द्वितीय विश्व महा युद्ध : संदर्भ ग्रंथ, चित्रपट, डॉक्यु मेंटरीज इत्यादी.

Submitted by अश्विनीमामी on 24 July, 2023 - 04:13

दुसर्‍या महायुद्धा वर काढलेले चित्रपट, लिहि लेली पुस्तके डॉक्युमेंटरीज ह्यांची यादी.
१) चर्चिल हिटलर अँड अ‍ॅन अन नेसेसरी वॉर लेखक पॅट्रिक बुकॅनन
२) जन रल हाइ न्झ गुडेरिअन पँथर लीडर. जनरल गुडेरिअन
३) द सेकंड वर्ल्ड वॉर अ‍ॅण्टोन बीव्हर.
४) द सेकंड वर्ल्ड वॉर्स विक्टर डेविस
५) राइज अँड फॉल ऑफ द थ र्ड राइख. शीअरर.
६) मोसाद मायकेल बार झोहार.
७) जेरुसलेम सायमन सीबाग माँटेफिअरे.

विकिपी डिआ ऑन सेकंड वर्ल्ड वॉर. ह्यात बाकीच्या मेजर लढायांच्या लिंक्स आहेत.
नेट फ्लिक्स वरः मालिका वर्ल्ड वॉर २ इन कलर, हिटलर्स सर्कल ऑफ इव्हिल. मेजर इवेंट्स इन वर्ल्ड वॉर टू.

ह्या पुढे युट्युब वर भरपूर उपलब्ध आहे.
द पीपल्स प्रोफाइस म्हणून एक चॅनेल आहे. त्यात प्रत्येक मेन नेत्याची माहिती आहे.

अजून अपडेट करेन.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समजा जर्मनी जपान जिंकले असते तर....भारताच्या दृष्टीने काय फरक पडला असता....
माझा तर्क आहे बराच. आणि त्यासाठी दोन थिएरीज आहेत. प्रत्यक्षात कसे काय घडले असते कोणीच सांगू शकत नाही. पण त्यातल्या त्यात ..

समजा जर्मनी जपान जिंकले असते अर्थात ब्रिटीश हरले असते तर १९४७ ऐवजी ४३-४४ मध्येच भारत स्वतंत्र झाला असता. आणि चले जावची १९४२ ची हाक आणि ब्रिटीश सोडून जाणे एकपाठोपाठ घडल्याने भारतीय उपखंडात अभूतपूर्व गोंधळ माजला असता. असेही ४७ ला जातानाही फाळणी करून आणि सगळीकडे विनाशाची बिजे रोवून ब्रिटीश गेले. तोच काहीसा प्रकार ४३ मध्ये झाला असता किंवा अशी शक्यता आहे की अजून बजबजपुरी माजली असती.
स्वातंत्र्यासोबतच सरदार पटेल यांनी कठोर पावले उचलत सगळ्या संस्थानिकांना भारतात विलिनीकरण व्हायला भाग पाडले. हीच परिस्थिती ४३ मध्ये असण्याची शक्यता नव्हती. कारण ब्रिटीश आधीच हरल्याने, तुमचा गोंधळ तुम्हीच निस्तरा करत बोट पकडून मायदेशी निघून गेले असते. त्यामुळे संस्थानिकांनी पुन्हा आपापली सत्ता स्थापन करण्याचा कसोशीने प्रयत्न केला असता. त्यात प्रामुख्याने हैदराबादचा निजाम, म्हैसूरचा राजा, काश्मिरचा राजा हरिसिंग आणि राजपुताना ही संस्थाने त्रासदायक ठरली असती आणि अशी दाट शक्यता आहे आता दिसतोय तसा एकसंघ असा भारत न होता कदाचित चार किंवा पाच राष्ट्रात विभागला गेला असता.
त्यात बलुचिस्तान, पाकिस्तान, काश्मिर, राजपुताना, हैदराबाद, त्रावणकोर, म्हैसुर अशी राष्ट्रे असली असती. अर्थात ही एक शक्यताच. कदाचित तेव्हाही कडक धोरण अमंलात आणले असते तर एकसंघता आली असती पण पाकिस्तान होणे तेव्हाही टाळता आले नसते कारण मुस्लिम लीग तेव्हाही भरात होती (१९४२-४३ साली)
समजा भारत विविध राष्ट्रात विभागला गेला असता तर काय झाले असते. आता बोस्निया, सर्बिया आणि बारीक बारीक देशात सतत धुसफुस सुरु असते आणि सतत सगळे युद्धसज्ज अवस्थेत असतात तसे झाले असते का युरोपियन महासंघाप्रमाणे सीमारेषा वेगळ्या पण सगळ्यांनी कालांतराने एकच चलन, एकच शेंगेन व्हिसा असे धोरण स्वीकारले असते हे सांगणे अशक्य आहे

