माझी लेक, लारा, सध्या न्युयॉर्कमध्ये इंग्लिश लिटरेचर आणि आर्टचे शिक्षण घेत आहे. तिच्या एका असाईनमेंटसाठी flânerie हा विषय होता. flânerie म्हणजे निरुद्देश भटकंती करणारी/रा. यासाठी वर्गातील विद्यार्थ्यांना रस्त्यावर भटकत फोटो काढून त्यावर काही लिहिणे अपेक्षित होते. मिडटर्म परिक्षेसाठी यावर आधारीत पेपर किंवा या विषयावर एखादा प्रोजेक्ट बनवणे अपेक्षित होते.
हे प्रोफेसरनं क्लासमध्ये सांगितलं आणि क्लास सुटल्यावर घरी जाताना लारानं काही फोटो घेतले. संध्याकाळ झाली होती. दुकानं, रेस्टॉरंटस, ऑफिसेस प्रकाशमान झाली होती. त्यांचे फोटो घेतले तिनं. परिक्षेसाठी या फोटोंना समोर ठेऊन काय करता येईल यावर विचार करताना तिला न्युयॉर्कसिटी आणि चालणे, भटकणे यांचं नातं जाणवलं आणि मग एकातून दुसरा असे विचार मनात यायला लागले.
एखादं शहर किती अंगांनी आपल्याला जाणवतं! शहराचं अंतरंग असं या निमित्तानं उलगडून दाखवता आलं तर किती छान ... भटकंतीतून गवसलेले शहराचे कवडसे. हे कवडसे तिनं एका डिजिटल मॅगझिनमधे
(याला झिन म्हणायचं) एकत्र केले आहेत. एक पेपर लिहिण्याची अपेक्षा असताना एक पुस्तिका बनली - Faces of Flanerie.
हे झिन ही पूर्णपणे तिची निर्मिती आहे. यात जे काही आहे ते सर्व तिनं केलंय - फोटो, त्यावर आधारीत स्केच, इतर आर्ट, कविता, लेख, झिनची मांडणी, रंगसंगती सर्व सर्व तिचं आहे. यात तिनं स्वतः बनवलेलं शब्दकोडंही आहे. या शब्दकोड्याची थीम आहे - व्हर्जिनिया वुल्फ.
तिच्या इन्स्टाग्रामवर हे बघायला मिळेल. खाली लिंक देत आहे.
https://www.instagram.com/p/CvmrQfnvl0n/?igshid=MzRlODBiNWFlZA==
Interactive डिजिटल झिनची लिंक : https://heyzine.com/flip-book/27cc2e1651.html
छान आहे झिन.
छान आहे झिन.
इंस्टावर नाहीये एकदोन फोटो
इंस्टावर नाहीये एकदोन फोटो बघता आले त्यावरून कल्पना आली. लाराचे खूप कौतुक व अभिनंदन!
लाराचे खूप कौतुक व अभिनंदन!
लाराचे खूप कौतुक व अभिनंदन!
मस्त केला आहे मॅगझीन
मस्त केलं आहे मॅगझीन . अभिनंदन.
>>>इंग्लिश लिटरेचर आणि आर्टचे शिक्षण घेत आहे
याबद्दल अजून लिहिणार का? कोर्स काय आणि या क्षेत्रात पुढे करिअर ऑप्शन काय असतील?
लाराचे खूप कौतुक आणि अभिनंदन
लाराचे खूप कौतुक आणि अभिनंदन
लाराचे खूप कौतुक आणि अभिनंदन.
मामी मस्त वाटलं वाचून.
लाराचे खूप कौतुक आणि अभिनंदन.
मी insta वर नाहीये, मला कुठे बघायला मिळेल.
मी बघून नंतर लिहितो.
साईटवर बघितलं. फार बारीक प्रिंट आहे. दिसत नाही.
विषय आवडला. रस्त्यावर चालल्याने (वाहनातून न जाता) आपले कपडे इतरांना बघण्याची संधी मिळते आणि इतर तसेच करत असतील तर त्यांच्या फ्याशनही दिसतात. (हे मी नेहमी घरी सांगत असतो)चालतात कसे हेसुद्धा दिसतं जे समारंभांत दिसत नाही. रस्त्यावर सर्व प्रकारचे,लहान मोठे,गरीब श्रीमंत लोक दिसतात .
पण यांच्याशी बोललो किंवा बोलताना ऐकलं तर भाषेंचा उजेड पडेल हे माझं मत. पण त्याअगोदरची पहिली फेरी म्हणून कॉलेजने ही पायरी ठेवली असणार.
साहित्यात म्हणजे कथा कादंबऱ्यांत पात्रं उभी करण्यासाठी आणि संवाद , दिसणे इ. वर्णनासाठी लागणार आहे. निरीक्षण आणि ग्रहण हा पाया आहे.
यशस्वी लेखक किंवा टीकाकार होण्यासाठी याची गरज आहे.
धन्यवाद मनिम्याऊ, मंजूताई,
धन्यवाद मनिम्याऊ, मंजूताई, हर्पेन, चैत्रगंधा, मनीमोहोर, अन्जू, Srd.
Srd, हो तुमची जी तक्रार आहे ती माझीही होती. इन्स्टावर वाचणं कठीण जातं. विशेषतः मोबाईलवरून. लॅपटॉपवरून वाचता येतं सहज.
चैत्रगंधा, लारा लिबरल आर्टचा अंडरग्रॅज्युएट कोर्स करत आहे.
याच्या Interactive डिजिटल झिनची लिंक : https://heyzine.com/flip-book/27cc2e1651.html देत आहे. इथे तुम्ही अॅक्च्युअली पानं उलटून बघू शकता.
Insta चेक केले. गूड जॉब.
Insta चेक केले. गूड जॉब. लेकीला शुभेच्छा
मला आधी लारा म्हणजे लारा दत्ताचे एखादे फेशन मेगझिन की काय असे वाटलेले
मला आधी लारा म्हणजे लारा
मला आधी लारा म्हणजे लारा दत्ताचे एखादे फेशन मेगझिन की काय असे वाटलेले. >>> नशिब ब्रायन लारा नाही आठवला.
धन्यवाद ऋन्मेष.
मॅगझिन पाहिले. छान वाटले,
मॅगझिन पाहिले. छान वाटले, वाचले. शुभेच्छा आगामी शिक्षणास.
नशिब ब्रायन लारा नाही आठवला.
नशिब ब्रायन लारा नाही आठवला. Happy
मला मात्र तोच आठवला काय आहे ना सध्या वेस्ट इंडिज बरोबर मॅचेस चालू आहेत ना म्हणून वाटलं त्यासंदर्भात मत व्यक्त करत असेल। फ्लिप बुक बघितलं, मस्तच। LARA AGRAWAL ला अनेक शुभेच्छा .