लाल टमाटर वाले तेरा भाव तो बता.....

Submitted by ASHOK BHEKE on 14 July, 2023 - 12:26

लोकसभा निवडणुक जशजशी समीप येत आहे तशतशी Digital Media वर तोबा गर्दी उसळली आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या वाटेत काटे पसरण्याचे काम अत्यंत जोमाने बहुतेक मीडिया कर्मी करीत आहेत. गत लोकसभा निवडणुकीत काहीच मनस्ताप झाला नव्हता. पूलवामाची घटना अगदी ताजी होती. भारतीय जनता सैनिकांच्या मृत्यूमुळे हळहळत होती. सध्या मात्र श्री नरेंद्र मोदींच्या विरोधात जनमत जाऊ लागल्याचे बोलले जाऊ लागले आहे. कारण टोमॅटोचा महागाई स्तर इतका झपाट्याने वाढला की, विरोधकांच्या हातात कोलीत दिल्याचे भाजपला मान्यच करावे लागेल. महागाईने लोक त्रस्त झाल्याचे लक्षात येताच विरोधी पक्षातील छोटी बडी धेंड स्वस्थ बसतील का? २०१४ च्या प्रारंभी महागाईने कळस गाठला असताना तत्कालीन पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांना बांगड्या भेट देण्यात वर्तमान केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृति इराणी यांनी तत्परता दर्शविली होती. आज तोच गॅस अब की बार हजार की पार... झाला. पेट्रोल डिझेल ने शतक ठोकले. यावर विरोधक गप्प बसतील का? मोदीविरोधात अप्रचार करण्यासाठी विरोधक, खाजगी मीडिया कर्मी एकवटले आहेत. कुठे मोदी चुकतात किंवा भाजप परिस्थिशी तडजोड करतात, याकडे बारकाईने पाहिले जात आहे. त्यांच्या सुपीक मेंदुतून नवनव्या आयडिया बाहेर पडताना दिसत आहेत. यामुळे सत्ताधारी गळीतगात्र झाले आहेत.
परवा श्री मोदींच्या वाराणशी मतदारसंघातील श्री अजय फौजी या मोदीविरोधकाने धमाल उडविली. हे अजय फौजी, सतीश फौजी मोदींचे कट्टर विरोधक मानले जातात. पंतप्रधानांच्या उत्तर प्रदेश दौर्‍यात यांच्यावर पोलिसांची तिरकी नजर असते, असे स्थानिक लोक बोलतात. या फौजीमहाशयांनी त्यादिवशी रस्त्यावर भाजी विकणार्‍या यादव पितापूत्रांच्या धंद्यावर बाऊन्सर उभे केले. टोमॅटोचा माल होता. ग्राहक यायचे तसे हे बॉडीगार्ड ग्राहकणा टोमॅटोला हात लाऊन देत नव्हते. या घटनेचा व्हिडिओ तयार करण्यात आला आणि तो समाजवादी नेते श्री अखिलेश यादव यांनी ट्विट्टर वर viral केला. क्षणात खळखळ माजली. टोमॅटोसाठी बाऊन्सर उभे करण्यात आल्याचे पाहून बुध्दिवंत देखील संभ्रमात पडले. पण तो व्हिडिओ होता. पण काही वेळातच याची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली. स्थानिक प्रशासनाला धारेवर धरताच पोलिस खडबडून जागे झाले धावपळ झाली. पंतप्रधानांच्या मतदारसंघात हा खेळ सुरू असलायचे पाहून पोलिस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले तो पर्यन्त फौजी आणि त्याचे बाऊन्सर परागंदा झाले होते. पोलिसांच्या तावडीत सापडला तो यादव बापबेटे. सामाजिक द्वेष पसरविण्याच्या गुन्ह्या अंतर्गत त्यांना कोठडीत डांबले. सांगण्यासारखे किस्से असतात आणि ऐकण्यासारखेही. पण वाचण्यासारखे किस्से भ्रामक असोत वा दिशाभूल करणारे... काही काळ तर जनमनावर हुकमत करीत असतात. फेरीवाल्याचा काहीही दोष नसताना कोठडीत बिचार्‍यांना लाल टमाटर वाले तेरा भाव तो बता.... सोबतचे कैदी नक्कीच फिरकी घेत असतील. गरिबांचे पौष्टिक अन्न खुसखुशीत, गोड, तिखट भाजीत मानाचे स्थान पटकाविणार्‍या टोमॅटोचे वाभाडे मोदी विरोधासाठी वापरले जात आहेत. यदा कदाचित मोदी यांना याबाबतीत काहीही कल्पना नसेल. पण त्यांच्या सोबतच्या मंडळीचा दूरदृष्टीकोण शून्य असावा. वाराणशी मतदारसंघात घडलेल्या घटनेकडे किती गांभिर्याने पाहावे हे त्या झारीतल्या शुक्राचार्याना कळायला हवे होते. फेरीवाला असे करील का? त्याला पोट भरायचे आहे. तो गरीब जर बाऊन्सर ठेवत असेल तर रस्त्यावर पथारी पसरून धंदा का करील...! ज्याप्रमाणे विरोधक मोदींच्या विरोधात बेंबीच्या देठापासून गरळ ओकतात तेव्हा त्यांच्या सोबतीला असणारे देखील सहाय्य करतात. विरोधकांच्या हातात कोलीत देणारे कोण... भाजपला विचार करायला हवा. महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तडजोड करून काहीही साध्य होणार नाही. शासन दारोदार जात आहे. पण गॅस टोमॅटोचे, भाज्यांचे भाव कमी करा म्हणून लोकांनी ठणाणा करण्याच्या आंत आत्मचिंतन करायला हवे.
अशोक भेके

