काळ आला होता

Submitted by च्रप्स on 28 July, 2023 - 23:14

गोष्ट काही महिन्यापूर्वीची आहे... आधी दहा वर्षे मागे जाऊया... कॅलिफोर्निया मध्ये फ्रेंमॉण्ट नावाची एक जागा आहे तिथे माझे एक घर मी दहा वर्षांपूर्वी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतले होते आणि रेंट ने दिले होते... असे कधीच झाले नाही कि भाडेकरू मिळाला नाही.. मात्र तीन महिन्या पूर्वी एक भाडेकरू ची lease संपली आणि नवीन भाडेकरू यायला 15 दिवस होते... मी राहायला कॅलिफोर्निया मध्ये नाहीय.. म्हणून ठरवले कि कॅलिफोर्निया फिरायला जाऊ... आणि आपल्याच घरात राहू एक विकेंड...
दोन दिवस आरामात राहिलो आम्ही पण तिसऱ्या दिवशी घराच्या बॅकयार्ड मध्ये मला कोणता किडा चावला कि कोणती विड ऍलर्जी झाली कि माझ्या संपूर्ण अंगावर रॅशेस आले.. आणि चेहरा सुजू लागला... विदिन पाच मिन सगळे झाले आणि मी बेशुद्ध झालो... बायकोने लगेच ऍम्ब्युलन्स बोलावली आणि मला आयसीयू मध्ये नेले... माझ्या डोळ्यासमोर माझी बायका मुले.. आई बाबा दिसत होते... माझा बीपी खूप लो झाला होता... डॉक्टर म्हणाले जर अजून 5 मिन उशीर झाला असता तर लाईफ थ्रेटनिंग होते... अँटी histamine शॉट देऊन मी लगेच ठीक झालो पण हि गोष्ट माझे डोळे उघडून गेली... मला कोणतीही ऍलर्जी नाही .. माझा बीपी व्यवस्थित आहे... शुगर नाही...मी फुल मॅरेथॉन केली होती काही महिने आधी... मला काहीच होऊ शकत नाही... मी एकशे ऐशी बेंच करतो ... चार लॅप मारतो पूल मध्ये... मी फार भारी... हे सगळे एका क्षणात चक्काचूर झाले... निसर्गासमोर आपण काहीही नाही.... हेच खरे....अजूनही मला कळले नाही मला कशाची ऍलर्जी झाली... टेस्ट्स केल्या पण सापडली नाही...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयुष्य वाढलं. त्या प्रसंगाला विसरून जा.
कमी लोकांना मिळते ती दुसरी संधी मिळाली आहे. जर काही चुका आधी केल्या असतील तर त्या होऊ नयेत याची काळजी घ्या.
जास्तीत जास्त चांगले हातून घडावे यासाठी प्रयत्न करा.
यामागे काही शुभ संकेत असतील (विश्वास असो नसो) सकारात्मक विचार करा.
शक्य तितकी लोकांना मदत करा.
नवीन जन्मासाठी खूप खूप शुभेच्छा !

( माझ्या एका धाग्याला कुलूप लागले नंतर ग्रुप पुरता मर्यादीत पण केलाय. तेव्हढं बघा).

अरे बापरे!
वेळ आली नव्हती हे किती बरे!
तुम्हाला उदंड आरोग्य आणि आयुष्य लाभो.
आता आयर्नमॅन ही करून टाका लवकर!

मोठ्या बिकट प्रसंगातून सुखरूप बाहेर आलात ह्यासाठी अभिनंदन.
पुनर्जन्म ही देवाची देणगी आणि घरची पुण्याई आहेच पण गोष्ट कश्यामुळे घडली ह्याचा पाठपुरावा करून कारण शोधून काढाच. घर / प्रॉपर्टी तिकडे आहे तर असे प्रसंग पुन्हा घडू नयेत म्हणून आवश्यक ती खबरदारी नक्की कश्याची घ्यायची हे समजलेच पाहिजे.

