Submitted by अश्विनीमामी on 24 July, 2023 - 04:13
दुसर्या महायुद्धा वर काढलेले चित्रपट, लिहि लेली पुस्तके डॉक्युमेंटरीज ह्यांची यादी.
१) चर्चिल हिटलर अँड अॅन अन नेसेसरी वॉर लेखक पॅट्रिक बुकॅनन
२) जन रल हाइ न्झ गुडेरिअन पँथर लीडर. जनरल गुडेरिअन
३) द सेकंड वर्ल्ड वॉर अॅण्टोन बीव्हर.
४) द सेकंड वर्ल्ड वॉर्स विक्टर डेविस
५) राइज अँड फॉल ऑफ द थ र्ड राइख. शीअरर.
६) मोसाद मायकेल बार झोहार.
७) जेरुसलेम सायमन सीबाग माँटेफिअरे.
विकिपी डिआ ऑन सेकंड वर्ल्ड वॉर. ह्यात बाकीच्या मेजर लढायांच्या लिंक्स आहेत.
नेट फ्लिक्स वरः मालिका वर्ल्ड वॉर २ इन कलर, हिटलर्स सर्कल ऑफ इव्हिल. मेजर इवेंट्स इन वर्ल्ड वॉर टू.
ह्या पुढे युट्युब वर भरपूर उपलब्ध आहे.
द पीपल्स प्रोफाइस म्हणून एक चॅनेल आहे. त्यात प्रत्येक मेन नेत्याची माहिती आहे.
अजून अपडेट करेन.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओ मामी थांबायच ना, मी एक
ओ मामी थांबायच ना, मी एक सविस्तर धागा काढत होतो. लिहून झालं आहे माझं बऱ्यापैकी
ओ मामी थांबायच ना, मी एक
ओ मामी थांबायच ना, मी एक सविस्तर धागा काढत होतो. >> तुम्ही काढा ना वेगळा धागा. मी फक्त संदरभ सूची देणार आहे.
राइज अँड फॉल ऑफ द थ र्ड राइख.
राइज अँड फॉल ऑफ द थ र्ड राइख. शीअरर >> यावरूनच आधारित मराठीत - नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि ग कानिटकर
छान केलंत.
छान केलंत.
माझ्याकडचे बाराला दहा कमी हे पुस्तक मला सापडत नाही. बहुतेक कुणी तरी नेलेले असावे.
त्यातली संदर्भ सूची कुणी देऊ शकले तर छानच.
The coming of the Third Reich
The coming of the Third Reich
Third Reich in power
Third Reich at war
- रिचर्ड एव्हन्स ह्यांची पुस्तकत्रयी
तुम्ही काढा ना वेगळा धागा. मी
तुम्ही काढा ना वेगळा धागा. मी फक्त संदरभ सूची देणार आहे>>> ओके, मी मग असं करतो की सैनिकांनी लिहिलेले अनुभव यावर लिहितो
जो फक्त इतिहास नाही, त्या काळाचे जिवंत चित्रण आहे
Red Joan चित्रपट.
Red Joan चित्रपट.
दुसऱ्या महायुद्धा दरम्यान अणुबॉम्ब बनवण्याची प्रगत देशांची स्पर्धा.
इंग्लंडची एक वैज्ञानिक स्त्री त्यातली गुपिते रशियाला देते.
तिला पकडून तिच्यावर खटला भरला जातो.
लाईफ इज ब्युटिफुल - एक नितांत
लाईफ इज ब्युटिफुल - एक नितांत सुंदर चित्रपट. थेट महायुद्धावर नाही, पण त्याच्या गडद छायेत असलेली कथा.
Inglorious bastards
Inglorious bastards
Imitation games
Dunkirk
पाहिला नाही, पण बहुचर्चित रशियन सिनेमा - come and see
युद्धनेत्रुत्व - दि. वि.