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

डिसेम्बरात अमाप पिक आले आणि भाव पडले म्हणुन रस्त्यावर लाल चिखल करणार्‍या शेतकर्‍याला डिसेंबरात टोमटो साठवुन, जुलैमध्ये शेतात एकही टोमटो नसतो तेव्हा ते विकण्याचा मार्ग कोणी दाखवेल त्याला समस्त शेतकरी वर्ग त्याचे बहुमोल मत देईल. पण हे करण्यात काहीच मजा नाहीये, बाउंसर्स बगैरे प्रकरणात जास्त गंमत आहे.

साठवणुकीच्या अनेक टेक्नोलॉजी उपलब्ध आहेत ऑलरेडी पण ते वापरायचं मनावर कोणी घेत नाही. वापरल्या तर राजकारण करायचे ९९% मुद्देच संपुष्टात येतील.
________@लेख
जरा ते सर्वच्या सर्व मजकूर अनावश्यकपणे बोल्ड केलाय तो नॉर्मल ठेवला तर किमान वाचला जाईल.

Miya vendors are responsible for the price increase of vegetables in the city. Most of the vegetable vendors who are increasing the price belong to the "Miya community,' - हिमंत बिस्वा सर्मा , मुख्यमंत्री , आसाम.

हिमंत बिस्वा सर्मा यांची चौफेर टोलेबाजी. काही दिवसापूर्वी ह्यांनी ओबामाला धरून पिटले होते. मला नेहमी वाटायचं कि भारताचा भावी पंंप्र कोण होणार? आता ती काळजी मिटली.

