विज्ञान जगतातील बातम्या आणि घडामोडी

Submitted by मामी on 13 April, 2022 - 02:00

जगातील आणि भारतातील विज्ञान जगतात घडणार्‍या घडामोडी, संशोधन, प्रयोग, शोध आणि इतर बातम्या या संबंधित नोंदी आणि चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निसर्गातून उत्पन्न होणारे नॅनो हर्ट्स मोजू शकलो ही फारच मोठी अचीव्हमेंंट असावी >> +१

अश्या लहरींचा एक तरंग मोजायला काही वर्षे लागत असतील तर हे फारच अवघड आहे. निदान तो तरंग आहे हे कळायला २-४ तरंग लागतात आणि त्याची तरंग लांबी अचूक कळायला बरेच जास्त तरंग मोजावे लागतात. ही किमया कशी साधली हे जाणून घ्यायला आवडेल. डॉप्लर इफेक्ट वगैरे वापरून कमी वेळात ते तरंग मोजण्यात आले काय? लिंक्स वाचून बघतो.

माझ्या प्रश्नांची उत्तरं वावे यांच्या पहिल्या लिंकमध्ये दिसली. पण माझं ज्ञान तोकडं असल्यामुळे नीट कळली नाहीत. कुणी समजावून सांगू शकेल काय?

हा नक्कीच माईलस्टोन टप्पा आहे. इतक्या कमी वारंवारतेच्या आणि प्रचंड तरंगलांबीच्या गुरुत्वाकर्षण लहरी शोधणे हे प्रचंड मोठे जिकीरीचे व क्लिष्ट काम असणार यात वादच नाही. कारण २०१५ साली LIGO ने बनवलेल्या तब्बल चार बाय चार किलोमीटर लांबीच्या उपकरणाविषयी आणि ते ज्या प्रकारे काम करते त्याविषयी वाचले तेंव्हाच थक्क व्हायला झाले होते. तेंव्हा सुरवातीला जास्त वारंवारता असलेल्या गुरुत्वलहरी डिटेक्ट झाल्या होत्या.


>> गुरुत्व लहरी म्हणजे काय?त्यांचा उगम कोठे होतो?त्या कशा निर्माण होतात?

आपल्याला विश्वामध्ये जितक्या काही प्रकारच्या उर्जा आणि त्यासंबंधित मुलभूत कण पाहायला मिळतात त्यानुसार पूंजभौतिकी मध्ये चार मुलभूत क्षेत्रे अस्तित्वात आहेत असे आजच्या घडीला मानले आहे

विद्युतचुंबकीय क्षेत्र, गुरुत्वाकर्षण क्षेत्र, मजबूत आण्विक क्षेत्र, कमकुवत आण्विक क्षेत्र

(हि वेगवेगळी आहेत कारण त्यांच्यात अजूनतरी थेट संबंध सापडलेला नाही. किंवा या चारींना कारणीभूत एकच/दोनच क्षेत्रे कदाचित असतीलही पण सध्यातरी ती माहिती नाहीत. तसेच या चारी व्यतिरिक्त अजूनही काही मुलभूत क्षेत्रे असू शकतात. जसे कि हिग्ज क्षेत्र, जे हिग्ज कणांशी संबंधित आहे. पण बहुतांश पूंजभौतिकी या चारीद्वारे स्पष्ट करता येते)

अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी "सामान्य सापेक्षतेचा सिद्धांत" (General theory of relativity) मांडताना गुरुत्वाकर्षण हि शक्ती न मानता काल-अवकाश (spacetime) या मिती मधला वक्राकार आहे असे मानले. जिथे (खूपसे) वस्तुमान आहे त्या ठिकाणी अवकाशच वक्र होते. त्यामुळे काल व अवकाश वेगवेगळे न मानता ती एकच मिती मानली तर त्यामध्ये गुरुत्वाकर्षण केवळ त्यातल्या भूमितीद्वारे स्पष्ट करता येते. "आपल्याकडे ओढून घेणारी शक्ती" वगैरे म्हणण्याची गरज पडत नाही. पण जेंव्हा "वक्राकार भाग" अशी मांडणी आपण करतो तेंव्हा ते क्षेत्र "उंचसखल असणे" हे ओघानेच येते (नाहीतर वक्राकार ला अर्थ काय?). आणि "उंचसखल असणे" याचाच दुसरा अर्थ काल-अवकाश (spacetime) मध्ये लहरी आहेत. वक्र भागाला आधीपासूनच गुरुत्वाकर्षण शब्द असल्याने "उंचसखल असणे" याला ओघानेच गुरुत्वीय लहरी शब्द आला. जसे विद्युतचुंबकीय क्षेत्रात विद्युतभाराच्या हालचालीमुले विद्युतचुंबकीय लहरी तयार होतात तसेच इथे प्रचंड मोठ्या वस्तुमानाच्या हालचालींमुळे कालअवकाश क्षेत्रात (म्हणजेच गुरुत्वाकर्षण क्षेत्रात) गुरुत्वीय लहरी तयार होतात. किंबहुना त्या तिथे असायला हव्यात असे आईन्स्टाईन यांनी वर्तवले. पण आईन्स्टाईन यांच्या काळात साधने नसल्याने या लहरींची पडताळणी करता आली नाही. LIGO मुळे ती पडताळणी केली गेली आणि त्यामुळे General theory of relativity सिद्ध करणारे सबळ पुरावे मिळाले.


>> त्याचा उपयोग काय? काही कल्पना?

अशा संशोधनाचा दूरगामी भविष्यात यावर आधारित संशोधने करण्यासाठी उपयोग असतो. कृष्णविवरांच्या केंद्रातून निघणाऱ्या गुरुत्व लहरी अभ्यासून कृष्णविवरांच्या आतील घडामोडी समजून घेता येते. याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक संभाव्य शक्यता असतात. जसे विद्युतचुंबकीय लहरींचा शोध लागल्यावर नंतरच्या काळात त्यावर आधारित अगणित संशोधने आणि उपकरणे आज अस्तित्वात आली आहेत. तोच प्रकार. या लहरी आता आता कुठे आपल्याला अंधुकशा दिसू लागल्या आहेत. अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

LIGO च्या सुरवातीच्या काळात फक्त तीव्र स्वरूपाच्या आणि जास्त वारंवारता असलेल्या लहरी डिटेक्ट झाल्या. ज्या अतिप्रचंड वस्तुमानाच्या ताऱ्यांच्या किंवा कृष्णविवरांच्या हालचालीमुळे निर्माण होतात. पण आताच्या प्रगतीमुळे इतरही खगोलाच्या हालचालीमुळे निर्माण झालेल्या तुलनेने दुबळ्या लहरी सुद्धा डिटेक्ट करणे शक्य झाले आहे.

>> त्याचा उपयोग काय? काही कल्पना?
छान चर्चा चालली आहे. अतुल तुम्ही समर्पक माहिती दिली आहे.
मी त्यात थोडी भर घालू इच्छितो.
विश्वानिर्मितीला कारण असणारा महाविस्फोट १३.७ बिलिअन वर्षांपूर्वी झाला. आपण हा महाविस्फोटाचा प्रकाश "बघू" शकू का? उत्तर आहे नाही. मग आपण कुठवर बघू शकतो?
WHL0137-LS, also called, Earendel(काय नाव आहे!)हा तारा आपल्या पासून २८ बिलिअन प्रकाशवर्ष दूर आहे. ह्या ताऱ्यापासून जे प्रकाश किरण निघतात ते पृथ्वीवर यायला १२.९ बिलिअन वर्ष लागतात. म्हणजे आपण १२.९ बिलिअन वर्ष मागे भूतकाळात बघू शकतो.
विश्वाच्या भूतकाळात त्याच्याही मागे जायचे असेल तर आपल्याला CMBR चा आधार आहे. CMBRचा उगम महाविस्फोटा नंतर ३८०,०००वर्षानंतर झाला. म्हणजे आपण १३.३२ बिलिअन वर्ष भूतकाळात पोहोचलो.
The creation of the CMBR occurred during a period that scientists call the epoch of recombination.
CMBRच्या आधी महा विस्फोटा नंतर केवळ १०^-३४ सेकंदा नंतर गुरुत्वलहरी निर्माण करणाऱ्या अनेक घटना घडल्या. ह्या लहरी अजूनही आपल्या अवतीभवती असणार.
Background gravitational wave ह्या आणि आणि इतर काही लहरींचे मिश्रण आहे. ह्या लहरींच्या अभ्यासामुळे आपण महाविस्फोटाचे अगदी जवळून दर्शन घेऊ शकणार आहोत.
>> त्याचा उपयोग काय? काही कल्पना? ह्या प्रश्नाचे हेही एक उत्तर आहे.