विजेत्या राष्ट्रांना जर्मनी आणि जपानसाठी भारतीय उपखंडाचे फार महत्व नव्हते. भारतात सैन्य ठेवून ते पोसत बसण्यापेक्षा भारताशी राजनैतिक संबध ठेवून तिथून व्यापार आणि दळणवळण सुरु ठेवणे आणि आपल्या गोटात भारताला वळवून घेणे जर्मनीने जास्त पसंत केले असते. जपाननेही पूर्ण भारतावर कबजा करण्यापेक्षा फिलिपाईन्स, इंडोनेशिया सोबत भारताचा इशान्यपूर्व प्रदेश खाल्ला असता, तो खाली बांगलादेश, म्यानमार असा सगळाच. दुसऱ्या महायुद्धात जपानी सैन्य तिथवर आलेच होते. त्यामुळे खुशीने जपानने त्यावर आपला कबजा केला असता. त्यामुळे भारतीय सीमारेषा कलकत्तापाशी संपली असती आणि जपान आपला शेजारी असता. असेही भारतीय कट्टर हिंदुंना आर्य आणि स्वस्तिकामुळे हिटलरशी जवळीक वाटत होतीच. त्यानिमित्ताने त्यांनी आपला दबदबा वाढवण्याचा प्रयत्न केला असता. पण त्यांना फार यश मिळाले असते असे वाटत नाही कारण हिटलरला या लोकांची काडीमात्र किंमत नव्हती. त्याने तसे लिहूनही ठेवले आहे.

आता समजा विभाजन झाले नाही आणि एकखंड असा भारत देश निर्माण झाला असता १९४३ साली तर त्याचे आजचे स्वरुप कसे झाले असते? अमेरिका आणि रशियाच्या कोल्ड वॉर मध्ये रशियाने भारताला त्याच्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न केला तर अमेरिकेने पाकिस्तानला पंखाखाली घेतले. हा प्रकार जपान आणि जर्मनीबाबत होण्याची शक्यता फार कमी होती.
अमेरिकेईतका मुस्लिम द्वेष जर्मनीच्या वाट्याला आला नसता आणि अफगाणीस्तानमध्ये राडा करण्याईतका रशियाला जोर नसता. त्यामुळे अल कायदा, लष्कर किंवा अन्य घातकी संघटनांना पैसै पुरवून मोठे करणारा हात आधीच आखडता घेतल्याने कदाचित परिस्थिती आत्तापेक्षा बरी असली असती.
किंवा मग उलटही झाले असते, ब्रिटन-फ्रान्स-अमेरिका आणि रशियाने एकत्रितपणे अशा संघटनाना उभे करून त्यांना जर्मनीवर सोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला असता. मध्यपूर्व, बाल्कन राष्ट्र आणि दक्षिण युरोपमध्ये या सगळ्याचा भडका उडाला असता.
ब्रिटन आणि फ्रान्स पराभूत असताना युरोपात शांतता कधीच नांदली नसती. आणि एक अगदी दूरस्थ शक्यता अशी की पराभूत झाल्यावरही ब्रिटीशांनी भारताचा कबजा सोडला नसता आणि उलट जर्मनीशी लढण्यासाठी एक लॉंचपॅड म्हणून कॉमनवेल्थ देशांचा भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया यांचा वापर केला असता. रॉ मटेरियल, मनुष्यबळ आणि पैसा या देशांकडून ओरबाडत त्यांच्याच जीवावर जर ब्रिटीश युद्ध रेटत राहीले असते तर जर्मनी - जपानने युद्ध भारतीय उपखंडात आणून इथली शहरे बेचिराख केली असती.
आणि मग ते महायुद्ध फारच व्यापक आणि सर्वनाशी ठरले असते.