●कॉपी पेस्ट●
~~~~~~~~~
छान माहिती वाचनात आली. ती सगळ्यांसाठी शेअर करतोय.

*टोमॅटो शिवाय काही अडलंय का ?* वाढलेल्या टोमॅटोच्या दराने मला तर आनंद झाला. कारण प्रत्येक वेळी बहुतेक सर्व आजारांत टोमॅटो खाऊ नका असा सांगण्याचा त्रास वाचला.

*कोणत्या अजारांत टोमॅटो खाऊ नये ?*
* सर्दी खोकला
* सांधेदुखी
* सूज
* डोकेदुखी
* अम्लपित्त (acidity )
* वाढलेलं uric acid
* वाढलेलं creatinine
* मूत्रपिंडाचे आजार ( kidney stones , CKD etc)
* Allergies
* त्वचाविकार

मग खायचाच कशाला रोज रोज टोमॅटो ? बिया काढून नको , साॕस नको , टाॕपिंग नको

*टोमॅटोला पर्याय आहे ?*
आहेच की. १५ - २० वर्षांपूर्वी टोमॅटोचा इतका वापर नव्हता. पंजाबी पदार्थांमुळे टोमॅटोची ग्रेव्ही हा प्रकार आला.नाहीतर कोकम, चिंच , लिंबू क्वचित् आमचूर यावर आमचे पदार्थ छान बनत होतेच की !

*या घटकांचे फायदे*
*चिंच*-
यामध्ये vit C भरपूर आहे.
पोट साफ ठेवते
पचन सुधारते.
मोठ्या आतड्यांचे आरोग्य सुधारते व त्यांची हालचाल ( peristalsis ) नियमित करते

*सांधेदुखी असणार्यांनी चिंचेची चटणी खाऊ नये. पण स्वयंपाकातील चिंच चालते*

*कोकम*
वजन व cholesterol कमी करते
हृदयाचे कार्य सुधारते
पचनक्रिया सुधारते
अम्लपित्तावर वरदान
अंगावर पित्त उठणे कमी होते
त्वचेची कांति सुधारते

*लिंबू*
Vit C चा पुरवठा
पाचक
वजन कमी करण्यात उपयोगी
त्वचेचे आरोग्य सुधारते

*आमचूर*
कफ कमी करते
वारंवार होणाऱ्या मूत्रप्रवृत्तिला थांबवते
सांध्यांना मजबूती देते.

या चारांशिवाय ऋतुनुसार उपलब्ध कैरी व आवळ्याचा वापरही आपण स्वयंपाकात आवर्जून करा.

*कैरी*
पाचक
यकृताचे कार्य सुधारते

*आवळा*
Vit C चा उत्तम पुरवठा
पाचक
अम्मपित्त नाशक
शरीरातील नवीन पेशी ( cells ) बनवण्यात मदत करतो.

एवढा मुबलक आरोग्यपूर्ण साठा असताना टोमॅटोची गरज काय ?
कधीतरी पावभाजी , छोले बनवाताना वापरा.पण रोज रोज नको रे बाबा !

'टोमॅटो खाऊ नका ' हाच सल्ला कांदा पिकाला एके काळी दिला गेला होता. खुद्द निर्मलाताईंनी स्वत:चे उदाहरण दिले होते. 'आमचे काही अडत नाही, तुमचेच का अडावे ' वगैरे. मांस मासळी विषयी तर बोलायलाच नको.
खरे तर भाव प्रचंड वाढले की आपण निमूटपणे कुणाच्याही सल्ल्याशिवाय त्याचा वापर कमी करतोच.
पण अशी परिस्थिती येऊच नये यावर कधी काळी उपाय होणार का? की onus consumer वरच ढकलून द्यायचा?

आणि ते कॉपी पेस्ट तर मजेशीरच आहे. Rofl C R F मध्ये अनेक पदार्थ वर्ज्य असतात. उदा. तूर डाळ, कडधान्ये वगैरे. मग ती महाग झाली तर सगळ्याच निरोगी लोकांना C R F ची भीती दाखवून हे पदार्थ सेवनातून कमी करा असा आदेश देणार का?

टोमॅटो नाव तरी भारतीय का?
टोमॅटोवड, टोमॅटोपोकळी असली नावे ऐकली आहेत का कधी?
कसे काय परकीय लोकांचे पीक इकडे आणुन खातात?
चिंच खायला काय धाड भरते?

मानव सहमत. चिंचच खा. नावापासुनच भारतीय. तुम्हारे हिंदकी, तुम्हारे हिंदकी म्हणत म्हणत शेवटी टॅमरिंड झाली..

मला वाटते खजूराला तिकडे तामर म्हणतात. इकडे आल्यावर सोललेली चिंच दृष्टीस पडली तेव्हा दिसायला आपल्या तामरसारखीच, पण हिंदुस्थानातली, म्हणून तामर ए हिंद म्हणू लागले. त्याचे पुढे Tamarind झाले.
शिवाय ताम्र म्हणजे तांबडा रंग म्हणजे पुन्हा संस्कृतच. अरेरे! इतकी शुद्ध पवित्र पुरातन वस्तू टाकून आम्ही फिरंगी/ म्लेंच्छ/ यवनांच्या नादी लागलो ना!
अवांतर : टोमॅटोला विदर्भात भेदरं म्हणतात.
ता.क. मा पृ ह्यांच्या सूचनेनुसार ' बेंद्रं किंवा भेंद्रं ' ह्यात भेदरं अशी दुरुस्ती केली आहे.

भेदरं.
हे नेहमी पेक्षा लहान पण चिनी चेरी टोमॅटो पेक्षा मोठे असलेल्या टोमॅटो जातीला.
नेहमीच्या टॉमटोंना टमाटर असेच म्हणत बहुतेक लोक.

बाकी माहीत नाही. पण राजमा आणी छोले यात तरी मला टॉमेटो लागतोच. तसे छोले बनतात की बीना टॉमेटोचे. माझ्या मैत्रिणीने फक्त बटाटा घालुन केले होते, आले लसुण नव्हतेच त्यात.

पंजाबी वरीजिनल भाज्यात पण टॉमेटो नसतो म्हणे.