बाईपण भारी देवा हा चित्रपट धो धो चालला आहे. पहिल्या आठवड्यात याने सैराटचं रेकॉर्ड मोडून ताबडतोड कमाई केली आहे. १२.५० कोटी एका आठवड्याची कमाई. दुसर्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी २.४५ कोटी रूपये कमावले. दुसर्या आठवड्याचा वीकेण्ड अॅडव्हान्सला फुल झाला आहे. मराठी चित्रपटाच्या बाबतीत अनेक दिवसांनी असं काहीतरी ऐकू येतंय. विशेष म्हणजे बाईपण हा निव्वळ महिलांच्या जोरावर एव्हढे मोठे यश मिळवताना दिसतोय. अर्थव्यवस्थेत महिलांचं अस्तित्व ठळक करणारा चित्रपट म्हणून इतिहास त्याची नोंद घेईल.
या चित्रपटाच्या लाटेत बॉलीवूड आणि हॉलीवूडच्या अनेक बड्या चित्रपटांनी महाराष्ट्रात मान टाकली आहे. आता त्याचे शोज वाढवणार आहेत. कदाचित सैराटचे रेकॉर्ड हा मोडीत काढणार असं दिसतंय. क्लासेस नाही तर मासेस चित्रपटाचं भवितव्य ठरवतात हे बाईपण ने पुन्हा एकदा सिद्ध केलं. झिम्मा सुद्धा असाच हिट होता पण हा त्याच्या पाच सहा पटीने गर्दी खेचतोय..
(सैराटला ४०० स्क्रीन्स मिळाले होते दुसर्या आठवड्यात ते ४५० पर्यंत वाढले. बाईपणला फक्त ३४० स्क्रीन्स, त्यातही मर्यादीत शोज आहेत. तेव्हढेच शोज असते तर सैराटचं २५ कोटी कलेक्शन मागे पडलं असतं असं हे आकडे दर्शवतात).
एव्हढं काय आहे त्यात कि ज्यामुळे एव्हढा तुफान चालला असेल ? नेमकं काय आवडतंय महिलांना ?
पुरूषांनी पण पहायला पाहीजे का ?
भारी बायकांनी शेअर केले पहिले
भारी बायकांनी शेअर केले पहिले-वहिले धमाकेदार किस्से
https://www.youtube.com/watch?v=hRUHnXiKLNg
एखादी कलाकृती सुपरहिट होते
एखादी कलाकृती सुपरहिट होते त्याला सामान्यतः ३ पैकी १-२ कारण असतात
१. लोक त्याच्याशी relate करतात,/connect होतात
२. त्यांना काही करायचे असते पण प्रत्यक्षात करू शकत नाहीत मग त्यांचे ते स्वप्न/ इच्छा/ आकांशा पडद्यावर पूर्ण होताना बघायला मिळते
३. अगदी त्यांची चाहती/ मनातली व्यक्तिरेखा असते
एक तर त्यात कोणीही मेनस्ट्रीम हिरो - हिरोईन नाही, कसलेल्या अभिनेत्री असल्या तरी त्या सगळ्या चाळीशी पुढच्या आहेत. तरी सिनेमा एव्हढा गाजतोय. का?
बाई पण मध्ये १ आणि २ points बरेचसे कव्हर होतात कदाचित म्हणून हा सिनेमा येव्हढा hit झाला असावा.
१. नीट बघितलं तर त्यात काही गोष्टी किंचित illogical किंवा ओढून ताणून आणल्यासरख्या वाटतात. जसं, iphone घेण्यासाठी मंगळागौर खेळून बक्षीस जिंकणे, fibroid झालं म्हणून एव्हढ्या तरुण मुलीचं तडका फडकी uterus काढून टाकणं etc.
२. काही सीन्स थोडे अति वाटतात एक स्पर्धा हरल्यावर लगेच हताश होऊन दारू प्यायला बसणे, भर स्टेशन वर मोठ्या बहिणीचा गळा पकडणे etc.
