द्वितीय विश्व महा युद्ध : संदर्भ ग्रंथ, चित्रपट, डॉक्यु मेंटरीज इत्यादी.

Submitted by अश्विनीमामी on 24 July, 2023 - 04:13

दुसर्‍या महायुद्धा वर काढलेले चित्रपट, लिहि लेली पुस्तके डॉक्युमेंटरीज ह्यांची यादी.
१) चर्चिल हिटलर अँड अ‍ॅन अन नेसेसरी वॉर लेखक पॅट्रिक बुकॅनन
२) जन रल हाइ न्झ गुडेरिअन पँथर लीडर. जनरल गुडेरिअन
३) द सेकंड वर्ल्ड वॉर अ‍ॅण्टोन बीव्हर.
४) द सेकंड वर्ल्ड वॉर्स विक्टर डेविस
५) राइज अँड फॉल ऑफ द थ र्ड राइख. शीअरर.
६) मोसाद मायकेल बार झोहार.
७) जेरुसलेम सायमन सीबाग माँटेफिअरे.

विकिपी डिआ ऑन सेकंड वर्ल्ड वॉर. ह्यात बाकीच्या मेजर लढायांच्या लिंक्स आहेत.
नेट फ्लिक्स वरः मालिका वर्ल्ड वॉर २ इन कलर, हिटलर्स सर्कल ऑफ इव्हिल. मेजर इवेंट्स इन वर्ल्ड वॉर टू.

ह्या पुढे युट्युब वर भरपूर उपलब्ध आहे.
द पीपल्स प्रोफाइस म्हणून एक चॅनेल आहे. त्यात प्रत्येक मेन नेत्याची माहिती आहे.

अजून अपडेट करेन.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जगात एक पण उदाहरण नाही हुकूम शाह विरुद्ध हिंसक विरोध करण्याचा>>> हे लिहिताना तुम्ही मुळीसुद्धा विचार, शोध, माहिती घेतली नाही ना

होय आणि नाही मध्ये सांगा

दोन्ही महायुद्ध आणि भारताचे स्वतंत्र हा विषय वेगळा आहे आणि
स्वतंत्र लढा आणि भारताचे स्वतंत्र हा विषय वेगळा आहे
दुसऱ्या महायुधदात भारता ला मदत करणाऱ्या राष्ट्रांचा पूर्ण पराभव झाला होता.जपान,जर्मनी .
ते स्वतः दोस्त राष्ट्रांना शरण गेले होते

१८५७ साली सैनिकांचे ( शिपायांचे) बंड मोडून काढताना आणि त्या आधी ईस्ट इंडिया कंपनीने अनेक जुलूम अत्याचार केले हे तर आहेच. त्यापैकी संस्थाने खालसा करणे ह्या एका गोष्टीमुळे कंपनीविरुद्ध अधिक असंतोष निर्माण झाला. आणि त्याची परिणती १८५७ च्या युद्धात झाली. ह्या असंतोषाची दाखल घेऊन ब्रिटिश सरकारने भारतीय शासन व्यवस्था आपल्या ताब्यात घेतली. नंतर उपरती म्हणा किंवा मुत्सद्दीपणा म्हणा ब्रिटिश सरकारने लोकांच्या चालीरीती आणि धर्म ह्यांत ढवळाढवळ करणे शक्यतो थांबवले. काही कल्याणकारी योजनाही राबवल्या. ठग पेंढाऱ्याचा बंदोबस्त, चोराचिलटांना त्वरित शिक्षा ह्यामुळे लोकांमध्ये सुरक्षितता आली.
त्यांनी द्वीपकल्पाचा प्राचीन इतिहास आणि संस्कृती ह्याकडे लक्ष पुरवले आणि प्राच्य विद्या जतन करण्याचे, मुळात ती उजेडात आणण्याचेही प्रयत्न केले. (सती, संमतीवय वगैरे कायदे सुधारकांच्या जोरदार विरोधामुळे आणि आग्रहामुळे झाले. सरकारच्या पुढाकारामुळे नव्हे.) थोडक्यात, ब्रिटिश सरकारने थोडेसे मवाळ धोरण स्वीकारले. राणीच्या जाहीरनाम्यात त्याचे प्रतिबिंब पडले आहे. त्यांनी सामान्य नागरिकांना शक्यतो त्रास होऊ नये हे पाहिले.( प्लेग च्या ' जुलूमा ' संबंधी माझे मत वेगळे आहे.) एकंदरीत सरकारी शासनाच्या सुरुवातीला सामान्य रयतेचे मत सरकारविरोधी फारसे नव्हते. मात्र हिंसक कटांना त्यांनी खंबीरपणे मोडून काढले, जहाल आणि छुप्या सशस्त्र विरोधाकडे वक्र दृष्टीनेच पाहिले.
अर्थात ते इथे व्यापारासाठीच आले होते आणि ते उद्दिष्ट ते कधीच विसरले नाहीत. तरीही कसल्याच अध्यात मध्यात नसणारा सामान्य माणूस ब्रिटिश शासनाच्या पहिल्या चाळीसपन्नास वर्षात असमाधानी नव्हता. कित्येक शतकांनंतर त्याला सुशासन मिळाले होते.
हे विस्ताराने लिहिण्याचे कारण म्हणजे जपान - जर्मनीकडे भारताविषयीची ही पार्श्वभूमी नव्हती, ते आले असते तर लचके तोडायलाच आले असते हे सांगायचे होते.

