Submitted by ढंपस टंपू on 4 August, 2023 - 09:34
एका ओळखीच्या महिलेने मला सिरीयसली विचारले कि " फाटलेल्या धोतराचे काय करतात ?"
आमच्यात कुणीच धोतर नेसत नाहीत तरी तिने टाकलेल्या या गुगलीने गोंधळून जाऊन का, कशासाठी असे बेसिक प्रश्न विचारले.
त्यातून असे समजले कि तिच्या सासर्यांचे धोतर फाटलेले आहे. शिवून ते बरे दिसणार नाही म्हणून ती टाकून द्या असे म्हणाली.
तर ते उसळून म्हणाले कि " एव्हढं कापड आहे, थोडं फाटलं म्हणून फेकून द्यायचं असंच ? काही दिवस वापरू, नंतर पण त्याचा उपयोग होईल".
नंतर त्यांनी तिला कापड टाकून द्यायच्या आधी त्याचा वापर करण्याची माहिती आहे का असे विचारले. कुणीच कसे शिकवले नाही म्हणून ते चिडले सुद्धा.
म्हणून तिला धोतराचे उपयोग हवे आहेत.
अशा वेळी मायबोलीच कामाला येते म्हणून लगेचच धावत येऊन धागा काढला.
तिला मदत करणार का ?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चालला रावण, त्याने ऊतमात केला
चालला रावण, त्याने ऊतमात केला
तेहतीस कोटी देवांनी त्याचा धाक घेतला
फाटले धोतर SSSSS
फाटले धोतर, त्याला ठिगळ कुणी लावा
(No subject)
धोतर फाटले तर पंचा करा, पंचा
धोतर फाटले तर पंचा करा, पंचा फाटला की हातरुमाल करा, रुमाल फाटला की त्याच्या वाती करून वापरा, मग त्याची राख गंध म्हणून वापरा.
धोतराला बारीक बारीक छिद्रं
धोतराला बारीक बारीक छिद्रं पाडून मच्छरदाणी करा.
सांडगे कुरडया वाळवायला भाड्याने द्या.
चितळेंना श्रीखंडाचा चक्का बनवायला भाड्याने द्या.
आंतरपाट साईझ कापून मंगलकार्यालतात भाड्याने द्या.
छोटे छोटे चौकोन कापून इडली
छोटे छोटे चौकोन कापून इडली वाफवायला उडपी हॉटेलात भाड्याने द्या.
फि(प)टले का ? सल्ले ओ !
फि(प)टले का ?सल्ले ओ !
ये जो धोतर है
ये जो धोतर है
दुश्मन है हमारा
जहां बैठे हम ओ SSSSS
जहां बैठे हम
वही पर ये जम जाये
ओ SSSSS
ये जो धोतर है
दुश्मन है हमारा
काहीही वापर करा धोतराचा, पण
काहीही वापर करा धोतराचा, पण वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्या बस
धोतर स्वच्छ धुवून त्याचे
धोतर स्वच्छ धुवून त्याचे छोटे छोटे तुकडे करा व पाण्याचा गाळण्या (पिशव्या) बनवा। थोडे मोठे फडके करा व ओटा पुसायला वापरा।
नुकतीच कोणी बाळंतीण झाली असेल तर लहान मुलांचे लंगोट बनवून भेट द्या
गोधडी शिवायला इतर
गोधडी शिवायला इतर कपड्यांबरोबर धोतरही द्या.
फाटक्या जीन्स सारखी फाटकी
फाटक्या जीन्स सारखी फाटकी धोतरं विकायला आलेत हल्ली. खूप आवडती ( ट्रेंडिंग ) फॅशन आहे. त्यामुळे न फाटलेलं धोतरंही लोकं फाडून घालू लागलेत. पुरवठा कमी आहे. तेव्हा एखादे दुकान, मॉल, आंतरजाल असे कितीतरी पर्याय आहेत विक्रीचे. उत्तम आणि खात्रीशीर उत्पन्न देणारा व्यवसाय.
(No subject)
आजोबांच्या ( किंवा इकडे
आजोबांच्या ( किंवा इकडे सासऱ्यांच्या) धोतराच काही कधी केलेलं मी बागितल किंवा ऐकलं नाहीये, मात्र आजीची नऊवारी अगदी जपून ठेवून तिची गोधडी, पांघरूण, बाळाला बांधायला कापड म्हणून अशा अनेक ठिकाणी वापरताना (तिचा हळुवार स्पर्श त्यात शोधायचा प्रयत्न करताना ) मात्र बघितलंय, ऐकलय.