धर्म स्त्रीकडून ठेवत असलेल्या अपेक्षा आणि स्त्री आयुष्य

Submitted by राधानिशा on 28 July, 2023 - 11:57

बरंचसं कॉपी पेस्ट आहे , गुलमोहर हे योग्य सदर सिलेक्ट केलं आहे की नाही हेही समजत नाही . धागा दुसऱ्या सदरात कसा हलवायचा ते माहीत नाही . त्यामुळे नियमांच्या बाहेर पोस्ट झाली असल्यास धागा उडवला जाऊ नये ही विनंती .

स्त्रीजन्माची सार्थकता गृहव्यवस्था व शिशुसंगोपन यांतच आहे. आदर्श स्त्री तीच कीं, जी सुमाता व सुगृहिणी असते आणि याच तत्त्वावर स्त्रियांना जर्मनींत घराबाहेरच्या कोणत्याही धंद्यांत वा व्यवहारांत न पडण्याचे पाठ आज मिळत आहेत त्यांच्या नाजूक व प्रेमळ प्रकृतीला अपत्यसंगोपन, रुग्णपरिचर्या, यांसारखीं वत्सलतेचीं किंवा गृहव्यवस्था, पाकसिद्धि, शिक्षण, कशीदा, यांसारखीं लालित्यपूर्ण कामेंच योग्य. गृह हेंच त्यांचे कार्यक्षेत्र व सुगृहिणी बनणें हाच त्यांचा आदर्श... अशा प्रकारच्या ज्ञानानेंच आर्यमहिलांचा उद्धार होणार आहे. एवंगुणविशिष्ट स्त्रीरत्नें जेव्हां घराघराला शोभवितील, तेव्हांच घरोघर सुख, समाधान, संपन्नता, सुशीलता व स्वदेशाभिमान नांदू लागतील. "
-
स्त्रीशिक्षण सुधारणेचें दिग्दर्शन - या सदराखालीं 'सह्याद्रि' मासिक .

ऋग्वेदकालीन विवाहाची वयोमर्यादा कशी होती हैं सप्रमाण दर्शवून श्रीदत्तजन्माची एक सुंदर गोष्ट त्यांनी सांगितली आहे . ती पाहातां स्त्रियांचें वैवाहिक जीवन किती उच्च व पवित्र आहे, तसेंच ब्राह्मणांच्या मुलांना जशी मुंजीची आवश्यकता, तशीच स्त्रियांना विवाहाची आवश्यकता आहे, हेंही दिसून येतें. स्त्रियांना विवाहविधीच वैदिक संस्कार, पति सेवाच गुरुकुलवास व गृहकृत्येंच त्यांचें अग्निहोत्र असें मन्वादि स्मृतिकार म्हणतात ' यांत किती अर्थ भरला आहे, पवित्र अंतःकरणी स्त्रियाच जाणूं शकतील

यानंतर असवर्ण अथवा भिन्नवंशीय विवाहाबद्दल सुधारलेल्या जर्मन लोकांचं निषेधात्मक मत सांगून, हल्लींचें संततिनियमन किती राष्ट्रबलविघातक आहे हें सांगितलें आहे. 'समाजाचा चारी बाजूंनीं होत असलेला अधःपात धर्मवीर अशा आर्य महिलांनींच मनावर घेतल्यास बंद होईल ' अशी इच्छा प्रगट केलेली किती सत्य आहे हें तशा स्त्रियाच जाणूं शकतील.

संततिनियमनाच्या घातक चालीपासून लोकसंख्येवर व आरोग्यावरसुद्धां कसा भयंकर परिणाम होतो हें सप्रमाण दाखविण्याच्या उद्देशाने हल्लीं आस्ट्रिया देशांतील राजधानीच्या शहरीं एक जंगी प्रदर्शनही उघडण्यांत आल्याचें वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झालें आहे ! प्रथम त्या चालीच्या ' गुणाचा ' दुंदुंभी पश्चिम दिशेत वाजलेला आमच्या लोकांच्या कानीं पडला व ती चाल येथें सुरू झाली; तसा त्या चालीच्या दोषाचा ' दुंदुभीही कानीं पडला पाहिजे, म्हणजे मग आमचे लोक सावध होतील. पण तो केव्हां पडतो पाहावें !

आमच्या पूर्वजांनीं मानवी स्वभावाचा चांगला अभ्यास करूनच विवाहसंस्था सुरू केली आहे व त्या सर्वाना धर्माच्या दावणीत अशा रीतीनें गोवून टाकले आहे की मानवांना त्यायोगें 'भोगांतही मोक्ष' साधतां येईल ! पण आपल्या धर्माच्या आचारविचारांचं थोड्या दमानें मनन करतील तेव्हांच ना त्याच्या रहस्याचा प्रकाश होईल ! असो.

■■■
'उठा, चहा घेतां ना ? उठा.' म्हणत नर्सनं त्यांना उठवलं, तेव्हां त्यांना अगदी ओशाळल्यासारखं झालं.

'काय ग बाई तरी झोप !' म्हणत त्यांनीं रग कमरेपर्यंत बाजूला सारला आणि किंचित् उठण्याचा प्रयत्न केला. चहा फार चवदार होता. चहाबरोबर टोस्टही होता. त्या हळुहळू फराळ करीत होत्या आणि नर्स त्यांच्या शेजारीच बसून होती. त्यांचीं गेलीं तीन बाळंतपणं याच नर्सनं केली होती. दोघींनाहि एकमेकींविषयीं स्नेहभाव वाटत होता.

'माई, हीं दोन बाळंतपणं तुम्हांला बरींच जड गेलीं हो. फार थकला आहांत. असं बरं नाहीं. पहांटे तर शेवटी शेवटीं मी घाबरलेंच. म्हटलं, धडपणी बाई सुटते की नाहीं ! तुमच्या अंगांत ताकदच राहिलेली नाहीं. '

'गेल्या चार वर्षांत मला बरं नाहीच आहे. कधीं डॉक्टरकडे गेलं की म्हणतात, 'विश्रांती घ्या.' आपलं ऐकून घ्यायचं आणि सोडून द्यायचं. ' माई क्षीणपणानं हसल्या.
,
'आपल्या शरीराची काळजी आपणच घ्यायला पाहिजे, बाई ! माईंनी एक आवंढा गिळला; आणि त्या बराच वेळ स्तब्ध बसून राहिल्या.
दर महिना रुपये चाळीस अधिक म. भ. पंचवीस मिळवणाऱ्या एका प्राथमिक खाजगी शाळेतील शिक्षकाचा संसार माईंना लाभला होता. प्रथम त्याही नोकरी करीत होत्या. पण तीन मुलं होईपर्यंत त्यांची नोकरीची धडपड टिकून राहिली. चवथ्या खेपेला डोहाळे लागतांच त्यांनीं नोकरीचा राजिनामा दिला होता. आणि मास्तरांनीं आणखी दोन शिकवण्या पत्करल्या होत्या. त्यांच्या संसाराचं स्वरूप हे असं ओढाताणीचं होतं.

या ओढाताणीच्या जाणिवेनं माईंची जीभ ओढल्यासारखी झाली. कष्ट तर होतेच, पण आणखीहि पुष्कळ होतं. कष्टापेक्षाही तेच त्यांना कासावीस करून टाकत होतं. त्या हळुहळू बोलायला लागल्या. त्यांचा आवाज किंचित कापरा होता.

'ताई, कुणाचं शरीर अन काय ? ज्या दिवशीं हें शरीर दुसन्याच्या स्वाधीन केलं त्याच दिवशीं शरीराचा दगड व्हायला सुरवात झाली. आतां त्याला स्वतःचं सुख - इच्छा - वासना - कांहींच नाहीं. शुद्ध दगड झालं माहे. त्याची काय काळजी घ्यायची -'

'असं का म्हणतां ? मुलं लहान आहेत. एकच काळजी घ्या. आता पुन्हा-'

' - बाळंतपण नको, असंच ना ?' माई रुक्षपणानं हंसल्या.
त्यांचं हें सहावं बाळंतपण. ज्याला हें कळे तो हेटाळणीनं किंचित हसे. किती किती मुलं - किती मुलं ? छे माईंना तें भारी बोचायचं. पण - पण 'पण' कसा सुटणार ?

मुलं फार नसावीत हें त्यांना कळत नव्हतं असं थोडंच होतं ? पण कळूनही वळत नसणाऱ्या अशा गोष्टी असतातच कीं !

कालचींच सलणारी शल्यं, आणि उद्यांचे रोखलेले भाले; शरीराचे कष्ट आणि मनाचे शीण; नोकरीच्या याचना आणि संसारांतल्या विवंचना ;
-
साऱ्या गोष्टी माणसाला विसरायला हव्या असतात. क्षणभर त्या यांपासून दूर कुठं तरी विसावा हवा असतो. कुणी त्यासाठी दारूकडे ळतो, तसच कुणी - व्यसनी माणसाला व्यसनाची वाईट बाजू माहीत नसते असं थोडंच असतं ? पण माहीत असूनही त्याचा उपयोग काय होणार ? सारं कांहीं उगीचच. आणि म्हणूनच अगदीं कातर आवाजांत माई म्हणाल्या,

'ताई, कुणाला अन काय सांगायचं ? बाळंतपणाचा महिना जिथं अगदीं कसाबसा कोरा जातो- '

'बाई ग ! ' त्या नर्सच्या डोळ्यांत टचकन पाणी उभं राहिलं.

