
गदर + सनी पाजी
बस ! ही दोनच नावं पुरेशी होती पब्लीकला थेटरमधे खेचून आणण्यासाठी. आणि पब्लिक पण मिरवणुकीने आलं.
हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा खरा खुरा अॅक्शनस्टार सनी भरात असताना सगळे त्याच्या पुढं किरकोळ वाटत होते. डोनाल्ड ट्रंप म्हणालेच होते
सनी पाजी अंगार है, बाकि सब भंगार है !
सनी जोरात असताना बाकिचे सगळे हिरोज बच्चे वाटायचे. आमीर खान घरच्या प्रॉडक्शनवर अवलंबून होता नाहीतर महेश भट वर. तो रोमँटीक इमेज सांभाळत होता. सलमानला सूरच सापडत नव्हता. सूरज बडजात्याचा पिक्चर आला तरच तो पुन्हा हिट द्यायचा.
बें बें शाहरूख खानला तर बकरी म्हणायचे. त्याने खलनायकी रोल्स स्विरारले म्हणून टिकला. कुंदन शहा, आजिज, सईद मिर्झा यांनी त्याला हात दिला. नंतर यश चोप्रा आणि करन जोहरययांचं बोट धरून तो चालायला लागला.
पण सनीची बातच और होती. अर्जुन, घायल, दामिनी, जोर, सलाखे, यतीम, डकैत एक से एक क्लासिक हिटस दिले. त्याला सिल्व्हेस्टर स्टॅलोन ऑफ इंडीया म्हणायचे. पण खरं तर तो अर्नोल्ड आहे भारतातला. अर्नोल्डचं वय झालं तरी लोक त्याला पहायला गर्दी करतात.
सनीचा बॅडपॅच सुरू झाला. तो दूर गेला. राजकारणात शिरला. त्याच्या अनुपस्थितीत भंगार हिरो फायबरचे सिक्स पॅक लावून साऊथच्या पिक्चरची कॉपी मारून अॅक्शन करू लागले. त्याच्या गैरहजेरीत यांना चांगले दिवस आले...
पण गदर २ ने या सगळ्या चंगू मंगूंना इशारा दिला आहे !!
सनी सुद्धा आता ६७ वर्षांचा आहे. पण वयाचा अशा हिरोंना फरक पडत नाही.
नुकत्याच आलेल्या गदर २ ने सनीच्या टीकाकारांची तोंडं बंद झाली आहेत.
आता हा पिक्चर ५५० कोटी सहजच आकडा गाठेल हे निश्चित झाले.
ओटीटी आणि टीव्ही प्रक्षेपण आणि संगीताचे हक्क मिळून १००० करोड क्रॉस होणार हे ही निश्चित झाले आहे.
या यशा पाठोपाठ बातमी आली आहे बॉर्डर च्या सिक्वेलची.
जे पी दत्ता आणि त्यांची कन्या हा सिनेमा बनवणार असल्याची घोषणा झाली आहे. एका प्रॉडक्शन हाऊसशी फायनान्स साठी त्यांचे निर्माता म्हणून बोलणे चालू आहे. या स्टुडीओनेही या प्रोजेक्ट मधे इंटरेस्ट दाखवला आहे.
त्यामुळे आत्ताच धागा काढणे गरजेचे आहे.
मायबोलीकरांनी आपले पैसे कोणत्याही आलतू फालतू पिक्चरवर वाया न घालवता ते जपून ठेवावेत. बॉर्डर २ चा सिक्वेल आला कि दोन दोन तीन तीन वेळा जाउन आपल्याला हा सिनेमा सुपर डुपर हिट करायचा आहे.
मधल्या काळात दर्जेदार पिक्चर आला तर बघायला हरकत नाही.
हलका फुलका आला तरी बघायला हरकत नही.
पण फालतू पिक्चरवर पैसा वया गेला कि लोक नंतर येणारा पिक्चर सुद्धा बघत नाहीत. सूर्यवंशी सारखा भंगार सिनेमा कोविड नंतर लगेच आल्याने दीड वर्ष लोकांनी कुठलाच पिक्चर पाहिला नव्हता. त्यामुळे फालतू, भंगार सिनेमाचा राग बॉर्डर वर निघू नये ही काळजी आपण घ्यायला पाहिजे.
डोनाल्ड ट्रंप म्हणालेच होते
डोनाल्ड ट्रंप म्हणालेच होते
सनी पाजी अंगार है, बाकि सब भंगार है !>> कोणते ट्रम्प. अमेरिकेतले की थुरकटवाडीचे ?
बें बें शाहरूख खानला तर बकरी म्हणायचे.>> कोण रे तो? कोण बोललं?
गदर, बॉर्डर चा सिक्वेल
गदर, बॉर्डर चा सिक्वेल तसाच्या तसा बनणे अवघड आहे. चित्रपट चालेल यात शंका नाही.
पण ती मजा येणार नाही हे पण खरं. ९० चा मसाला नॉस्टॅल्जिक होत एकदा चालेल. परत नाही.
गदर ३ चालणार नाही.
मला गोलमाल ३ आवडला होता.
मला गोलमाल ३ आवडला होता.
बॉर्डर माझा अत्यंत आवडीचा
बॉर्डर माझा अत्यंत आवडीचा चित्रपट आणि संदेसे जाते है , तो चलू आवडती गाणी... आणि ये धरती मेरी माँ है आवडता डायलॉग...
माझ्या 50 व्या वाढदिवसाला तो चित्रपट थेटरात पाहिला होता म्हणून अजून जास्त जवळचा...
पण 1 मध्ये फक्त जॅकी जिंदा असतो ना.. त्याला घेऊन अक्खा बॉर्डर 2 म्हणजे रिस्क आहे...
हा काय प्रकार आहे ?
हा काय प्रकार आहे ?
प्रत्येकाने आपल्या आवडत्या हिरोच्या येणार्या पिक्चरची जाहीरात करायची ठरवलं तर मायबोली फक्त सिनेमा गल्ली बनून जाईल. मायापुरी नाव ठेवायचंय का बदलून ? यांना पैसे मिळतात का प्रमोशनचे ? कि मायबोलीला मिळतात ?