युरोपीय देशांचा वसाहतवाद आपण अनुभवला . पण जपानच्या वसाहतवादाबद्दल आपल्याला फार कमी माहीत आहे. जपान आणि जर्मनी या दोन्ही देशातील राज्यकर्ते वंशश्रेष्ठत्व मानणारे होते. जपानी सैन्याच्या क्रौर्याचा अनुभव आपल्या पूर्वेकडच्या भागाने घेतला. अंदमाननेही घेतला.

जपानी सैन्याच्या क्रौर्याचा अनुभव आपल्या पूर्वेकडच्या भागाने घेतला. अंदमाननेही घेतला.>> चीन व कोरी आ पण. बीजिन्ग मसॅकर ची फिल्म पण बघवत नाही.

चीन व कोरी आ पण. बीजिन्ग मसॅकर ची फिल्म पण बघवत नाही.>>>
होय अत्यंतिक क्रूरपणा, तान्ह्या मुलांना फरशीवर आपटून मारणे त्यांच्यासाठी किरकोळ होते
पॅसिफिक मधेही मृत अमेरिकन मरिन्सच्या देहांची विटंबना करणे, डोकी कापून त्यात गुप्तांग खुपसून ठेवणे अनेकदा झालं आहे, अनेक मरिन्स नी त्याचा उल्लेख केला आहे
चीन मध्ये नाझीना लाजवेल इतकी क्रूरतेची सीमा पार केली होती त्यांनी

तेच नंतर चीन ने तिबेट मध्ये केलं

तेच कशाला रशियन काय वेगळे होते? आपल्याच नागरिकांना त्यांनी जे काही हाल हाल करून मारलं आहे त्याची वर्णने वाचून शहारा येतो

युरोपियन आणि जपान बद्दल थोडीफार माहीत आहे पण इतकाच क्रूरपणा आफ्रिकेतील राष्ट्रात झाला आहे, लहान मुलांना भरती करून घेतानाच त्यांना पहिली टास्क दिली जायची की पहिल्यांदा आपल्या आई वडिलांची मशिननगने चाळण करा
Beasts of no nation
First they killed my father

या संदर्भातील काही सिनेमे
मी पूर्ण बघूच शकलो नाही हे

Patton - जनरल Patton वर काढलेला सिनेमा. जॉर्ज स्कॉट चा अतिशय उत्तम अभिनय.

" ब्रिटन आणि फ्रान्स पराभूत असताना युरोपात शांतता कधीच नांदली नसती" +१११
आशु चॅम्प, प्रतिसाद आवडला.
भारतावर जपान जर्मनीचे राज्य आले असते तर तोपर्यंत परकीयां विरुद्ध हिरीरीने संघर्ष करणाऱ्या अखंड भारतीय प्रजेने काय केले असते? नव्या परकीयांना खुशीने स्वीकारले असते? शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ह्या न्यायाने? कारण नेताजींनी जपानची मदत घेतली होती आणि पर्यायाने त्यांना मदत केली होती.

" ब्रिटन आणि फ्रान्स पराभूत असताना युरोपात शांतता कधीच नांदली नसती" +१११
आशु चॅम्प, प्रतिसाद आवडला.
भारतावर जपान जर्मनीचे राज्य आले असते तर तोपर्यंत परकीयां विरुद्ध हिरीरीने संघर्ष करणाऱ्या अखंड भारतीय प्रजेने काय केले असते? नव्या परकीयांना खुशीने स्वीकारले असते? शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ह्या न्यायाने?
नेताजींनी जपानची मदत घेतली होती आणि पर्यायाने जपानला त्यांची मदत झाली होती.

प्रतिकार तर आपण केलाच असता. रशियाच्या अत्याचारांनी गांजलेल्या युक्रेनमधल्या कित्येक नागरिकांनी जेव्हा जर्मनीने रशियावर आक्रमण केले तेव्हा त्यांना अन्नधान्य देऊन स्वागतच केले, शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने, पण नाझी विचारसरणीने झिंगलेल्या जर्मन्ससाठी ते फक्त स्लाव लोकं होते आणि त्यांनी रशिया काय करेल इतके दुप्पट अत्याचार केले. परिणामी रशियन आघाडीवरून मार खात माघारी जाणाऱ्या जर्मन्सची लांडगेतोड करण्यात याच लोकांचा मोठा वाटा राहीला....

जर्मन्स किंवा जपानी यांच्यापेक्षा ब्रिटिश कधीही चालले असते. निदान त्यांनी असहकार, दांडी मोर्चा, जेलभरो असले काही होऊ दिले. ब्रिटीशांच्या जागी जर्मन्स असते तर पहिल्याच आंदोलनानंतर महात्मा गांधी, नेहरू आणि अन्य कॉंग्रेस नेत्यांना फायरिंग स्क्वाडसमोर उभे करून गोळ्या घातल्या असत्या.