'पण मास्तर फार चांगले आहेत. त्यांची माझ्यावर माया नाहीं असं नाहीं. माझ्यासाठी त्यांचा जीव सारखा तुटत असतो. '

' हें त्याचंच लक्षण वाटतं ? '

'असं नाहीं हो. तेही माणूसच आहेत ना ? तुम्हाला सांगतें, जोंपर्यंत माझं मनही दगड बनलं नव्हतं, तोपर्यंत खूप प्रयत्न केले मी. पण व्हायचं काय ? सदा धुसफूस, चिडचीड, अबोला, असाच सारा दिवस - - कधीं त्यांनीं ताडकन् दार उघडून बाहेर निघून जावं, कधीं मी रागारागांत पोरांत येऊन झोपावं. काय फायदा त्याचा ? शेवटीं आतां मनाचाही दगड झाला आहे बघा. दगड, नुसता दगड ! जीव आहे इतकंच काय तें - '

नर्सनं डोळ्याला पदर लावला.

.....

असंच आपलं बाळ सदोदित लहान असावं आणि आपणही असंच सारख सारखं पडून रहावं. कुणी यावं, चहा द्यावा, कुणी ताट वाढून आणावं. जेवण तरी किती सुग्रास लिंबाचं लोणचं, लसणाची चटणी, भरपूर तूप, आणि वाफा येत असलेलं गरम गरम अन्न -

घरीं असं कुठे असणार ? नेहमींच अपुरं जेवण भाजी असेल तर आमटी नाहीं. तूप तर पहायलाही मिळत नाहीं. आणि कढत अन्न जेवण्याचं सुख - तें तरी कुठं मिळतं ? रोज मास्तरनां शाळेत पाठवायचं, मुलांचं आवरायचं, आणि मग पितळींत वाढून घ्यायचं. तोंवर भाताचे डिखळे आणि आमटीचं कोमट पाणी झालेलं असायचं. उजव्या डाव्या बाजूचं कालवण मुलांच्या तडाख्यांतून उरलं तर भाग्य ! पण इथं या जेवणांत त्यांना एक प्रकारची चैन वाटायची. चाखत माखत त्या जेवायच्या. चार घास अधिकही जायचे.

बाळ झोपलं कीं इतर खाटांकडून फेरी काढायची.
साऱ्याच बाळंतिणी वॉर्डातल्या आणि म्हणूनच समदुःखी .. कुणाचं चवथं, कुणाचं सातवं अशीं बाळंतपणं. त्यामुळं भेटीलाही सहसा कुणी यायचं नाहीं. कोपऱ्यातील खाटेवर एक पहिलटकरीण होती. तिचा नवरा रोज तीनदां यायचा. साऱ्या वाळंतिणी त्याच्याकडे पाहून कुत्सितपणानं हसायच्या. माईही आंवढा घोटून त्या चेष्टेंत सामील व्हायच्या. प्रत्येकीच्या घरचे अनुभव, बाळंतपणांतील खोडी, नवऱ्याचे स्वभाव चर्चेला निघायचे आणि या रसाळ गप्पांत वेळ कसा जायचा तें समजायचंही नाहीं.

रात्री अगदीं गाढ झोपावं. मूल दाईच्या स्वाधीन असायचं. रडेल बिडेल कांहीं काळजी नको. खरंच किती सुखाचे दिवस !
·
त्यामुळं दहाव्या दिवशीं रात्रीं माईंना उगीचच अस्वस्थ वाटायला लागलं. स्वतःच्या घरीं जायला मन घेईना .-

ते सारं घर - ती चूल - तें रेशन- तें धुणं तीं भांडीं मुलं- आजारपण नवऱ्याचा राग--सारं सारं भुतासारखं त्यांना भेडसावायला लागलं. मुलाला छातीशी घेऊन त्या स्वतःला विसरू पहायला लागल्या.

या रात्रीच्या शिणानं सकाळीं त्यांना जाग आली, त्या वेळी कमी येऊन तयार होती. आज अकरावा दिवस. आज त्यांना तिथं चहा मिळणार नव्हता. त्या मुकाट्यानं उठल्या.

तूं आलीस ?' आपले कपडे आवरत त्यांनी कमीला विचारलं.

'बाबा म्हणाले, मी घरांतलं करतों, तूं आईला आणायला जा, म्हणून आलें मी.'

तिच्या कडेवरील शरू हात पुढं करीत म्हणाली,

'आई, बाबा शिला कलतायत. '

माई उगीचच हसल्या.

त्यांनी मुलाला कपडे चढवायला सुरवात केली. तें दहा दिवसांचं सुख अजून त्यांच्या डोळ्यासमोरून हलत नव्हतं. मुलाला टोपरं घालतां घालतां त्यांच्या मनांत विचार आला,

'आतां आजपासून पुनः कष्ट - पुनः कामं - शरीरांत प्राण असेपर्यंत उभं रहायचं आणि -- आणि -- कसली तरी किळस त्यांच्या शरीरांत थरकांप उडवून गेली, पण लगेच खुदकन् त्या हसल्या. पुनः वर्षा सव्वा वर्षांनीं असा परत विसावा -- तें हसू त्यांना कोयनेलसारखं लागलं. त्यांनीं मुलाला बाळंत्यांत नीट गुंडाळलं, छातीशी धरलं, माथ्यावरून नीट पदर घेतला. सामानाचं गाठोडं कमीच्या हातांत दिलं. आणि समोर असलेल्या दाईच्या नर्सच्या हातावर चार आणे, आठ आणे ठेवीत त्या हळूहळू जिना उतरल्या. दाराशीं धमणी उभी होती. गाडीवानानं दार उघडतांच, मुलाला सावरत त्या हलकेच धमणींत चढल्या. पुनः घरी निघाल्या.,

इंदिरा संत - कथासंग्रह कदली .


"डॉक्टर, मला आजारी पडायचंय, औषध द्या. चांगली दीड-दोन महिने तरी अंथरुणावर पडले पाहिजे. "

"अगं, लोकांना आजारी पाडण्यासाठी का डॉक्टर असतात? आणि अंगावरून पांढरं जाणं, कंबरदुखी, अशक्तपणा या तक्रारी आहेतच तुझ्या. आणखी आजारी पडून अंथरुणावर खिळलीस तर मुलांना, नवऱ्याला जेवायला कोण घालेल ?"

"खाऊन खाऊनच नवरा माजतो अन् छळतो मग-"

नवरा छळतो म्हणजे काय याचा उलगडा मला लगेच होईना. कारण ही बाई माझी जुनी पेशंट. दोन मुलं झाल्यावर तिने संतती - प्रतिबंधक शस्त्रक्रियासुद्धा करून घेतली होती. नवरा एक फॅक्टरी कामगार, मिळकत बऱ्यापैकी, आणि निर्व्यसनी होता.

"दारू पिऊन त्रास द्यायला लागला की काय तुझा नवरा ! कधी बोलली नाहीस तू याआधी ?”

" व्यसन वगैरे काही नाही हो. आता कसं सांगावं तुम्हाला ? अहो, त्यांना रोज संबंध लागतो. कधी कधी रात्रीतून दोन-दोन वेळासुद्धा माझं मढं जागं करतात. नको म्हटलं तरी ऐकत नाहीत. हा छळवाद नाहीतर काय?"

ही बाई तशी जेमतेम दुसरी-तिसरी शिकलेली. लग्न लवकर झालं होतं. आता एकोणतीस-तीस वर्षांची असेल. अजाणतेपणे तिने लैंगिक मार्गदर्शन या विषयाला हात घातला. नवऱ्याला याबद्दल काही बोलली आहे का ते मी विचारलं. नवऱ्याजवळ तिने विषय काढल्यावर त्याने तिला उडवून लावलं होतं.

नुसतं गप्प पडून राहण्यात तुला कसला त्रास होतो असंच त्याने विचारलं.

"बाकी काही त्रास देत नाहीत हो. फॅक्टरी सुटली की सरळ घरीच येतात. खाणं पिणं, कपडालत्ता कशालाही कमी करत नाहीत. पण हा त्रास सहन होत नाही मला. पाळीचे चार दिवस सुद्धा कटकट करतात. रोज विचारतात, थांबलं का नाही? आता ते काय माझ्या हातातलं आहे का?"

बाईच्या नवऱ्याला मी बोलावून घेतलं. तुमच्या बायकोची इच्छा लक्षात न घेता तुम्ही रोज समागम करता त्यामुळे तिला अंगावरून पांढरं वगैरे त्रास होतो, हे मी त्याला समजावून सांगितलं.
नवऱ्याचं उत्तर वेगळंच,

"मला नाही तसं वाटत. संबंध करतो म्हणजे काय मारपीट करतो का? लग्नाला पंधरा वर्षं तर झाली. माझं काय वय झालं का? संबंध रोज करायची इच्छा होते मला, अन् होणारच, त्यात काय पाप आहे का? हक्काची बायको आहे, का बाहेर जातोय कुठे मी? तिच्या त्रासावर तुम्ही औषधं देतच आहात आणि बाईच्या इच्छेचा प्रश्न येतोच कुठे? पुरुषाच्या उत्तेजनांवर सगळं अवलंबून आहे. वेश्या धंदा कोणासाठी करतात, पुरुषांसाठीच ना?" असा प्रश्न विचारून त्याने मोठ्या दिमाखात हास्य केलं.