हे विस्ताराने लिहिण्याचे कारण म्हणजे जपान - जर्मनीकडे भारताविषयीची ही पार्श्वभूमी नव्हती, ते आले असते तर लचके तोडायलाच आले असते हे सांगायचे होते.>>> मस्त अभ्यासू पोस्ट हिरा

आणि याच कारणाने त्यांनी अहिंसक चळवळ, सत्याग्रह याकडे फारसे लक्ष दिले नाही

सशस्त्र चळवळ, त्यात गुप्ततेची शपथ, घरदारावर तुळशीपत्र ठेऊन जीवाच्या कराराने लढणारे यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती काहीसा दूर राहिला कारण इतक्या पराकोटीचा त्याग, प्रखर विरोध, हसत मरणाचे स्वागत हे प्रत्येकाला शक्य नसते
यामुळेच गांधीजींनी दिलेल्या अहिंसक सत्याग्रह लढ्याला मोठा पाठिंबा मिळाला, लहान मुलांपासून ते वृद्ध, महिला सर्वजण आपापल्या शक्तीनुसार या चळवळीत सहभागी होऊ शकत होता, आपलेही काही योगदान देता येणे शक्य आहे ही जाणीव सर्वसामान्य लोकांना यामुळेच झाली
हे मोठे यश होते यात शंकाच नाही

पण परत तेच लिहितो, हे ब्रिटिश सत्ता असल्याने शक्य झाले
जर्मन किंवा जपान्यांनी बिनदिक्कत पणे या जमावावर बेछूट गोळीबार करायला मागेपुढे पाहिलं नसतं
ते जालियनवाला बागेत डायर ने केलंच पण त्यांनतर त्याला चौकशीला सामोरे जावे लागले, त्याला शिक्षा झाली नाही ही गोष्ट वेगळी पण अशी घटना अपवाद
60 लाख ज्यू ची थंड डोक्याने वासलात लावणाऱ्या जर्मनीने काही हजार लोकांना गोळ्या घालून मारताच ही अहिंसक चळवळ तिथंच कोलमडली असती

इंग्रजांना आपल्यावर राज्य करायचे होते, त्यामुळे भारतीयांना कह्यात ठेऊन त्यांच्याकडुन लाभ उपटण्याइटके इंग्रज धूर्त होते
जर्मनी आणि जपान हे वांशिक दुराभिमानाने पछाडलेले होते
आपण सोडून कुणीच जगण्यास लायक नाहीत
जगले तर आपले गुलाम म्हणूनच, ज्यांची योग्यता पशुपेक्षाही कमी असल्या मानसिकतेने त्यांनी दुबळ्या राष्ट्रात केवळ संहार केला
गोडीगुलाबीने, नमते घेत असल्याचे दाखवून कबजा करणे वगैरे कधी त्यांना जमलेच नाही

आणि ब्रिटिशांच्या तुलनेत जर्मन किंवा जपान चे वर्चस्व, साम्राज्य अल्पजीवीच ठरले, जपानने रशियाचा पराभव केला, मंचुरीया, चीन ला धूळ चारली पण ते तिथं राज्य नाही करू शकले

तेच जर्मनीचे, त्यांच्या आफ्रिकेत काही वसाहती होत्या पण त्यावर पकड अशी नव्हती आणि ब्रिटिशांनी जसे जगभर पसरलेल्या वसाहती आपल्या फायद्यासाठी राबवल्या तसे काही त्यांना करता आले नाही

HP please write. I am getting so much more information. Difficult to keep track and give links here. Pan karte.

