भारतीय सिनेसृष्टीत बेस्ट डान्सर कोण ?

Submitted by ढंपस टंपू on 17 August, 2023 - 22:22
file picture

तुमच्या मते बॉलीवूड, टॉलीवूड, मॉलीवूड, कॉलीवूड मधल?/ मधली बेस्ट डान्सर कोण ?

आजवरचं भारतीय चिसृष्टीतल बेस्ट कोरीओग्राफ केलेलं आयटम सोंग कुठलं ?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतातला प्रभू देवा
बॉलीवूड मधील ह्रतिक रोशन
हे या प्रश्नाचे उत्तर आहे.

आता तुम्हाला अजून कोण आवडते यावर चर्चा करू शकतो.
माझा आवडता रणबीर कपूर कारण आमची नाचाची शैली मिळती जुळती आहे Wink

बेस्ट हिरो डान्सर्स-
रणबीर कपूर

बेस्ट हिरोइन्स डान्स -
मीनाक्षी शेषाद्री

वैजयंती माला.

आताचे हिंदीतले नाच, नाच कमी व कवायती जास्त वाटतात आणि त्यात कौशल्य किती व सिजी ग्राफीक किती हेही कळत नाही. जितका जास्त वेग तितका नाच चांगला हे गृहितक असल्याने सगळे नुसते वेगवान हालचाली करत असतात.
नाचो नाचो वर पडद्यावर नाचणार्‍यांनी प्रत्यक्षात ऑस्करच्या रंगभुमीवर त्यावर थिरकायला नकार दिला तेव्हा डोक्यात सिजीचीच शंका आली इतका तो नाच वेगवान आहे. नुसते अवाक होऊन पाहायचे, इतका वेग की जितके आहे त्यातले फार थोडे डोक्यात रजिस्टर होते असे नाच असतात हल्ली.

कथक हा नजाकतीचा नाच आहे असा माझा समज होता. तिथेही हा वेग घुसला आहे.

धर्मेंद्र , सनी
सोनाली बेंद्रे

बेस्ट कोरिग्राफी
मै जट यमला पगला दिवा, अरे रफ्ता रफ्ता देखो आंख मेरी लडी है

जो हाल दिल का , इधर हो गया है, वो हाल दिलका

भीगे होंठ तेरे

ही सर्वच नृत्ये अद्भुत, आहेत. स्वर्गीय आनंद देणारी आहेत.
https://www.youtube.com/watch?v=q-uTucja2LI

ओन्ली न ओन्ली सनी पाजी
डान्सिंग मध्ये सुद्धा मल्टी टास्किंग

आताचे हिंदीतले नाच, नाच कमी व कवायती जास्त वाटतात>>=+१
बेस्ट असं काही नसतं. बरेच आहेत. ज्योथिका, माधुरी(डीटीपीएच), श्रिदेवी, मिनाक्षी शेशाद्री, जयाप्रदा, वैजयन्ती माला.
शाहिद कपूर, ह्रिथिक रोशन. गोविंदा च्या नाचात १ वेगळाच स्वॅग असतो, एन्जॉय करून नाचतो. प्रभू देवा.
नच बलिये चे पहिले काही सिझन्स खूप आकर्षक होते. आता रोबोटिक हालचाली, वेग सगळंच बोर होऊन बसलय..ग्रेस, नजाकत सगळं आऊट.
जजेस च्या रीअ‍ॅक्शन्स पण कायच्या काय असतात, अजिबात टिका करत नाहित. सगळंच छान & आग लगा दी टाईप.

नाचो नाचो वर पडद्यावर नाचणार्‍यांनी प्रत्यक्षात ऑस्करच्या रंगभुमीवर त्यावर थिरकायला नकार दिला तेव्हा डोक्यात सिजीचीच शंका आली इतका तो नाच वेगवान आहे.
>>>

हो. त्या व्हिडिओचा स्पीड वाढवला आहे हे कळते लगेच. आपण साधे मोबाईल एप वर सुध्दा करू शकतो हे. किंवा insta reels सुध्दा बनतात तश्या. व्हिडिओ शूट करताना गाणे स्लो वाजते. आपण नॉर्मल नाचायचे. मग व्हिडिओ शूट झाल्यावर प्ले होताना गाणे नॉर्मल स्पीडला येते आणि आपला नाच आपसूक फास्ट दिसतो.

कारण आमची नाचाची शैली मिळती जुळती आहे Lol
,>>>>

यात काय हसण्यासारखे.. माझ्या मित्रांचे आणि घरच्यांचे मत सुद्धा हेच आहे.

आताचे हिंदीतले नाच, नाच कमी व कवायती जास्त वाटतात
>>>>>
मला ते जिम्नास्टिकचे प्रकार सुद्धा वाटतात. लवचिक अंग मोडायचे कसेही. जास्त वेळ बघवत नाहीत. नाचात सर्वात मोठा गुण म्हणजे ग्रेस दिसली पाहिजे. नाहीतर मी सोडून देतो बघणे. ग्रेस असेल तर गणपती मिरवणुकीतले नाच सुद्धा बघायला मस्त वाटतात.

सिरीयसली
अलिकडच्या कलाकारात टायगर श्रॉफ, ऋत्विक रोशन आवडतात. प्रभू देवा ऑल टाईम फेवरिट आहे.

जस्ट एक पिढी मागे
अक्षयकुमार आमीर खान. कधी कधी सैफ. सलमानचे डान्स हा संशोधनाचा विषय आहे.