स्त्री-पुरुष संबंध, स्त्रीची इच्छा, समाधान, त्यातला आनंद याबद्दल मी त्याला मार्गदर्शन केलं, पण तो ते काही पटवून घेत नव्हता. अन् वर म्हणाला,

" इतर, अगदी सुंदर, शिकलेल्या, मोठ्या पगाराची नोकरी करणाऱ्या बायकांचं असेल तुम्ही म्हणता तसं कामेच्छा वगैरे पण माझ्या बायकोचं तसं काही नाही. मला माहीत आहे तिचा स्वभाव पहिल्यापासून. दुसरा काही घरात त्रास नाही. मी दारू पीत नाही. आता एवढीही स्वतःची हौस करू नये का माणसानं ?"
आता याला काही शिकवण्यात अर्थ नव्हता. तेव्हा याच्या बायकोलाच शिकवलं पाहिजे, असं मी मनाशी ठरवलं.

- डॉ लीना मोहाडीकर - कामविश्व संसारिकांचे



" स्त्रियांमध्ये सती, पतिप्रेमिका, साध्वी आणि पतिव्रता अशा चार पाय-या आहेत.

( १ ) केवळ स्वपतीवरच ज्यांची निश्चल प्रीति असते, अर्थात् ज्या कुवर्तनी नव्हेत, त्यांना सती म्हणावें. पण अशा सर्व सतींना पतिप्रेम पूर्णपणे जिंकता येतें असें नाहीं.

( २ ) सतीप्रमाणे शरीराचें व मनाचें पावित्र्य राखतातच, शिवाय बुद्धीच्या चतुराईनं ज्या स्त्रिया पतीचं चित्त नेहमी प्रसन्न राखूं शकतात, त्या 'पतिप्रेमिका'
समजाव्या.

( ३ ) सतीत्व व प्रतिप्रेमिकत्व असले म्हणजे तेवढ्यानं साध्वीत्व येतं असें नाहीं. ( ' साधु ' शब्दाचें स्त्रीलिंगी रूप ' साध्वी' होय. ) व्यवहारांत एखादा मनुष्य नीतिमान् व सज्जन असला तरी तेवढ्याने त्यास साधु म्हणतां येणार नाहीं. सज्जनपणा + कडक उपासना + भूतदया + तितिक्षा + परोपकार + परमार्थाभ्यास, इत्यादि मिळून साधुत्व. त्याप्रामाणें सतीत्व + पतिप्रेमिकत्व + वरील गुण, मिळून 'साध्वीत्व ' येतें.

( ४ ) सती, पतिप्रेमिका व साध्वी या तिघींच्या गुणसमुच्चयानेंच केवळ पतिव्रता पदवी प्राप्त होऊं शकणार नाहीं ; तर वरील तीनही गुण + पतिदेहावर व पतिजीवावर ईश्वरबुद्धीची अचल धारणा धरणारीच ' पतिव्रता ' पदवीस पात्र होऊं शकते. पतीशिवाय दुसरें व्रतच जिला माहीत नाहीं, तीच पतिव्रता ('पतिरेव व्रतं यस्या अखंडा सा पतिव्रता ' ) होय. पतिस्वरूपावर याप्रमाणे जिची वृत्तीची अखंड धारा .

- धर्मग्रंथ .

 एक दमयंतीचा अपवाद सोडला, तर पुराण काळापासून प्रथेप्रमाणे एकदा लग्न करून मुलगी सासरघरी गेली की, तिचा माहेरचा 'शेर' संपला. कधी माहेरपणाला आली, तर चार दिवसांचे कौतुक. बाकी त्रास होत असेल तरी सहन करून मन मारून तिथेच तिने राहावे.
तेव्हापासून ते आजघडीला विज्ञानयुगातसुद्धा काही फारसा फेरफार झालेला नाही. परवाच एका स्त्रीची कथा ऐकली आणि थक्क झाले.

बाई चुणचुणीत, एस. एस. सी. पर्यंत शिकलेली, टायपिंग येत होते. पार्टटाईम नोकरी करायची. सगळ्या गोष्टीत अतिशय हौस होती आणि थोडक्या पैशात नीटनेटका संसार चालवत आनंदी राहत होती. नवरा शेतीच्या कामाकरता गावी गेला होता. घरी आल्यावर बायकोला दिवस राहिलेले बघून त्याचे डोकेच फिरले. “हे मूल माझे नाही” म्हणू लागला. बायकोला घराबाहेर काढले. माहेरी नेऊन घातले. माहेरच्यांनी चार दिवस 'माहेरपण' करून तिला परत नवऱ्याकडे आणून सोडले. त्याने घराबाहेर काढले. दार लावून घेतले.

शेवटी बाईची मैत्रीण तिला घेऊन नवऱ्याकडे आली. वारंवार पटवून दिले की, तिला दिवस आधीच राहिले असले पाहिजेत. त्याची समजूत पटेना. शेवटी नेहमीच्या डॉक्टरीणबाईंकडे सर्वजण गेले. डॉक्टरीणबाईंनी दिवस मोजून सोनोग्राफी करवून घेऊन सर्व तऱ्हांनी त्याची समजूत पटवली. हे मूल आपलंच असल्याची त्याची खात्री पटली. बाईला त्याने 'उदार अंत:करणाने' घरात घेतले. आता बाई बदलूनच गेल्यात.

आधी त्याने भरपूर शिवीगाळ केली होती व पोटात एवढ्या लाथा घातल्या होत्या की, ते मूल पोटात राहिलेच नाही. गर्भपात झाला. आता बाईंचे आनंदी असणे, खळखळून हसणे, गप्पा मारणे, फुलांचे गजरे वगैरे घालणे, थोडक्यात का होईना, कपड्यांची, भांड्यांची, घर सजावटीची हौस करणे सगळे बंदच झाले आहे. जर माहेरच्यांनी थोडे पाठबळ दिले असते, जावयाला बोलवून समजावले असते, जरूर तर कानउघाडणी केली असती, तर आज जे बाईचे आयुष्य पार विसकटून गेले आहे ते गेले नसते .

- माधवी कुंटे - स्त्रीसूक्त


नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय नोटाबंदीनंतर देशभरात एक गोष्ट सारखीच पाहण्यात आली . घराघरातून बाहेर नोकरी न करणाऱ्या , घरातच कष्ट उपसणाऱ्या आणि त्याचे नगद मोल न मिळणाऱ्या बायकांनी डब्याडुब्यांतून नवऱ्याच्या चोरून काही रोख पैसे साठवले होते .

किती विविध कारणं असतात हे असे चोरून पैसे साठवण्यासाठी... घरातील अडीअडचणीच्या वेळी कामी यावेत म्हणून, सणासुदीला पोराबाळांना काही चीजवस्तू घेता यावी म्हणून , माहेरचे पाहुणे आले तर त्यांच्या स्वागतासाठी कदाचित् दमडा मिळणार नाही म्हणून लाज झाकण्यापुरते आतिथ्य करता यावे म्हणून , मासिक पाळीसाठी पॅड्स विकत घेता यावीत म्हणून, आतल्या कपड्यांसाठी पैसे द्यायला नवरा रडवतो आणि घरात सांगायची लाज वाटते म्हणून... कल्पनाही करवणार नाही असली कारणं असतात बायांनी चोरून पैसे साठवण्याची.

नोटाबंदीनंतर अनेक बायकांकडे पाचशे हजारच्या नोटा साठवलेल्या पैशात होत्या. दोनतीन हजार रुपयांपेक्षाही कमी रक्कम... मोलाची बचत बिनमोलाची होऊ नये म्हणून या सगळ्या बायांनी साठवलेले पैसे नवऱ्यांकडे दिले- नोटा बदलून आणायला- कारण बँकेत जाणं हे अजूनही फक्त पुरुषांनीच करायचं असतं. बऱ्याच जणींना पैसे `बाजूला टाकल्याबद्दल चोरीचा आरोप ठेवून नवऱ्यांनी मारहाण केली. शिव्या दिल्या. पैसे बदलून आणल्यानंतर ते पैसे नवऱ्यांनीच खिशात घातले. आणि नंतर कोणत्याही प्रकारे रोख हातात देणे बंद केले.

मध्य प्रदेशमधील ऍक्शन एड संस्थेच्या वन स्टॉप ऍक्शन सेंटरने एक पाहाणी केली, त्यातून त्या राज्यातील हकीकती अहवाल रुपात आल्या आहेत . नऊ नोव्हेंबरला एका चोवीस वर्षाच्या बाईला- तिच्या चार पोरांसकट नवऱ्याने घराबाहेर काढले - कारण तिच्याकडे चार हजार पाचशे रुपये निघाले. दुसऱ्या एका आईने आपल्या तेरा वर्षाच्या मुलीच्या इन्सुलिनसाठी चोरून पैसे बाजूला टाकले होते . नवरोबांनी तिला मारमारून मुलीसकट बाहेर काढले .

आज स्त्रीला एका धार्मिक थेरड्याने सामग्री म्हटले म्हणून वातावरण जरासे हिंदकळले. पेटूनबिटून काही उठत नसतो आपण. त्याने ते बोलणे चूकच होते . पण त्याने फक्त जे घडते ते निर्लज्जपणे बोलून दाखवले एवढाच काय तो दोष .

नाहीतर भारताच्या शहरांत परिस्थिती जरा बदललेली असली तरी गावखेड्यांतून अजूनही हाच दृष्टीकोन आहे. प्रश्न असा आहे... या सामग्री तर सामग्रीचीही काळजी घेत नाहीत त्या सामग्रीचे तथाकथित रक्षक.