युद्धनेत्रुत्व - दि. वि. गोखले (मराठीतच आहे)
Life is beautiful
Life is beautiful
द बुक थीफ - मार्कस झ्यूसॅक
द बुक थीफ - मार्कस झ्यूसॅक
'द इमिटेशन गेम' चित्रपट
विटनेसिंग ट्रिनिटी
विटनेसिंग ट्रिनिटी
Saving private Ryan
Saving private Ryan
हा स्टीव्हन स्पीलबर्ग चा सिनेमा आहे
बँड ऑफ ब्रदर्स (https://www
बँड ऑफ ब्रदर्स (https://www.imdb.com/title/tt0185906)
द पॅसिफिक (https://www.imdb.com/title/tt0374463)
दुसर्या महायुद्धात भाग घेतलेल्या सैनिकांचे अनुभव, त्यांनी लिहिलेले अनुभव कथन, काहींच्या मुलाखती, इतिहास ह्यान्च्यावर आधारित ह्या दोन मालिका आहेत. मला प्रचंड आवडल्या. बिंज वॉचिंग करण्याइतक्या चांगल्या आहेत.
पहिली युरोपात लढल्या गेलेल्या युद्धाबद्दल आहे.
दुसरी जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला त्याला उत्तर म्हणून अमेरिकेने प्रशांत महासागरातील जपानच्या ताब्यात असलेल्या बेटांवर हल्ला केला त्यावर आधारित.
दोन्ही मालिका अमेरिका केंद्रित आहेत. दुसर्या महायुद्धाच्या काळातले वातावरण, वेषभूषा, हत्यारे, वाहने इ. फारच मेहनत आणि संशोधन करून निर्माण केले आहे.
आय डेझर्टेड रोमेल - गंथर
आय डेझर्टेड रोमेल - गंथर बानमान (अनुवाद विजय देवधर) - पण हा संदर्भ ग्रंथ नाही, मिक्स ऑफ फिक्शन आणि रिअॅलिटी.
चित्रपट
चित्रपट
The thin red line
Schindler's list
The bridge on the River Kwai
Pearl Harbour
Jojo rabbit
पहिल्या आणि दुसऱ्या
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचा भारतावर, भारतीयांवर, भारतीय सैनिकांवर, महाराष्ट्रावर कसा इन/डायरेक्ट परिणाम झाला - याची काही पुस्तकं आहेत का?
https://www.nationalww2museum.org/students-teachers/student-resources/re...
चीन, भारतमधे जे सामान्य नागरिकांचे मृत्यू झालेत त्याची कारणमीमांसा कुठे केली आहे का?
एकूण Civilian Deaths 45,000,000
आणि एकट्या चीनमधे 20,000,000
https://thewire.in/books
https://thewire.in/books/review-chronicling-the-birth-of-india-after-the...
Dunkirk
डायरी ऑफ यंग गर्ल - ऍन फ्रॅंक
Dunkirk
Guns of Navarone - चित्रपट /पुस्तक
Saving Private Ryan
Casa Blanca
Schindler’s list
Russian Sniper
Valkyrie
Okinawa
The Boy in Striped Pajamas
Memoirs of a Geisha पुस्तक, चित्रपट नको. मेन विषय तो नाही पण त्याचा इंपॅक्ट जाणवतो
‘हिटलर’ पुस्तक बहुतेक कानिटकरांचेच
Letters from Iwo Jima
Katyń
The Pianist
The King's Speech
The English Patient
The Desert Fox
Where Eagles Dare - चित्रपट /पुस्तक
Two Lives - विक्रम सेठची कादंबरी. त्याचे चुलते व त्यांची जर्मन ज्यू पत्नी यांच्या आयुष्यावर आधारित आहे.
The Glass Palace - अमिताव घोषची कादंबरी. फक्त दुसऱ्या महायुद्धवर नाही. पण त्याचा रेफरन्स आहे. आणि त्या दरम्यान व त्या आधी ब्रह्मदेशातून झालेले भारतीयांचे एक्झोडस हा फारसा प्रसिद्ध नसलेला इतिहासही मांडला आहे.
Nuremberg Trials
The World at War - लॉरेन्स ओलिव्हिएने नरेट केलेली डॉक्यु सिरीज
Bridge of Spies - महायुद्ध संपत असताना एक अमेरिकन विद्यार्थी आणि एक नागरिक पूर्व जर्मनीत अडकतात. दरम्यान रातोरात भिंत उभी राहते. त्यांना एका रशियन हेरांच्या बदल्यात निगोशिएट करून कसे सोडवले जाते ती कथा. टॉम हँक्स निगोशिएटर आहे.
