बरंचसं कॉपी पेस्ट आहे , गुलमोहर हे योग्य सदर सिलेक्ट केलं आहे की नाही हेही समजत नाही . धागा दुसऱ्या सदरात कसा हलवायचा ते माहीत नाही . त्यामुळे नियमांच्या बाहेर पोस्ट झाली असल्यास धागा उडवला जाऊ नये ही विनंती .
स्त्रीजन्माची सार्थकता गृहव्यवस्था व शिशुसंगोपन यांतच आहे. आदर्श स्त्री तीच कीं, जी सुमाता व सुगृहिणी असते आणि याच तत्त्वावर स्त्रियांना जर्मनींत घराबाहेरच्या कोणत्याही धंद्यांत वा व्यवहारांत न पडण्याचे पाठ आज मिळत आहेत त्यांच्या नाजूक व प्रेमळ प्रकृतीला अपत्यसंगोपन, रुग्णपरिचर्या, यांसारखीं वत्सलतेचीं किंवा गृहव्यवस्था, पाकसिद्धि, शिक्षण, कशीदा, यांसारखीं लालित्यपूर्ण कामेंच योग्य. गृह हेंच त्यांचे कार्यक्षेत्र व सुगृहिणी बनणें हाच त्यांचा आदर्श... अशा प्रकारच्या ज्ञानानेंच आर्यमहिलांचा उद्धार होणार आहे. एवंगुणविशिष्ट स्त्रीरत्नें जेव्हां घराघराला शोभवितील, तेव्हांच घरोघर सुख, समाधान, संपन्नता, सुशीलता व स्वदेशाभिमान नांदू लागतील. "
-
स्त्रीशिक्षण सुधारणेचें दिग्दर्शन - या सदराखालीं 'सह्याद्रि' मासिक .
ऋग्वेदकालीन विवाहाची वयोमर्यादा कशी होती हैं सप्रमाण दर्शवून श्रीदत्तजन्माची एक सुंदर गोष्ट त्यांनी सांगितली आहे . ती पाहातां स्त्रियांचें वैवाहिक जीवन किती उच्च व पवित्र आहे, तसेंच ब्राह्मणांच्या मुलांना जशी मुंजीची आवश्यकता, तशीच स्त्रियांना विवाहाची आवश्यकता आहे, हेंही दिसून येतें. स्त्रियांना विवाहविधीच वैदिक संस्कार, पति सेवाच गुरुकुलवास व गृहकृत्येंच त्यांचें अग्निहोत्र असें मन्वादि स्मृतिकार म्हणतात ' यांत किती अर्थ भरला आहे, पवित्र अंतःकरणी स्त्रियाच जाणूं शकतील
यानंतर असवर्ण अथवा भिन्नवंशीय विवाहाबद्दल सुधारलेल्या जर्मन लोकांचं निषेधात्मक मत सांगून, हल्लींचें संततिनियमन किती राष्ट्रबलविघातक आहे हें सांगितलें आहे. 'समाजाचा चारी बाजूंनीं होत असलेला अधःपात धर्मवीर अशा आर्य महिलांनींच मनावर घेतल्यास बंद होईल ' अशी इच्छा प्रगट केलेली किती सत्य आहे हें तशा स्त्रियाच जाणूं शकतील.
संततिनियमनाच्या घातक चालीपासून लोकसंख्येवर व आरोग्यावरसुद्धां कसा भयंकर परिणाम होतो हें सप्रमाण दाखविण्याच्या उद्देशाने हल्लीं आस्ट्रिया देशांतील राजधानीच्या शहरीं एक जंगी प्रदर्शनही उघडण्यांत आल्याचें वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झालें आहे ! प्रथम त्या चालीच्या ' गुणाचा ' दुंदुंभी पश्चिम दिशेत वाजलेला आमच्या लोकांच्या कानीं पडला व ती चाल येथें सुरू झाली; तसा त्या चालीच्या दोषाचा ' दुंदुभीही कानीं पडला पाहिजे, म्हणजे मग आमचे लोक सावध होतील. पण तो केव्हां पडतो पाहावें !
आमच्या पूर्वजांनीं मानवी स्वभावाचा चांगला अभ्यास करूनच विवाहसंस्था सुरू केली आहे व त्या सर्वाना धर्माच्या दावणीत अशा रीतीनें गोवून टाकले आहे की मानवांना त्यायोगें 'भोगांतही मोक्ष' साधतां येईल ! पण आपल्या धर्माच्या आचारविचारांचं थोड्या दमानें मनन करतील तेव्हांच ना त्याच्या रहस्याचा प्रकाश होईल ! असो.
■■■
'उठा, चहा घेतां ना ? उठा.' म्हणत नर्सनं त्यांना उठवलं, तेव्हां त्यांना अगदी ओशाळल्यासारखं झालं.
'काय ग बाई तरी झोप !' म्हणत त्यांनीं रग कमरेपर्यंत बाजूला सारला आणि किंचित् उठण्याचा प्रयत्न केला. चहा फार चवदार होता. चहाबरोबर टोस्टही होता. त्या हळुहळू फराळ करीत होत्या आणि नर्स त्यांच्या शेजारीच बसून होती. त्यांचीं गेलीं तीन बाळंतपणं याच नर्सनं केली होती. दोघींनाहि एकमेकींविषयीं स्नेहभाव वाटत होता.
'माई, हीं दोन बाळंतपणं तुम्हांला बरींच जड गेलीं हो. फार थकला आहांत. असं बरं नाहीं. पहांटे तर शेवटी शेवटीं मी घाबरलेंच. म्हटलं, धडपणी बाई सुटते की नाहीं ! तुमच्या अंगांत ताकदच राहिलेली नाहीं. '
'गेल्या चार वर्षांत मला बरं नाहीच आहे. कधीं डॉक्टरकडे गेलं की म्हणतात, 'विश्रांती घ्या.' आपलं ऐकून घ्यायचं आणि सोडून द्यायचं. ' माई क्षीणपणानं हसल्या.
,
'आपल्या शरीराची काळजी आपणच घ्यायला पाहिजे, बाई ! माईंनी एक आवंढा गिळला; आणि त्या बराच वेळ स्तब्ध बसून राहिल्या.
दर महिना रुपये चाळीस अधिक म. भ. पंचवीस मिळवणाऱ्या एका प्राथमिक खाजगी शाळेतील शिक्षकाचा संसार माईंना लाभला होता. प्रथम त्याही नोकरी करीत होत्या. पण तीन मुलं होईपर्यंत त्यांची नोकरीची धडपड टिकून राहिली. चवथ्या खेपेला डोहाळे लागतांच त्यांनीं नोकरीचा राजिनामा दिला होता. आणि मास्तरांनीं आणखी दोन शिकवण्या पत्करल्या होत्या. त्यांच्या संसाराचं स्वरूप हे असं ओढाताणीचं होतं.