अशाच शिबिरातली एक लेक मला भेटायला लपून छपून आली. आणि रडत रडत सांगू लागली - ताई मला ना त्या वाटेने नुसतं दह्यासारखा पांढरं बाहेर येतं. आणि खाज तरी इतकी उठते की जाऊन जीव द्यावा वाटतं हो. विचारल्यावर सांगितलं की दुसऱ्या गावातला डॉक्टर पुरुष आहे- त्याच्याकडे जायचं नाही म्हणून बंदी केलीय. काय मला दाखवायचं ते त्याला दाखवणार काय म्हणतो नि शिव्या घालतो . आणि तालुक्याच्या गावी लेडी डॉक्टर आहे तिच्याकडे जायला त्याला वेळ नाही. मी करू तरी काय...

बायकोवर परपुरुषाची नजर पडू नये- आपल्या सामग्रीवर कुणाची नजर पडू नये हे मुख्य. मग त्या सामग्रीला वाळवी लागून ती कुरतडली गेली तरी बेहत्तर. ही वृत्ती भारतात रुजलेल्या सर्वच धर्मांच्या चौकटीतून पावन होते आहे. प्राचीन हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म, शीख धर्म आणि ख्रिस्ती, इस्लाम, ज्यू- सर्वांनाच स्त्रीचे दुय्यमत्व सोयीचे पडते.

एका संपूर्ण समूहाला मालमत्ताच ठरवले की त्याचा मालमत्तेवरचा हक्कच संपतो. कायद्याच्या दृष्टीने सर्वात विकसित अशा इंग्लंडनेही तीच चलाखी केली होती. '

घरात शिजवलेलं काय खावं, किती खावं, आपल्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी काय करावं याची सत्ता आजही आपल्यातील करोडो स्त्रियांना नाही हे सत्य आहे.
***

मुग्धा कर्णिक - शब्दांचीच वस्त्रे धैर्यास माझ्या .

हे सगळं कॉपी पेस्ट झालं . आता मला काय वाटतं ते .. पतिसेवा , पतिव्रता वगैरेवर लिहिताना न थकणारे जुने जुने धर्मग्रंथ लेखक आणि एवढं लिहिण्याची वाङ्ममयीन क्षमता नसलेले पण मनातून त्याच अपेक्षा बाळगणारे असंख्य सामान्य पुरुष यांना उलटं टांगून ओल्या मिरचीची धुरी आणि चाबकाचे फटके कोणीतरी देण्याची गरज आहे .

एका वादग्रस्त ग्रंथाच्या एका प्रतीत बायकोने नवऱ्याच्या ताटातलं उरलेलं ( उरलं तर ) अन्न खावं इथपासून बरेच नियम सांगितले होते , ती सेव्ह केलेली पानं आज कुठे सापडली नाहीत म्हणून त्यातला मजकूर इथे पेस्ट केलेला नाही .

एकूण मजकूर आठवता त्या लेखकाचा स्त्री हे अन्न पाण्यावर चालणारं शरीर नाही , ते निव्वळ हवा आणि पाणी भक्षण करून कामाचे रगाडेच्या रगाडे उपसण्याची आणि अखंड प्रसन्न वृत्ती , गोड भाषण , शयनेषू रंभा वगैरे होण्याची दिव्य शक्ती प्राप्त असलेलं , मन भावना वगैरे नसलेलं यंत्र आहे , असा समज असावा .

उलटं टांगून मिरचीची धुरी ही शिक्षा म्हटली खरी पण ती या सगळ्या लोकांसाठी फारच सौम्य आहे .

स्त्रीदेहात जन्म घेऊन वरच्या लेखांमध्ये असलेले अत्याचार आणि असंख्य प्रकारचे आणखी अत्याचार ( लैंगिक शोषण , बलात्कार वगैरे वगैरे ) हे फर्स्ट हँड अनुभवणं हीच शिक्षा यांना योग्य आहे . परमेश्वर ती देत असेल अशी आशा आहे .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

याहीपेक्षा जास्त, सो कॉल्ड धार्मिक राईट विंगर स्त्रिया, ज्या या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देत राहतात, त्यांना चाबकाचे फटके मारायची गरज आहे.>>>>>>>>
हे झाले याचे दिव्य विचार !
आणि याचा मित्र म्हणजे माबो वरील प्रसिद्ध फेमिनिस्ट दिवसा ढवळ्या म्हणतो संघी पुरुषच नाही पण बायका सुद्धा sexually frustrated असतात .

मणीपूर , संघ वगैरे राजकिय बाबी इथे आल्या नसत्या तर चाललं असतं . कारण जरी धाग्यात धर्म हा उल्लेख आहे आणि हिंदू धर्मग्रंथांमधलेच पॅरा आहेत तरी त्या धर्माचा अर्थ फक्त हिंदू धर्म , राजकीय दृष्टीने हिंदू धर्म नसून एकूणच सगळे धर्म असा आहे

आणि हे वेगवेगळे धर्म त्या त्या धर्मातल्या ( आआपल्या ) स्त्रियांवर करत असलेले कौटुंबिक अन्याय आणि अत्याचार हा विचार धाग्यात स्पष्ट झाला आहे .

धर्माचा वापर करून एका धर्माच्या स्त्रिया दुसऱ्या धर्माच्या स्त्रियांवर करणारे अत्याचार हा विषय कितीही दाहक आणि दुःखदायक असला तरी तो या ठिकाणी आणणं हे बरोबर नव्हतं असं वाटतं . कारण ती गोष्ट संपूर्ण वेगळ्या विषयाच्या अखत्यारीत येते - ती म्हणजे एका धर्माचे लोक दुसऱ्या धर्माच्या लोकांवर करत असलेले अत्याचार . तो विषय एवढाच गंभीर असला तरी वेगळा आणि फार मोठी व्याप्ती असलेला आहे , त्यावर चर्चा व्हावी असं वाटत असेल तर ती स्वतंत्रपणे व्हायला हवी . त्यासाठी ज्यांना त्यातलं ज्ञान , त्याबद्दल पोटतिडिक आहे त्यांनी जरूर वेगळा धागा काढावा , जेणेकरून चांगली चर्चा होऊ शकेल .

एका धर्माचे लोक दुसऱ्या धर्माच्या लोकांवर करत असलेले अत्याचार .
<<
तो वेगळा विषय आहे.

प्रत्येक धर्मातले "उजवे" आपल्याच धर्मातील स्त्रीयांवर अत्याचार करीत असतात, अन त्याला मोठ्या प्रमाणावर स्त्रीवर्ग समर्थन देत असतो. कोणत्याही भोंदू बाबाच्या/इव्हांजेलिस्ट प्रिस्टच्या 'सत्संगा'ला कळपाने गर्दी करणारा वर्ग प्रामुख्याने स्त्री असतो.

ब्रिजभूषण नावाच्या प्राण्याला समर्थन देतानाचा एका स्त्री समर्थकाचा व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल होता. "जर ब्रिजभूषणवरचे आरोप खरे असतील तर ते आम्हाला रात्री का नाही बोलवत? कुस्तीगीरांपेक्षा जास्त सुस्वरूप आहोत" असले निर्लज्ज वक्तव्य त्या बाईने केलेले होते. हे अत्याचाराचे समर्थन नाही?

हे चौफेर ढळढळीत दिसणारे सत्य जर दुर्लक्षित करायचेच असेल, तर करत रहा. मग असल्या धाग्यांचा उपयोग समविचारी एकोचेंबरमधे माना डोलावण्यापलिकडे काहीही नाही.

समाजकारण अन राजकारण या एकाच नाण्याच्या बाजू आहेत. इथे राजकारण नको, असे म्हणणे म्हणजे..

राजकारण , तुम्हाला नापसंत , पसंत असलेले पक्ष , उजवे डावे हे सगळं गेल्या 70 -75 वर्षातले आहेत . आणि स्त्रियांवरचे अत्याचार , अन्याय शेकडो किंवा काही हजार वर्षं जुने आहेत . तुम्हाला खटकणाऱ्या गोष्टी ही आजाराची लक्षणं आहेत , आजाराची कारणं नाहीत . लक्षणांवर उपाय केले जात नाही , करताही येत नाहीत . कारणांच्या मुळात गेल्यावर आणि आजार कोणता आहे हे नीट समजून घेतल्यानंतरच पुढे उपचार शक्य असतात , आधी तो आजार आहे हे समजणं , मान्य करणं ही पहिली पायरी असते . अनेक स्त्रियांना इतिहासकालापासून हे अत्याचार होत आहेत याची माहिती नाही , आपल्यासोबत घडत असलेली एखादी गोष्ट ही अन्याय / अत्याचार यात मोडते हेही काहीवेळा समजत नाही . इतर स्त्रियांसोबत घडत असलेली एखादी गोष्ट ही फार प्राचीन छळाच्या परंपरेतून घडत आहे , रँडम - स्वतंत्र घटना नाही , याची कल्पना नसते . स्त्रीजीवनाचा इतिहास पुन्हा एकदा दिसेल किंवा लांबून काढलेल्या फोटोत ज्याप्रमाणे सर्व स्पष्ट दिसतं त्याप्रमाणे मागच्या आणि आताच्या परिस्थितीची एक कल्पना येईल - त्यासाठी असे लेख आवश्यक असतात . हे माझं मत आहे .

प्रत्येक गोष्टीचा राजकिय घटनांशी संबंध जोडण्यात अर्थ नाही , त्यावर स्वतंत्रपणे केव्हाही वेगळी चर्चा करता येते , ती अखंड सगळीकडे चालूच असते .