त्यामुळे पुढचं सगळं बासनातच गुंडाळून ठेवावं लागलं असतं. जर्मन्स आणि जपान्यांना नमवायला केवळ आणि केवळ सशस्त्र प्रतिकार हा एकमेव पर्याय राहीला असता.

ब्रिटिश काळात सशस्त्र प्रतिकाराचे अनेक फुटकळ, sporadic आणि हिंसक प्रयत्न ब्रिटिशांनी हाणून पाडले. त्यात गुंतलेल्यांना कठोर सजा फरमावल्या. अहिंसक आंदोलनापुढे मात्र ते नमले. दुसरे महायुध्द आणि नौसेनेचे बंड हे सुध्दा कारणीभूत ठरले पण निर्णायक विजय अहिंसक आंदोलनाचा होता. सशस्त्र प्रतिकाराला लोकांकडून अगदीच कमी प्रतिसाद मिळाला. ती लोकचळवळ ठरली नाही.
तर त्या सुरुवातीच्या काळात प्रसारमाध्यमे आणि आवाजी संपर्क दळणवळण उपलब्ध नसताना भारतीय जनतेकडून अशी सशक्त, सशस्त्र लोकचळवळ उभी राहिली असती का आणि सातत्य दाखवून टिकली असती का असे तियाननमेन चौक घटनेच्या पार्श्वभूमीवर मनात येते.

काही सांगता येत नाही. उलट हिटलरने दोस्त राष्ट्रांचा इतिहास वाईट दाखवण्याची संधी साधावी म्हणून भारत आणि इतर देशांना स्वतःहून स्वातंत्र्य दिलं असतं आणि आपल्याला कायम उपकारांच्या ओझ्याखाली ठेवलं असतं. फाळणी कदाचित झाली नसती. पण तीच पुढे डोकेदुखी ठरू शकली असती. महायुद्ध आणि स्वातंत्र्य दोन्हींचा इतिहास वेगळा लिहिला गेला असता आणि रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले हेच सर्वांनी ठासून सांगितलं असतं. जसे आपण सध्या टिळक वगैरे जहाल मतवादी लोकांना विसरून गेलो आहोत, तसे मवाळ मतवादी लोक आणि त्यांच्या कार्याला विसरून गेलो असतो. (ते आताही होऊ शकतं म्हणा, पण ते असो.)

ब्रिटिश काळात सशस्त्र प्रतिकाराचे अनेक फुटकळ, sporadic आणि हिंसक प्रयत्न ब्रिटिशांनी हाणून पाडले. त्यात गुंतलेल्यांना कठोर सजा फरमावल्या. अहिंसक आंदोलनापुढे मात्र ते नमले.>>> आपण काय केलं असतं हा मोठा प्रश्नच आहे
कारण युद्ध संपेपर्यंत जर्मनव्याप्त देशात हे वरती उल्लेख केले आहेत तसे अनेक सशस्त्र प्रतिकाराचे असंख्य प्रयत्न होऊनही ते स्वतंत्र होऊ शकले नाहीत, जनरल गॉल ने तर पूर्ण सेना उभी केली होती, पोलंड आणि नॉर्वे मध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कडवा लढा दिला जात होता पण हे सगळं अफाट लष्करी ताकदीसमोर निष्प्रभ ठरले आणि रशिया अमेरीकेने जर्मनीला पिटाळून लावले म्हणूनच हे देश स्वतंत्र झाले

त्यामुळे कितीही म्हणलं देशाभिमान वगैरे तरी निव्वळ हिंसक मार्गाने स्वतंत्र होऊच शकलो नसतो, अहिंसक तर विषयक नाही, ते एरवीही झालं नसत, जर्मनीने ब्रिटिशांचे कंबरडे मोडलं नसतं आणि नाविकदलाने बंड पुकारले नसतं तर ब्रिटिश आरामात अजून काही वर्षे भारतात राहिले असते
चले जावं आणि बाकी चळवळी सुरूच राहिल्या असत्या

