Submitted by द्वैत on 8 August, 2023 - 13:44
वारा येतो घेऊन धुळीची आवर्ते
पाचोळा धरतो फेर नदीच्या काठाशी
क्षितिजावर गर्दी निळ्याजांभळ्या मेघांची
अन... अद्याप परतला नाही पक्षी घरट्याशी
काळोख उतरतो फांद्याफांद्यांतून जसा
सावली लांबते झाडाची वेशीपाशी
दिवटीला विझत्या एक मिळेना आडोसा
अन... अद्याप परतला नाही पक्षी घरट्याशी
भवताल पेरतो बीज भयाचे कुठेतरी
उठतात कंपने खोल मनाच्या गाभारी
नजरेला होती सर्व दिशा धूसर धूसर
अन... अद्याप परतला नाही पक्षी घरट्याशी
पक्ष्याला ठाऊक परतीच्या साऱ्या वाटा
पक्ष्याला ठाऊक नाते त्याचे गगनाशी
पक्ष्याला कळते घरट्याची वेडी माया
पण... अद्याप परतला नाही पक्षी घरट्याशी
द्वैत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे .
छान आहे .
छान कविता..पण वाचताना हुर हूर
छान कविता..पण वाचताना हुर हूर लागते. सुंदर वर्णन
या चिमण्यांनो परत फिरा रे -
या चिमण्यांनो परत फिरा रे - गाण्याची आठवण झाली. फार व्याकुळ करणारं गाणं आहे ते.
हुरहूर लागते.
सुंदर!
सुंदर!
सुंदर...!!
सुंदर...!!