अनेक स्त्रियांना इतिहासकालापासून हे अत्याचार होत आहेत याची माहिती नाही , आपल्यासोबत घडत असलेली एखादी गोष्ट ही अन्याय / अत्याचार यात मोडते हेही काहीवेळा समजत नाही . इतर स्त्रियांसोबत घडत असलेली एखादी गोष्ट ही फार प्राचीन छळाच्या परंपरेतून घडत आहे , रँडम - स्वतंत्र घटना नाही , याची कल्पना नसते
<<

संपूर्ण सहमत.

यामुळेच स्त्री वर होणारे पुरुषी अत्याचार हे स्वयंभू/आयसोलेटेड घटना नसून, एका परंपरेतून होत आहेत हे जर मान्य केले, तर या परंपरा मोडण्यासाठी फक्त पुरुषांचे प्रबोधन पुरेसे नाही, या प्रकारांना जाणता/अजाणता उत्तेजन देणार्‍या स्त्रीयांनाही प्रबोधनाची गरज आहे, हा मुद्दा मी मुळात मांडला.

त्याच्या समर्थनासाठी ताज्या घडलेल्या घटनांचे उदाहरण दिले.

I have said what I wanted to say.

शुभेच्छा!

Radha Nisha.

तुमच्या पोस्ट मधील धर्म हा शब्द बाजूला ठेवू, आणि फक्त स्त्री वर अत्याचार आणि राज दंड इतकाच मर्यादित विषया चा आवाका ठेवूया त्या साठी काही उदाहरणे
१) पारथी ही जमात गुन्हेगार वृत्तीची असते असा ठप्पा ब्रिटिश सरकार पासून आत्ता पर्यंत राजसत्ता आणि समाज ह्यांनी मारला आहे.
सर्व च पारधी गुन्हेगार असतात का?.
पण त्यांना अटक होते काही गुन्हा घडला की.
२) मुस्लिम हे देशद्रोही आणि अतिरेकी वृत्ती चेच असतात.
हा पण ठप्पा सरकार आणि लोकांनी मारला आहे
पण सर्व च मुस्लिम अतिरेकी असतात का?
पण अशी घटना घडली की पहिले मुस्लिम हेच संशयित असतात आणि त्यांना अटक होते.
३) ऑफिस ,घर ह्या मध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये .
एकदम खालच्या पोस्ट वर काम करणारे .
झाडू वाले,शिपाई, वॉचमन ही मंडळी चोर च असतात.
ऑफिस,घर इथे चोरी झाली की पहिले संशयित हीच लोक असतात.
पण ही सर्व च मंडळी चोर असतात का?
पण त्यांचे कोणी ऐकून घेते का?
तर नहीं
ही काही मोजकीच उद्दहरणे दिली आहेत
अशी खूप आहेत
ती स्फोटक आहेत म्हणून देत नाही.
गुन्हेगार हाच असला पाहिजे हा पूर्वग्रह पहिला बाजूला केला तर च संतुलित कायदे निर्माण होतात,संतुलित विचार लोक करतात.
आता स्त्री पुरुष ह्या संबंध विषयी.
स्त्री वादी लोक स्त्री वर पुरुषांचा अत्याचार हा विषय काढतात तेव्हा त्यांच्या डोक्यात एक च नात असते.
तरुण कपल्स.
पण स्त्री पुरुषात हे एकच नात आहे का?
आई,बहीण,सासू,मावशी,chulathi,वहिनी , मैत्रीण ,प्रेयसी अनेक नाती आहेत.
विवाहित स्त्री वर तिच्या सासरच्या घरी अन्याय अत्याचार होतो त्या मध्ये फक्त पुरुष असतात का?
तर नाही.
सासू, नणंद ह्या स्त्रिया नेहमी खलनायिका असतात.
म्हणजे कथित vअत्याचार करण्या मध्ये स्त्री असतेच.
पती पत्नी नाते .
संपत्ती मध्ये अर्धा हिस्सा पत्नी च असतो.
घटस्फोट झाला तर पोडगी म्हणून रक्कम पुरुषाला च द्यावी लागते.
Fir झाला की काहीच ऐकून न घेता नवरा म्हणजे पुरुषाला अटक होते
त्याचे काहीच ऐकून घेतले जात नाही.
पण खरेच अत्याचार प्रतेक घरात होत असतो का?
Sextortion च्या अनेक घटना देशात घडतं आहेत.
ते एक पैसे कमविणे ह्या साठी वापरला जाणार सोप मार्ग आहे.
सर्वच घटनेत असा गुन्हा पुरुषानं कडून घडलेला असतो का?
Jasa आरोप केला जातो.
तर नाही..
कित्येक सभ्य पुरुषांनी चुकीचे आरोप आणि पुरुषानं बाजूच मांडून न देण्याची कायद्यातील तरतूद ह्या मुळे आत्महत्या केक्ता आहेत.
त्याच्या कडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
घरकुती हिंसाचार वर आधारित आशा च एक तर्भो कायद्या मुळे निरपराध पुरुष च नाही तर ..
सासू नावाची स्त्री वर पण अन्याय झालेल्या अनेक घटना आहेत
त्या नाकारू नका.
माझ्या पहिल्या पोस्ट चा ..हे सर्व विचारत घेवून अर्थ काढा.
माझे मत तुम्हाला पटेल..
आंधळे कायदे बिलकुल नकोत.
कोणावर च अगोदर गुन्हेगार म्हणून ठप्पा नको
सर्वांना त्याची बाजू मांडण्याचा पूर्ण हक्क हवा .
आणि त्या नंतर च अटक.
अनेक समाज घटक हे शोषीत च असे समजून अनेक एक तर्भी कैदेत आहेत.
स्त्री ही नेहमीच शोधीत असते असे समजून अनेक एकर तर्भि कायदे आहेत
पण अत्याचार थांबले आहेत का?.
देशात रोज किती तरी घटना अत्याचार च्या घडतात .
ज्या गुन्ह्याला १० वर्ष पेक्षा जास्त आणि फाशी पण शिक्षा आहे.
कारण एकच .
गुन्हेगार वृत्तीच्या लोकांना ( हया मध्ये स्त्री ,पुरुष दोन्ही आले)बाजूला काढून फक्त त्यांना शिक्षा देत च नाही.
हेच गुन्हेगार असा ठप्पा आपण मारून ठेवला आहे त्या मुळे ही चूक घडते

स्त्री वर अत्याचार करणारे सराईत गुन्हेगार (स्त्री ,पुरुष दोन्ही)
ह्या बाकी समजपडून वेगळं करून जगातील सर्वात कठोर शिक्षा देण्यात यावी .
सर्व समाज,अगदी पुरुष पण त्याला पूर्ण पाठिंबा देतील.
पण स्त्री वर अत्याचार हातात होतात त्याला पूर्ण जबाबदार पुरुष च असतात.
आणि काहीच विचार न करता त्यांच्या वर कारवाई केली पाहिजेच .
अशा कोणत्याही विचाराचे,कायद्याचे .
मी तरी समर्थन बिलकुल करणार नाही

१३ लाख महिला आणि मुली मागच्या तिन वर्षात (२०१९-२०-२१) देशभरातून बेपत्ता झालेल्या आहेत असे मंत्र्यांनी लोकसभेत सांगितले.
यात सगळ्यांच बेपत्ता घटनांच्या नोंदी झाल्या नसतील तरी पण आकडा मोठा आहे.

https://www.ndtv.com/india-news/over-13-lakh-girls-women-went-missing-be...

उदय साहेब.
दुवा पण देवू शकतो..
पण किती तरी male child, आणि पुरुष भारतात बेपत्ता झले आहेत
हे आकडे पण खूप मोठे आहेत...
लिंग विरहित,धर्म विरहित ,जात विरहित .
विचार आणि कायदे च हवेत. .तर च प्रश्न सुटेल.
लिंग नुसार,धर्मा नुसार,जाती नुसार.
कोणावर गुन्हेगार हाच असेल असा ठप्पा मारला तर .
प्रश्न कधीच सुटणार नाहीत.
किडनी खराब झाली तर .
लिव्हर, हार्ट पण खराब होवू शकते..कारण ते सर्व अवयव शरीराचे हिस्सा आहेत.
त्या नुसार समाजात पण एक घटक खराब झाला तर सर्व system बिघडू शकते ..
त्या मुळे पूर्व ग्रह सोडलेच पाहिजेत

लेख वाचून मला एक च वाटते खरा गुन्हेगार असेल त्याला अत्यंत कडक शिक्षा ध्या मग तो कोणी ही असू .बिलकुल दयामाया न दाखवता
मग
स्त्री असू किंवा पुरुष.

श्रीमंत लोक,गुंड,राजकारणी, प्रतिष्ठित लोक,पुरुष ,स्त्रिया, सरकारी नोकर, .
पोलिस अधिकारी .
सर्वांना समान न्याय देण्यात अडचण निर्माण करत असतील तर तो त्या कायद्याचा दोष नाही
अधिकार वर ,सत्तेत असणाऱ्या लोकांचा दोष आहे .
अधिकारात, सत्तेत असणारी लोक जो पर्यंत योग्य दर्जा ची,लायकीची असणार असणार नाहीत.
तो पर्यंत कसलेही कायदे करा..
कमजोर,गरीब, हाच वर्ग शोषीत असणार .