>>२८ बिलिअन प्रकाशवर्ष दूर आहे. ह्या ताऱ्यापासून जे प्रकाश किरण निघतात ते पृथ्वीवर यायला १२.९ बिलिअन वर्ष लागतात.>> हे कसं? विश्व प्रसरण पावत आहे म्हणून आजचं अंतर आणि निर्मिती वेळचे अंतर ह्यामुळे हा फरक का?
अतुल छान सांगितले तुम्ही.

अतुल , उत्तम पोस्ट.
केकु , छान लिहिलेय.

एरंडेल Lol , तारा जर २८ बिलिअन प्रकाशवर्ष दूर आहे. ह्या ताऱ्यापासून जे प्रकाश किरण निघतात ते पृथ्वीवर यायला १२.९ बिलिअन वर्ष लागतात.हे जर विश्वनिर्मितीच्या वेळे पासून अजून दूर गेले आहे , तर किती दूर व कुठल्या दिशेने हे नेमकं कसं मोजतात. अवकाशात दिशाज्ञान असतं का आणि त्याने फरक पडतो का ? विश्वाचे प्रसरण या स्पंदनामुळे होते त्यालाच गुरुत्वीय लहरी म्हणता येईल का ? विश्व आधी अमर्याद नव्हते का , म्हणजे जेव्हा विश्वनिर्मिती झाली तेव्हापेक्षा आता ते मोठे आहे म्हणजे मग ज्या जागी हे मोठे होत गेले तिथे आधी काय होते का त्याने ही जागाही प्रसरण पावत निर्माण केली. अशाही काही जागा आहेत का की जिथे काहीच नाही, काहीच अस्तित्वात नाही. गुरुत्वीय लहरीमुळे काळ ही संकल्पना अस्तित्वात आहे का, कारण जिथे यापेक्षाही सूक्ष्म लहरींचे अस्तित्व असेल तिथे पृथ्वीच्या मानाने काळ थांबल्या सारखा होतो का? पृथ्वीपासून सगळं विश्व सगळ्या दिशांनी तितकंच मोठं आहे का ? वक्राकार म्हणजे गुंडाळल्यासारखे , ripple effect. ही चक्क मोठी गाठ आहे , प्रसरण पावताना या गाठी हळुहळू मोकळ्या होत असतील का ? हे प्रश्न बाळबोध वाटले तर सोडून द्या. Happy

खरंतर विश्व १३.८ बिलियन वर्षांच्या आधीपासून असायला हवे ,फक्त आपल्याकडे पुरावे नाहीत. बिग बँग हे इसवीसनपूर्व व इसवीसन पश्चात या मानवी कालगणनेसारखं परिमाण असावं.कारण सध्या एवढाच आवाका आहे.

काल वावेची लिंक वाचून जरा शोधलं तर अल् जजिरा वरील ही लिंक मिळाली. किंचित सोपं आहे, अतुल यांच्या पोस्टीसारखं.
Scientists hear the cosmic 'hum'

>>२८ बिलिअन प्रकाशवर्ष दूर आहे. ह्या ताऱ्यापासून जे प्रकाश किरण निघतात ते पृथ्वीवर यायला १२.९ बिलिअन वर्ष लागता

हे प्रकाश किरण माणसाने पकडले आहेत का?

एअरंडेल ४ बिलियन प्रकाशवर्ष दूर असताना त्यातून निघालेला प्रकाश आहे तो. तेव्हापासून विश्व प्रसरण पावल्यामुळे १२.९ बिलियन वर्ष लागली

ही सर्व थोडक्यात शास्त्रीय भाषेतील वर्णन आहे.
त्याचा अर्थ शब्दशः घ्यायचा नसतो.