या ओढाताणीच्या जाणिवेनं माईंची जीभ ओढल्यासारखी झाली. कष्ट तर होतेच, पण आणखीहि पुष्कळ होतं. कष्टापेक्षाही तेच त्यांना कासावीस करून टाकत होतं. त्या हळुहळू बोलायला लागल्या. त्यांचा आवाज किंचित कापरा होता.
'ताई, कुणाचं शरीर अन काय ? ज्या दिवशीं हें शरीर दुसन्याच्या स्वाधीन केलं त्याच दिवशीं शरीराचा दगड व्हायला सुरवात झाली. आतां त्याला स्वतःचं सुख - इच्छा - वासना - कांहींच नाहीं. शुद्ध दगड झालं माहे. त्याची काय काळजी घ्यायची -'
'असं का म्हणतां ? मुलं लहान आहेत. एकच काळजी घ्या. आता पुन्हा-'
' - बाळंतपण नको, असंच ना ?' माई रुक्षपणानं हंसल्या.
त्यांचं हें सहावं बाळंतपण. ज्याला हें कळे तो हेटाळणीनं किंचित हसे. किती किती मुलं - किती मुलं ? छे माईंना तें भारी बोचायचं. पण - पण 'पण' कसा सुटणार ?
मुलं फार नसावीत हें त्यांना कळत नव्हतं असं थोडंच होतं ? पण कळूनही वळत नसणाऱ्या अशा गोष्टी असतातच कीं !
कालचींच सलणारी शल्यं, आणि उद्यांचे रोखलेले भाले; शरीराचे कष्ट आणि मनाचे शीण; नोकरीच्या याचना आणि संसारांतल्या विवंचना ;
-
साऱ्या गोष्टी माणसाला विसरायला हव्या असतात. क्षणभर त्या यांपासून दूर कुठं तरी विसावा हवा असतो. कुणी त्यासाठी दारूकडे ळतो, तसच कुणी - व्यसनी माणसाला व्यसनाची वाईट बाजू माहीत नसते असं थोडंच असतं ? पण माहीत असूनही त्याचा उपयोग काय होणार ? सारं कांहीं उगीचच. आणि म्हणूनच अगदीं कातर आवाजांत माई म्हणाल्या,
'ताई, कुणाला अन काय सांगायचं ? बाळंतपणाचा महिना जिथं अगदीं कसाबसा कोरा जातो- '
'बाई ग ! ' त्या नर्सच्या डोळ्यांत टचकन पाणी उभं राहिलं.
'पण मास्तर फार चांगले आहेत. त्यांची माझ्यावर माया नाहीं असं नाहीं. माझ्यासाठी त्यांचा जीव सारखा तुटत असतो. '
' हें त्याचंच लक्षण वाटतं ? '
'असं नाहीं हो. तेही माणूसच आहेत ना ? तुम्हाला सांगतें, जोंपर्यंत माझं मनही दगड बनलं नव्हतं, तोपर्यंत खूप प्रयत्न केले मी. पण व्हायचं काय ? सदा धुसफूस, चिडचीड, अबोला, असाच सारा दिवस - - कधीं त्यांनीं ताडकन् दार उघडून बाहेर निघून जावं, कधीं मी रागारागांत पोरांत येऊन झोपावं. काय फायदा त्याचा ? शेवटीं आतां मनाचाही दगड झाला आहे बघा. दगड, नुसता दगड ! जीव आहे इतकंच काय तें - '
नर्सनं डोळ्याला पदर लावला.
.....
असंच आपलं बाळ सदोदित लहान असावं आणि आपणही असंच सारख सारखं पडून रहावं. कुणी यावं, चहा द्यावा, कुणी ताट वाढून आणावं. जेवण तरी किती सुग्रास लिंबाचं लोणचं, लसणाची चटणी, भरपूर तूप, आणि वाफा येत असलेलं गरम गरम अन्न -
घरीं असं कुठे असणार ? नेहमींच अपुरं जेवण भाजी असेल तर आमटी नाहीं. तूप तर पहायलाही मिळत नाहीं. आणि कढत अन्न जेवण्याचं सुख - तें तरी कुठं मिळतं ? रोज मास्तरनां शाळेत पाठवायचं, मुलांचं आवरायचं, आणि मग पितळींत वाढून घ्यायचं. तोंवर भाताचे डिखळे आणि आमटीचं कोमट पाणी झालेलं असायचं. उजव्या डाव्या बाजूचं कालवण मुलांच्या तडाख्यांतून उरलं तर भाग्य ! पण इथं या जेवणांत त्यांना एक प्रकारची चैन वाटायची. चाखत माखत त्या जेवायच्या. चार घास अधिकही जायचे.
बाळ झोपलं कीं इतर खाटांकडून फेरी काढायची.
साऱ्याच बाळंतिणी वॉर्डातल्या आणि म्हणूनच समदुःखी .. कुणाचं चवथं, कुणाचं सातवं अशीं बाळंतपणं. त्यामुळं भेटीलाही सहसा कुणी यायचं नाहीं. कोपऱ्यातील खाटेवर एक पहिलटकरीण होती. तिचा नवरा रोज तीनदां यायचा. साऱ्या वाळंतिणी त्याच्याकडे पाहून कुत्सितपणानं हसायच्या. माईही आंवढा घोटून त्या चेष्टेंत सामील व्हायच्या. प्रत्येकीच्या घरचे अनुभव, बाळंतपणांतील खोडी, नवऱ्याचे स्वभाव चर्चेला निघायचे आणि या रसाळ गप्पांत वेळ कसा जायचा तें समजायचंही नाहीं.
रात्री अगदीं गाढ झोपावं. मूल दाईच्या स्वाधीन असायचं. रडेल बिडेल कांहीं काळजी नको. खरंच किती सुखाचे दिवस !
·
त्यामुळं दहाव्या दिवशीं रात्रीं माईंना उगीचच अस्वस्थ वाटायला लागलं. स्वतःच्या घरीं जायला मन घेईना .-
ते सारं घर - ती चूल - तें रेशन- तें धुणं तीं भांडीं मुलं- आजारपण नवऱ्याचा राग--सारं सारं भुतासारखं त्यांना भेडसावायला लागलं. मुलाला छातीशी घेऊन त्या स्वतःला विसरू पहायला लागल्या.
या रात्रीच्या शिणानं सकाळीं त्यांना जाग आली, त्या वेळी कमी येऊन तयार होती. आज अकरावा दिवस. आज त्यांना तिथं चहा मिळणार नव्हता. त्या मुकाट्यानं उठल्या.