राधानिशा तुमचा धागा काढण्याचा उद्देश तुम्ही कितिही पोटतिडकिने स्पष्ट केलात तरी दुर्दैवाने जायच्या त्याच वळणावर जाणार आहे.

धर्म जरूर तात्पुरता बाजूला ठेवू .

When my ex husband broke my nose All the police officer said was "do you really want to prosecute the father of your child ? "

ही एका युरोपीय देशातील स्त्रीची तिथल्या एका पोलीस स्टेशनमधील अनुभव सांगणारी कमेंट आहे . तेव्हा भारतात पोलीस तक्रार झाली की काहीच ऐकून न घेता नवरा म्हणजे पुरुषाला अटक होते - एवढे सुवर्णमयी दिवस अजून इथे आलेले नाहीत .

एक उदाहरण - गरीब किंवा कनिष्ठमध्यमवर्गीय थरातील नाही - सुशिक्षित , मध्यमवर्गीय कुटुंबातील - बाहेरच्या जगासमोर सुखी दाम्पत्यजीवनाचं नाटक , नवरा रोज दारू पिऊन बायकोला सिगरेट चटके देणे वगैरे विकृत खेळ करून नंतर लैंगिक अत्याचार करी . 15 वर्षे त्या बाईने मुकाट्याने सहन केलं आणि एक दिवस तिच्या अंगात अचानक कालीमाता संचारली , डोकं सणकलं , नवऱ्याला झोडपलं आणि पोलिसात गेली . पोलिसांनी काय केलं असेल ? तिची समजूत काढली आणि तिला नांदायला घरी परत पाठवलं .

का ? इतकी वर्षं मुकाट्याने सहन केलं याचा अर्थ बाईला माहेर किंवा स्वकमाई अशी कोणतीही सपोर्ट सिस्टीम नाही . कोर्टकचेरी करायची वेळ आली तर नवऱ्याकडे आर्थिक ताकद आहे , हिच्याकडे नाही आणि कोणी पाठबळ देणारेही नाहीत . वकील करायला हक्काचे पैसे नाहीत . पोलिसांनी मदत करावी म्हटलं तर अशा मारझोडीच्या असंख्य तक्रारी येत असतात , सगळ्या बायकांना कोर्ट कचेरीसाठी मदत करणं पोलीस खात्याला अशक्य आहे . म्हणून त्यातल्या त्यात तिच्या हिताचा पर्याय ( त्यांच्या मते ) म्हणजे ऍडजस्टमेंट करून नवऱ्यासोबत नांदणं .

दुसरी एक बाई नवरा मारहाण करतो आणि जीवे मारण्याची धमकी देतो ही तक्रार घेऊन पोलिसात गेली असता , तिच्या नवऱ्याच्या मुसक्या बांधून त्याला स्टेशनमध्ये आणण्याऐवजी , तिची समजूत घालून तिला परत पाठवलं गेलं , बायकोशी चांगलं वागावं असा उपदेश नवऱ्याला करण्यासाठी एक लेडी कॉन्स्टेबल बायकोसोबत पाठवली गेली , त्या लेडी पोलिसावर त्याने शस्त्राने हल्ला करून जखमी केलं , त्यावेळी बहुतेक पोलिसांची तो बायकोला देत असलेल्या धमक्या पोकळ नसल्याची खात्री पटली असावी .

असा माथेफिरू एखादाच असतो . पण पोलीस खातं आधार नसलेल्या , कोर्टकचेरीची आर्थिक व इतर ताकद नसलेल्या बायकांच्या बाबतीत कोणती भूमिका घेतं याविषयीचे तुमचे गैरसमज दूर व्हावेत म्हणून ही उदाहरणं दिली आहेत .

एफआयआर , घटस्फोट , पोटगी हे सगळं माहेरचा किंवा अन्य भक्कम आधार असलेल्या स्त्रियांनाच शक्य होतं .

मुलगी घटस्फोट घेऊन परत येईल मग तिला मिळालेल्या वन टाईम सेटलमेंट मध्ये किंवा दर महिन्याच्या पोटगीमध्ये आपण मजेत गुजराण करू असा भिकारडा विचार करून तिचं लग्न लावून देणारी मध्यमवर्गीय कुटुंबं फार थोडी असतात . घटस्फोटीत स्त्रीची लग्नाच्या बाजारातली किंमत कितीतरी कमी होते , संपूर्ण आयुष्य एकटीने काढण्याची रिस्क वाढते .. ती रिस्क पोटगीची रक्कम मिळावी म्हणून घेणारी कुटुंबं फार कमी आहेत , फसवणूक , लुबाडणूक हाच हेतू असलेली ती असतात . त्यांची संख्या 2 -3 टक्के एवढीही भरणार नाही . त्यात एखादं दुसरं मूल असेल तर ती पोटगीची रक्कम म्हणजे फाटलेल्या आभाळाला लावलेल्या ठिगळासारखी असते .

तेव्हा घटस्फोट , पोटगी हा मार्ग अतिशय आनंदाने निवडणारी कुटुंबं खुप कमी असतात . 80 % कौटुंबिक विवाद , छळ , हिंसा , मतभेद या सगळ्या प्रश्नांमध्ये बायकोला " तू ऍडजस्ट करून घे , संसार टिकव , पोरांना वडलांपासून वेगळं करू नकोस , आपण त्याला समजावू , तो सुधारेल , आज ना उद्या त्याच्यात नक्की बदल होईल , तू धीर सोडू नकोस , दुर्लक्ष कर , सहन कर , घटस्फोट झाला तर लोक 10 तोंडांनी बोलतील इत्यादी इत्यादी अनेक सल्ले खुद्द माहेरचे लोक देतात . लग्न झालेल्या भावाला , वहिनीला बहीण परतून आपल्या घरात यायला नको असते .

अलीकडे हे चित्र मध्यमवर्गात बदलू लागलं आहे . माहेरचे लोक पाठिंबा देतात , घटस्फोटानंतर दुसरं लग्न किंवा आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहायला मुलीला मदत करतात . मूल बहुतेकवेळा आईकडेच असतं त्याचीही जबाबदारी कायमची घेतात .

जाणूनबुजून एका कुटुंबाला / तरुणाला छळायचं आहे , लुबाडायचं आहे या हेतूने कोणी मुलींची लग्नं करून देत नाहीत किंवा मुलगीही नवऱ्याला छळायचं हा अंतस्थ हेतू ठेवून लग्नाला उभी राहत नाही . काही अपवाद वगळता .

उलट नवी सून ही मोलकरीणीला पर्याय म्हणून आणल्यासारखी लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून तिला राबवायला , छळायला सुरुवात करणारी कितीतरी कुटुंबं आहेत , त्यात सासू वगैरे स्त्रियाही आल्या आणि या अत्याचाराला विरोध न करणारे सासरा , नवरा हे पुरुषही आले .

तुम्ही शीर्षकात धर्म ही संज्ञा वापरली आहे. पण लेखातल्या आणि प्रतिसादातल्या उदाहरणांत धर्माचा सरळ संबंध वाटत नाही. असो.
--

इंदिरा संतांना या विषयावर लिहावंसं वाटलं. ती कथा किमान ५० वर्षे जुनी असावी. रखमाबाई सावेंचा जन्म १८६४ सालचा. त्यांना बालपणात झालेला विवाह मान्य नव्हता की नवरा नंतर आवडला नाही म्हणून त्यांनी नांदायला जायला नकार दिला आणि न्यायालयात जाऊन न्याय मिळवला. त्यांच्या आईचा त्या काळात विधवा विवाह झाला होता आणि त्यांचे सावत्र वडील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. रखमाबाई सुरुवातीच्या प्रॅक्टिसिंग भारतीय स्त्री डॉक्टर्सपैकी एक. यांच्याबद्दल किती लोकांना माहीत आहे?
---
उलट आजही कथाकादंबर्‍यामालिकाचित्रपटांतही झटून परंपरा पाळण्याचे, स्वतः सोसून संसार टिकवण्याचे गोडवे गायले जातात. यात लेखिकांची नावेही भरपूर दिसतात.

नववधू असताना स्वैपाक न येण्यावरून सासरी रडवल्या जाणार्‍या स्त्रीचा मुलगा त्याच्या बायकोची घरकाम करताना होणारी धांदल धावपळ बघून हसतो आणि ही स्त्री मात्र आपल्या आधीच्या पिढीकडून आलेला मारून मुटकून सुगरणपणा पुढल्या पिढीतल्या स्त्रीला पास ऑन करण्यात धन्यता मानते अशी एक कथा मायबोलीवरच आहे. त्यात अनेकींना काहीही खटकलं नाही.
---
पोलिसच काय, स्त्री समुपदेशक बाईलाच तू जरा पडतं घे असा सल्ला देतात. त्याच वेळी स्त्रियांसाठी वेगळी पोलिस ठाणी, प्रत्येक ठाण्यात स्त्री पोलिस हेही बदल होत आहेत. माझ्या मैत्रिणीला घरगुती हिंसाचार प्रकरणी अशा पोलिस ठाण्यातून योग्य मदत मिळाली.

लेखातली उदाहरणं जुन्या धर्मग्रंथांच्या अपेक्षा , सूचना आणि प्रत्यक्ष वास्तव यांच्यातील कॉंट्रास्ट अधोरेखित करण्यासाठी आहेत . असे एकेक नवरे असताना स्त्रियांनी पतिप्रेमी , सती - साध्वी वगैरे असावं ह्या अपेक्षा हास्यास्पद किंवा खरं तर क्रूर आहेत .