अमा, सॉरी. अवांतर होते आहे.
ब्रिटिश सरकार, भारतीय स्वातंत्र्य आणि गांधी हा विषय खूपच व्याप्ती असलेला आणि well documented आहे. ह्या अवाढव्य माहितीतून एखादे नेमके सूत्र बाहेर काढणे कठीण. ज्याला जे सापडले त्याला तेवढेच खरे असे वाटले.
ब्रिटिश सरकार आणि गांधी ह्यांची एकमेकांशी ओळख ( एन्काऊंटर) जुनी होती, दक्षिण आफ्रिकेतली. मी ह्याला serendipity म्हणेन. दोघांनी एकमेकांना बरोबर जोखले होते. तिथल्या कार्यामुळे गांधींभोवती एक जागतिक, तेव्हाचे जग अर्थात, वलय आधीच निर्माण झाले होते. इथे भारतात आल्यावर बुद्धिबळाच्या पटावर गांधी जिंकले हे निर्विवाद. फारेंड म्हणाले तसे त्यांनी ब्रिटिशांना महायुद्धात मदत करावी असे म्हटले नाही हे खरे. पण युद्धकाळात इथे आंदोलने करून ब्रिटिशांना कमकुवत करू नये अशा मताचे ते होते. सैन्यामध्ये जनतेने रंगरूट ( रिक्रूट) व्हावे असे जोरदार आवाहन इतरांनी केले, ते वेगळ्या हेतूने. ( पण कुठल्याही आवाहनाशिवाय जनता ब्रिटिश लष्कर भरतीसाठी तयार आणि उत्सुक होती हेही इतिहासात नमूद आहे. त्याला अर्थात औद्योगिक क्रांतीमुळे कृषीसंस्कृतीची, बलुतेदारीची पडझड अशी वेगळी कारणे होती.) नेताजी आणि गांधी यांच्यातल्या मतभेदाचा मुद्दा हाच होता की सशस्त्र उठावाला निर्दयपणे चिरडण्यात येईल, (तो कठोरपणे दंडनीय असा क्रिमिनल गुन्हा होता.)आपली हानी होईल म्हणून त्या मार्गाने जाऊ नये. त्याला गांधींनी अहिंसेचे नैतिक बळ दिले.
जागतिक परिस्थिती भराभर बदलू लागली ही गोष्ट भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या पथ्यावरच पडली.
असो. ह्या क्षणी ह्या विषयी इतके काही डोक्यात येते आहे की एक लेखमाला होईल. पण अमांची क्षमा मागून पूर्णविराम.
आणि इतर काही जणांना ह्या विषयावर काही लिहायचे असेल तर हे प्रतिसाद वेगळे काढून वेगळा धागा बनवला तर बरे होईल.
एकट्यानेच प्रतिसाद लिहीत बसणे योग्य होणार नाही.

Hira please write all you want . I really admire your post.

हिरा --दुसरे महायुद्ध आणि त्याअनुषंगाने भारतीय स्वातंत्र्ययुद्ध असं आहे त्यामुळे अवांतर नसावेत हे प्रतिसाद
आणि अमा यांनीही लिहा म्हणून सांगितले आहे तर लिहाच
खूप चांगल्या पोस्ट असतात तुमच्या

धन्यवाद अस्मिता

सिंगापुरच्या National Museum मधे एक जपान्यांच्या कौर्या बाबत एक विभाग आहे. ते बघुन वाटल की बर झाल जपान हरले. जर तर ला तसा काही अर्थ नसतो पण जर सुभाष चंद्र बोस जपान्यांना कंट्रोल करु शकले नसते तर. विजयी उन्मादाने जपानने भारतात काय केले असते त्याची झलक दिसते. तेथे INA आणि बोसांवर पण एक विभाग आहे. तो पण छान आहे. खुप सुंदर Museum.
जर सिंगापुरला गेलात तर जरुर भेट द्या. टुरिस्ट पॅकेज मधे हे नसते.