पण सहा पात्रांना एकत्र आणणे आणि त्यांची पार्श्वभूमी थोडक्यात सांगणे यासाठी लेखिकेला बहुदा ह्या गोष्टी कराव्या लागल्या असतील.
वरील काही बाबी सोडल्या तर अतिशय छान जमून आलेल्या गोष्टी:
१. सगळ्यांचा उत्तम अभिनय, team work
२. Competitive आई, पळून जाऊन केलेलं लग्न निमूटपणे निभवणारी, प्रसंगी आपली आवड निवड बासनात बांधून ठेवणारी नोकरपेशी स्त्री, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी नसल्यामुळे कुचंबणा होणारी गृहिणी, फक्त सौंदर्य बघून केलेल्या लग्नात, तेच सौंदर्य उतरल्यावर दुसरीकडे खेचला जाणारा नवरा बघुन हताश झालेली स्त्री, सगळ्यात महत्त्वाची आजची घर, मुलं, नोकरी, लोन्स सगळं स्वतः च्या खांद्यावर वाहून नेणारी चाळिशीतली सुपरमॉम ह्यातली कोणी ना कोणी प्रत्येकीला आपल्यात, शेजारणीत, मैत्रिणीत, नातेवाईकांमध्ये , ओळखीच्यांमध्ये जरूर दिसते.
३. इतर मालिका आणि सिनेमात दाखवतात तशी कुठली नाती खरतर flawless नसतात. त्यामुळेच दोन जुळ्या बहिणी मधल शीतयुद्ध, छोट्या गैरसमजातून दोन टोकांना घेऊन जाणारे नातेसंबंध, हे नातेसंबंधांचे पीळ जेव्हा अलगद स्क्रीन वर सोडवलेले दिसतात तेव्हा नकळत प्रेक्षकही सुखावले जातात.
४. प्रेक्षणीयता, संगीत, हलकं फुलकं वातावरण, हसता हसता रडविणार लेखन, उत्तम दिग्दर्शन, आणि संहितेचा वेग.
मला वाटतं ह्या जमेच्या गोष्टींनी पारडं जड झाल आणि प्रेक्षकांनीही तसच कौल दिला.
जाता जाता केदार शिंदेच एक कौतुक वाटत, त्यानं टिपरे, अग बाई अरेच्चा, आणि आताचा बाई पण भारी हे मध्यमवर्गी, मध्यममार्गी सरळ साधं आयुष्य जगणाऱ्या लोकांना केंद्रस्थानी ठेवून इतके छान सिनेमा / मालिका बनवल्या आहेत.
१९९१ ला आलेल्या "माहेरची साडी" ला बायकांनी उचलून घेतले होते आणि २०२३ ला तीस वर्षांनी "बाई पण भारी.." ला उचलून धरलंय. पण म्हणजेच सासर माहेर गुंत्यातून कधीच्याच बाहेर पडलेल्या ह्या, आता आत्मनिर्भर होऊन स्वतःच छोट का होईना पण स्वतंत्र विश्व शोधू आणि वसवू पाहतायत अस वाटत ना?
आताच सोसायटीतील
आताच सोसायटीतील मैत्रिणींबरोबर पाहून आले ' बाईपण भारी देवा '. आम्हाला सगळ्यांना प्रचंड आवडला. संपूर्ण थेटर फुल होते. सिनेमाने खूप हसवलं, खूप रडवलं, अंतर्मुख केलं. एखादी मनाविरुद्ध घडलेली गोष्ट वर्षानुवर्ष मनाला जाळत राहते, आणि त्या माणसाबद्दल कायमची अढी मनात बसते आणि असं खरंच होतं बायकांचं. त्यातून एक निमित्त मिळतं बाहेर पडायला, मोकळं व्हायला ते या मंगळागौरीच्या निमित्ताने. सगळ्यांचा अभिनय सुंदर. तरी मला वंदना फॅन असल्यामुळे ती, सुकन्या आणि दीपा विशेष आवडल्या. रोहिणी हटटंगडी तर ग्रेट आहेतच. मला मनापासून आवडला बुवा सिनेमा.
