बूमर लाइफ, बूमर थिंग्ज

Submitted by अश्विनीमामी on 9 August, 2023 - 23:32

हाय, पन्नाशी पुढची वाटचाल असा धागा काढला होता त्याला बरीच वर्षे झाली. आता ह्या वर्शी साठी लागणार. त्या निमित्ताने हा धागा!! पुढील वाटचाली साठी. ह्या ह्या ह्या. कोटी आपण हूनच झाली. ऑफिशिअली ज्येना लाइफ. त्यामुळे ह्या वयोगटातील माबोकर तर मोस्ट वेलकम आहेतच पण ज्यांचे पालक नातेवाइक ह्या वयोगटात आहेत त्यांनी ही प्रतिसादात लिहा. हे असे का वागतात असा प्रश्न पडत असेल तर मी त्यांचे पर्स्पेक्टिव्ह लिहायचा प्रयत्न करेन.

माझे जीवनातले रोजचे अनुभव लिहायला एक व्यासपीठ म्हणून धागा काढला आहे. बरेच ज्ये ना आज काल एकटे राहतात . तेव्हा येणारे प्रश्न सोडवायला मदत व्हावी असाही एक गोल आहे. सध्याच माझे आयटी रिटर्न भरताना आधार कार्ड फोन मॅपिन्ग राहिले होते ते धाव्पळीत केले व
चांगला अनुभव आहे. तो शेअर करेन.

डिस्क्लेमरः मी व्होट्सॅप फोरवर्ड कॉपी पेस्ट करत नाही व प्रतिसादकांनी ही करू नये. द आयडिआ इज टू एज स्मार्टली. लिव्ह हॅपीली अ‍ॅन्ड एंजॉय
द डेली स्पेक्टॅकल ऑफ लाइफ. अ‍ॅज इट पासेस बाय. जॉइन इन.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी प्रतिसादात लिहिते आता तयार होउन घरची कामे उरकून डबा बनवून हपिसात पळायचे आहे. नाहीतर रिक्वेस्टर फोन करायला लागतील.

<माझे जीवनातले रोजचे अनुभव लिहायला एक व्यासपीठ म्हणून धागा काढला आहे> हे याच धाग्याबद्दल आहे की आणखी कोणता धागा ?

मला ऑफिशियली ज्येष्ठ नागरिक व्हायला ५ वर्षे आहेत. वाटचाल सुरू आहे. पण दोन अतिज्येष्ठ / अतिवृद्धांचं पालकत्व निभावलं आहे. ते अनुभव इथे लिहू शकेन.

एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिकही पाहतो आहे.

नक्की कोणकोणत्या अंगांनी लिहायचं हे ठरलंय का? आर्थिक, शारीरिक ( आरोग्य - तंदुरुस्ती - आजारपण), मानसिक, भावनिक, सामाजिक, कौटुंबिक.

मी ज्येना नाही मनानी व्हायची इच्छाही नाही पण शरीरानी होईलच. Wink
तर दोन पैसे - टेक लिटरेट व्हायलाच हवंय. वस्तू, जिन्नस, टॅक्सी, ड्रायव्हर, इतर सर्विसेस, बँक इ. सहजपणे आणि जागरुकतेनी ऑनलाईन करता यायला हवं हे माझं मत. आणि त्याकरता डिसेंट फोन असणं अन त्या वस्तूवर खर्च करण्याची तयारीही आवश्यकच (अर्थात नेहेमीप्रमाणे हेमावैम आहेच).
सपोर्ट सिस्टम भोवती उभी करणे, सो इन केस ऑफ इमर्जन्सी ५-१० मिनिटात कुणी पोहोचू शकेल, इतरांना इन्फॉर्म करू शकेल. बाकी होता रहेगा.

अमा, आमच्या होडीत स्वागत! तुम्ही इतक्या हरहुन्नरी व जिंदादिल आहात आरामसे कट जाएगी ... अनुभव, अडचणी शेअर करत रहा ....

माझे आधार कार्ड व फोन मॅपिन्ग राहिले होते. परवा आयटी रिटर्न तर भरले वेळेत पण फोन आधार कार्ड मॅपिन्ग नसल्याने इ व्हेरीफिकेशन जे तीस दिवसात करायचे असते ते पेंडिन्ग राहिले आहे. मी पूर्ण महिन्याची एक बारकी टू डू लिस्ट बनवते व ती पोस्ट इट नोट वर लिहून सर्व सिसिट्म वर चिकटवून ठेवते. म्हणजे आपला जो अ‍ॅक्टिव्ह वेळ असतो. व आपली एनर्जी लेव्हल लिमिटेड वेळ हाय असते तेव्ढ्या वेळात ह्यातील कामे पूर्ण होतात.
मुंबईत कामाच्या रगाड्यात पर्सनल कामे, हेल्त रिलेटेड कामे बाजूस टाकायची सवय होती पण आता तसे करत नाही. प्रत्येक दिवसाची सर्वात महत्वाची कामे प्रथम करून घेते. बाकी ठिका णी प्रायोरि टी क्रम करून महत्वाची कामे करते व एखादे काँप्रमाइज करावे लागले तर ते तसे.

