भारतीय सिनेसृष्टीत बेस्ट डान्सर कोण ?

Submitted by ढंपस टंपू on 17 August, 2023 - 22:22
file picture

तुमच्या मते बॉलीवूड, टॉलीवूड, मॉलीवूड, कॉलीवूड मधल?/ मधली बेस्ट डान्सर कोण ?

आजवरचं भारतीय चिसृष्टीतल बेस्ट कोरीओग्राफ केलेलं आयटम सोंग कुठलं ?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक हेलन सारखी दिसणारी डान्सर होती. कुणाला नाव माहितीये का ?
टोपणनावाने प्रसिद्ध होती, मूळ इंग्रजी नाव अवघड आहे.
^^
सापडलं उत्तर. मधुमती टोपणनाव
https://www.youtube.com/watch?v=L3M4DXjnqTI

<<<<संध्याची भयनृत्ये विसरून कसे चालेल ?

Submitted by रघू आचार्य >>>>

यावर विस्ताराने आलेच पाहिजे...
तिच्या काही clips तर लहान मुलांना घाबरवायला बर्‍या आहेत.. "पटपट दूध पी, नाहीतर ती बाई नाचून दाखवेल हां तुला... " अशासाठी

>>>>>>आम्रपाली तिच्या नृत्या करता परत परत पाहते, त्यात ती खरच कोणी अप्सराच वाटते. आणि सुनील दत्त म्हणजे uff too hot Happy
+१

मला CG म्हणजे Center of Gravity तेवढं माहीत होतं.
CG छान आहे म्हणजे नाचताना किती वाकतात, उड्या मारतात, तरी तोल जात नाही असे वाटले.

तिच्या काही clips तर लहान मुलांना घाबरवायला बर्‍या आहेत.. "पटपट दूध पी, नाहीतर ती बाई नाचून दाखवेल हां तुला... " अशासाठी
>>>>> Rofl Rofl

विनोद खन्ना , धरम पाजी, सुनील + संजय दत्त , सनी , सुनील शेट्टी इ . इ . इ.
अशोक मामा , लक्षा , महेश कोठारे
यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. कारण आमची नाचाची शैली मिळती जुळती आहे

माझे फेवरीट ऋषी कपूर, शाहिद, आयुष्मान खुराणा , वैजयंती माला , आशा पारेख , हेलन
आजकाल रियालिटी शोज मधले क्लासिकल डान्स पण झटका डान्स वाटतात (झटका डान्स ची प्रणेती संध्या ) , नृत्यातील नजाकत संपल्यासारखी वाटते .

अशोक सराफ यांची ती किंवा कृष्णाच्या रूपात पावा वाजवताना ची क्लिप असणार हे वाटलेच होते.
कृष्ण सराफ बघून लोळण घेतली होती. आता गाणं आठवत नाही.

संध्याची भयनृत्ये विसरून कसे चालेल ?>>>> वेगळ्या धाग्याच पोटेन्शियल आहे यात. >> टोटली!

अशोक सराफ आणि रंजना ह्यांचा iconic dance कसं विसरलं public?
गाणं : अगं अगं म्हशी
Steps अशा आहेत की कोणत्याही गाण्यावर बसवता येतात, एकदम कमाल!
अश्विनी ये ना ह्या गाण्यातला अशोक मामांचा नाच तर त्याहून अप्रतिम आहे.
भुताचा भाऊ चित्रपटात असलेलं rock baby baby गाणं पाहिलंत का? अजून एक नमुना

अजूनपर्यंत ह्या धाग्यात रेखाची आठवण कुणाला कशी झाली नाही?
मागच्या पानांवर रेखा आली असेल तर माफ करा.

अजूनपर्यंत ह्या धाग्यात रेखाची आठवण कुणाला कशी झाली नाही? >>
जो दिल मे होते है उन्हें याद नही किया करते.

रेखा उमराव जान शिवाय फारशी नृत्यात चमकल्याचे आठवत नाही, बेस्ट वगैरे नाहिये ती निदान नाचात तरी. दिसण्यात १ ऑफ द बेस्ट..

नाचाच्या कार्यक्रमात शिल्पा शेट्टी ला घेणे म्हणजे फक्त बिहार छाप् ठुम्के /चुरा के दिल मेरा ह्या कमाई वर ही बाई इथे जज म्हणून बसलीय असं वाटतं.. अगदीच नाही सूट होत.
सोनाली बेंद्रे ला ही जज म्हणून कुठल्याश्या प्रोग्राम मधे पाहील्याचं आठवतयं.

जर आपण लोकं जज ना जज करू शकतो तर जज का नाही स्पर्धकांना जज करू शकत Happy

बाई दवे ,
जज वरून आठवले
धाग्यावर अजून महागुरू सचिन पिळगावकर यांचे नाव आले नाही याचे आश्चर्य वाटले..
मराठी लोकांनाच मराठी लोकांचे कौतुक नाही..
म्हणून स्वतःच स्वतःचे करावे लागते..

तरी सुद्धा जज मेंटल नसावे एवढी माफक अपेक्षा आहे.

(मेले शब्द डोळ्या देखत बदलतात, कधी नको तिथे स्पेस देऊन)

वैजयंतीमाला - अप्रतिम पदन्यास, हस्तमुद्रा आणि अभिनय. मागच्या पानांवर आम्रपालीचा उल्लेख आला आहेच पण त्याशिवाय कठपुतलीमधलं "बागड बमबम", मधुमतीमधलं "चढ गयो पापी बिछुआ" आणि आशामधलं "तू ना आया और होने लगी शाम" यात अप्रतिम नाचली आहे ती.

पभुदेवा - खूप जलद हालचालीतही ग्रेस राखू शकतो.

हेलन - तशी दुसरी होणे नाही

भगवानदादा - ठेक्याचे ठेकेदार

माधुरी दिक्षित - शास्त्रीय, देशी, वेस्टर्न असे अनेक प्रकार सहज करू शकते.

गोविंदा - सुरुवातीच्या (इल्जाम इ) सिनेमात त्याचे ब्रेकडान्स भारी होते. पुढे त्याने त्याची देशी नाचाची स्टाइल बनवली.

साई-सुब्बालक्ष्मी - नाव वाचून कदाचीत कळणार नाही. पण त्या आहेत अपलम चपलम सिस्टर्स. मला त्यांची दोनच गाणी माहिती आहेत पण दोन्ही अप्रतिम आहेत.

लिला गांधी - मराठी चित्रपटात लावणी म्हटली की दोन नावे आठवतात - सुलोचनाबाई चव्हाण आणि लिला गांधी

हिरोंमधे ह्रितीक, गोविंदा, शाहिद कपूर.
हिरोईन्स मधे रेखा, वैजयंतीमाला, वहिदा रहेमान, हेमामालिनी, माधुरी दीक्षित आणि हेलन व मराठीत जयश्री गडकर.
मला वहिदा रहेमान व रेखा यांनी काहीही केलं तरी आवडतंच. फार रसरशीत व उत्फुल्ल अदाकारी वाटते.
धूममधे ह्रितिकचा टॅप डान्स आमिरपेक्षा उजवा वाटला होता.
मखणा गाण्यात अमिताभ, गोविंदा आणि माधुरीने जी काय धमाल केली आहे त्याला तोडच नाही. फक्त धमालीसाठी धमाल आहे म्हणून फारच बेस्ट आहे.
गोविंदाचा एफर्टलेसनेस ह्रतिक मधे नाही. त्याचे कष्ट जाणवतात.

Pages