“खरंतर ऐन उन्हाळ्यात चित्रपट
“खरंतर ऐन उन्हाळ्यात चित्रपट प्रदर्शित करायला हवा होता…”, संजय मोने यांची पोस्ट; म्हणाले “नाव ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी…”
संजय मोने यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत
https://www.loksatta.com/manoranjan/marathi-cinema/marathi-actress-sukan...
लै भारी म्हनायचं !
लै भारी म्हनायचं !
आजच्याला आम्च्या पिंचिंवाडीत ऑनलैन तिकटं बगत हुतो ... पन समदी कडं समदे ख्येळ हौसफुल्ल दावत होता .. लै भारी वाटलं
मराठी सिनेमा च दर्जा उंचावत
मराठी सिनेमा च दर्जा उंचावत आहे.
हिंदी पेक्षा स्थानिक भाषेतील चित्रपट च दर्जेदार आहेत.
आणि web series पण
मराठ,तमिळ,कन्नड,बंगाली इत्यादी
लोगो को सपने बेचो
लोगो को सपने बेचो
खरीददारोंकी लाईन लग जाती है..
शाहरूखचे चित्रपट तेच करायचे.
या चित्रपटाने देखील तेच केले आहे..
चित्रपटाचा ट्रेलर बघून पूर्ण
चित्रपटाचा ट्रेलर बघून पूर्ण चित्रपट बघायची हिम्मत होत नाहीय... तुम्ही सगळे डेरिंगबाज आहात...
लेखातील सगळ्यात वरचा फोटो
लेखातील सगळ्यात वरचा फोटो पाहुन माझी तर ट्रेलर पाहण्याचीही हिंमत होत नाहीये.
आमची सासुरवाडी बघून आली.
आमची सासुरवाडी बघून आली. सासूबाईंना पिक्चर फार आवडला. बायकोच्या अविवाहीत बहिणींना ओके ओके वाटला. माझ्या बायकोला जायची इच्छा आहे. मुलीने सुद्धा सोबत जायचा हट्ट केला तर तिला समजावले की तुला त्यातील बायकांचे प्रॉब्लेम रीलेटच होणार नाहीत कारण घरी तू जी बाई म्हणजेच तुझी आई बघतेस तिची लाईफ टोटली डिफरंट आहे. थोडक्यात हा पिक्चर जिथे रीलेट होत जाईल तिथे मजा देणारा, इमोशनल करणारा असावा असे मला वाटते
अपवाद असतात. त्यानेच नियम
अपवाद असतात. त्यानेच नियम बनतात.
माझी आई तिच्या मैत्रिणींसोबत
माझी आई तिच्या मैत्रिणींसोबत बघून आली . गॉगल वगैरे लावून पोस्टरसोबत फोटो काढले. She enjoyed movie , company , her outing.
मलाही जायला सांगत होती , बघू जमलं तर जाईन
गॉगल वगैरे लावून पोस्टरसोबत
गॉगल वगैरे लावून पोस्टरसोबत फोटो काढले.
,,.>>>
गॉगल लाऊन फोटो काढणे भारी आहे.
या पोस्टर सोबत फोटो काढणे ट्रेण्ड झाला आहे. बरेच जण असे फोटो अपलोड करता आहेत. फेसबूकवर रिव्ह्यू सोबत असे फोटो पडत आहेत. एका मराठी चित्रपटाबाबत हे घडतेय हे बघून आनंद वाटतोय.
एकंदरीत प्रतिसाद बघून असे
एकंदरीत प्रतिसाद बघून असे वाटतेय की पिक्चर नक्कीच चांगला आहे. त्याशिवाय केवळ रीलेट होतोय म्हणून कोणी इतके इमोशनल होणार नाही. त्यासाठी कलाकृती चांगली हवीच.