दुपारी सी एचा फोन आला की हे मॅपिन्ग करुन घ्या लगेच मग कामाव रून लवकर निघाले( एक तास फक्त!!) त्या आधी आधार कार्ड चे सेंटर कुठे आहे ते गूगल मॅप वर चेक केले. पोस्ट ऑफिसात होते पण ते बंद होते. मग भेटला तो रिक्षेवाला करून पत्ता शोधत गेले. गूगलने बरूब्बर चुकीच्या दिशेला नेले. तिथे आपला जुना भारतीय नुस्खा किराणा माल दुकानात विचार ले. तर कोर्टात एक केंद्र आहे व ते आत्ता बंद झाले आहे असे समजले. रिक्षावाला पण रुसला की मी तुम्हाला तिथेच नेत होतो. मग त्याची समजूत घालून मुलुंड कोर्टा त आत आत आत रिक्षा वाल्याने पार केंद्रा समोरच आणून थांबवले. मी तिथे फोटो घेउन उद्या परत यायचे ठरवत होते पण मग त्याला म्हटले एक मिनिट वेटिन्ग कर मी आत काय आहे बघुन येते.

तर ते केंद्र चालू होते!!! पाच वाजता. मग तिथे एका बाईने फॉर्म भरून घेतला. माझे आधार कार्ड जुने आंध्रातले होते त्याची कलर झेरॉक्स करुन मी प्लास्टिक मध्ये लावलेली होती. ती दाखवली. मग मला फॉर्म वर सही करवून आत पाठवले. एक दोन वेटिन्ग होते. मग डिजिटल सरकारी सुंदरीने पूर्ण प्रोसेस नुसार अपडेट केले. फोटो, डोळ्याचे स्कॅनिन्ग, हाताच्या बोटांचे, अंगठ्याचे स्कॅनिन्ग, फोन नंबर नाव देवनागरीत असे काय काय केले मला चेक करवले व १०० रु घेतले रिसीट दिली. आता दोन आठवड्यांनी या विचारायला असे सांगितले. हिला बिचारीला वॉशरुम
ब्रेक घ्यायचा होता पण मी अचानक आल्याने माझे काम करुन मगच तिने ब्रेक घेतला. मी तुझी परिस्थिती समजू शकते असे मी तिला म्हटले.
रिक्वेस्टर इज ऑलवेज प्रायोरिटी. हाच आमचा धर्म.

आता हे काम झाले की चांगले कार्ड वाले आधार कार्ड पण करून घेणार आहे. निघताना भरपूर पाउस आला पण वेळेत घरी पोहोचले. रिक्षावाल्याने ( उत्तर भारतीय) बरीच वैयक्ति क माहिती विचारली. हे एक पीळ प्रकरण असते पण त्याच्या सहकार्या मुळे काम झाले म्हणून
काहीही बडबड करत घरी पोहोचले. हुश्श.

आता कार्ड आल्यावर अपडेट लिहिन. फ्युनरल साठी पण अपडेटेड आधार कार्ड लागते असे इथेच वाचले आहे. ते हाताशी असलेले बरे.

अमा, Aadhar card ला मोबाईल नंबर link असेल तर तुम्ही कधीही डाऊनलोड करून प्रिंट करून घेऊ शकता.
Linked मोबाईल नंबर आधार कार्ड वर प्रिंट असतोच

Hi karte. Mami you toh are forever young ji. Post anytime.
Aaba te pahile mapping nahi te aata kele aahe.

Down with 103 fever. COVID may be. Do just lying down. Listening to podcast. No energy to play game also.