तूं आलीस ?' आपले कपडे आवरत त्यांनी कमीला विचारलं.
'बाबा म्हणाले, मी घरांतलं करतों, तूं आईला आणायला जा, म्हणून आलें मी.'
तिच्या कडेवरील शरू हात पुढं करीत म्हणाली,
'आई, बाबा शिला कलतायत. '
माई उगीचच हसल्या.
त्यांनी मुलाला कपडे चढवायला सुरवात केली. तें दहा दिवसांचं सुख अजून त्यांच्या डोळ्यासमोरून हलत नव्हतं. मुलाला टोपरं घालतां घालतां त्यांच्या मनांत विचार आला,
'आतां आजपासून पुनः कष्ट - पुनः कामं - शरीरांत प्राण असेपर्यंत उभं रहायचं आणि -- आणि -- कसली तरी किळस त्यांच्या शरीरांत थरकांप उडवून गेली, पण लगेच खुदकन् त्या हसल्या. पुनः वर्षा सव्वा वर्षांनीं असा परत विसावा -- तें हसू त्यांना कोयनेलसारखं लागलं. त्यांनीं मुलाला बाळंत्यांत नीट गुंडाळलं, छातीशी धरलं, माथ्यावरून नीट पदर घेतला. सामानाचं गाठोडं कमीच्या हातांत दिलं. आणि समोर असलेल्या दाईच्या नर्सच्या हातावर चार आणे, आठ आणे ठेवीत त्या हळूहळू जिना उतरल्या. दाराशीं धमणी उभी होती. गाडीवानानं दार उघडतांच, मुलाला सावरत त्या हलकेच धमणींत चढल्या. पुनः घरी निघाल्या.,
इंदिरा संत - कथासंग्रह कदली .
"डॉक्टर, मला आजारी पडायचंय, औषध द्या. चांगली दीड-दोन महिने तरी अंथरुणावर पडले पाहिजे. "
"अगं, लोकांना आजारी पाडण्यासाठी का डॉक्टर असतात? आणि अंगावरून पांढरं जाणं, कंबरदुखी, अशक्तपणा या तक्रारी आहेतच तुझ्या. आणखी आजारी पडून अंथरुणावर खिळलीस तर मुलांना, नवऱ्याला जेवायला कोण घालेल ?"
"खाऊन खाऊनच नवरा माजतो अन् छळतो मग-"
नवरा छळतो म्हणजे काय याचा उलगडा मला लगेच होईना. कारण ही बाई माझी जुनी पेशंट. दोन मुलं झाल्यावर तिने संतती - प्रतिबंधक शस्त्रक्रियासुद्धा करून घेतली होती. नवरा एक फॅक्टरी कामगार, मिळकत बऱ्यापैकी, आणि निर्व्यसनी होता.
"दारू पिऊन त्रास द्यायला लागला की काय तुझा नवरा ! कधी बोलली नाहीस तू याआधी ?”
" व्यसन वगैरे काही नाही हो. आता कसं सांगावं तुम्हाला ? अहो, त्यांना रोज संबंध लागतो. कधी कधी रात्रीतून दोन-दोन वेळासुद्धा माझं मढं जागं करतात. नको म्हटलं तरी ऐकत नाहीत. हा छळवाद नाहीतर काय?"
ही बाई तशी जेमतेम दुसरी-तिसरी शिकलेली. लग्न लवकर झालं होतं. आता एकोणतीस-तीस वर्षांची असेल. अजाणतेपणे तिने लैंगिक मार्गदर्शन या विषयाला हात घातला. नवऱ्याला याबद्दल काही बोलली आहे का ते मी विचारलं. नवऱ्याजवळ तिने विषय काढल्यावर त्याने तिला उडवून लावलं होतं.
नुसतं गप्प पडून राहण्यात तुला कसला त्रास होतो असंच त्याने विचारलं.
"बाकी काही त्रास देत नाहीत हो. फॅक्टरी सुटली की सरळ घरीच येतात. खाणं पिणं, कपडालत्ता कशालाही कमी करत नाहीत. पण हा त्रास सहन होत नाही मला. पाळीचे चार दिवस सुद्धा कटकट करतात. रोज विचारतात, थांबलं का नाही? आता ते काय माझ्या हातातलं आहे का?"
बाईच्या नवऱ्याला मी बोलावून घेतलं. तुमच्या बायकोची इच्छा लक्षात न घेता तुम्ही रोज समागम करता त्यामुळे तिला अंगावरून पांढरं वगैरे त्रास होतो, हे मी त्याला समजावून सांगितलं.
नवऱ्याचं उत्तर वेगळंच,
"मला नाही तसं वाटत. संबंध करतो म्हणजे काय मारपीट करतो का? लग्नाला पंधरा वर्षं तर झाली. माझं काय वय झालं का? संबंध रोज करायची इच्छा होते मला, अन् होणारच, त्यात काय पाप आहे का? हक्काची बायको आहे, का बाहेर जातोय कुठे मी? तिच्या त्रासावर तुम्ही औषधं देतच आहात आणि बाईच्या इच्छेचा प्रश्न येतोच कुठे? पुरुषाच्या उत्तेजनांवर सगळं अवलंबून आहे. वेश्या धंदा कोणासाठी करतात, पुरुषांसाठीच ना?" असा प्रश्न विचारून त्याने मोठ्या दिमाखात हास्य केलं.
स्त्री-पुरुष संबंध, स्त्रीची इच्छा, समाधान, त्यातला आनंद याबद्दल मी त्याला मार्गदर्शन केलं, पण तो ते काही पटवून घेत नव्हता. अन् वर म्हणाला,
" इतर, अगदी सुंदर, शिकलेल्या, मोठ्या पगाराची नोकरी करणाऱ्या बायकांचं असेल तुम्ही म्हणता तसं कामेच्छा वगैरे पण माझ्या बायकोचं तसं काही नाही. मला माहीत आहे तिचा स्वभाव पहिल्यापासून. दुसरा काही घरात त्रास नाही. मी दारू पीत नाही. आता एवढीही स्वतःची हौस करू नये का माणसानं ?"
आता याला काही शिकवण्यात अर्थ नव्हता. तेव्हा याच्या बायकोलाच शिकवलं पाहिजे, असं मी मनाशी ठरवलं.
- डॉ लीना मोहाडीकर - कामविश्व संसारिकांचे
" स्त्रियांमध्ये सती, पतिप्रेमिका, साध्वी आणि पतिव्रता अशा चार पाय-या आहेत.