ह्या अपेक्षा इतिहासजमा झालेल्या आहेत , त्यामुळे आजच्या काळाला लागू पडत नाहीत असं वरवर दिसेल .

पण प्रत्येक ती व्यक्ती - जी म्हणते / मानते की- स्त्रियांनी मर्यादेत राहिलं पाहिजे , स्त्रियांना खूपच अधिकार मिळाले आहेत - त्याचा त्या गैरफायदा घेऊ लागल्या आहेत , घर सांभाळणं हे त्यांचं पहिलं कर्तव्य आहे, नवरा वाईट असला तरी बायकोने पडतं घेऊन संसार टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत -

यांना जर असं का ? का बरं ? स्त्रीला असे अर्धवट अधिकार पुष्कळ झाले असं तुम्हाला का वाटतं ? पुरुषांना जे अधिकार आणि स्वातंत्र्य आहे त्या तुलनेत हे अधिकार आणि स्वातंत्र्य तुटपुंजं आहे हे तुम्हाला दिसत असतानाही ते खूप झालं असं कसं तुम्ही म्हणता ? तिने संसारातच समाधानी असावं , आणखी काही करण्याचा , मिळवण्याचा प्रयत्न करू नये असं तुम्हाला का वाटतं ?

असे बेसिक प्रश्न विचारत गेलं तर उत्तर असेल की - समाजात बॅलन्स असावा यासाठी स्त्रियांना ते स्थान / तेवढेच अधिकार , त्या जबाबदाऱ्या ठरवून दिलेल्या आहेत .

यावर कोणी बरं हे सगळं ठरवून दिलेलं आहे ? असा प्रश्न विचारला असता - आपल्या धर्मानेच - हे उत्तर मिळेल .

किंवा स्पष्ट या शब्दात उत्तर मिळालं नाही तरी त्यांच्या मनातल्या या समजुतींना , अपेक्षांना जो घट्ट अदृश्य बेस आहे तो धर्माने सांगितलेल्या अपेक्षांचा आहे .

आपण जे मानतो किंवा वागतो तो अतिरेकी किंवा अन्यायाचं मुळीच नाही , कसं असेल ? कारण हे तर आपल्या पवित्र धर्मानेच सांगून ठेवलेलं आहे - तेव्हा ते काही चूक असणार नाही - हा विश्वास असतो . आपल्या विचारांना नैतिक आधार आहे , धर्माचा पाठिंबा आहे - हा विश्वास त्या वागण्याची चिकित्सा होऊ देत नाही , ते वर्षानुवर्षं अखंड चालू राहू देतो . पुराणातलं आपल्याला सोयीस्कर तेवढं घ्यायचं - त्याचाच हा प्रकार आहे .

अगदी दोन दिवसांपूर्वीच एक कमेंट वाचली - की बाबासाहेबांनी संविधानात स्त्रियांना खूप अधिकार दिले , चांगल्या हेतूने दिले - पण त्यांचा या स्त्रिया गैरफायदा घेतात त्यामुळे त्यांना चूल आणि मूल यांच्यातच ठेवलं पाहिजे , कोणतेही जॉब अवेलेबल करून देता नयेत तर त्या धडपणे राहतील .

ही विचारसरणी काही अनपेक्षित किंवा नवीन नाही , फक्त इतक्या प्रामाणिकपणे मांडलेली बघून किंचित धक्का बसला . बाबासाहेबांना स्त्रियांना अधिकार द्यावे लागले याचा अर्थ ते फक्त स्त्रियांनाच आधी नव्हते , पुरुषांना होते - स्त्री ही माणूसच असताना किती काळ अर्धवट अधिकार घेऊन राहते आहे यात बाबा तुला काही गैर वाटत नाही का आणि यापुढेही तिची मुस्कटदाबी ( जॉब नको , चूल मूल यात ठेवलं पाहिजे ) करून ठेवलं पाहिजे - ही इच्छा करताना तुला त्यात काही गैर आहे , असं वाटत नाही का ?

असं विचारावंसं वाटलं पण आवर घातला . ते म्हणजे इयत्ता दुसरीतल्या मुलाला दहावीची प्रश्नपत्रिका दिल्यासारखं झालं असतं , तो ती चिडून फाडून फेकून देण्यापलीकडे काही करू शकत नाही .

प्रोफाइल चेक केली असता सदर कमेंट करणारा माणूस एखादा मद्दड , अल्पशिक्षित , गुंड दिसणारा तरुण किंवा गेल्या पिढीतला म्हातारा मनुष्य नसून अगदी सौम्य चेहऱ्याचा , बऱ्यापैकी शिक्षित , मध्यमवर्गीय आणि एका सात आठ वर्षांच्या मुलीचा अतिशय प्रेमळ तरुण बाप असल्याचं दिसून आलं . त्यावरून ह्या विचारांची कीड ही समाजातल्या कोणा कोणाच्या डोक्यात आहे हे तोपर्यंत समजू शकत नाही , जोवर तो माणूस तोंड उघडून मुक्ताफळं उधळत नाही - हे पुन्हा एकदा कळून आलं .

काही पारंपरिक प्रथा.
1) लग्न जुकवणे हे आई वडिलांचे च काम आहे तिथे मुलांच्या पसंतीला काही किंमत नाही.
ह्या मुलगा किंवा मुलगी ह्यांची लग्न आई वडील च फिक्स करत.
मुलांच्या पसंतीला काही अर्थ नव्हता.
२) पुरुषानं बाहेर ची सर्व काम बघावित,
घरातील सर्व लोकांचे रक्षण, घरावर येणारी विविध संकट ,शेतातील कष्टाची काम ही पुरुषांची च असत.
स्त्रिया नी घर सांभाळावे,मुल सांभाळा वित, घरातील सर्व काम करावीत
३) सुनेला काहीच अधिकार नव्हते,स्वतःचे आई वडील जरी आले तरी साधा चहा पण देण्याचे स्वतंत्र नव्हते.
सासू ची परवानगी घ्यावी लागायची.
म्हणजे अधिकार गाजवणारी पण स्त्री आणि जिच्या वर अधिकार गाजविणार ती पण स्त्री.
पुरुष ह्या मध्ये सहभागी खूप कमी असतं.
४) पुरुष किती ही लग्न करू शकत होते पण स्त्री ला तो अधिकार नव्हता.
५) बायको सोडून बाकी बाकी बाहेरच्या स्त्री वर हात उचलणे हा सर्वात मोठा गुन्हा होता.
स्त्री ल मारहाण करणे हे मोठे पाप.
६) कोणत्याही भांडणात स्त्री सहभागी होत नसत हे क्षेत्र पुरुषांचे.
७)पुरुषांचे जेवण झाल्यावर च स्त्रिया नी जेवण करायचे.
असे काही नियम होते.
ते आता खूप मोठ्या प्रमाणात नष्ट झले आहेत.
लग्न हे मुला,मुलींची पसंती बघून च केले जातात.
घरातील अनेक निर्णयात स्त्रिया सहभागी असतात.
स्त्रिया नोकरी ,व्यवसाय करू शकतात.
स्त्रिया घराचे निर्णय घेवु शकते.
स्त्री शिक्षण घेवु शकते.
दुसरे लग्न पण करू शकते.
बदल तर झाला च आहे.

मानवाने प्रतेक पिढी नुसार प्रगती च केली .
स्थिर जीवन असेल तर च प्रगती होवू शकते अन्यथा नाही.
हे माणसाला जाणवले म्हणून च सामाजिक नियम तयार झाले.
कुटुंब व्यवस्था तयार झाली.
जबाबदाऱ्या वाटल्या गेल्या..
लहान मूल,स्त्रिया,वृध्द पुरुष,वृध्द स्तिया सर्वांचे हित जपण्यासाठी परंपरा आल्या .
त्या मध्ये काही दोष असतील पण ते सामाजिक नियम,परंपरा होत्या म्हणूनच मानव आता प्रगती पथा वर आहे.
अवास्तव, आणि अनियंत्रित व्यक्ती स्वतंत्र मुळे.
लहान मूल आणि वृध्द स्त्री पुरुष, आणि अगदी young पिठी पण धोक्यात आली आहे.
.
मुलांची जबाबदारी कोणाला नको आहे पण वारस मात्र हवा आहे.
वृध्द आई,वडील कोणाला नको आहेत.
पण वारसा हक्क मात्र हवा आहे.
बंधन कोणाला नको आहेत पण त्यांच्या अधिकारच संरक्षण मात्र हवं आहे.
त्रास कोणालाच नको आहे पण आपले व्यक्ती स्वतंत्र गाजविल्या मुळे बाकी लोकांना त्रास होतों
त्यांच्या अधिकारावर गदा येते .ह्याची जाणीव मात्र नाही

हेमंत ३३३ एक पर्सनल प्रश्न आहे.
उत्तर देणे अजिबात बंधनकारक नाही.
अगदीच न राहवून विचारते.

तुम्हाला मुलगी आहे का?

पळून जाऊन लग्न केलेल्या मुलीच्या बातमीवर हिचं सैराट करून टाकलं पाहिजे , माझ्या मुलीने असं काही केलं तर नक्कीच सैराट करणार ( म्हणजे खून ) अशा कमेंट्स पुरुषांनी केलेल्या वाचलेल्या आहेत .