याउलट रीलेट होत नाही त्यांना ना आवडण्यामागे कारण ते चुकीच्या अपेक्षा ठेवून गेलेत असे असू शकते. तरी वैयक्तिकरीत्या मला असे वाटते की अशांनी आपले निगेटिव्ह रिव्ह्यू काही काळ देऊ नयेत. जेणेकरून एका मराठी चित्रपटाचा व्यवसायावर परिणाम होईल
थेअटरला जाऊन चित्रपट पाहायचं
थेअटरला जाऊन चित्रपट पाहायचं माझ्या मनात सुद्धा नव्हतं. मात्र बऱ्याच मैत्रीणींच्या wts स्टेटसला चित्रपट पाहून आल्याचे फोटो पाहिले तेव्हा काही मैत्रिणींनी शनिवारी दुपारच्या शोला जायचं plan केलं तेव्हा मी सुद्धा चित्रपट पाहण्यासाठी त्यांच्यासोबत जायचं ठरवलं. बघुया म्हटलं.. कसा आहे चित्रपट.. एवढ्या सगळ्या जणी हौसेने वेळ काढून जाताहेत तर.. आपणही जाऊया..!
चित्रपट सुरु झाला आणि पाहता -पाहता अडीच तासाचा चित्रपट कधी संपला ते कळलंच नाही इतकं ह्या चित्रपटात गुंतायला झालं.
चित्रपट व्यवसाय हा इतर व्यवसायासारखाचं पोटा- पाण्याचा गल्लाभरू व्यवसाय असला तरी ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून केदार शिंदेंचे खूप कौतुक करावेसे वाटते.... स्त्रियांच्या मनातील त्यांना सारं काही ऐकू येतंय की काय ..त्यांना खरंच एखादी अशी अज्ञात शक्ती लाभली असावी असं एक स्त्री म्हणून मला वाटतं.
चित्रपटातले काही प्रसंग पचायला जरासे कठीण जातात पण ठिक आहे.. चित्रपट म्हटलं म्हणजे तेवढं चालायचंचं...!
आता नावातचं ' बाईपण ' असल्याने स्त्रियांच्या आयुष्यावर चित्रपट बेतलेला आहे हे नव्याने सांगायला नकोच...!
अभिनयाच्या बाबतीत सांगायचं तर सगळ्याच कलाकारांनी उत्तम अभिनय केलायं.. चित्रपटाच्या सगळ्या नायिका दिग्गज कलाकार आहेतच पण चित्रपटात दाखवलेली वंदना गुप्तेंची मुलगी असलेली भूमिका, रोहिणी हट्टंगडींच्या पतीची भूमिका , सुकन्या कुलकर्णींच्या सुनेची भूमिका , शरद पोंक्षेची वर्चस्ववादी , हट्टी सासऱ्याची भूमिका.. ह्या सार्या भूमिका केलेल्या कलाकारांचं कामही वाखाण्याजोगं आहे.
चित्रपटात दाखवलेल्या सहा बहिणींचं कधी काळी मायेचा ओलावा असलेलं आपसांतलं नातं कालांतराने घडणाऱ्या काही अप्रिय घटनांमुळे हळूहळू दुरावा, द्वेष, तिरस्कारात बदलत जातं. आपासातले संबंध बिघडत जातात. कधी-कधी तर त्या कोंबड्यांसारख्या एकमेकींत झुंजत राहतात.
मात्र मंगळागौर स्पर्धेच्या निमित्ताने सहाही बहिणी एकत्र येतात आणि मग एकमेकींच्या आयुष्यातील सुख- दुःख , चढउतार एकमेकींना जाणवू लागतात. रक्ताच्या नात्यांची नव्याने ओळख होऊ लागते आणि पुन्हा एकदा एकमेंकींना समजावत, समजून घेत सहाजणीही रक्ताच्या नात्यात घट्ट बांधल्या जातात.. हे चित्रपटाचे कथानक..!