( १ ) केवळ स्वपतीवरच ज्यांची निश्चल प्रीति असते, अर्थात् ज्या कुवर्तनी नव्हेत, त्यांना सती म्हणावें. पण अशा सर्व सतींना पतिप्रेम पूर्णपणे जिंकता येतें असें नाहीं.
( २ ) सतीप्रमाणे शरीराचें व मनाचें पावित्र्य राखतातच, शिवाय बुद्धीच्या चतुराईनं ज्या स्त्रिया पतीचं चित्त नेहमी प्रसन्न राखूं शकतात, त्या 'पतिप्रेमिका'
समजाव्या.
( ३ ) सतीत्व व प्रतिप्रेमिकत्व असले म्हणजे तेवढ्यानं साध्वीत्व येतं असें नाहीं. ( ' साधु ' शब्दाचें स्त्रीलिंगी रूप ' साध्वी' होय. ) व्यवहारांत एखादा मनुष्य नीतिमान् व सज्जन असला तरी तेवढ्याने त्यास साधु म्हणतां येणार नाहीं. सज्जनपणा + कडक उपासना + भूतदया + तितिक्षा + परोपकार + परमार्थाभ्यास, इत्यादि मिळून साधुत्व. त्याप्रामाणें सतीत्व + पतिप्रेमिकत्व + वरील गुण, मिळून 'साध्वीत्व ' येतें.
( ४ ) सती, पतिप्रेमिका व साध्वी या तिघींच्या गुणसमुच्चयानेंच केवळ पतिव्रता पदवी प्राप्त होऊं शकणार नाहीं ; तर वरील तीनही गुण + पतिदेहावर व पतिजीवावर ईश्वरबुद्धीची अचल धारणा धरणारीच ' पतिव्रता ' पदवीस पात्र होऊं शकते. पतीशिवाय दुसरें व्रतच जिला माहीत नाहीं, तीच पतिव्रता ('पतिरेव व्रतं यस्या अखंडा सा पतिव्रता ' ) होय. पतिस्वरूपावर याप्रमाणे जिची वृत्तीची अखंड धारा .
- धर्मग्रंथ .
एक दमयंतीचा अपवाद सोडला, तर पुराण काळापासून प्रथेप्रमाणे एकदा लग्न करून मुलगी सासरघरी गेली की, तिचा माहेरचा 'शेर' संपला. कधी माहेरपणाला आली, तर चार दिवसांचे कौतुक. बाकी त्रास होत असेल तरी सहन करून मन मारून तिथेच तिने राहावे.
तेव्हापासून ते आजघडीला विज्ञानयुगातसुद्धा काही फारसा फेरफार झालेला नाही. परवाच एका स्त्रीची कथा ऐकली आणि थक्क झाले.
बाई चुणचुणीत, एस. एस. सी. पर्यंत शिकलेली, टायपिंग येत होते. पार्टटाईम नोकरी करायची. सगळ्या गोष्टीत अतिशय हौस होती आणि थोडक्या पैशात नीटनेटका संसार चालवत आनंदी राहत होती. नवरा शेतीच्या कामाकरता गावी गेला होता. घरी आल्यावर बायकोला दिवस राहिलेले बघून त्याचे डोकेच फिरले. “हे मूल माझे नाही” म्हणू लागला. बायकोला घराबाहेर काढले. माहेरी नेऊन घातले. माहेरच्यांनी चार दिवस 'माहेरपण' करून तिला परत नवऱ्याकडे आणून सोडले. त्याने घराबाहेर काढले. दार लावून घेतले.
शेवटी बाईची मैत्रीण तिला घेऊन नवऱ्याकडे आली. वारंवार पटवून दिले की, तिला दिवस आधीच राहिले असले पाहिजेत. त्याची समजूत पटेना. शेवटी नेहमीच्या डॉक्टरीणबाईंकडे सर्वजण गेले. डॉक्टरीणबाईंनी दिवस मोजून सोनोग्राफी करवून घेऊन सर्व तऱ्हांनी त्याची समजूत पटवली. हे मूल आपलंच असल्याची त्याची खात्री पटली. बाईला त्याने 'उदार अंत:करणाने' घरात घेतले. आता बाई बदलूनच गेल्यात.
आधी त्याने भरपूर शिवीगाळ केली होती व पोटात एवढ्या लाथा घातल्या होत्या की, ते मूल पोटात राहिलेच नाही. गर्भपात झाला. आता बाईंचे आनंदी असणे, खळखळून हसणे, गप्पा मारणे, फुलांचे गजरे वगैरे घालणे, थोडक्यात का होईना, कपड्यांची, भांड्यांची, घर सजावटीची हौस करणे सगळे बंदच झाले आहे. जर माहेरच्यांनी थोडे पाठबळ दिले असते, जावयाला बोलवून समजावले असते, जरूर तर कानउघाडणी केली असती, तर आज जे बाईचे आयुष्य पार विसकटून गेले आहे ते गेले नसते .
- माधवी कुंटे - स्त्रीसूक्त
नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय नोटाबंदीनंतर देशभरात एक गोष्ट सारखीच पाहण्यात आली . घराघरातून बाहेर नोकरी न करणाऱ्या , घरातच कष्ट उपसणाऱ्या आणि त्याचे नगद मोल न मिळणाऱ्या बायकांनी डब्याडुब्यांतून नवऱ्याच्या चोरून काही रोख पैसे साठवले होते .
किती विविध कारणं असतात हे असे चोरून पैसे साठवण्यासाठी... घरातील अडीअडचणीच्या वेळी कामी यावेत म्हणून, सणासुदीला पोराबाळांना काही चीजवस्तू घेता यावी म्हणून , माहेरचे पाहुणे आले तर त्यांच्या स्वागतासाठी कदाचित् दमडा मिळणार नाही म्हणून लाज झाकण्यापुरते आतिथ्य करता यावे म्हणून , मासिक पाळीसाठी पॅड्स विकत घेता यावीत म्हणून, आतल्या कपड्यांसाठी पैसे द्यायला नवरा रडवतो आणि घरात सांगायची लाज वाटते म्हणून... कल्पनाही करवणार नाही असली कारणं असतात बायांनी चोरून पैसे साठवण्याची.
नोटाबंदीनंतर अनेक बायकांकडे पाचशे हजारच्या नोटा साठवलेल्या पैशात होत्या. दोनतीन हजार रुपयांपेक्षाही कमी रक्कम... मोलाची बचत बिनमोलाची होऊ नये म्हणून या सगळ्या बायांनी साठवलेले पैसे नवऱ्यांकडे दिले- नोटा बदलून आणायला- कारण बँकेत जाणं हे अजूनही फक्त पुरुषांनीच करायचं असतं. बऱ्याच जणींना पैसे `बाजूला टाकल्याबद्दल चोरीचा आरोप ठेवून नवऱ्यांनी मारहाण केली. शिव्या दिल्या. पैसे बदलून आणल्यानंतर ते पैसे नवऱ्यांनीच खिशात घातले. आणि नंतर कोणत्याही प्रकारे रोख हातात देणे बंद केले.