रिटिश काळात सशस्त्र प्रतिकाराचे अनेक फुटकळ, sporadic आणि हिंसक प्रयत्न ब्रिटिशांनी हाणून पाडले.
>>>> १८५७ ला विसरू नका. कुठलाच ऑफिशिअल मिडीआ नसण्याच्या जमान्यातला तो उठाव स्पोरॅडीक नक्कीच नव्हता, नी जालियांवाला बाग - तिथे तर अहिंसक विरोधासाठीच लोकं जमली होती ना?
ब्रिटीशांनी प्रचंड दमननिती अवलंबिली होती. फक्त त्यांनी मवाळ पुढार्यांना नजरेत भरतील अश्या हिंंस्त्र शिक्षा केल्या नाहीत. यातही त्यांचा स्वार्थच होता. कारण त्यांच्याशी चर्चा करून जनमानसातला राग कुकरच्या शिट्टीसारखा रिलीज करता येत होता. पूर्ण कम्युनिकेशन चॅनेल ब्रेक झाले असते तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती.

कितीही म्हणलं देशाभिमान वगैरे तरी निव्वळ हिंसक मार्गाने स्वतंत्र होऊच शकलो नसतो, अहिंसक तर विषयक नाही, ते एरवीही झालं नसत, जर्मनीने ब्रिटिशांचे कंबरडे मोडलं नसतं आणि नाविकदलाने बंड पुकारले नसतं तर ब्रिटिश आरामात अजून काही वर्षे भारतात राहिले असते
चले जावं आणि बाकी चळवळी सुरूच राहिल्या असत्या
>>>> + १०००

जर अमुक झाले असते तर तमुक झाले असते. भूतकाळातील गोष्टी ह्या जशा घडल्या तशा घडल्या नसत्या ह्याचे अन्दाज बांधणे एक निव्वळ कल्पनाविलास आहे. ते सिद्ध करायचा कुठलाही उपाय नाही. उदा. जपान जिंकले असते तर. मग अणूबॉंब टाकला गेला असता असे मानले का
तो टाकलाच नाही असे समजायचे? जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला असे गृहित धरले आहे का नाही? पुन्हा एकदा युद्धाचा सारिपाट मांडून नव्याने काल्पनिक इतिहास बनवायचा हे सोपे नाही.

ब्रिटिश सरकार हे खूप दयाळू होते असे मानणार्यांसाठी. १९४३ साली बंगालमधे महाप्रचंड दुष्काळ पडला होता. चर्चिल हा त्यावेळेस ब्रिटिश पंतप्रधान होता. त्याला भारतीय लोकांबद्द्ल प्रचंड वर्णद्वेष होता. त्याने बंगालला जास्तीचे अन्नधान्य पुरवायला नकार दिला. टोलवाटोलवी केली. युद्धाची सबब पुढे केली. ह्या दुष्काळात साधारण ३० लाख लोक मेले. ह्या बर्‍याचशा मानवनिर्मित दुष्काळाचे श्रेय ब्रिटिश सरकारला जाते.

तोच प्रकार फाळणी झाली नसती तर काय् ह्याचा. बहुतेक लोक फाळणी हे कसे एक छुपे वरदान होते वगैरे सांगत असतात. बहुधा काँग्रेसचे हे पाप थोडे सौम्य करावे असाही उद्देश असेल! पण फाळणी झाली नसती तर कदाचित केंद्र इतके प्रबळ झाले आहे तसे न होता कदाचित अमेरिकेसारखे काही बनले असते. आजच्या पाकिस्तान भागात उद्योग धंदे विकसित झाले असते तर कदाचित इतके धर्मांधपण वाढले नसते. पण हे सगळे आपल्या कल्पनेनेच ठरवावे लागेल. ह्याला सिद्ध करणे अशक्य आहे.

दुसर्‍या महायुद्धावर आधारित हॉलिवूड सिनेमे असतात त्यात बहुतेक वेळा जर्मन हे अत्यंत मूर्ख , भोळसट इ. दाखवले जातात. इंडियाना जोन्स, गन्स ओफ नॅव्हेरोन आणि त्याचा पुढचा भाग (फोर्स १० फ्रॉम) ही उदाहरणे आहेत. जिंकलेला पक्षच इतिहास लिहितो हे पुन्हा एकदा सिद्ध होते.