तर ते केंद्र चालू होते!!! पाच वाजता.
बिचारीला वॉशरुम
ब्रेक घ्यायचा होता पण मी अचानक आल्याने माझे काम करुन मगच तिने ब्रेक घेतला. >>

म्हणजे सरकारी कामात थोडी फार तरी सुधारणा झालीय असे वाटले का? मग लोकं का शिव्या देत असतात सरकारला जाता येता? (विषयांतर झाले, सॉरी)

आधार वेगळंच प्रकरण आहे. हे काम कोणाकोणाला आउटसोर्स केलेलं असतं. काही बँका, पोस्ट ऑफिस आणि व्यक्ती ( individuals) या व्यक्तींना सरकारी कार्यालयांत जागा दिलेली असते. बँक कर्मचार्‍यांपैकी कोणाच्या तरी गळ्यात काम मारलेलं असे. माझं आधार बनवायचं होतं तेव्हा बँकांमध्ये आमचं सेंटर बंद आहे, कधी सुरू होईल ते येऊन विचारा असं सांगत. व्यक्ती - यात तरुण मुलं मुली . व्यक्तींचा अनुभव चांगला होता. मी बोरिवलीच्या तहसीलदार ऑफिसमध्ये गेलो होतो, तेव्हा त्या जोडीला त्यांचा सेट अप (डेस्कटॉप, स्कॅनर इ, घेऊन ) टेबल शोधत नाचवत होते. त्या दिवशी टेबल मिळालं नाही आणि त्यांना परत जावं लागलं.
माझ्या एका एक्स कलीगनेही एक सेंटर चालवायला घेतलं होतं. दोघी बायकाच. त्यांची अक्षरशः दया आली होती. इतकी गर्दी आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे लोक. तीच तीच माहिती न कंटाळता परत परत सांगायची. त्यात ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण अधिक. त्यांना पुन्हा या म्हणून सांगणं शिक्षाच असे.
बी एम सी कार्यालयात उघडलेल्या सेंटरवाल्यांनी नाव नोंदवून घेऊन एक महिन्यानंतरची अपॉइंटमेंट दिली आणि त्या तारखेला काम झालं.

थोडेसे विषयांतर मुंबईमध्ये राहणाऱ्या व आधारविषयी कामे पेंडिंग असणाऱ्यांसाठी सर्वांसाठी :
सफेद पूल, कुर्ला येथे आधारचे ऑफिस (फ्रॅन्चायजी नव्हे) आहे. इथे ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळते व ठरलेल्या वेळेला सुरळीत काम होते. खुद्द आधारवाल्यांचे ऑफिस असल्याने प्रोफेशनल होते.

लहान मुलांच्या बोटांचे ठसे घेणे व आयरिस स्कॅन तसे किचकट काम आहे. ते इथे फार सफाईने झाले. फोटोही अपडेट केला आणि आधारवरचा फोटो पोलीस स्टेशनमध्ये तडीपार कॅटेगरीत लावण्यासाठी काढलेला असतो या समजालाही धक्का बसला.

मला रि क्षा वाल्याकडून असे ही समजले की हा सर्व डेटा बदला पूर का बी पासून सुरु होणारे गाव आहे तिथे जातो काम होते. आज सी ए चा फोन आलेला तिला अपडेट दिला.

आज कोव्हिड ९९.८ प्रेन्त कमी आहे. नाक सुकले आहे व थोडी शक्ती परत आलेली आहे. त्यात दोन दिवस सुट्टी. आराम करणे व कंफर्ट फूड खाणे - बेन्ने दोसा इडली वडा च टणी व कंफर्ट बघणे चालू आहे. जुना जॉ ज बघितला. आता सिलसिला लावला आहे. ह्यात रेखा फार सुरेख दिसते. हा आमचा एकेका ळी लाइफ गोल होता. चायना सिल्कच्या साड्या मोठी कानातली.

अमा तब्येत कशी आहे आता ?>> ऑलमोस्ट बॅक टू नॉर्मल. टेम्प ९८.३ !! घरची सर्व कामे केली. घी रोस्ट चिकन बनवले पण चव घेतल्यावर तिखट आंबट मुळे एकदम किचन मध्ये थय थयाट डान्स केला. तिखट लागू देत नाही. दुपारी कॉफी व क्रसां खाल्ला. सोफ्ट बटरी त्यामुळे आता जेवायचे काम नाही. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना.

अमा,
एकदा update झाले आधार कार्ड आणि मोबाईल लिंक झाले की नंतर बरेच काम घरून online होते.
अड्रेस प्रूफ नीट असेल तर अड्रेस अपडेट आणि नंतर PVC मटेरियल चे आधार कार्ड मागवणे बेस्ट.
Online होते हे काम.