मध्य प्रदेशमधील ऍक्शन एड संस्थेच्या वन स्टॉप ऍक्शन सेंटरने एक पाहाणी केली, त्यातून त्या राज्यातील हकीकती अहवाल रुपात आल्या आहेत . नऊ नोव्हेंबरला एका चोवीस वर्षाच्या बाईला- तिच्या चार पोरांसकट नवऱ्याने घराबाहेर काढले - कारण तिच्याकडे चार हजार पाचशे रुपये निघाले. दुसऱ्या एका आईने आपल्या तेरा वर्षाच्या मुलीच्या इन्सुलिनसाठी चोरून पैसे बाजूला टाकले होते . नवरोबांनी तिला मारमारून मुलीसकट बाहेर काढले .
आज स्त्रीला एका धार्मिक थेरड्याने सामग्री म्हटले म्हणून वातावरण जरासे हिंदकळले. पेटूनबिटून काही उठत नसतो आपण. त्याने ते बोलणे चूकच होते . पण त्याने फक्त जे घडते ते निर्लज्जपणे बोलून दाखवले एवढाच काय तो दोष .
नाहीतर भारताच्या शहरांत परिस्थिती जरा बदललेली असली तरी गावखेड्यांतून अजूनही हाच दृष्टीकोन आहे. प्रश्न असा आहे... या सामग्री तर सामग्रीचीही काळजी घेत नाहीत त्या सामग्रीचे तथाकथित रक्षक.
अशाच शिबिरातली एक लेक मला भेटायला लपून छपून आली. आणि रडत रडत सांगू लागली - ताई मला ना त्या वाटेने नुसतं दह्यासारखा पांढरं बाहेर येतं. आणि खाज तरी इतकी उठते की जाऊन जीव द्यावा वाटतं हो. विचारल्यावर सांगितलं की दुसऱ्या गावातला डॉक्टर पुरुष आहे- त्याच्याकडे जायचं नाही म्हणून बंदी केलीय. काय मला दाखवायचं ते त्याला दाखवणार काय म्हणतो नि शिव्या घालतो . आणि तालुक्याच्या गावी लेडी डॉक्टर आहे तिच्याकडे जायला त्याला वेळ नाही. मी करू तरी काय...
बायकोवर परपुरुषाची नजर पडू नये- आपल्या सामग्रीवर कुणाची नजर पडू नये हे मुख्य. मग त्या सामग्रीला वाळवी लागून ती कुरतडली गेली तरी बेहत्तर. ही वृत्ती भारतात रुजलेल्या सर्वच धर्मांच्या चौकटीतून पावन होते आहे. प्राचीन हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म, शीख धर्म आणि ख्रिस्ती, इस्लाम, ज्यू- सर्वांनाच स्त्रीचे दुय्यमत्व सोयीचे पडते.
एका संपूर्ण समूहाला मालमत्ताच ठरवले की त्याचा मालमत्तेवरचा हक्कच संपतो. कायद्याच्या दृष्टीने सर्वात विकसित अशा इंग्लंडनेही तीच चलाखी केली होती. '
घरात शिजवलेलं काय खावं, किती खावं, आपल्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी काय करावं याची सत्ता आजही आपल्यातील करोडो स्त्रियांना नाही हे सत्य आहे.
***
मुग्धा कर्णिक - शब्दांचीच वस्त्रे धैर्यास माझ्या .
हे सगळं कॉपी पेस्ट झालं . आता मला काय वाटतं ते .. पतिसेवा , पतिव्रता वगैरेवर लिहिताना न थकणारे जुने जुने धर्मग्रंथ लेखक आणि एवढं लिहिण्याची वाङ्ममयीन क्षमता नसलेले पण मनातून त्याच अपेक्षा बाळगणारे असंख्य सामान्य पुरुष यांना उलटं टांगून ओल्या मिरचीची धुरी आणि चाबकाचे फटके कोणीतरी देण्याची गरज आहे .
एका वादग्रस्त ग्रंथाच्या एका प्रतीत बायकोने नवऱ्याच्या ताटातलं उरलेलं ( उरलं तर ) अन्न खावं इथपासून बरेच नियम सांगितले होते , ती सेव्ह केलेली पानं आज कुठे सापडली नाहीत म्हणून त्यातला मजकूर इथे पेस्ट केलेला नाही .
एकूण मजकूर आठवता त्या लेखकाचा स्त्री हे अन्न पाण्यावर चालणारं शरीर नाही , ते निव्वळ हवा आणि पाणी भक्षण करून कामाचे रगाडेच्या रगाडे उपसण्याची आणि अखंड प्रसन्न वृत्ती , गोड भाषण , शयनेषू रंभा वगैरे होण्याची दिव्य शक्ती प्राप्त असलेलं , मन भावना वगैरे नसलेलं यंत्र आहे , असा समज असावा .
उलटं टांगून मिरचीची धुरी ही शिक्षा म्हटली खरी पण ती या सगळ्या लोकांसाठी फारच सौम्य आहे .
स्त्रीदेहात जन्म घेऊन वरच्या लेखांमध्ये असलेले अत्याचार आणि असंख्य प्रकारचे आणखी अत्याचार ( लैंगिक शोषण , बलात्कार वगैरे वगैरे ) हे फर्स्ट हँड अनुभवणं हीच शिक्षा यांना योग्य आहे . परमेश्वर ती देत असेल अशी आशा आहे .
उद्वेगाने लिहिलं असावं असं
उद्वेगाने लिहिलं असावं असं जाणवत आहे. उद्वेग यावा असंच आहे आणि सगळं!
नवऱ्याच्या अतिरेकी कामेच्छेमुळे बायकोला होणारा त्रास या विषयावर जयवंत दळवींची एक कथा वाचली होती, तिची आठवण झाली.
रडगाणे गाण्या पेक्षा गेल्या
रडगाणे गाण्या पेक्षा गेल्या 100 वर्षात स्त्री च्या आयुष्यात कसा बदल होत गेला.
आणि आज स्त्री काय स्थिती मध्ये आहे ह्या वर लिहिले तर ते स्त्री च्या फायद्याचे आहे
स्त्री ही शोषीत च असते असा पुरता ग्रह करून घेणे साफ चूक.
मला "सखाराम बांईडर" आठवलं...
मला "सखाराम बाइंडर" आठवलं...
फक्त पोटापाण्यासाठी तिथे राहणा-या असाह्य बायकांचं शोषण.