त्यामुळे मुलगी झाल्यामुळे पुरुषांच्या या प्रकारच्या मतांमध्ये बदल होऊन ते स्त्रियांबाबत , स्त्रियांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील होत असतील हा कदाचित आपला आंधळा आशावाद आहे . आणि झालेच संवेदनशील तर ते तात्पुरते फक्त स्वतःच्या मुलीवर अशी वेळ आली तर होतील , उर्वरित स्त्रियांनी मात्र चूल मूल यात राहावं , सहन करुन संसार टिकवावा आणि ज्या तसं करत नाहीत त्या नवऱ्याच्या सालस कुटुंबाचा गैरफायदा घेणाऱ्या बायका असतात हाही समज टिकून राहील .

या वागणुकीत शिक्षण घेऊन फरक पडत नाही, जवळच्यात/ नात्यात अत्याचार बघुन फरक पडत नाही, देश बदलून तिकडची कायदा सुव्यवस्था ठीक असल्याने काही फरक पडला तर तितकाच अन्यथा त्याने ही फरक पडेलच याची शाश्वती नाही.
मला वाटतं अर्थार्जन करुनच काही फरक पडला तर. स्त्रीयांनी अर्थार्जन केलेच पाहिजे. ते केले तरच त्या काही करू शकतील. बाकी इतर पुरुष आणि इतर स्त्रीया त्यांना मदत करतील तर बोनस. अ‍ॅमी नाही येत हल्ली का? त्यांचा आवडता विषय होता हा.

<<
या वागणुकीत शिक्षण घेऊन फरक पडत नाही, जवळच्यात/ नात्यात अत्याचार बघुन फरक पडत नाही, देश बदलून तिकडची कायदा सुव्यवस्था ठीक असल्याने काही फरक पडला तर तितकाच अन्यथा त्याने ही फरक पडेलच याची शाश्वती नाही.
मला वाटतं अर्थार्जन करुनच काही फरक पडला तर. स्त्रीयांनी अर्थार्जन केलेच पाहिजे. ते केले तरच त्या काही करू शकतील. बाकी इतर पुरुष आणि इतर स्त्रीया त्यांना मदत करतील तर बोनस. अ‍ॅमी नाही येत हल्ली का? त्यांचा आवडता विषय होता हा.
Submitted by अमितव on 31 July, 2023 - 14:03 >>

------ नोकर्‍या मिळणे दुरापास्त आहे, त्यातून एखादी स्त्री लग्नाच्या आधी चांगले अर्थांजन करत असेल तर सासरचे ते किती आणि कसे स्विकारतात हे पण महत्वाचे आहे.
" आमची आर्थिक स्थिती उत्तम आहे, पैशांसाठी मुलीला नोकरी करायची काहीच अवशक्ता नाही... " सुरवातीला लाडिक सांगणे होते, नंतर आग्रह... पुढे नोकरीचा राजिनामा द्यावा म्हणून जबरदस्ती. असे उदाहरण फार तुरळक असेल पण शिक्षणाने काहीही फरक पडलेला नाही.

नोकरी / व्यावसाय हे केवळ अर्थांजनासाठीच असते असे नाही. बाहेर पडायला मिळते, चार लोकांत मिसळून काही नवे शिकता येते.... मुलीला तिचा choice विचारा आणि नोकरी करायची आहे का नाही हे तिला ठरवू द्या.

(स्त्रियांसाठी ) सर्व परिस्थितीत, सर्व काळ आर्थिक स्वावलंबन असणे जरुरीचे आहे.

स्त्रिया नी आर्थिक बाबतीत सक्षम असावं.
स्त्रिया ना शिक्षणाचा पूर्ण अधिकार असावा.
स्त्रिया ना आपल्या आवडीनुसार वागण्याचा अधिकार असावा .हे कोणी नाकारत नाही.
मुलींना ती मुलगी आहे म्हणून शिक्षण दिले जात नाही असे उदाहरण दुर्मिळ च आहे आता.
पण ज्यांची आर्थिक स्थिती च एकदम खराब आहे दोन वेळचे जेवण मिळणे मुश्किल आहे अशा घरात मुलीचं काय मुलाना पण शिक्षण सोडून लहान मोठी काम करावी लागतात.
पण आर्थिक बाबतीत सक्षम असणारे एक घर भारतात सापडणार नाही तिथे मुलींना शिक्षणाचा हक्क नाकारला आहे.
एक शंका
बील गेट्स ची बायको नोकरी करते का?
एकद्या आयएएस,आयपीएस,डॉक्टर,सैन्य अधिकारी ह्यांच्या बायका उच्च लेव्हल ची नोकरी नाही मिळाली तर आवड म्हणून लहान दर्जा ची नोकरी करत आहे आवड म्हणून असे उदाहरण आहे का?.आयएएस अधिकाऱ्याची बायको शिक्षिका आहे प्राथमिक शाळेत .
असे उदाहरण आहे का?
प्रतेक कुटुंबाची गरज वेगळी असते.श्रीमंत घर असेल तर बायको नी नोकरी करू नये असे मत असले तरी तिने बाकी उद्योग व्यवसाय करावा ह्याला कोणी विरोध करत नाही.
नोकरी मध्ये सक्ती नी आठ दहा तास घरा बाहेर काढण्या पेक्षा व्यवसाय उत्तम .हा विचार काही चूक नाही

Lol आता धुरी घेतली की! Wink
जेंडर बायास होणार नाही हे प्रत्येक बाबीत बघावे, आपल्या मुलग्यांना आणि मुलींना स्वावलंबन शिकवावे, आपणही शिकावे. फेमिनिस्ट बनावे.
बाकी उलटं टांगून धुरी मिळणारच आहे तर.. एन्जॉय माडी! Wink

मला हा लेख वाचताना "पण लक्षात कोण घेतो? " ची आठवण आली.
तो १९०० चां सुरुवातीचा काळ असावा( नक्की आठवत नाही).
पण दुर्दैवाने हे अजूनही कोणत्या ना कोणत्या समाजात अजूनही घडतंय. हे पूर्णपणे कधी संपतच नाहीये.

दरवेळी " स्त्रीचं स्त्रीची शत्रू " वगैरे ऐकवून हात झटकायचे हे ही नित्याचेच झालंय.

काही मूठभर स्त्रियांकडे सोयीनुसार अगुलिनिर्देश करून बघा स्त्रियांना किती स्वातंत्र्य "दिलंय ' kinva त्याचा कसा गैरवापर केला जातोय वगैरे वगैरे फाटे फोडायचे हे नित्याचेच.

" स्त्रीचं स्त्रीची शत्रू "
मला दिवसात एक तरी हे उदाहरण दिसतेच . बस, ट्रेन च्या प्रवासात.
वयस्कर स्त्रिया गर्दी असणाऱ्या बस, ट्रेन मध्ये चढतात. कावऱ्या bavrya होवून मोठ्या आशेने बघत असतात कोणी तरी जागा देईल .
पण कोणतीच तरुण स्त्री त्या बिचारीला जागा ऑफर करत नाही.
कोणी बिचारा पुरुष च जागा ऑफर करतो.
ह्या वरून काय निष्कर्ष निघतो.

हो, पण ती स्त्रीही पुरुष मानसिकतेचीच बळी असते. एक बळी दुसऱ्या बळीला फुलण्याचं स्वातंत्र्य देऊ शकत नाही. स्त्रियांना लहानपणापासून शिकवण असते 'पुरुष तुझा नेता आहे तू त्याची अनुयायी.' त्यामुळे इतर स्त्रियांबद्दल त्यांना अनुकंपा किंवा आदर कमी असतो. सतत असुरक्षित रहायचं, ताब्यात रहायचं ट्रेनिंग दिलेलं असताना मानसिक आरोग्य चांगलं रहात नाही. हे अयोग्य नॉर्म मनात तयार होत असतात . हे खूप गुंतागुंतीचं आहे, दिसतं तितकं सरळ नाही. त्यामुळे पुरुषांना स्त्रियांना त्यांच्या शरीर व मनासहित ताब्यात ठेवणं हा त्यांचा अधिकार आणि जबाबदारी दोन्ही वाटते. थोडंही चांगलं रहाणाऱ्या/ चांगलं काम करणाऱ्या/आत्मविश्वासाने वावरणाऱ्या स्त्रीचा दंभ कमी करण्यासाठी स्त्रीपुरूष दोन्ही तत्पर असतात. या मानसिकतेची पाळंमुळं पितृसत्ताकात आहेत,जे पुरूषांच्या सोयीचं तर आहेच पण स्त्रियांनाही दुसरा पर्याय माहिती नसल्याने किंवा समाजात एकट्या स्त्रीची आपोआपच इतकी कोंडी केलेली आहे की त्यांनाही हा पर्यायच सुरक्षित वाटतो. यातून बाहेर आल्याशिवाय ह्यातले दोष दिसत नाहीत. जिला हे लक्षात येतं व ते ती बोलून दाखवते , ती सर्वानुमते उद्धट ठरते. जिला लक्षात येतं पण बोलण्याची- हे acknowledge करण्याची हिंमत होत नाही ती विझून जाते. रोजरोज एखाद्या गोष्टीसाठी भांडणं अशक्य आहे, संघर्षाचा कंटाळा येतो माणसाला. शांततेसाठी दोन पावलं मागे राहावं लागतं. धर्म ही संकल्पना सुद्धा पुरूषांच्या सोयीने पुरूषांसाठी पुरूषांनीच तयार केलेली आहे. धार्मिक बायका हे एक ऑक्सिमोरॉन वाटतं मला कधीकधी. चूभूद्याघ्या.

Pages