पर्यावरण बदल

Submitted by चिंता मनी on 10 August, 2023 - 16:25

आज जिकडे तिकडे वेळी यावेळी अचानक पुराचे थैमान आपण पाहत आहोत. इतके दिवस ग्लोबल वॉर्मिंग नावाखाली चर्चिला जाणारा हा विषय आता climet change' पर्यावरण बदल 'नावाने चर्चिला जाऊ लागला. पुराच्या थैमानाने अतोनात नुकसान होत आहे. आज चीन मध्ये तर हाहाकार माजला आहे.
असे असून देखील या विषयावर आपल्या देशात फार काही जागरूकता दिसत नाही. गोष्टी इतक्या टोकाला गेल्या आहेत की या पर्यावरण बदलासाठी प्रत्येकजण जबाबदार आहे. कुठेतरी कोणीतरी सभा घेतं . कोणाचे तरी भाषण ठेवले जाते. पुढे काहीच होत नाही .आता तुम्ही म्हणाल मी एकटा विचार करून काय होणार? पण म्हणतात ना प्रवासाची सुरुवात एक पावलाने होते. माझा तोच प्रयत्न आहे. इथे चर्चेला हा विषय घेऊन . या विषयात आपण काय करु शकतो याचीच चर्चा मला हवी आहे.
पर्यावरण बदलाला कारणीभूत असणारे घटक. त्याबद्दल आपण काय करू शकू? हा विचार व्हायला हवा. पुढे मी जी लिंक दिली आहे त्यावर इथे चर्चा व्हावी असे वाटते.त्यावर तात्काळ कृती करण्याची गरज आहे असे मला वाटते
https://www.un.org/en/climatechange

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ग्लोबल वॉर्मिंग नाकारणारे, आणि कोठेही वादळ, पूर वगैरे आला की ते ग्लोबल वॉर्मिंग मुळेच आहे ठसवणारे दोघांचेही लॉजिक मला गंडलेले वाटते.

कॅलिफोर्नियात आता आलेले वादळ ८४ वर्षांनंतर आले. पण याचा एक अर्थ असाही आहे की ८४ वर्षांपूर्वी ज्या कारणांनी वादळ आले त्याच कारणांनीच हे ही आलेले असू शकते.

ते स्नो कॅप्स मेल्ट होत आहेत वगैरे पटण्यासारखे आहे. पण प्रत्येक नैसर्गिक आपत्ती ही त्यामुळेच (ग्लोबल वॉर्मिंग) मुळेच होत आहे याची नक्की खात्री कोणी करत आहे का? अशीच वादळे, पूर, पाऊस, ब्लिझार्ड जर पूर्वीही होत असतील तर निसर्गामधेच कधी कधी होणारी एक्स्ट्रीम कंडिशन यापेक्षा वेगळे स्पष्टीकरण त्याचे कदाचित नसेलही.

तत्काळ कृती --
पर्याय अ
१-गाडी आणि ए सी स्क्रैप मध्ये टाकणे
२-मायबोली वर अजिबात न फिरकणे.
३-मॉडर्न गॅझेट्स त्यागुन १२ बलुतेदार शाही स्विकारणे
४- कायम वल्कल परिधान करणे
५- इमरती काळ्या मातीच्या बनवून त्यावर व्हर्टिकल फार्मिंग सर्व सोसायट्यांना सक्तीचे करणे
६- होता होईल तो सर्वांची नावे वर्षा आणि आडनावे वन अशी बदलून घेणे जेणे करून पृथ्वीवर वर्षावनांची संख्या भरपूर वाढेल.

पर्याय ब - चंद्रयानचा किंवा मंगळयानाचे टिकिट काढून सकुसप स्थलांतर करणे