पौराणिक / ऐतिहासिक दाखले
पौराणिक / ऐतिहासिक दाखले आणि गेल्या शतकातल्या गोष्टी तर संतापजनक आहेतच पण अगदी या वर्षीच्या बार्बी सिनेमातलं स्वगत देखील चिंताजनक आणि चिंतनीय आहे
It is literally impossible to be a woman. You are so beautiful, and so smart, and it kills me that you don't think you're good enough. Like, we have to always be extraordinary, but somehow we're always doing it wrong.
You have to be thin, but not too thin. And you can never say you want to be thin. You have to say you want to be healthy, but also you have to be thin. You have to have money, but you can't ask for money because that's crass. You have to be a boss, but you can't be mean. You have to lead, but you can't squash other people's ideas. You're supposed to love being a mother, but don't talk about your kids all the damn time. You have to be a career woman but also always be looking out for other people. You have to answer for men's bad behavior, which is insane, but if you point that out, you're accused of complaining. You're supposed to stay pretty for men, but not so pretty that you tempt them too much or that you threaten other women because you're supposed to be a part of the sisterhood.
But always stand out and always be grateful. But never forget that the system is rigged. So find a way to acknowledge that but also always be grateful. You have to never get old, never be rude, never show off, never be selfish, never fall down, never fail, never show fear, never get out of line.
It's too hard! It's too contradictory and nobody gives you a medal or says thank you! And it turns out in fact that not only are you doing everything wrong, but also everything is your fault.
I'm just so tired of watching myself and every single other woman tie herself into knots so that people will like us. And if all of that is also true for a doll just representing women, then I don't even know.
बाप रे ! केवढं लिहिलं आहे. मी
बाप रे ! केवढं लिहिलं आहे. मी नेटाने वाचण्याचा प्रयत्न केला, पण कंटाळाच आला. वर्षानुवर्ष वाचलेलं, ऐकलेल आणि सिरीज/सिनेमात पाहिलेलं तेच ते.
सॉरी, पण मी जेवढं वाचलं, त्या प्रश्नांशी रीलेट करूच शकत नाही, त्यामुळे कितीही उदास किंवा दुःखी व्हायचं म्हटलं तरी होता येत नाहीए.
उद्वेगाने लिहिलं असावं असं
उद्वेगाने लिहिलं असावं असं जाणवत आहे. उद्वेग यावा असंच आहे आणि सगळं!...... +१.
अफगाणिस्तान राहिलंच.
अफगाणिस्तान राहिलंच.
राधानिशा तुम्ही महत्वाचा विषय
राधानिशा तुम्ही महत्वाचा विषय मांडलाय. ह्यावर फार बोललं जात नसल तरी ही उद्वेग यावा असंच वास्तव आहे हे. आणि गेल्या पिढीतील महिलांसाठी तर आहेच पण ह्या पिढीतील महिला पण पुर्णपणे मुक्त नाहीत ह्या पासून. मी मध्यंतरी डॉ बंग ह्यांच्या संस्थेत काम करणार्या एका स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ चा लेख वाचला होता. तीने ही ह्या च प्रकारची उदाहरणे दिली होती लेखात.
नोटबंदीचा ह्या स्तरातील महिलांवर असा परिणाम झाला हे वाचून फार हळहळ वाटली. म्हणजे हे अनपेक्षित नाही पण तरीही स्त्रीया प्रत्येक घटनेत कशा साॅफ्ट टार्गेट ठरतात हे पुन्हा एकदा जाणवले.
लेख पोहोचला. प्रभावी आहे.
लेख पोहोचला. प्रभावी आहे. शतकानुशतकं हे सुरू आहे. कालातीत, संस्कृतीतीत.
मेधा, प्रतिसाद एकदम पटला. परखड सत्य.
कठीण आहे.परिस्थिती सुधारण्यात
कठीण आहे.परिस्थिती सुधारण्यात, जास्त न बिघडण्यात समाजाला आपला हातभार इतकंच काय ते करू शकतो.
सह्याद्रि मासिकातला लेख
सह्याद्रि मासिकातला लेख कधीच आहे? हल्लीच सुशिक्षित (हिंदू) स्त्रियांनी अधिकाधिक मुलं जन्माला घातली पाहिजेत अशी चर्चा फेसबुकवर वाचली. उद्देश कंसातला शब्द सांगेल.
नवर्याला अतिरेकी कामेच्छा असणं आणि त्यातून बायकोला होणारा त्रास हे म्हटले तर बोल्ड विषय चित्रपटांतसुद्धा आलेत. अगदी जुना धर्मकन्या आणि थोडा अलीकडचा प्राण जाए पर शान न जाए. पण त्याबद्दल बोललं जात नाही. बहुतेक बरखा दत्तने वुई द पीपल मध्ये यावर कार्यक्रम केला होता. मॅरिटल रेप हा गुन्हा मानला जायला बराच काळ लागेल.
अधिकाधिक मुलं ज्यांना मुलं
अधिकाधिक मुलं ज्यांना मुलं सांभाळायची चांगली एनर्जी, पैसे, घरी भरपूर मानवी मदत आहे त्यांनी जोडप्याचा परस्पर कंसेंट या गोष्टीला असेल तर घालावी.कोणताही धर्म जाती इत्यादी चा यात संबंध असायलाच नाही पाहिजे(पण हे अशी विधानं करणाऱ्याना कोण सांगणार?)
एखादा एकदम यशस्वी बॉलिवूड पिक्चर आलिया आणि आयुष्यमान ला घेऊन या विषयावर चांगला संदेश देणारा निघाला आणि चालला तरच थोडी शक्यता आहे लोक ऐकण्याची.
लिंग आधारित कोणतेच एकतर्फी मत
लिंग आधारित कोणतेच एकतर्फी मत बिलकुल पटत नाहीत.
कायदे पण लिंग आधारित आज पर्यंत होते पण किती दिवस त्या कायद्या ना पाठिंबा द्यायचा.
लिंग विरहित च कायदे हवेत.
लिंग पिसाट पुरुष असू शकतात तशा स्त्रिया पण असू शकतात.
शारीरिक अत्याचार पुरुष स्त्री वर करतात तशा स्त्रिया पण शारीरिक अत्याचार पुरुषांवर करतात.
मुल किती असावीत हा त्या जोडप्याचा प्रश्न आहे बाकी लोकांचा तिथे काही संबंध नाही.
कोणाला जास्त मुल आवडत नाहीत म्हणून दुसऱ्यांना पण तसेच वाटले पाहिजे हा हट्ट हास चुकीचा आहे.
पुरुषांवर अन्याय,अत्याचार करणाऱ्या स्त्रियांची संख्या आता tari bilkul कमी नाही.