कथा हलकीफुलकी आहे.. चित्रपटातले काही प्रसंग हसवतात तर काही प्रसंग प्रसंगी रडवतातसुद्धा..!
सहाही बहिणी मॉलमध्ये कपडे खरेदीला जातात तो प्रसंग कुठेही कुणाच्या भावना दुखावणार नाहीत अश्या विनोदी पद्धतीने साकारलायं...
चित्रपटातल्या एका प्रसंगाने मात्र मला खोलवर विचार करण्यास भाग पाडले. चित्रपटात चारूची भूमिका असलेली दिपा परब हॉलमध्ये तिच्या मुलांचा वाढदिवस साजरा होत असताना वॉशरूमध्ये जाऊन प्रेग्नंसी किटने प्रेग्नंसी confirm करत असते.. तिची मासिक पाळी चुकलेली असते .. बाकीच्या बहिणी तिला शोधत येतात आणि ती बाथरूम मध्ये असण्याचं कारण कळल्यावर तिला समजावत सल्ले देत राहतात .. आधीचं नवऱ्याची नोकरी नाही.. पैशांची टंचाई त्यात आधीच दोन मुलं असताना अजून मुलांची factory काढायची आहे की काय तुला.?? .. असं काही-बाही सुनावत राहतात... चाचणी चारही वेळेस निगेटीव येते.. पण चारूला टेंशन येतेच.. त्याचवेळी बाजूच्या बाथरूम मधली स्त्री जी डॉक्टर असते ती हे सगळं ऐकून त्यांना म्हणते की, तुमची पाळी आली नाहीये आणि गर्भ चाचणी सतत निगेटीव येतेयं याचा अर्थ असाही होतो की, तुम्ही मेनोपॉझच्या पायरीवर आहात... हे ऐकून चारूला जबरदस्त धक्का बसतो.. ते साहजिकच असते म्हणा कारण तिचं वय फक्त ४१ वर्षे असते.. डॉक्टर एवढ्या लवकर येणाऱ्या मेनोपॉझच कारण ही सांगतात.. फक्त एक शब्द ...
स्ट्रेस..!
निसर्गाने एक स्त्री म्हणून बहाल केलेलं अनमोल देणं असं वेळेआधी ध्यानीमनी नसताना अचानक हिरावून घेतल्यावर मनाची काय अवस्था होऊ शकते... हे दिपा परबने तिच्या अभिनयातून दाखवून दिलयं.. बंद कारमध्ये बसून तिने फोडलेला हंबरडा आपलं मन हेलावून टाकतो.. एक स्त्री म्हणून मला ते दुःख relate करता आलं..
निसर्ग नियमानुसार शारीरीक बदलांना प्रत्येकाला कधी ना कधी तोंड द्यावेचं लागते.. निसर्गाच्या विरोधात आपण जाऊ शकत नाही मात्र ४५ नंतर ५० व्या वर्षी जाणारा मासिक धर्म जर वेळेआधी ४० व्या वर्षीचं जाऊ लागला तर स्त्रीला शारीरिक- मानसिक पातळीवर काय वाटत असेल, तिच्या मनात काय भावकल्लोळ उठत असतील हे एक पुरुष दिग्दर्शक असूनसुद्धा केदार शिंदेनी ज्याप्रकारे चित्रपटात दाखवलयं ते पाहून त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीचं...!!
सोबत असलेल्या एका मैत्रिणीला चित्रपटातला हा प्रसंग पाहिल्यावर खूप रडू फुटलं..
माझी गेली गं पाळी ४२ व्या वर्षी..!!
पंचेचाळीशीत असलेली पण पस्तिशी- चाळीशी असल्यासारखी दिसणाऱ्या माझ्या मैत्रिणीची एवढ्या लवकर पाळी गेली हे ऐकून मला खरंच धक्का बसला..!
स्ट्रेस गं फक्त स्ट्रेस..!
