीएन लोकं स्वत:पुढे डॉक्टर ही पदवी लावू शकतात? की त्यांच्यात पण PhD in diet असा काही प्रकार आहे?

त्याबद्दल कल्पना नाही. पण त्यांचे एक दोन व्हिडीओज/ब्लोग्स सहज पाहिले त्यांच्या प्रोफाईल मध्ये त्यांनी ज्या लिंक दिल्यात त्यावरून.
त्यावरून तरी निदान मला त्या एक प्रगल्भ व्यक्ती वाटल्या.

मी गेल्या 2 वर्ष्यांपासून M.Sc. Clinical Nutrition च्या विद्यार्थिनींना (खरं तर कॉ-एड कोर्स असला तरी दोन्ही बॅचमध्ये सगळ्या मुलीच आहेत. महत्वाचे म्हणजे सध्या खूप डिमांडिंग कोर्स असल्याने आमच्या युनिव्हर्सिटीने मागच्या वर्षीपासून intake capacity वाढवली तरी सीट्स फुल असतात आणि कित्येक लोक वेटिंग लिस्ट मध्ये असतात) रिसर्च मेथोडॉलॉजी आणि बायोस्टॅटिस्टिकस हा विषय शिकवत आहे. तर त्यांच्या विभागप्रमुखांकडून ह्या बद्दल माहिती घेतली असता, त्यांनी नावाआधी Dt (Dietician) असे लावता येत असल्याचे सांगितले. मात्र PhD Clinical Nutrition/ Clinical Nutrition and Dietetics/ Nutrition and Dietetics/ Dietetics & Applied Nutrition/ Dietetics असल्याशिवाय Dr लावता येत नसल्याचे सांगितले.