हेच मी सांगत आहे,
असहकार,अहिंसक सत्याग्रह हा गांधी जी नी सांगितलेला मार्ग च अगदी योग्य होता.

. राणीच्या जाहीरनाम्यात त्याचे प्रतिबिंब पडले आहे. त्यांनी सामान्य नागरिकांना शक्यतो त्रास होऊ नये हे पाहिले.
>>> इथेच कुणी तरी बंगाल च्या दुष्काळाबद्दल लिहिले आहे.
- लाखो लोक अन्नावाचून तडफडत असताना ब्रिटिश सैन्याला युद्धासाठी राखीव शिबंदी असावी म्हणून बंगाल व आजूबाजूच्या प्रांतांमधून लाखो टन तांदूळ व इतर धान्ये कलकत्ता बंदरातून रवाना होत होती.
- भारतीय कापडाला युरोपमध्ये प्रचंड मागणी असताना इथला सगळा कापूस मँचेस्टरला जात होता त्यांच्या गिरण्या मालामाल करायला, भारतीय वस्त्रोद्योग सुसंघटीत नसला तरी कच्च्या मालाच्या अभावी नष्ट होत होता.
- रेशीम आणि कापसाची तलम वस्त्रे ज्या भारतात बनत होती तिथे मँचेस्टरवरून आलेले सबसिडाइझ्ड मांजरपाट कापड लोकांना वापरावे लागत होते
- मीठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर कर लादले जात होते.
- साध्या निळीच्या उत्पादनावर भारतीयांचा हक्क राहिला नव्हता.
- युरोपात प्रचंड मागणी असणारे मिरी इ. मसाले जहाजे भरभरून इंग्लंडला रवाना होत होते.
हे लचके तोडणे नाहीतर काय?

ब्रिटिशांनी कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवली असेल तर ती त्यांना त्रास होऊ नये म्हणून, पोस्ट, तार खाते वगैरे आणले ते त्यांचे कम्युनिकेशन चांगले व्हावे म्हणून, रेल्वे आणली ती मालपुरवठा बंदरांपर्यंत सुरळीत व्हावा म्हणून. भारतीय हे कोलॅटरल बेनेफिशिअरी ठरले. रोजगार हमी योजना सुरु करायला मायबाप सरकार इतक्या दूरवरून आले नव्हते.

मुळात भारतात आत्ताच्या आफ्रिकेसारखे प्रचंड पोटेन्शिअल असल्याने भारतावर स्वाऱ्या करून इथली संपत्ती लुटणे हाच उद्देश होता. तो कोणत्याही वसाहतवाद्याने केलाच असता.

जर्मन किंवा जपान्यांनी भारताला मदत केली असती आणि ते युद्धात जिंकले असते तरी -
१. कदाचित ते भारतात आले नसते कारण युद्धात त्यांची हानी झालीच होती, ती भरायला कित्येक वर्षे गेली असती.
२.जिऑग्राफिकली भारत त्यांना जवळ नव्हता व ज्या इमिनंट देशांना त्यांनी हरवले असते ते त्यांना जास्त जवळ (जर्मनीला इंग्लंड, जपानला रशिया इ) होते. तिथे मॅनेज करणे जास्त गरजेचे ठरले असते.
३. हानी वसूल करायला भारतात आले असते तर त्या देशांच्या मदतीने जे सरकार आले असते त्यांना मदतकर्त्यांना झुकते माप द्यावे लागले असते पण सर्वंकष सत्ता जर्मनी किंवा जपानच्या हातात गेली नसती. अर्थात ज्यांनी त्यांना भारतात आणले त्यांच्याविषयी आत्ता जेवढा आदर आहे तो जनसामान्यांना राहिला असता का हा प्रश्न आहेच.