मी तिच्या हाताला फक्त थोपाटले.. बस्स अजून काय करू शकणार होते मी..??
रोजचं धकाधकीचं आयुष्य, त्यातले ताणतणाव,नोकरी, करियर, मुलांच्या शाळा, त्यांच्या अभ्यासाचा आपल्याला येणारा ताण .. ह्या सगळ्यांतून उद्भभवणारा मानसिक- शारीरीक पातळी वरचा त्रास... ह्यातून स्त्री - पुरुष कुणाचीही सुटका होणं शक्य नसलं तरी ह्या सगळ्यांचा ताण आपण कितपत घ्यायला हवा... त्यातून आपलं मानसिक- शारिरिक आरोग्य कसं जपता येईल यावर माझ्यासारख्या एखाद्या सामान्य स्त्रीला खोलवर विचार करायला लावणं.. म्हणजे ह्या चित्रपटाचं यश नव्हे का..??
खरं हा चित्रपट पाहण्याची
खरं हा चित्रपट पाहण्याची इच्छा नव्हती. पण मैत्रिणींसोबत गेले आणि खूप आवडला. कॉन्सेप्ट तीच आहे typical... बायकांनी स्वतःला कुटुंब आणि जबाबदाऱ्यांमध्ये वाहून घेणे वगैरे... पण इतक्या वर्षांनी सगळ्या बहिणी एकमेकींसमोर येतात तेव्हा त्यांच्या मनात अढी असते... खरं तर घडलेल्या घटनांचे traumas असतात. त्यावर काम न करता ते तसेच दाबून आयुष्य पुढे रेटत असतात. Healing process वगैरे त्यांच्या खिजगिणतीतही नाही. triggers त्यांचं काम करत राहतात. एकत्र आल्यानंतर triggers अजूनच वाढतात. हळू हळू त्यांना self realisation होत जातं. त्या सगळ्या अगदी भूतकाळात जाऊन झालेल्या प्रसंगांवर काम करतात, एकमेकींना heal करायला मदत करतात, एकमेकींच्या मदतीने grow करतात ही कॉन्सेप्टच खूप आवडली.
भारतात जवळ जवळ ६० कोटींच्या
भारतात जवळ जवळ ६० कोटींच्या वर स्त्रिया आहेत. त्यातल्या किती जणींना पोहता येते?
भारतात जितके पुरुष आहेत त्यातल्या किती जणांना पोहता येते?
दोन्ही आकडेवार्या काढा आणि ठरवा हा चित्रपट का आवडतोय स्त्रियांना.
अगदी साधे साधे आनंददेखील त्यांना उपभोगता येत नाहीत.
रुपाली आणि शैलपुत्री छान
रुपाली आणि शैलपुत्री छान पोस्ट
रुपाली आणि शैलपुत्री छान
रुपाली आणि शैलपुत्री छान पोस्ट
मी आईसोबत जाऊन सिनेमा पाहून
मी आईसोबत जाऊन सिनेमा पाहून आले.
मला सिनेमा आवडला का ? - हो
परत पाहीन का? - नाही
रिलेट झाला का ? - नाही
अशा बायका मी आजूबाजूला पाहिल्या आहेत का? - हो
सिनेमा पाहून त्या बदलतील का - नाही
सिनेमातल्या सगळ्या गोष्टी पटल्या का ?- मुळीच नाही
सिनेमाचा गाभा आवडला का? - अगदीच हो
ट्रेलर पाहून सिनेमा टुकार वाटलेला का? - हो
सिनेमा टुकार आहे का? - नाही
हा सिनेमा बाईपण आणि तिला होणारे त्रास, तडजोडी इतकाच मर्यादित नाहीये तर 'स्त्री' ची दुरावलेले नाती हा ही एक गाभा आहे . ज्या स्त्रियांसोबत आपलं आयुष्य /लहानपण गेलंय त्या काही कारणाने मनातून दुरावल्या की जो त्रास होऊ शकतो आणि ते मळभ गेलं की जो सुकून मिळू शकतो तो छान पकडलाय सिनेमात.