कमल हसनचा क्लासच वेगळा आहे. तो ऑलराऊंडर आहे.
त्याच्या समकालीनांमधे ऋषी कपूर बॉलिवूड मधे बेस्ट.

त्याच्या आधी जितेंद्र !
शम्मी कपूरचं आळोखेपिळोखेअट्टम नाट्यम पण आवडते.

नायिकांमधे मोठी लिस्ट आहे. आल्यावर टाकतो.

सध्या एकच नाव - श्रीदेवी.

<< तुमच्या मते बॉलीवूड, टॉलीवूड, मॉलीवूड, कॉलीवूड मधल?/ मधली बेस्ट डान्सर कोण ? >>

हेलन

माझा आवडता रणबीर कपूर कारण
तो ऋन्मेऽऽष सरांची कॉपी करतो. ऋन्मेऽऽष सर इकडे बिझी आहेत नाहीतर ... ते इकडून मोकळे झाले कि पहा. सगळ्यांची छुट्टी करतील. काय समजलेत.
सर तुम्ही तुमच्या नाचाचा विडीओ टाका, म्हणजे रणबीर कपूरला प्रक्टिस करायला बर पडेल.
सर, उगाच रागावू नका.

टायगर पण कवायती नाच करतो. हृतिक ग्रेसफुल आहे. रणबीर कपुर / शाहिद कपुर नक्कीच भारी आहेत.

ऋषी कपुरच्य अंगातच लय होती, त्यामुळे त्याचे डान्स बघायला आवडत.

वहिदा, वैजयंतीमाला ह्या प्रशिक्षित नर्तिका होत्या. श्रीदेवी, जयाप्रदा ह्यादेखील. हल्लीच्या काळात दिपिकाचे काही नाच ग्रेसफुल आहेत

माझ्या मते माधुरी दीक्षित व श्रीदेवी ह्या भारतीय सिनेसृष्टीतील बेस्ट डान्सर असल्या तरी मला उर्मिला मातोंडकरचा डान्स प्रचंड आवडतो. कित्येक डान्सर पर्फेक्शनच्या नावाखाली जबरदस्तीने एक्स्प्रेशन आणतात पण तेच उर्मिलाचे खूप नैसर्गिक वाटतात. अगदी 'लकडी की काठी' बघा किंवा रंगीला, जुदाई सारख्या चित्रपटांतील डान्स बघा. ती उत्तम अभिनेत्री व डान्सर असली तरी मात्र तिच्या दुर्दैवाने ती झाकोळली गेली (उदा. रामगोपाल वर्माच्या सोबतीने तिचे फायदे आणि तोटे दोन्ही झाले त्यामुळे तिच्या समकालीन अभिनेत्री गर्दीत काहीशी हरवली गेली).

आताचे हिंदीतले नाच, नाच कमी व कवायती जास्त वाटतात
ऋषी कपुरच्य अंगातच लय होती, त्यामुळे त्याचे डान्स बघायला आवडत.

>>> अगदी अगदी.
ग्रेस मुद्राभिनय प्रकारच नाहीसा होतो आहे कि काय असे वाटते. वहिदा, वैजयंती माला, नंतरच्या काळात श्रीदेवी आणि जया प्रदा. हेलनलाही विसरू नका लोकहो. काय फुटवर्क आहे.

शम्मी कपूरचा नाच हा अचाट प्रकार असायचा पण त्यातही अंगभूत ग्रेस होती.
आता ह्रितिकच्या नाचात लय आहे.

अक्चुअली गोविंदाच्या अंगातही लय आहे. तो मनापासून नाचतो. पण त्याचे डान्स वल्गर झाले/करवले त्यामुळे कोणी विचारातच घेत नाही त्याला

त्यामुळे कोणी विचारातच घेत नाही त्याला
>>>>>

नाचामध्ये गोविंदाला कोणी विचारत घेत नाही हे विधान धाडसी आहे Happy
बाकी आपल्या इतर मतांशी सहमत

शाखा. ओन्ली शाखा.
पहा त्याचे बिल्लू मधले तीन नाच!
Submitted by केशवकूल on 18 August, 2023 - 13:02
>>>>

पुरुषांमधले आयटेम song Happy

अमिताभ बच्चन
Submitted by बेफ़िकीर on 18 August, 2023 - 12:35
>>>>

मी देखील घेणार होतो हे नाव.
शाहरूख आणि अमिताभ दोघे रूढार्थाने डान्सर नाहीयेत. पण त्यांच्यात एक एक्स फॅक्टर आहे जो नाचातही दिसतोच. नाचताना आपल्या सुपरस्टार पदाला दोघेही जागतात.
रॉक एंड रोल सोनिये गाण्याच्या वेळी अमिताभला डॉक्टरने नाचू नको सांगितलेले. तरी तो शूटींगवेळी असा नाचत होता की अभिषेक बच्चनला त्याला आवरावे लागत होते.

नाचामध्ये गोविंदाला कोणी विचारत घेत नाही हे विधान धाडसी आहे
>>>>म्हणजे जसे वैजयंती माला वगैरे संबंधात म्हटले जाते तसे 'मला बोवा गोविंदाचा डान्स आवडतो' असे पटकन कुणी म्हणते का?
बाकी अमिताभ अँग्री यंग मॅन होता तेव्हाचे त्याचे डान्स नाही आवडत मला. पण आता कभी ख़ुशी कभी गम, बागबान इव्हन अक्स मधला डान्स मला आवडला.

Pages