The Battle of Bismark
The Sound of Music - अगदी युद्ध दाखवले नसले तरी युद्धामुळे व्हॉन ट्रॅप फॅमिलीचे आयुष्य कसे बदलत जाते ते दाखवले आहे.
चर्चिल - अमेझॉन प्राईम वर एक डॉक्युमेंटरी का पिक्चर पहिला होता. नेमके नाव आठवत नाही.
The House on Garibaldi Street - ऍक्चुअल महायुद्धावर नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर आइकमन अर्जेंटिनामध्ये नाव बदलून आरामात आयुष्य जगत होता. पण तो आइकमनच आहे हे नक्की करून मोसादने त्याला अर्जेंटिनामधून पळवून इस्राएलला आणले त्याची कथा.
घातसूत्र - दीपक करंजीकर. यात फक्त दुसरे महायुद्धच नाहीये. पण दुसऱ्या महायुद्धाविषयी विशेषतः कॉन्सन्ट्रेशन कॅम्पस आणि त्याची मॅनेजमेंट याविषयी त्यांनी जे लिहिले आहे ते वाचून डोळे खाडकन उघडतात. ग्रंथाली प्रकाशनचे नसते तर सिरिअसली घेतलेच नसते.
Lords of the Finance - लियाकत अहमद यांनी लिहिलेले हे पुलित्झर विनर पुस्तक चार देशांचे तत्कालीन सेंट्रल बँकर्स/अर्थमंत्री, पहिले महायुद्ध, अमेरिकन ग्रेट डिप्रेशन आणि हिटलरचा उदय होण्यासाठी उद्भवलेली परिस्थिती याचा आर्थिक अंगाने धांडोळा घेते.
मस्त यादी धन्यवाद लोक्स.
मस्त यादी धन्यवाद लोक्स.
The man in the high castle :
The man in the high castle : alternative history series (what if nazis won ?)
निव्वळ फँटसी म्हणूनच ती ठीक
निव्वळ फँटसी म्हणूनच ती ठीक आहे कारण असे काही होण्याची शक्यता अगदीच दुरापास्त होती
जर्मन्स नी अणुबॉम्ब चा शोध लावला असता तर त्या धाकाने कदाचित
अर्थात त्यानंतर जर्मन्स फनाटिक्स नी जगाचे काय मातेरे केले असते याची कल्पना करूनच अंगावर काटा येतो
घातसूत्र - दीपक करंजीकर>>> एक
घातसूत्र - दीपक करंजीकर>>> एक टप्प्यापर्यंत ठीक वाटते पण नंतर नुसतेच तर्क/स्पेक्युलेशन चा कंटाळा येतो
म्हणजे हे सगळं खरं मानायचं तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडण्यापासून ते जिल्हापरिषद निकाल सगळीकडेच यांचा हात असल्याचा फील येतो
एक टप्प्यापर्यंत ठीक वाटते पण
एक टप्प्यापर्यंत ठीक वाटते पण नंतर नुसतेच तर्क/स्पेक्युलेशन चा कंटाळा येतो
म्हणजे हे सगळं खरं मानायचं तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडण्यापासून ते जिल्हापरिषद निकाल सगळीकडेच यांचा हात असल्याचा फील येतो
>>>>>
सगळेच तर्क खरे असतील असे मी म्हणत नाही. पण दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने बराच काळ स्वतःच्या आर्थिक फायद्याचा विचार केला असेल व दोन्ही बाजूंशी व्यापार केला असेल, अगदी युद्धासाठी लागणारी अत्यावश्यक सामुग्री वाजवी/अवाजवी दराने विकून उन्नती साधली असेल तर फार काही नवे वाटत नाही मला.
पण कार्ड पंचिंग मशीनचा उल्लेख मात्र खरेच शॉकिंग आहे. अर्थात यात अमेरिका ऍज अ कंट्री आणि काही अमेरिकन उद्यमी यात डिफरंशिएट करावे लागेल.