मला घरात तडजोड करत मन मारून जगणारी स्त्री रिलेट होत नाही फारशी. कारण मी स्वतः मध्ये बदल करून घेत त्या रोल मधून बाहेर आलेय आणि सोबत आई आणि सासूला पण आणते आहे. त्यामुळे साधना आणि चारू ला पाहून मला वाईट नाही वाटलं तर काय मूर्ख आहेत बाया असं वाटलं. जया ला मी समजू शकले पण तिचा नवरा फार आवडला. शशी चं कॅरेक्टर अगदी आजूबाजूला पहाते आहे त्यामुळे ती व्यवस्थित कळाली मला. माझी एक मावशी ditto आहे... बाकीच्या दोघी पण चांगल्या.
मंगळागौर हे उगाच कारण म्हणून आणि छान गाणं हवं म्हणून टाकलेलं प्रकरण आहे. कथा मंगळागौर शी रिलेटड नाहीये.
या सहाही जणी आणि सहाही कथा आजीच्या बहिणींच्या बाबतीत पाहिल्याने आणि त्यांची घालमेल जवळून पाहिल्याने चित्रपट मला 'समजला'
समरी - नात्याचं चित्रं दाखवणारा चित्रपट आवडला, बाई पण दाखवणारा चित्रपट ठीक वाटला.
संपादन करायला एकच मिनिटं शिल्लक होता त्याचा फायदा घेत हे ही सांगते की शेवट फार घाईत गुंडाळलेला वाटतोय. ते स्पर्धा जिंकले की नाही त्याचा उल्लेख नाही त्यामुळे आधी म्हणलं तसं मंगळागौर हे साईड actor प्रकरण आहे.
माझ्यामते चित्रपटाचा शेवट त्या प्रत्येकीने 'स्वतः' मध्ये बदल करून पुढे जे आयुष्य आहे त्याला सकारात्मकरित्या सामोरी जायला सुरुवात केली असा आहे. कारण दुसरा कुठला शेवट असेल असं म्हणायचं झालं तर बरेच अनुत्तरित प्रश्न आहेत.
रुपाली आणि शैलपुत्री छान पोस्ट >>>+11
रीया, रुपाली आणि शैलपुत्री
रीया, रुपाली आणि शैलपुत्री छान पोस्ट .
रीया, रुपाली आणि शैलपुत्री
रीया, रुपाली आणि शैलपुत्री छान पोस्ट . + १.
पोस्टर, ट्रेलर बायपास करून चित्रपट बघावा म्हणतो.
रॉय तुमचे म्हणणे बरोबर आहे.
रॉय तुमचे म्हणणे बरोबर आहे.
बघितला, ठीक वाटला. आई
बघितला, ठीक वाटला. आई वडिलांचा काहीच उल्लेख नाही आहे का माझ्याकडून निसटला? कारण भावंडांच्या भांडणामध्ये आई वडिलांची काहीतरी भूमिका असणार ना?
धन्यवाद सर्वांना..
धन्यवाद सर्वांना..
रिया , शैलपुत्री छान चित्रपट परिक्षण.
मानवजी, जमल्यास बघा चित्रपट... ट्रेलर पाहून माझीही इच्छा नव्हती पाहायची.
आई वडिलांचा काहीच उल्लेख नाही आहे का माझ्याकडून निसटला? >> केतकीला मुलगा पाहायला येतो आणि पल्लवीला पसंत करतो त्या प्रसंगात आईवडील दाखवलेत बहुतेक.. चित्रपटात माहेरचे घर बंद दाखवलेय म्हणजे आईवडील दोघेही हयात नसावेत ..
Mala typical Bai ani sansar
Mala typical Bai ani sansar ase baghayala bore hoil ase vatatey, tyamule OTT var yei paryant thamben ase vatatey
फायनली 'बाईपण भारी देवा'
फायनली 'बाईपण भारी देवा' बघितला.