पारंपरिक पद्धती नी लग्न न करता.
एक करारनामा करावा.
त्या मध्ये सर्व अटी आणि शर्ती असाव्यात.
आणि सहमत म्हणून दोघांच्या सह्या असाव्यात.
आणि तो करार दोघांनी पाळणे सक्ती चे करावे.
मग त्या मध्ये शारीरिक संबंध पासून सर्व काही असावे.
पतिसेवा , पतिव्रता वगैरेवर
पतिसेवा , पतिव्रता वगैरेवर लिहिताना न थकणारे जुने जुने धर्मग्रंथ लेखक आणि एवढं लिहिण्याची वाङ्ममयीन क्षमता नसलेले पण मनातून त्याच अपेक्षा बाळगणारे असंख्य सामान्य पुरुष यांना उलटं टांगून ओल्या मिरचीची धुरी आणि चाबकाचे फटके कोणीतरी देण्याची गरज आहे .
<<
१००% सहमत.
पण,
याहीपेक्षा जास्त, सो कॉल्ड धार्मिक राईट विंगर स्त्रिया, ज्या या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देत राहतात, त्यांना चाबकाचे फटके मारायची गरज आहे.
कारण असल्या बुरसटलेल्या कल्पना/संस्कारांतून आपल्या मुलांना बाहेर काढण्याचे काम स्त्री च करू शकते.
याहीपेक्षा जास्त, सो कॉल्ड
याहीपेक्षा जास्त, सो कॉल्ड धार्मिक राईट विंगर स्त्रिया, ज्या या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देत राहतात, त्यांना चाबकाचे फटके मारायची गरज आहे.
कारण असल्या बुरसटलेल्या कल्पना/संस्कारांतून आपल्या मुलांना बाहेर काढण्याचे काम स्त्री च करू शकते.
>>>> अरे वा! याची पण जबाबदारी स्त्रियांवरच का? छान! वडिलांनी आपल्या वागणुकीतून मुलांना योग्य धडे द्यायला हरकत काय आहे? वडिलांची वागणूक मुलं बघत नाहीत का? त्यांनीही मुलांवर संस्कार करण्यात हातभार लावण्यास कोणी मनाई केली आहे का? सगळी जबाबदारी आईवर टाकायची आणि खापरही आईवरच फोडायचं की सगळं कसं सोप्पं होतं.
अरे वा! याची पण जबाबदारी
अरे वा! याची पण जबाबदारी स्त्रियांवरच का? छान! वडिलांनी आपल्या वागणुकीतून मुलांना योग्य धडे द्यायला हरकत काय आहे?
<<
त्या बापाला एम्सीपी बनवण्यात त्याच्या आईचा हात नाहिये का?
आधी कोंबडी की आधी अंडे हा सवाल आहे.
सोडा. तुमच्या समजण्यापुढचं लिहिलं आहे मी.
मामी +१
मामी +१
<< उद्वेगाने लिहिलं असावं असं
<< उद्वेगाने लिहिलं असावं असं जाणवत आहे. उद्वेग यावा असंच आहे आणि सगळं!...... >>
---- सहमत
प्रत्येक धर्मांत कट्टरपंथी आहेत , याला अपवाद कुठलाही धर्म नाही. त्यांच्यासाठी स्त्री म्हणजे मुलांना जन्म देणारे यंत्र आहे.... कोण लढणार आहे यांचा धार्मिक लढा? म्हणून चार- दहा मुलांना जन्म देण्याचे आवाहन होत असते.
<< आज स्त्रीला एका धार्मिक थेरड्याने सामग्री म्हटले म्हणून वातावरण जरासे हिंदकळले. पेटूनबिटून काही उठत नसतो आपण. त्याने ते बोलणे चूकच होते . पण त्याने फक्त जे घडते ते निर्लज्जपणे बोलून दाखवले एवढाच काय तो दोष . >>
-------
सोडा. तुमच्या समजण्यापुढचं
सोडा. तुमच्या समजण्यापुढचं लिहिलं आहे मी. >>>>
जबाबदारी आई तसेच वडिलांची
जबाबदारी आई तसेच वडिल दोघांची सारखी आहे. हा वादाचा मुद्दा नको.
अलीबाबा, 'स्त्रीच' का करू
अलीबाबा, 'स्त्रीच' का करू शकते? पुरुषांचे हात कुणी बांधून ठेवलेत? दोघांची जबाबदारी आहे असं का नाही म्हणत? पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांची जबाबदारी जास्त आहे असं नाही का वाटत? सत्ता कुणाच्या हातात जास्त आहे?
धागा वाचला नाही अजून. मोठा
धागा वाचला नाही अजून. मोठा दिसला फार. म्हणून तूर्तास फक्त प्रतिसाद वाचले.
पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांची जबाबदारी जास्त आहे असं नाही का वाटत?
>>>
हे योग्य आहे मात्र.
काही स्त्रियांना तर हे सुद्धा माहीत नसेल की त्यांना त्यांच्या भल्यासाठी बदलाची गरज आहे.
अलीबाबा, 'स्त्रीच' का करू
अलीबाबा, 'स्त्रीच' का करू शकते?
Look around at the society, and tell me about the women who enable oppression of other women.
Be those the women in manipur that hand over girls of other tribes to raping males, or be those from mayboli who comment खखोदेजा आम्ही व्हिडिओ पहिला नाही.
असल्या कुऱ्हाडीच्या दांडयांबद्दल म्हणतो आहे मी.
लिहिलेल्या प्रतिसादातील अर्धाच हिस्सा घेऊन उत्तरे लिहिणं हे न समजायला माबोवर नवा नाहीये मी.
याहीपेक्षा जास्त, सो कॉल्ड
याहीपेक्षा जास्त, सो कॉल्ड धार्मिक राईट विंगर स्त्रिया, ज्या या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देत राहतात, त्यांना चाबकाचे फटके मारायची गरज आहे.
<<
ह्या भागाबद्दल कोण बोलणार? या बायांबद्दल कोण बोलणार? आरसा बघा जरा
उजव्या विचारांच्या
उजव्या विचारांच्या स्त्रियांना वठणीवर आणण्यासाठी चाबकाचे फटके व इतर काय काय हिंसक शिक्षा करायच्या याबद्दल वेगळा धागा येऊ दे. डॉक्टरसाहेबांनी मनावर घ्यावं. लोकशाही, संविधान यात आवश्यक ते काय बदल करावे लागतील हेही घाला त्यात.
कोणी कोणावरती विचार
कोणी कोणावरती विचार थोपवण्याची गरज नाही.
ज्यांना पारंपरिक आयुष्य योग्य वाटत त्यांनी तसे जगावे.