हाय, बुमरिंग अवे. नोकरी सोडल्याने खर्चावर नजर ठेवुन आहे. माझे रिपोर्ट चांगले आल्याने त्या पहिल्या क्वार्टर च्या फंक मधून हळू हळू बाहेर
पडत आहे. नोकरी सोडुन दिल्यामुळे इतके मस्त वाटत आहे. जो ख ड उतरवलेल्या थकलेल्या बैलाचे फीलिन्ग आठ पंधरा दिवस होते. आता हळू हळू ओरिजिनल स्वभाव परत येत आहे. काही करायचे नाही हे फीलिन्ग मस्त. सत्तरच्या दशकात टॉन्सैलचे ऑपरेशन झाल्यावर रिक्व्हरी साठी घरी होते तेव्हा आई बरोबर दुपारी तिचे सर्व आवरले की जेवायला बसायचे. पहिल्या वाफेचा गरम भात मुगाची आमटी तूप हळू हळू खायचे, बोलता फारसे येत नव्हते. मग निवांत लकडी पुलाचे काम बघत बसायचे ते दुपारचे प्रहर आठवले . तसा निवांत पणा नंतर आत्ता सापडत आहे.

एकदा तशी आमटी बनवणार आहे. आठवणीतून.

परवा फार मज्जा झाली. माझे सॅलरी अकाउंट आहे व कंपनीची इमेल व अ‍ॅड्रेस त्यात होती. ते बदलायला बँकेत गेलेले. तिथे कस्टमर सर्विस वाला पोरगा फोन वर माझ्याकडून करुन घेत होता. तर समोर एकदम प्लेट भर कोल्हा पुर भडंग आले. व चमचा!! मी यप्प ड सारखे " प्रसाद आहे का? " असे एकदम बावरुन विचारले. आमच्या हप्सात काम करताना मावशी एकदम येउन असेच काही बाही द्यायच्या, साहेब शिर्डीला जाउन आले.
कोणतरी युरोपातून आले तर चॉकोलेट्स, कधी एकदम कोणाचा तरी तिरुपती प्रसाद, जुन्या सवयी? !!

धावप ळ करुन इ मेल आयडी अपडेट झाली. पण आधार कार्ड वर नवीन पत्ता असल्या शिवाय तो अपडेट होणार नाही असे कळले. त्यामुळे ते तसेच पडले आहे.

माझे क्रेडिट कार्ड प ण वरील लफड्या मुळे हपिसात गेले व परत बँकेकडे गेले. ते त्यांनी परत पाठवले. ते घ्यायला काल धावपळ करत हपि सात गेले. तो बिचारा दहा मिनिटे वाट बघत थांबला होता. चकचकीत कार्ड बघुन अंमळ बरे वाटले. बरोबर प्रायोरिटी पास पण मिळाला . एअर पोर्ट लाउं ज साठी.

मी घरीच असल्याने कुत्र्याची एक टे राहायची सवय एकदम गेलेली आहे. लगेच नर्वस होउन ओरडते. वयस्कर दोघीपण.

मेन गेट पाशी मी काम करत होते तर सर्वात खडूस गॉसिपी गुज्जु कलीग भेटली. लगेच तब्येत बरी दिसत नाही वगैरे तिने चालू केले. त्याला सरळ हो. पण जॉब छो ड दी मैने ( शराफत छोड दी मैने च्या चालीवर) असे तिच्या अं गावर फेकून गायब झाले तिथून. यस आय हॅ ड रिअली इनफ ऑफ ऑल धिस. : )

ते वरच्या पोस्ट मधील एक चमचा भ डं ग, मीतर पूर्ण प्लेट्च घेतली असती. कस्ट्मर प्रिव्हिलेज यु नो. लाइक अ कारेन!! व काम चालू होते म्हणून
बॅगच्या पुढील खिशात ठेवले. त्या एक चमच्याने आत सर्वत्र दहा चमचे तेल सोडले. पेपर पैशे सर्व तेलकट झाले. पण घरी येउन एक एक चुरमुरा व एकच दाणा मिटक्या मारत खाल्ले. बघते बिग बास्केट वर मिळते का.

माझ्या तरफे तुम्हाला चहा व भडंग.

हाय शुभ प्री वीकांत. माझे अपडेट इथे लिहायचे लक्षातच राहात नाही.
रविवारी ९ तारखेला चक्क आमच्या घराजवळ मराठी बाणाचा प्रयोग आहे दुपारी चार वाजता ते सुद्धा. लगेच बुक केले आहे. सात आठ वर्शा पूर्वी गडकरीला रात्रीचा प्रयोग बघितला होता. परत येताना रात्री आटो मिळा यला त्रास झाला होता.

अमॅझॉन्वरुन काल पहाटे निळा कुर्ता व मॅचिन्ग पायजमा घेतला होता. कुर्ता आज आला पण. दिवस भरात पायजमा पण येइल. परवा घालता येइल.

काहीतरी गफलत झाली व दोन एक्स्ट्रा तिकिटे बुक झाली आहेत. त्याचा रिफं ड मागीन नाह्तर कालिदासच्या बाहेर पांचका दस पांचका दस करीन.

Pages