ब्रिटिश सरकार हे खूप दयाळू होते असे मानणार्यांसाठी>> असं कोणी म्हणतच नाहीये
निदान वरच्या चर्चेत तरी

ब्रिटिशांनी 1867 चे बंड शमवताना केलेले अत्याचार हे वर्णन करण्यापलीकडे आहेत
पुजार्यांना रक्त जिभेने चाटायला लावून मग मारणे, गावेच्या गावे जिवंत जाळून मारणे, बाहेर येऊ पाहणाऱ्या मुलांना बायकांना सांगिनेने खुपसून मारणे, हे करत असताना गाणी म्हणणे
त्यामुळे ब्रिटिश दयाळू वगैरे होते असा कुणाचाच समज नसावा

मुद्दा हा आहे की त्यांनी या चळवळी करू दिल्या, तुलनेने सौम्य शिक्षा दिल्या
हे जर्मनी जपान ने केलं नसतं

Hi please listen to the podcast Empire on Spotify to know about British behaviour across the board.

काँग्रेस हा सेफ्टी व्हाल्व होता त्यामुळे काँग्रेसला ब्रिटिश सरकारने विरोध केला नाही. आपल्याला परवडेल इतपत विरोध करणारे काँग्रेस इंग्रजांना अर्थातच श्रेयस्कर होते. दुसर्‍या महायुद्धात देखील महान अहिंसावादी गांधींनी हे मान्य केले की भारताने युद्धात ब्रिटिशांच्या बाजूने लढावे. दुसरीकडे क्रांतिकारक लोकांना फाशी, काळेपाणी, जन्मठेप असेच शासन मिळत असे. तुरुंगात गुलाबाची झुडुपे लावा, हलका व्यायाम, खेळ, वाचन असले चोचले फक्त कॉंग्रेसी नेत्यांना उपलब्ध होते.
दुसरे महायुद्ध जपान व जर्मन देशानी जिंकले असते तरी त्यांचे इंग्रजांसारखे दूरवर पसरलेले साम्राज्य नव्हते. हजारो मैल दूरच्या वसाहतीचा कारभार हाकण्याची यंत्रंणा त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे भारतात नाझी राज्य आले असते वा जपानच्या सम्राटाने राज्य केले असते असे मला तरी वाटत नाही. सुभाष चंद्र बोसांसारखा जास्त लायक माणूस नेहरुंच्या ऐवजी सत्तेवर आला असता तर कदाचित धोरणे वेगळी राबवली गेली असती. कदाचित नेहरु गांधी घराणे नको इतके डोईजड बनले नसते. (अर्थात हाही कल्पनाविलासच!)

एका दिवाळी अंकात दोस्त राष्ट्रच कशी युद्धपिपासू होती, हिटलर कसा बिचारा हे सांगणार्‍या आगामी मराठी पुस्तकातलं एक प्रकरण होतं. हिटलरने ज्यु संहार बिंहार केला नाही हे सिद्ध करणारं त्याच लेखकाचं आणखी एक पुस्तक येणार होतं. दिवाळी अंकांवरचे धागे पुन्हा चाळून लेखकाचं नाव इथे देतो. त्याचा माहितीचा स्रोत इंटरनेटवरची दुर्मीळ पुस्तकं असा काहीतरी होता. हिटलर फॅन्सना नक्की आवडतील.

नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग. कानिटकर पण थोडे हिटलरची भलावण करणारे वाटले. पण त्या पुस्तकाने दुसर्या महायुद्धाचा इतिहास जाणुन घ्यायची इच्छा बळावली.
encyclopedia Britannica चे दोन खंड आहेत दुसर्या महायुद्धावर ते मुलांना वाचायला चांगले आहेत.

<<दुसर्‍या महायुद्धात देखील महान अहिंसावादी गांधींनी हे मान्य केले की भारताने युद्धात ब्रिटिशांच्या बाजूने लढावे. >>
मला तर ही भूमिका फारच दूरदर्शीपणाची वाटते. हिटलर आणि मुसोलिनीविरुद्ध लढताना ब्रिटनचे कमकुवत होणे हे पुढे जाऊन भारताच्या फायद्याचे ठरणारे नव्हते. १९४३-४४ पर्यंत जपानी सैन्य भारताच्या उंबरठ्यापर्यंत पोचले होते. ब्रिटनने जपानविरुद्ध लढून जपानला नामोहरम करावे हे योग्य ठरले असते.
इतर नेत्यांच्या तुलनेत गांधींच्या निर्णयक्षमतेबद्दल आणि द्रष्टेपणाबद्दल मला वैयक्तिक रीत्या आदर आहे.