धागाकर्तीची परवानगी मिळाली आहे तर आणखी एक प्रदीर्घ असा लंबा प्रतिसाद पाडायला हरकत नाही.
ब्रिटिशांचे प्रभुत्व हळू हळू कसे वाढत गेले हे पाहाणे रंजक आणि रोचक आहे. ह्याचे मूळ प्रॉटेस्टंट चळवळीमध्ये आणि ह्या चळवळीचे मूळ रीनायसां(स) मध्ये म्हणजे इटलीमध्ये आहे. रिनायसांसच्या उगमाविषयी अनेक तर्क, दावे आणि थिऑऱ्या आहेत. एक तर्क असा होता की धर्मयुद्धांमुळे योरप मध्ये मानवी चलनवलन खूपच वाढले. झुंडीच्या झुंडी कॅथलिक जगताकडून इस्लामी जगताकडे आणि उलट असा मानवी प्रवाह वाहू लागला. संपर्क तर वाढलाच पण प्रदीर्घ प्रवास सुकर करण्याकडेही डोकी लढू लागली. अडचणींवर स्वत:ची स्वतः मात करण्याच्या प्रयत्नात बुद्धीला चालना मिळाली.
दुसरा अधिक प्रबळ दावा म्हणजे Constantinople च्या पाडावाचा. म्हणजे सुमारे दोनशे वर्षे नंतरचा. त्या वेळी ग्रीक विद्वानांचे आणि ग्रीक ज्ञान, तत्वज्ञान कला, भाषा, values ह्या सर्वांचे युरोपात स्थलांतर झाले. कारण बायझंटाईन साम्राज्य हे वस्तुतः: ग्रीको रोमन, ग्रीकच होते. ह्यामुळे मात्र मध्ययुग ढवळून निघाले. निषेधाचे, प्रोटेस्टस् चे सूर उमटू लागले. रोमचे धार्मिक वर्चस्व झुगारून दिले गेले. ह्यात इंग्लंड अग्रणी होते. त्यांनी आपले वेगळे चर्च स्थापन केले. समाज धर्मसत्तेच्या जाचकतेतून मुक्त झाला. धर्मसत्तेची लुडबूड थांबून रोजचे व्यवहार सेक्यूलर झाले. कल्पनेला नवीन कोंब फुटू लागले.
साधारण सतराव्या शतकापासून लंडन मध्ये एका नवीन विचारसरणीची लाट आली. मानवी आणि चतुष्पाद प्राणीजन्य उर्जेहून वेगळ्या, पर्यायी आणि अधिक कार्यक्षम अशा ऊर्जेचा शोध सुरू झाला. आणि काही दशकात नवनवीन शोध लागले. metallurgy, लोह निर्मिती, यंत्रनिर्मिती, त्यासाठीची तंत्रज्ञान निर्मिती, वाफेची शक्ती यांत्रिक शक्तीमध्ये रूपांतरित करणे, यंत्रावर वस्त्रनिर्मिती हे सर्व शक्य झाले आणि इंग्लंड एका वेगळ्याच मार्गावरून धावू लागले. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात ह्या औद्योगिक क्रांतीने कळस गाठला. १८५१ साली प्रिन्स अल्बर्ट आणि राजमंडळातील इतर काहींनी मिळून लंडनमध्ये एक अतिभव्य प्रदर्शन आयोजित केले. त्यात आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचे अनेक चमत्कार मांडले होते. ते पाहायला अनेक देशी परदेशी राजकुटुंबियांनी, नामवंतांनी, प्रतिष्ठितांनी प्रचंड गर्दी केली. ब्रिटनची डोळे दिपवणारी प्रगती युरोपवर अमेरिकेवर विलक्षण प्रभाव पाडून गेली. जगभर ब्रिटनचा दबदबा वाढला. कच्च्या मालाचे पुरवठादार आणि निर्यातीची बाजारपेठ म्हणून वसाहती कामी आल्या. कापसासाठी ईस्ट इंडिया कंपनीला भारत हा पुरवठादार मिळाला. वेळोवेळी त्यात इजिप्त, अरब जगत आणि अमेरिकेची भर पडली. स्टीमर्समुळे ब्रिटन समुद्री व्यापाराचा बादशहा झाला. १८५७ नंतर भारतही राणी विक्टोरियाच्या साम्राज्यात सामील झाला. कच्च्या मालाच्या पैशातूनच आणि स्वतःच्या फायद्यासाठी का होईना कल्याणकारी योजना आणि सोयीसुविधा भारतातही राबवल्या गेल्या. सर्वसामान्य भारतीय खुश आणि अचंबित झाले. सायबाचा पोर नकली रे, बिन बैलांची गाडी त्याने हाकली रे असे पवाडे गाऊ लागले. काठीला सोने बांधून ऐटीत काशीयात्रेला जाऊ लागले. काशीहून गावी खुशालीच्या तारा पाठवू लागले. आप्तेष्टांना भेटण्यासाठी खडतर प्रवास करावा लागत होता तो थोडा सुकर झाला. न्यायात समानता आली.