रिलेट झाला का? नाही.
आवडला का? हो. एन्गेजिंग आहे. बोअर नाही झाले नक्कीच. नवऱ्याला सेकण्ड हाफ विस्कळीत वाटला. पण त्यालाही काही पात्रे/सिच्युएशन्स रिलेट झाली. त्यालाही बोअर नाही झाला.
परत पाहीन का? टी व्ही, ओटीटीवर समोर आला तर. मुद्दाम जाऊन बघणार नाही.
समरी - नात्यात मुळात प्रेम असेल तर सहवास आणि कम्युनिकेशनमुळे प्रॉब्लेम्स सुटायला मदत होऊ शकते, असे वाटू देणारा चित्रपट
(स्पॉयलर अलर्ट)
काय आवडले?
बारीक सारीक गोष्टीत केदार शिंदे टच जाणवतो. जसे -
स्टेशनवरच्या डान्समध्ये वंदना गुप्ते तिच्या स्वभावानुरूप लीड घेते, आणि मग चारू तिच्या तारुण्यसुलभ प्रवृत्तीने.
डान्स करायला जातानाही सगळ्या बायका आपसूक त्यांच्या विश्वासू माणसांच्या (बहिणींच्या) हातात पर्स, पिशव्या देतात. १००% खरे.
सुकन्या कुलकर्णीने 'अण्णांना बटाट्याची भाजी लागतेच अगं' असं सहजपणे सुनेच्या मनावर ठसवत जाणे. आणि आपली स्वप्ने जशी चिरडली गेली तशीच आत्ता सुनेचीही गत होतेय हे जाणवणे.
माईच्या नवऱ्याचे पात्र - आयुष्यभर बायकोला सपोर्ट करणारा नवरा. शेवटी माईच्या मनातली सल नाहीशी होते आणि त्या नवऱ्यावर उघडपणे प्रेम व्यक्त करतात तेव्हाचा अभिनय
किंवा सुकन्या कुलकर्णीच्या आणि तिच्या सुनेच्या बाबतीत काडीचाही से नसणारा तिचा नवरा आणि मुलगा
चिनुच्या ऑपरेशन प्रसंगी रोहिणी हट्टंगडी यांचा अभिनय
पल्लवीला जाणीव होणे की तिचा नवरा आधीही आणि आत्ताही 'भुललासी वरलिया रंगा' कॅटेगरीतील आहे आणि तिने मुक्त होणे.
काय खटकले?
शरद पोंक्षेचा कायापालट आणि त्यावर सुकन्या कुलकर्णीला त्याचे अप्रूव्हल मिळाल्याची ख़ुशी. म्हणजे आपल्या मनासारख्या गोष्टी करताना घरचे खूश पाहिजेतच या कंडिशनिंगला बळ दिल्यासारखेच आहे.
चिनुच्या एवढ्या लाईफ अल्टरिंग ऑपरेशन नंतरही तिच्या नवरा बॅकग्राऊंड मधेच आहे.
चारुला तिची गाडी विकायला लागणे (मला ती गाडी तिची स्वतःची स्पेस वाटली होती. )
फारच मायनर पण कुणी तरी म्हटलेय तसे रोहिणी हट्टंगडीला डान्समध्ये सेन्टर स्टेजला ठेवणे आणि त्यांचा तो विचित्र, न शोभणारा विग
चित्रपटात माहेरचे घर बंद
चित्रपटात माहेरचे घर बंद दाखवलेय म्हणजे आईवडील दोघेही हयात नसावेत .>> हो ते आता, पण वंदना गुप्ते आणि रोहिणी यांच्या स्टोरी मध्ये भूतकाळात तरी आई वडिलांची काही भूमिका न्हवती का? कारण मला ते खूपच जाणवलं.
चित्रपट नक्की बघणार. वयानुरुप
चित्रपट नक्की बघणार. वयानुरुप रोल्स निर्माण होतायत हेही नसे थोडके.