अगेन, ग्रंथालीचे नसते तर कॉन्स्पिरसी थिअरीवाले म्हणून सोडून दिले असते.
जिल्हापरिषद निकाल सगळीकडेच यांचा हात असल्याचा फील येतो >>>
निव्वळ फँटसी म्हणूनच ती ठीक आहे कारण असे काही होण्याची शक्यता अगदीच दुरापास्त होती
>>>> जर्मनीचा विजय अशक्य नव्हता जोपर्यंत रशिया आणि अमेरिका विरोधात उतरले नव्हते. कारण फ्रांसने शरणागती स्वीकारली होती आणि ब्रिटन निकराने लढा देत असले तरी टेकीला आले होते
रशियावर हल्ला करून हिटलरने घोडचूक केली आणि जपानने पर्ल हार्बरवर हल्ला करून.
Churchill's Ministry of
Churchill's Ministry of Ungentlemanly Warfare: The Mavericks Who Plotted Hitler's Defeat -
हॅनाची सुटकेस
हॅनाची सुटकेस
युट्युब वर एक वॉर फॅक्टरीज
युट्युब वर एक वॉर फॅक्टरीज म्हणून सीरीज आहे. त्या त दोन्ही बाजूच्या वॉर फॅक्टरीज कश्या काम करत होत्या व त्याचा युद्धावर कसा परि णाम झाला ते दिलेले आहे. जर्मनीत तर युद्ध कैद्यांनाच वापरले व त्यांना अन्न पुरव ठा कमी करायचा व जास्त काम ठोकायचे व गडी वारला की फेकून द्यायचे. अशी वृत्ती होती. अन्नाचा पण वेपन म्हणून उपयोग झाला. घडोघडी केव्ढे हे क्रौर्य केव्ढी असंवेदन शील ता असे फीलिन्ग येते. ही टेंप्लेट आपल्या प्रिय ठिकाणी जशीच्या तशी वापरली जात आहे व त्याचा परीणाम काय झालेला आहे ते जगाने बघितले आहे. एक विचित्र हताश फीलिन्ग येते.
दुसरे निरीक्षण म्हणजे कोणत्याही नेतेपदी महिला नाहीत. महिला व्हिक्टिम, उपासमारीने मरणार, मुलांना घेउन रडणार, सपोर्ट रोल मध्ये,
सेक्स स्लेव्ह्ज, function at() { [native code] }याचा राच्या बळी. नाहीतर सोनेरीकेसांच्या नाझी सुंदर्या. कुखेन किंडर करणार्या. टॉक्सिक पॅट्रिआर्की चे उत्तम उदाहरण आहे. इफ यु रेज अ चाइल्ड यु वों ट वाँट इट टु डाय अननेसेसरीली. फॉर नो फॉल्ट ऑफ हिज.
नेतेपदी महिला नाहीत
नेतेपदी महिला नाहीत
>>> मुळात त्याकाळी किती महिला एखादया निर्णायक पोस्टवर होत्या? आणि ज्या होत्या त्यापैकी कोणाला निर्णय प्रक्रियेत सहभाग घेऊ दिला जात होता? अगदी राजकुमारी असणारी एलिझाबेथ त्यावेळी फक्त अन्नपुरवठ्याचा ट्रक चालवत होती तर बाकीच्यांची गोष्टच सोडा.
ज्या काही थोड्या महिला कुठेही लीड घेत होत्या त्यांचे प्रयत्न दुर्लक्षित झाले उदा. रेझिस्टन्समध्ये कित्येक महिला सामील होत्या, हेरगिरीमध्येही. कारण तुलनेने मेल काउंटर पार्ट्सना शौर्य गाजवायची जास्त संधी/जबरदस्ती होती आणि तसेच झाले.