त्या आधी जुलमी संस्थानिक रयतेला लुटत होते. त्यांनी त्यांना स्वतः ला प्रशासन सुलभतेने करता यावे यासाठी सोयीसुविधा राबवल्या नाहीत. एकाच तऱ्हेच्या गुन्ह्यासाठी समान न्याय राबवला नाही. त्यांची सैन्ये, शिधा सामग्री दारूगोळा हव्या त्या ठिकाणी लवकर पोचावा म्हणून इतरत्र उपलब्ध असे तंत्रज्ञान वापरावे असा विचारही केला नाही. बाहेरच्या जगाची दखल घेतली नाही. ते आपापसातील लढायांसाठी रयतेकडून थेट पैसा वसूल करत होते. गांजलेल्या रयतेला दगडापेक्षा वीट मऊ ह्या न्यायाने इंग्रजी शासन बरे वाटल्यास नवल नाही.
आता उत्तर म्हणून : मसाल्याचा व्यापार शेकडो हजारो वर्षे सुरू होता. रोमन आणि अरब व्यापारी आपल्याकडे येत होते. आपल्याकडचा सरप्लस माल आपण त्यांना विकत होतो. त्यात नवे काही नव्हते.
आणि सोळाव्या शतकाच्या अखेरीस किंवा सतराव्या शतकात मसाल्याचे महत्त्व युरोपीय मार्केटमध्ये अचानक कमी झाले होते. कारण तोपर्यंत चहा, कॉफी, चॉकलेट, तंबाखू असे नवे फ्लेवर्स लोकांना आकर्षित करू लागले होते. शिवाय नवीन ट्रेड रूटस शोधले गेल्याने मसाल्यांची आयात सुलभपणे होऊ लागली होती. मसाले दुर्मीळ राहिले नव्हते, श्रीमंतांपुरते मर्यादित राहिले नव्हते. त्यांच्या ऐवजी कापूस आणि चहा कॉफी सारखे पदार्थ आणि काही ठिकाणी गुलामही आयात केले जाऊ लागले होते.
एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पूर्वापार पश्चिमेकडून सात समुद्र ओलांडून त्यांचे व्यापारी आग्नेय आशियात ( दक्षिण पूर्व) येत होते. आमचे व्यापारी तिकडे फारसे जात नव्हते. पूर्वेकडे मात्र चोळा, खारवेल, कलिंग राजवटी प्रसरण पावल्या होत्या.

जर्मनीने दुसर्‍या महायुद्धाच्या आधी आणि दरम्यान काय केलं ते सर्वज्ञात आहे . ते खोटं आहे, असं मानणारेही लोक आहेत म्हणा.
जपानने जे काय दोन तीन वर्ष अंदमान बेटं ताब्यात ठेवली तिथे किती लोकांना आणि कशा प्रकारे मारले हे मात्र क्वचितच माहीत असतं.
अन्यत्र जपानी सैन्याने लाखो लोकांना ठार केलं. यात भारतीयही होते. स्त्रियांना सेक्स स्लेव्ह म्हणून वापरलं. माणसांना मारून खाल्लं. वेदना सहन करण्याच्या क्षमतेचे प्रयोग युद्ध कैद्यांवर केले. ब्रिटिश संत होते असं कोणी म्हणत नाही. पण तुलनेने बरेच सिव्हिल होते.

तसंही दुसर्‍या महायुद्धानंतर भा रताला स्वातंत्र्य मिळालंच. जपान जर्मनी जिंकते तरीही ते मिळतंच आणि आपण आगीतून निघून फुफाट्यात पडलो नसतो याबद्दलचा विश्वास मात्र विचारात पाडतो. समजा तसं झालं असतं तर काय होणार होतं? भारतात काहींना न आवडणार्‍या राज्यकर्त्यांऐवजी दुसरे राज्यकर्ते आले असते. पण ते संपूर्णपणे वेगळे असते का? नेताजींनी आपल्या पलटणींची नावं काय ठेवली होती माहीत असेलच.