दुसर्या महायुद्धाच्या वे़ळेस गांधींनी ज्यू लोकांना असा सल्ला दिला होता की नाझी लोकांच्या हल्ल्याला शांतपणे सहन करा. ते तुम्हाला ठार मारतील तर तुम्ही शांतपणे मरण स्वीकारा. त्यांनी अत्याचार केले तर ते आनंदाने सहन करा. वगैरे वगैरे. असला दिव्य उपदेश ज्यू लोकांना देणारा महात्मा काँग्रेसने ब्रिटिशांना युद्धात सहाय्य करणे कसे मान्य करु शकला? आपले आमरण उपोषणाचे अस्त्र का नाही वापरले?
त्यांचे दिव्य अहिंसक तत्त्वज्ञान जे ते बळी जाणार्‍या ज्यूंना पाजत होते ते यावेळी कुठे गेले?
अहिंसेचे खूळ हे हवे तिथे वापरायचे आणि हवे तिथे गुंडाळून ठेवायचे हा काय प्रकार आहे?

हुकूम शाह आणि साम्राज्य वादी अत्यंत क्रूर असतात

कंबोडिया, जर्मनी,जपान नी चीनाध्ये केलेली कत्तल.
North Korea च hukum Shah.
लोकांनी हिंसक विरोध केला तर पूर्ण नाश करून टाकतील जनतेचा.
जगात एक पण उदाहरण नाही हुकूम शाह विरुद्ध हिंसक विरोध करण्याचा
गांधी जी च ऐकले नसते आणि हिंसक विरोध ब्रिटिश सरकार
ला केला असता तर लाखो लोका ना यम सदनी त्यानी पाठवले असते
आता जे निवांत बसून सांगत आहेत ना ब्रिटिश सरकार विरुद्ध सशस्त्र विरोध केला पाहिजे होता.
ते अज्ञानी आहेत.
जगा वर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सरकार नी भारताचा समूळ नाश पण केला असता.
इतके ब्रिटिश सरकार powerfull होते.
गांधी जी नी योग्य दिशा दिली होती स्वतंत्र लढ्याला .
शांतेतेने विरोध,सत्याग्रह,असहकार.

जगा वर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सरकार नी भारताचा समूळ नाश पण केला असता.>>> कसा काय? त्यांच्याकडे काय अणुबॉम्ब होता का ब्रिटन वरून विमाने उडत येऊन भारतावर हल्ले करणार होती

अहिंसक लढ्याला आरामात खतपाणी घालत ब्रिटिश अजून कैक वर्षे राहिले असते
पण महायुद्धात सडकून नुकसान झाल्याने आणि नाविक दलाने बंड केल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली, हीच लागण लष्करात झाली तर 1857 ची पुनरावृत्ती होईल या भीतीने पळाले ते

अकख्या इतिहासात एक तरी निर्णय ब्रिटिश सरकारने अहिंसक लढ्याला नमुन घेतल्याचे वाचनात नाही
मग भारत सोडण्याचा इतका मोठा निर्णय घेतील हे संभवतच नाही

दुसर्‍या महायुद्धात देखील महान अहिंसावादी गांधींनी हे मान्य केले की भारताने युद्धात ब्रिटिशांच्या बाजूने लढावे >>>

ही माहिती चुकीची आहे. दुसर्‍या महायुद्धात गांधीजींनी ब्रिटिशांच्या बाजूने भारतीयांनी लढावे असे मान्य केले नव्हते. उलट विरोधच केला होता.

हिटलर आणि मुसोलिनीविरुद्ध लढताना ब्रिटनचे कमकुवत होणे हे पुढे जाऊन भारताच्या फायद्याचे ठरणारे नव्हते.>>>
ब्रिटनने न विचारताच भारताला लुबाडून या युद्धात गोवले होते
25 लाख सैनिक रक्त गाळत यांची सेवा करत होतेच शिवाय कित्येक लाख टन तिंबर, अन्न धान्य, सोने नाणे आणि जे जे काय लुटता येईल ते लुटून ब्रिटनने त्यांचा लढा चालवला
युरोपातल्या दोन देशांच्या झगड्यात आम्ही काय म्हणून हिंसक व्हायचं आणि आमच्या सैनिकांचे बळी द्यायचे, हा प्रश्न काही गांधीजींना विचारता आला नाही
इतर वेळी अहिंसेचा अतिरेक करताना इथं मात्र खुशाल हिंसेला परवानगी
या युद्धात लाखभर भारतीय सैनिक मरण पावले, त्यांचे मरण इतकं स्वस्त होतं का, की त्या बदल्यात या काँग्रेसी नेत्यांना काहीच म्हणजे काहीच पदरात पडता आले नाही?
डोईजड झाली होती ही सैनिक संख्या?

