Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47
https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सश्याच्या घरी मांजरं
सश्याच्या घरी मांजरं
(No subject)
अतुल आता फोटो दिसत आहे. छान
अतुल आता फोटो दिसत आहे. छान आहे तुमची माऊ.
क्युट आहे माऊ अतुल..लांबी
क्युट आहे माऊ अतुल..लांबी जास्त आहे.नाव काय?
अंजली किती क्यूट, डोळ्यासमोर
अंजली किती क्यूट, डोळ्यासमोर आलं.
सिंबाची नवीन खुर्ची
सिंबाची नवीन खुर्ची
गोड गोड खुर्ची आहे, सिम्बा
गोड गोड खुर्ची आहे, सिम्बा लाडोबा आहे एकदमच.
सर्व फोटो मस्त. लव्ह टू ऑल
सर्व फोटो मस्त. लव्ह टू ऑल फर बेबीज.
भारी आहे सिंबा.उंची वाढलीय
भारी आहे सिंबा.उंची वाढलीय वाटतं.
need info ::gastro
need info ::gastro
mi_anu --> होय चांगलाच उंच
mi_anu --> होय चांगलाच उंच झालाय आता
लोल, त्यांना पटतच नाही वाढ
लोल, त्यांना पटतच नाही वाढ झाल्याचं....
पपीचा डॉग झालातरी लहान मुलासारखे वागतात हाहहा..
अगदी अगदी, ओड्या तर लाडात आला
अगदी अगदी, ओड्या तर लाडात आला तर त्याच्या वजनाने तोल जातो आपला. येड्याला कळतच नाही की आपण किती वाढलोय ते. अजूनही मांडीवर येऊन बसायला बघतो
आमचेकडे रोज दूध प्यायला व
आमचेकडे रोज दूध प्यायला व मोतीच्या हिस्यातले खायला येणार्या मांजरी पैकी एक मांजर काल रस्त्याचे कडेला मॄत आढळली , खूप लळा लावला होता , केव्हाही समोर येऊन पायापाशी लोळायची व पाठ खाजवून मागायची कशानी मेली समजले नाही तशी सुस्थित होती कुठलीही जखम नव्ह्ती त्यामूळे दुसरीही थोडी शांत झाली .
अरर
अरर
विषबाधीत/ इन्फेक्टेड उंदीर
विषबाधीत/ इन्फेक्टेड उंदीर वगैरे शिकार करुन खाल्ला असेल तिने कदाचित.
विषबाधीत/ इन्फेक्टेड उंदीर
विषबाधीत/ इन्फेक्टेड उंदीर वगैरे शिकार करुन खाल्ला असेल तिने कदाचित. > शक्यता जास्त आहे, उंदीर सुसुंद्री खूप आहेत !
अरेरे…
अरेरे…
सगळे फोटो लाघवी.
स सा तुमच्या मांजरीचे वाचुन मजा वाटली.
कालची फ्रेंडशिप डे ची मज्जा
कालची फ्रेंडशिप डे ची मज्जा
पोरगा गेला मित्रांना भेटायला, थोड्याच वेळात परत आला वैतागून
म्हणलं का रे, म्हणे सगळे ढोल ताशा सरावाला गेलेत, एक जण जिम ला आणि एक जण क्लासला, कुणालाही वेळ नाहीये
मग थोडा वेळ बसला, ओड्याला म्हणाला चल आपणच खेळू,
लगेच मला त्याला उपदेश करायची उबळ आली
म्हणलं, हाच असा मित्र आहे तुझा जो कधीही, कुठल्याही वेळी तुझ्यासाठी असणारे, मध्यरात्री पण
असंच थोडं बोलत राहिलो तर म्हणे इतकाही गोंडस नाहीये तुझं बाळ
एकतर त्याच्याशी खेळायचं तर त्याच्या टर्म कंडिशन नुसार खेळावं लागत, ते म्हणजे बॉल घेऊन तो पळणार आणि आपण त्याच्या मागे पळायचं, किंवा लपाछपी. दुसरं काहीही खेळत नाही तो
आणि वर पुन्हा एवढं खेळल्याबद्दल नंतर त्याला अर्धा तास बेली रब करून द्यावं लागतं नैतर भुंकून हैराण करतो
अजून एक मज्जा म्हणजे पोरगा त्याला रोज रात्री बरोबर 9.15 ला जेवायला देतो, आणि दर वेळी हॉल मधले मोठे घड्याळ दाखवतो हे बघ हा काटा इथं असला की तुझी जेवणाची वेळ, त्या आधी भुणभुण करायची नाही
तर ओड्या ला कितपत समजलं माहीत नाही पण काहीतरी नक्की कळलंय कारण तो 8.15 लाच बरोबर त्याच्या मागे लागतो जेवायला दे म्हणून
पोरगा म्हणतो, ओडिन तू फक्त मोठा काटा लक्षात ठेवलायस
छोटा काटा इथं आणि मोठा काटा इथं असेल तर मिळणार, जा आता अजून एक तासाने ये
ओडिनचे विडिओ पाहिलेले
ओडिनचे विडिओ पाहिलेले असल्याने वरचे प्रसंग imagine होउन फार हसलो
वेळेचे संवाद भारी आहेत
वेळेचे संवाद भारी आहेत दोघांमधले.
@ आशुचँप - तुमचे वाक्य अगदीच
@ आशुचँप - तुमचे वाक्य अगदीच relate करू शकलो कारण माझा मुलगा पण मला हेच म्हणतो जेव्हा पाहावा तेव्हा सिम्बाच्या तोंडात एका बॉल असतो आणि आपण फक्त तो फेकायचा किंवा मग लपाछपी किंवा दोरीची ओढाओढ बस ...
बाकी वेळेचे संवाद भारी आहेत दोघांमधले :ड
क्यूट संवाद!
क्यूट संवाद!
काय धमाल किस्सा आहे. त्याला
काय धमाल किस्सा आहे. त्याला घड्याळ कळायला लागलं आहे अर्ध
आमचा कोकोनट (कसाबसा)पास झाला.
आमचा कोकोनट (कसाबसा)पास झाला. परिक्षेच्या दिवशी टाय व डिग्रीची हॅट घालून अभ्यास न करता गेलो होतो. सगळा भर टिपटॉप रहाण्यावर होता.
कसला क्यूट दिसतोय..
कसला क्यूट दिसतोय..
हाहाहा कसलं क्युट
हाहाहा कसलं क्युट
कशाचे सर्टिफिकेट आहे हे??
Hearty congratulations
Hearty congratulations Coconut. Handsomest goodest boye.
कोकोनट, आम्हाला पेढे हवेत हं
कोकोनट, आम्हाला पेढे हवेत हं !
Basic Pet training आहे हे
Basic Pet training आहे हे आशुचॅम्प. Sit, stay , come on वगैरे कमांड्स शिकवतात. पेटस्मार्ट नावाचं दुकान आहे, त्यांचा कोर्स होता.
स्वान्तःसुखाय
Pages