Submitted by दत्तात्रय साळुंके on 4 August, 2023 - 00:05
बोलघेवडी कविता त्यांची
ऐकली रानाने तन्मयतेने
सुखदुःखात एकमेकाच्या
अनुभवले हसणे रडणे
चांदणं लदबदलेला जोंधळा
आज काळवंडून गेलाय
रुपेरी शंब्दांचा सौदागर
निशब्दता पेरुन गेलाय
पोटरीतला गहू ओंबीत
हसणं विसरलाय
साळीच्या रानाचाही
पिवळा बहर हिरमुसलाय
बोलघेवडी साळुंकी आज
एकाकी मूक जाहली
हिरव्या बोलीच्या शब्दांची
हिरवी ओल निमाली
पुन्हा हीच माती
होईल प्रसवती
हिरवे राघू हळूहळू
येतील रानावरती
त्या रानाच्या गंधाने
तुमचा जीव दरवळेल
रानातल्या केशर वाटेवर
पाऊल तुमचे वळेल
( भावपूर्ण श्रद्धांजली)
दत्तात्रय साळुंके
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कवीला कवीने वाहिल्रली
कवीला कवीने वाहिल्रली काव्यपूर्ण काव्य सुमनांजली!
सुमनांजली!
सुमनांजली!
वा! काव्यपूर्ण श्रद्धांजली.
वा! काव्यपूर्ण श्रद्धांजली.
दंडवत!!
दंडवत!!
श्रद्धांजलि. कविता
श्रद्धांजलि. कविता वाचलेल्या आहेत. अगदी रानाचा सुगंध. आता परत पुस्तके घेते.
कविता छान!
कविता छान!
भावपूर्ण श्रद्धांजली... महानोरांची बरीचशी गाणी मनाला गारुड घालून गेलीत .
एक महान कवि! फार वाईट वाटले!
एक महान कवि!
फार वाईट वाटले!