Creatinine वाढले किडनी खराब झाली असेल असा अंदाज केला जातो.
प्रत्यक्षात किडनी कडे बघून ती खराब आहे की चांगली आहे हे सांगता येत नाही.
तसेच हे सर्व अंदाज आहेत .
विश्व प्रसारण पावत आहे.
बिग बँग .
हे सर्व फक्त अंदाज आहेत .
बाकी निरीक्षण वरून केलेले .
सत्य असू शकतात अंदाज.
पण सत्य च असतील असे काही नाही.

घ्या! तिकडे पृथ्वी वक्राकार आहे का याबद्दल अजून चर्चा सुरू आहेत आणि इथे अवकाश वक्राकार आहे पर्यंत पोहोचलेत Wink

ही वरची चर्चा व वरचे निरीक्षण वाचून मला ही शास्त्रीय चर्चा आठवली. यातले कोण कोण आहे ते तुम्हीच ठरवा Happy

जस्ट किडिंग. इंटरेस्टिंग माहिती. वावे, अतुल, केशवकूल - धन्यवाद उकल केल्याबद्दल.

सूर्य मालेत अजून ग्रह असले पाहिजेत असा खुप संशोधक लोकांना संशय आहे..आणि आपण चाल लो 13 बिलियन वर्षा पूर्वीचा तारा शोधण्यासाठी

अस्मिता, त्या अल् जजिरा लिंक वरची माहिती एकदम जबरदस्त! पल्सार मधले ब्लिंकचे निरीक्षण करून सुद्धा सिद्ध केले ग्राव्हिटी वेव्हज!

एकंदर, LIGO मुळे तसेच इतर निरीक्षणानुसार त्या गुरुत्व लहरी आहेत हे सिद्ध झालं म्हणून बरं. नाहीतर? वस्तुमानामुळे अवकाश वक्री होते हे गृहीतक प्रश्नांकित झाले असते, ते प्रश्नांकित झाल्यामुळे पूर्ण जनरल रिलेटीविटी थियरीचा बराच भाग प्रश्नांकित झाला असता. आणि त्यावर तर जगात बऱ्याच लोकांनी पीएचडी केलेल्या आहेत आजवर Lol बरीच जनता कामाला लागली असती. ग्राव्हिटी वेव्हज नही तो फिर क्या?

WHL0137-LS, also called, Earendel या एरंडेल चा अर्थ सुद्धा भारी आहे. सकाळी सकाळी एरंडेल Lol
earendel meaning
the morning star
In Old English, Earendel is a personal name, but it also can mean "the morning star" or "the dawn."

अस्मिता तुमचे प्रश्न तसेच अशा चर्चांसाठी आपला तो प्रलंबित "अवकाशाशी जडले नाते" धागा आता सुरु करायलाच हवा Happy हा धागा फक्त बातम्या नि घडामोडी साठी असुद्या. आपण सर्वजण तिथे कुटत बसुया. अवकाश, विश्व, ग्राव्हिटी, रिलेटीव्हीटी, CMBR, Time Dilation, Twin Paradox, क़्वाटम फिजिक्स इत्यादी. मस्त मजा येईल. आता तर ChatGPT, Google Bard इत्यादी सुद्धा आले आहे. मला अजून आईनस्टाईन Spacetime का म्हणतोय कळलेले नाही नुसत्या स्पेस ला काय धाड भरली होती Lol असो. उद्याच सुरु करतो धागा.

अतुल
तुम्ही कराच सुरु धागा. मग आपण ट्वीन पॅॅराडॉक्स हमरा तुमरीवर येऊ! दिवे घेऊन.
आणि सर तुम्ही क़्वाटम फिजिक्स विसरलात काय.
वर अस्मिता ने अल जझीराची लिंक दिली आहे. माझा PC डंब आहे म्हणून ऐकता आली नाही. पण इथे ABPची एक लिंक मिळाली आहे. तिथे हे छान समजाऊन सांगितले आहे.
https://news.abplive.com/science/first-evidence-of-gravitational-waves-a...