बापरे काळजी घ्या ..
इतके वर्ष भाडेकरू राहत होते काही झाले नाही. तुमच्याच नशिबी आले. पण सुखरूप बाहेर देखील पडला. आयुष्य असेच आहे हे खरे आहे. त्यामुळे ते मजा करतच जगायचे आहे. तुम्ही भारीच आहात. त्यामुळे हा विचार चकणाचुर करायची काही एक गरज नाही. फक्त माणसाला घमेंड होऊ नये.

अरे बापरे! डॉक्टरनी कसली ऍलर्जी सांगितले नाही का? गुगलबाबा ने यापैकी एखादी असू शकते असे सांगितले:
Hives (urticaria),
Angioedema (swelling under the skin),
Contact dermatitis,
Eczema

च्रप्स, तुम्ही सुखरूप बाहेर पडलात हे बघून हायसं वाटलं.

ह्या प्रकारचा मुलाबाबत अनुभव घेतला होता. Fire ants , विषारी मुंग्यांची जात असते त्यांच्या वारूळावर पाय दिला होता. अर्जंट केअरला ताबडतोब जावं लागलं.

तुम्ही लवकरात लवकर Allergy testing करून घ्या. त्यात सगळे ज्ञात किडे मुंग्या ई यांची पडताळणी केली जाते. Severity सुद्धा कळते. हे कॅलिफोर्निया पुरतं असेलच असं नाही. काळजी घेतलेली बरी. कारण तुम्हाला अजूनही नक्की माहीत नाही की काय चावलं होतं. EpiPen(२-३) चे प्रिस्क्रिप्शन घेऊन या. एक कायम घरात व एक स्वतः जवळ असू द्या. स्वतः EpiPen कसं घ्यायचं हे शिकून घ्या. ह्या गोष्टी लवकरात लवकर करा.

अस्मिताच्या पोस्टशी पूर्ण सहमत.
काळजी घ्या. आपल्याला कशाची अलर्जी आहे ह्याची माहिती असणे आवश्याक आहे.

अरे बापरे च्रप्स, फारच भयंकर प्रसंग. पण तुम्ही सहिसलामत बाहेर आलात त्यातून, नशिब बलवत्तर होतं देवाचे आभार! अस्मिता म्हणतेय ते बरोबर आहे,ते एका. काळजी घ्या.

अरे बापरे च्रप्स, फारच भयंकर प्रसंग. पण तुम्ही सहिसलामत बाहेर आलात त्यातून, नशिब बलवत्तर होतं देवाचे आभार>>>>> ++११

वावे, अस्मिता यांचे पण काळजी वाटणारे अनुभव आहेत..

मला किटक चावल्याचा एक तोंडओळख अनुभव मागच्या वर्षी आलाय.
ट्रैव्हलस ने गावाला निघालो होतो..वाट पाहत रस्त्यावर थांबलो होतो..एक बारीकसं चावल्यासारखं वाटलं मानेला.. दुर्लक्ष केलं..गाडीमध्ये चढल्यावर पाठीला दोन ठिकाणी पुन्हा तेच मग सावधपणे त्या किटकाला पकडून चीरडला..पाहिले तर चावलेल्या जागी सुजले होते आणि मध्यभागी डसल्याची खूण..गावाला सकाळी पोहोचणार होतो..लकिली जास्त काही झालं नाही.. दोन दिवस दुखले फक्त...

बाप रे ! काय झाल हे माहित करुन घ्या, अस्मिता म्हणतेय तस अ‍ॅलर्जी असेल किवा नसेलही... सुखरुप बाहेर आलात त्याबद्द्ल अभिनदन.

वेळेवर इलाज झाला आणि या प्रसंगातून बाहेर आलांत हे वाचून चांगले वाटले.>>+१
सुरवंट असेल. >> +१ सुरवंटाबद्दल लोकसत्तामधे वाचले होते.

बाप रे !
काळजी घ्या. संकटातून सुखरूप बाहेर पडलात अभिनंदन.>>> +१