बायकांना मिशा असत्या तर ?

Submitted by ढंपस टंपू on 6 August, 2023 - 09:51

मोराला पिसारा आहे, सिंहाला आयाळ आहे.
या दोन्ही प्राण्यात मादीला हे वैभव नाही.
माणसात स्त्री ला केशसंभार आहे तर पुरूषाला खुरटे केस / टक्कल आहे.
हे उलटे झाले.
पण पुरूषाला दाढी मिशा दिल्यात.
जे इतर कुठल्या प्राण्यात फक्त नराला दिलेले नाही.
एक चूक दुरूस्त करायला दुसरी चूक बरोबर कशी काय ?

झुरळात नर मादी दोघांनाही मिशा असतात.
मांजर, बोका दोघांनाही मिशा असतात.
ज्या प्राण्यात नराला मिशा असतात.
त्यांच्यात मादीलाही मिशा असतात.

म्हणून बायकांना पण दाढी मिशा पाहीजेत.
बरोबर ?

जर असे झाले तर काय होईल ?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अत्याबाईला मिश्या असतातच की....
मग मिश्या ना लावायचे तेल, लंबी घनी मेरी मिशी वगैरे...
लहान लहान मिशी साठी खास असे कंगवे येतील...
मिशीच्या वेण्या , पोनी वगैरे विविध केशरचना बनतील... त्याच्या रिबन , एक्सेसरीज वेगळ्या येतील......

योगीजीना सागितले कि प्रश्न सुटणार !
बायकांचे नाव पुरूष आणि पुरूषांचे नाव बायका असे बदलून देतील ते.
मग बायकांना मिशा असतील.

म्हणून बायकांना पण दाढी मिशा पाहीजेत.
बरोबर ?

जर असे झाले तर काय होईल ?......... काही नाही. पार्लरचा खर्च वाढेल इतकेच.

र.आ.,उत्तर आवडले.

मिशीच्या वेण्या , पोनी वगैरे विविध केशरचना बनतील... त्याच्या रिबन , एक्सेसरीज वेगळ्या येतील.... >>> Lol
हे कधी डोक्यात आले नाही. Lol

रआ - खरंच.
देवकी - Lol
मानव पृथ्वीकर - कस्ला भारी व्हिडीओ आहे. सिरीअसली जे इमॅजिन केलं ते सगळंच आहे यात. Happy

मिशीच्या वेण्या , पोनी वगैरे विविध केशरचना बनतील... त्याच्या रिबन , एक्सेसरीज वेगळ्या येतील...... Lol
आमचा एक अतरंगी मित्र दाढीच्या वेण्या घालायचा. एकदा बाप अचानक गावाकडून आल्यावर हया ध्यानाला बघून भयंकर संतापला होता. कानफटात देऊन तडक न्हाव्याकडे नेण्यात आले.

मानव Lol Nice find!

बायकांना मिशा असत्या तर ?
हिंदी गाण्यांत मिशांचा समावेश झाला असता...
तेरी प्यारी प्यारी मुछों को
किसी की नजर ना लगे
मूँछएबद्दूर