ज्यांना सण,परंपरा, ustav ह्या मध्ये आनंद भेटतो त्यांनी तसेच जगावे..ज्यांना
बेधुंद,मुक्त जगायचे आहे त्यनी तसे जगावे.
पण बाकीच्या लोकांच्या अधिकारच हनन न करता.
हे चांगले हे वाईट हे असे काही नसते.
मुळात घर ,कुटुंब ह्या मध्ये व्यवहार नसतो..
ज्यांना जे जमते त्यांनी ते काम घरातील करावे..ज्यांची जशी क्षमता आहे त्या नुसार जबादरी उचलावी.
जरा मनासारखे नाही झाले की माझ्या वर अन्याय झाला असे जे विचार करतात त्यांनी .
लग्न,मुल,कुटुंब ह्या नादाला लागू च नये.
एकटे मस्त जगावे.
पण दुसऱ्यांना ज्ञान न मागता देवू नये
छान लिहिले आहे राधानिशा,
छान लिहिले आहे राधानिशा, पोचलंच..!
लग्नसंस्थेचा व (पृथ्वीवरील सर्व) धर्मांचा आधार पुरुषसत्ताक आहे. साधे हळदीकुंकू - मंगळागौर वगैरे समारंभ सुद्धा नावाला स्त्रियांचे आहेत. नवरा असलेल्या आणि पुढे मुलगा असलेल्या स्त्रियांना समाजात मानाचे स्थान आहे. भाऊ-वडील-नवरा नसलेल्या स्त्रिया vulnerable केल्या जातात. फेमिनिझम ही एक विचारधारा आहे. स्त्री वा पुरुष कुणीही फेमिनिस्ट असू शकते , हेही बऱ्याच जणांना समजत नाही. काहींच्या मते फेमिनिस्ट म्हणजे घरदार सोडणारी-जबाबदारी न घेणारी- भांडकुदळ बाई असते. फुले -कर्वे आणि अनेक समाज सुधारक त्या काळी लढले नसते तर हे असं सो मि वर व्यक्त व्हायचं वैचारिक स्वातंत्र्य व पात्रता सुद्धा आपल्यात नसती ह्याची मला कायम जाणीव असते. संविधानाने दिलेल्या हक्कांमुळे थोडीफार समानता आहे. बाकी आनंदी आनंद आहे.
लेख विदारक आहे.
लेख विदारक आहे.
लेखातले प्रसंग किती सार्वत्रिक आहेत ? काही कल्पना ?
सर्वांना धन्यवाद . या लेखात
सर्वांना धन्यवाद . या लेखात असलेली वाईट परिस्थिती , अत्याचार यातलं काहीही मला स्वतःला कधीही अनुभववावं लागलेलं नाही किंवा कुटुंबातही पहावं लागलं नाही . तरीही कळू लागल्यापासून या अत्याचारांबद्दल मनात राग , दुःख आणि आपण काहीही मदत करू शकत नसल्याची असहायतेची भावना आहे , मला वाटतं सर्वच संवेदनशील मनाच्या स्त्रियांमध्ये ह्या भावना असतात , क्वचित वाचून त्या जागृत झाल्या नाहीत तर एखादी पीडिता समोर दिसल्यावर जागृत होत असतील . असो .
वृत्तपत्रातील एक बातमी आठवते - एक चौदा वर्षांची मुलगी रात्री घरच्यांची नजर चुकवून घराबाहेर पडली आणि चालत चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यात गेली , उद्या माझं जबरदस्ती लग्न लावत आहेत , ते थांबवा . त्यांनी तो बालविवाह थांबवला आणि मुलीला सुरक्षित ठिकाणी , महिला गृहात वगैरे पाठवलं . पण प्रत्येक 14 / 15 किंवा अगदी 18 - 20 वर्षांच्याही मुलीत घरच्यांविरुद्ध असं बंड करण्याची ताकद असेलच असं नाही , किंबहुना ती नसतेच . आणि कायद्याला धाब्यावर बसवून खेड्या - गावात बहुसंख्य विवाह याच वयात होतात , वय जास्त असेल तरीही वर वधूला पसंत नसेल तर तिच्या होकार नकाराला काडीची किंमत नसते . तिला आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभी करून नंतर नवरा निवडू द्यावा हे न होता , शिकली , कमवू लागली तर जास्त अक्कल येईल , हाताबाहेर जाईल अशी विचारसरणी आहे . त्यामुळे कमी वयात , कमी शिक्षण असताना लग्न लावून दिलं जातं .
15 - 18 - 20 वर्षांच्या स्त्रीकडे लग्न करायचं की नाही याचा निर्णय घेण्याची ताकद , स्वातंत्र्य नसतं . हेमंत हे मागे कुणीतरी म्हटल्याप्रमाणे ivory tower मध्ये राहत असल्यामुळे वास्तव या प्रकाराशी त्यांचा काही संबंधच नाही आहे , वास्तवाकडे डोळे घट्ट मिटून घेऊन आपल्याला दिसतं तेवढंच पूर्ण सत्य आहे ,
असं मानायचं ,
परिस्थिती निश्चितच बदलली आहे पण ती मूठभर फार तर 10 - 15 टक्के बायकांसाठी , उरलेल्या 85 % अजून पिचत आहेत ही गोष्ट संपूर्ण अमान्य करून , ते रडगाणं आहे असं म्हणायचं शिवाय शेंडा बुडखा नसलेली इल्लॉजिकल स्टेटमेंट्स करून स्वतःचं म्हणणं रेटायचं हा प्रकारही जुनाच आहे . आकडेवारीनिशी पुरावे , असंख्य सर्व्हें मधून निघालेले निष्कर्ष , रोजच्या रोज पेपरात येत असलेल्या स्त्रियांवरच्या कौटुंबिक हिंसेच्या असंख्य बातम्या वगैरे कशाला काही अर्थ नाही , हे म्हणतात तेवढं फक्त अचूक सत्य . कुठे चाललेत स्त्रियांवर अत्याचार ? आणि थोडेफार चालले असतील तर बायका काय कमी आहेत का ? त्या सुद्धा अत्याचार करतात पुरुषांवर , दोघे एकमेकांना पुरून उरत आहेत , तक्रारीचं काहीही कारण नाही , सगळा आनंदीआनंद आहे , बायका उगाच कांगावा करतात , रडून दाखवतात , कायद्यांचा गैरवापर करून घेतात .. असो .
राधानिशा, तुमच्या लेखातील
राधानिशा, तुमच्या लेखातील विचार पोचले.
खोडसाळपणा चा असला धागा
(https://www.maayboli.com/node/83783)
वाचल्यावर तर उद्विग्नता अधिक वाढते.
Pages