उलट महायुद्धामुळे सामाजिक संरचना बऱ्याच प्रमाणात बदलली. जर्मनी व इंग्लंड मध्ये पुरुषांच्या पिढ्या लढत असताना, महिलांनी नागरी जीवन एक हाती सांभाळले. अमेरिकेमध्येही कारखान्यामध्ये महिलांनी काम करायला सुरुवात महायुद्धामुळेच केली. उद्ध्वस्त झालेल्या जर्मनीला वर आणण्यात कित्येक फ्रॉयलाईन संपल्या. कित्येकांच्या घरातले ब्रेड विनर्स परतून आलेच नाहीत आणि तीही जबाबदारी त्यांच्यावरच आली.
एकदा स्वातंत्र्याची चव चाखलेल्या महिलांनी नंतर मात्र मागे वळून पाहिले नाही.
समजा जर जर्मनी, जपान आणि इटली
समजा जर जर्मनी, जपान आणि इटली जिंकले असते तर
१. इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा जगाची राजकिय भौगोलिक स्थिती ही १९ व्या शतकात होती त्याच स्वरुपाची झाली असती. जर्मनी काय किंवा जपान काय हे राज्यकर्ते कधीच नव्हते. त्यांच्याकडे धडाडी, पराक्रम, धाडस, लष्करी ताकद आणि झपाटलेले नेते होते पण त्यामुळे युद्धे जिंकली जातात, मने नाहीत. एखाद्या देशावर परकीय आक्रमण करून वर्षानुवर्षे ते पारतंत्र्यात ठेवणे हे ब्रिटीश सोडून अन्य कुणाला जमू शकले नाही. ब्रिटीशांनाही भरपूर प्रतिकार झाला आहे पण त्यांनी धुर्तपणे आपले आसन बळकट करून ठेवले.
दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा कबजा पोलंड, नॉर्वे, स्वीडन, नेदरलँड, डेन्मार्क, फ्रान्स, ऑस्ट्रीया, युगोस्लाविया आणि उत्तर अफ्रिका या देशांवर होता. त्यातला ऑस्ट्रिया त्यातल्या त्यात कमी, पण बाकी बहुतांश देशातील स्वातंत्र्यप्रेमी जनतेने जर्मनांना जेरीला आणले होते. घातपात, लुटमार आणि प्रतिकार याच्यामुळे जरुरीपेक्षा जास्त सैन्य या देशात जर्मनीला धाडावे लागले होते. पाच लाखांहून अधिक सैन्य तर फक्त नॉर्वे मध्येच होते.
त्यामुळे जरी जर्मनी जिंकली असती तरी त्यांना या देशांमध्ये कायदा सुव्यवस्था आणि आपले शासन टिकवून ठेवण्यासाठी प्रचंड हाणामारी करावी लागली असती. त्यात पुन्हा ग्रेट ब्रिटनची लढाऊ वृत्ती आणि अमेरिका आणि रशिया यांचे अवाढव्य प्रदेश यांची व्यवस्था लावणे हे जर्मनी काय जगातल्या कुठल्याही राष्ट्रासाठी अशक्य असेच होते.
तेच कशाला युद्धात जर्मनी पराभूत झाला तरी अमेरिकेने त्यांच्यावर कबजा केला नाही. रशियाने केला पण नंतर तो सोडून द्यावा लागला. आणि ही दोन राष्ट्रे अतिशय बलाढ्य होती. तरीही व्हिएतनाम, क्युबा आणि नंतर अफगाणीस्तान सारख्या लहान देशांनी त्यांना नाकीनऊ आणले.
यामुळे हे प्रदेश आहेत तसे ठेऊन त्यांच्यावर आपले हस्तक किंवा आपल्याशी मिळतीजुळती सरकारे असतील अशी व्यवस्था करून बाकी सगळे त्याच्या हवाले सोडावे लागले असते. आणि ही परिस्थिती कधी न कधी बदलली असतीच.
ज्यु संहारामुळे जर्मन्सबद्दल अतोनात घृणा सर्वत्र पसरली होती आणि जर्मनीची नवी पिढीही त्याला अपवाद नव्हती. जर्मनच्या नव्या पिढीने आपल्या वाडवडीलांवरच खटले चालवले महायुद्धानंतर. त्यामुळे जर्मनीची साम्राज्यतृष्णा ही जास्तीत जास्त दहा वर्षे टिकली असती.
Pages