यात कसलाही धुर्तपणा नव्हता, निदान आता तरी ब्रिटिश सरकार दयाळू होऊन आपल्याला स्वतंत्र करेल अशी भाबडी लाचारी होती

आणि सो कॉल्ड दयाळू ब्रिटिश सरकार आपल्या वसाहतींचा इतका फायदा उठवूनही त्यांना स्वतंत्र करायला काही राजी नव्हती

अडचणीत सापडलेल्या ब्रिटींशना आपले म्हणणे ऐकायला लावण्याची ही सुवर्णसंधी होती
ती आपण आपल्या कर्मदरिद्री पणाने घालवली

सा काय? त्यांच्याकडे काय अणुबॉम्ब होता का ब्रिटन वरून विमाने उडत येऊन भारतावर हल्ले करणार होती

काही पण जोक करत आहात.ब्रिटिश सरकार नी भारताला गुलाम बनवले होते इथे त्यांची सत्ता होती.
.
अतिशय power फुल ब्रिटीश सरकार होते.
आणि भारतीय लोकांची अवस्था अत्यंत दीनवाणी होती.
असंख्य भारतीय च ब्रिटिश लोकांचे हस्तक होते.आणि जे हस्तक होते तेच थोडे फार आर्थिक बाबतीत ठीक होते.
गरीब,दीन दुबळा भारत होता.
ह्यांना मातीत मिळवण्यासाठी अणू बॉम्ब ची गरज च नव्हती.

आशुचँप - दुसर्‍या महायुद्धाबद्दलच बोलतोय ना आपण? Happy गांधी व काँग्रेसने भारतीयांना सैन्यात सामील होऊ द्यायला विरोध केला होता. इतकेच नव्हे तर सर्वांनी घाउक राजीनामेही दिले त्या वेळी. तेव्हा प्रांतीय निवडणुका होत होत्या व त्यातून मर्यादित अधिकार असलेली पदेही काँग्रेसला मिळत होती. त्या पदांचे सर्वांनी राजीनामे दिले. त्यानंतर चले जाव चळवळीत सर्वाना अटक करून ब्रिटिशांनी सैनिकभरती केली.

तेव्हा मला जितकी माहिती आहे त्यावरून तरी काँग्रेसचा विरोध डावलून सैनिकभरती झाली. त्यांच्या पाठिंब्याने/संमतीने नव्हे.

होय सुरुवातीला विरोध होताच आणि स्वतंत्र होण्याची मागणीही केली गेली होती
या संदर्भात सत्याग्रह आणि अहिंसक आंदोलन देखील करण्यात आले होते
पण त्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले, पोलीस स्टेशन वर हल्ले झाले यामुळे गांधीजींनी आपले आंदोलन माघारी घेतले
त्यांनतर ते 1944 पर्यंत जेलमध्येच होते, याच दरम्यान कस्तुरबा गेल्या बहुदा

विरोध केला पण एरवी जसा आमरण उपोषण करून सगळ्यांना वेठीस धरत तसे काही या संदर्भात केलं नाही

कॉग्रेस नेत्यानाही ही मागणी जोरकसपणे लावून धरली नाही
मान्य करत असाल तरच सैन्य पाठवले जाईल, धान्य दिले जाईल असा काही स्टँड नव्हता

मुळात दयाळू ब्रिटिश सरकारने त्यांना काही विचारलेच नाही त्यांनी परस्पर युद्ध जाहीर केले, आपलाच माल असल्यागत सैनिक, अन्नधान्य आणि इतर साधन सामुग्री उचलून नेली

ब्रिटिश सरकार नी भारताला गुलाम बनवले होते इथे त्यांची सत्ता होती.>> सर तुम्ही एकदा लिहून झाल्यावर ते परत एकदा वाचत जा, थोडं त्यावर चिंतन मनन करत जा, आपण लिहिलं आहे त्याचा नक्की अर्थ काय आहे हे कुणाकडून तरी समजावून घेत जा, बघा तुमच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त पोस्ट वाचतील लिहायच्या
एक मित्रत्वाचा सल्ला

Pages