भारताचा पुढचा प्रवास फार वेगळा झाला असता असं वाटत नाही. नेताजी सेक्युलर होते. नेहरूंपेक्षा अधिक डावे होते. नेहरूंइतकेच लोकशाहीवादी होते. freedom implies not only emancipation from political bondage but also equal distribution of wealth, abolition of caste barriers and social inequalities and destruction of communalism and religious intolerance त्यामुळे नेताजी स्वतंत्र भारताचे पंतप्रधान झाले असते तर काहींकडून नेहरूंच्या वाट्याला आला तोच द्वेष त्यांच्या वाट्यालही आला असता. त्यात त्यांची पत्नी भारतीय नसल्याची भर पडली असती. अगदी पटेल जरी सर्वोच्च नेते झाले असते तरी त्यांनाही या गटाकडून द्वेषच मिळाला असता.

गांधी नेहरूं ऐवजी नेताजी भारताचे सर्वोच्च नेते ठरले असते तर फाळणी झाली नसती का?

मला वाटतं, फाळणी अनिवार्य होती. ती रक्तरंजित झाली नसती तर बरं झालं असतं.

भरत यांचा २८/७, ९-२९ हा प्रतिसाद खूप आवडला. नेताजी तर radical communist होते. ते उजव्यांना झेपले नसतेच. आणि परदेशी फिरंगी पत्नीचा मुद्दा होताच.

ब्रिटिश विरोधी देशाच्या शक्ती च्या मदतीने स्वतंत्र मिळवले असते.
ब्रिटिश विरोधी देशाच्या लष्करी ताकतीचा वापर करून स्वतंत्र मिळाले असते.
तर भारत ब्रिटिश कडून मुक्त झाला असतां.
पण मदत करणाऱ्या देशांच्या अधीन झाला असता.
बोस ह्यांना स्थिती थांबवता आली असती का?
हा दुसरा प्रश्न आहेच

विषय खूप किचकट आहे.
पण ब्रिटिश अभिनंदनास पात्र आहेत.
भारतात स्वतंत्र पूर्व पण जाती धर्म हा विद्वेष होताच .
मुस्लिम ना नी अगदी तुर्की ची पण मदत घेण्याचे प्रयत्न केले होते.
भारतात ब्रिटीश काळात च काही प्रतिनिधी हिंदुस्तान मधून निवडणुका घेवून नेमले जात होते.
मग मुस्लिम साठी वेगळे राखीव संघ ,बाकी जाती साठी वेगळे .
हे सर्व खेल खेळून झाले होते.
प्रशासन व्यवस्था,लष्करी व्यवस्था ही ब्रिटिश सरकार नीच देशात निर्माण केली होती.
त्या साठी देशाचे संविधान असावे ही कल्पना पण त्यांचीच होती..
सर्व काही व्यवस्थित झाल्यावर च त्यांनी देश सोडला .
त्यांनी काहीच व्यवस्था न लावता देश सोडला असता तर.
भारतीय राजकीय पक्षांना भारतात योग्य राज्य व्यवस्था निर्माण करताच आली नसती.
हे पण कटू सत्य च आहे.
आपसात च भांडून सर्व सत्यानाश नक्की झाला असता.
दोन्ही महायुद्ध,ब्रिटिश न चे भारतावर राज्य, ह्या दोन घटना घडल्या म्हणून आज च लोकशाही असणारा भारत निर्माण झाला
असे खेदाने म्हणावे लागत आहे

मोलाची माहिती आणि मतं मांडली जात आहेत, त्याबद्दल सर्वांचे अनेक आभार.
हे सगळं पुन्हा नीट सावकाशीने वाचायला हवं आहे.

आता पुन्हा धाग्याच्या शीर्षकाकडे.
The Great Escape
Battle of Britain
A Bridge too far
The Devil's Brigade
Battle of El Alamein
Ehere Eagles Dare
Summer of 42
Dinkirk
The Pianist
The Dirty Dozen
Saving Private Ryan
Fiddler on the roof.
Escape from Sobibor
ह्यातली काही नावे आधी सुचवली गेली असण्याची शक्यता आहे.

Pages