>> ही वरची चर्चा व वरचे निरीक्षण वाचून मला ही शास्त्रीय चर्चा आठवली

एक नंबर Lol Evergreen guys n episode as always

@ केशवकूल होय होय नक्कीच Lol Evolution पण घेऊया त्यात. दंगा धुडगूसच Biggrin
मी हे लिहित असताना बाजूला बसलेल्या चिरंजीवानी मध्येच डायनासोरच्या काळातला साप वर व्हिडीओ दाखवला.

एक कोणते तरी गृहितक आहे.
तुम्ही बघत असाल तर च तो particle तिथे असती तुम्ही नजर हटवली की तो भलत्याच ठिकाणी असतो.

अतुल काही वर्षांपूर्वी आपली क्वांटम फिजिक्स, श्रोडींजर मांजर, मेनी वर्ल्ड थिअरी इत्यादिवर चर्चा झाली होती तो धागा कुठला?
तो अशा चर्चेचा नसेल तर नविन धागा काढाच.

Fossil वरून आपण काही अंदाज केले आहेत
तुटलेल्या विस्कळीत कड्या जोडून.
Fossils बनणे ही क्रिया च खूप किचकट आहे.
सहज ते बनत नाहीत

त्या मुळे अनेक गोष्टी आपल्याला माहीत च नाहीत
माणसाचे अवशेष च फक्त 3 लाख वर्ष पूर्वी चे माहीत आहेत
3 लाख वर्ष काळ च evolution साठी खूप म्हणजे खूप लहान आहे
अशी मत आहेत अभ्यासू लोकांची

अतुल, छान लिहिलं आहे. या विषयावर धागा नक्की काढा. विशेषतः या लो फ्रिकवेंसी तरंगमापन पद्धतीबद्दलसुद्धा वाचायला आवडेल.

मला पल्सार/ त्यांचा ॲरे आणि त्यांना वापरून दीर्घिकेच्या आकाराची दुर्बीण कशी तयार करतात आणि वापरतात तो भाग जाणून घ्यायची उत्सुकता आहे.

अमितव,
स्पंदकांकडून येणारे पल्सेस हे अत्यंत नियमित असतात. पण गुरुत्वीय लहरींमुळे एखादा पल्सार आणि पृथ्वी यांच्यामधल्या स्पेस-टाईम फॅब्रिकमधे हलचल होते. ते एकतर ताणलं जाईल किंवा आकुंचन पावेल. (लहरीचा crest आहे की trough यावर ते ठरेल) मग पल्सारकडून येणारा पल्स हा एक तर थोडा उशिरा येईल किंवा थोडा लवकर येईल. (हे सगळं अत्यंत कमी प्रमाणात. मुळात यासाठी निवडलेल्या पल्सार्सचा आवर्तन काल मिलिसेकंदांमधे आहे. त्यावरून कल्पना येईल.)
आता एकाच पल्सारचं निरीक्षण करून निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल. कारण इतर अनेक कारणांमुळे असा अत्यल्प फरक पडू शकतो. म्हणून अनेक (दिशांना असलेल्या) स्पंदकांची अनेक वर्षे (कारण आपल्याला हव्या असलेल्या लहरींचा आवर्तन काल अनेक वर्षांचा आहे) निरीक्षणं घेऊन त्यातून या लहरींच्या अस्तित्वाचा 'पुरावा सापडला आहे'.

इंटरेस्टिंग बातमी आहे.
Bose-Einstein condensate (the fifth state of matter) हि अवस्था प्रयोगशाळेत निर्माण करायला वैज्ञानिकाना absolute zero तापमान आणि बराच खर्चिक खटाटोप करावा लागला होता. पण तीच अवस्था झाडाच्या पानात नैसर्गिकरित्या बनलेली असते असे लक्षात आले Lol

https://scitechdaily.com/quantum-physics-in-a-leaf-scientists-discover-l...

कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून ओडिशा टिव्हीवर लिसा नामक एका व्हर्चुअल (आभासी?) वृत्तनिवेदिकेने इंग्रजी आणि ओडिया भाषेत बातम्या दिल्या: https://scroll.in/video/1052362/watch-odishas-first-ai-powered-virtual-n...
ही कदाचित पहिली भारतीय आभासी वृत्तनिवेदिका असावी.

Pages