Submitted by मामी on 13 April, 2022 - 02:00
जगातील आणि भारतातील विज्ञान जगतात घडणार्या घडामोडी, संशोधन, प्रयोग, शोध आणि इतर बातम्या या संबंधित नोंदी आणि चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाय द वे आता सर्वांनी
बाय द वे आता सर्वांनी चांद्रयान 3 चे प्रक्षेपण लाईव्ह पहा
Watch live Chandrayan 3 launch live now:
https://www.youtube.com/watch?v=q2ueCg9bvvQ
https://www.isro.gov.in
https://www.isro.gov.in/Chandrayaan3_Mission_LiveStreaming.html
पूर्ण टीम चे अभिनंदन..भारताची
पूर्ण टीम चे अभिनंदन..भारताची अजून एक उत्तुंग झेप.
गेले काही दिवस ही बातमी
गेले काही दिवस ही बातमी माध्यमातून झळकत आहे. "हिंदी महासागरात गुरुत्वाकर्षणामध्ये भले मोठे छिद्र(?)"
https://www.bbc.com/marathi/articles/c3g1l5q3p9ro
वास्तविक 'छिद्र' हा मध्यमांनी केलेला विपर्यास आहे. छिद्र म्हणजे काय तिथे गेल्यावर गुरुत्वाकर्षणाअभावी भुर्रर्रकन उडून चंद्रावर जाणार का?
असे छिद्र वगैरे असते तर इतक्या वर्षात माहीत झाले असते आणि उपग्रह प्रक्षेपण करण्याकरिता त्याचा उपयोग केला असता. अब्जावधी रुपये खर्च करून लॉंचपॅड बनवण्याची जरुरी नव्हती
काहीही मनाला येईल ते छापतात.
छिद्र वगैरे काही नाही या भागात महासागराखाली प्रचंड मोठी पोकळी आहे. त्यामुळे तिथे पृथ्वीचे वस्तुमान आपसूकच कमी आहे, व त्याचा परिणाम त्या महाप्रचंड क्षेत्रात पृथ्वीवरील इतर भागाच्या तुलनेने गुरुत्वाकर्षण कमी आहे. तसेही गुरुत्वाकर्षण पृथ्वीवर सर्वत्र अगदीं समान नाहीच. कमीजास्त आहे. आणि हिंदी महासागरातील या भागाविषयी जहाजांच्या उपकरणांनी कित्येक दशकांपूर्वी नोंद घेतली होती. मात्र अचानकच ही बातमी मागचे काही दिवस माध्यमांनी का उचलून धरली आहे हे कळत नाही.
आता परग्रह वासियांचा प्रश्न
आता परग्रह वासियांचा प्रश्न ऐरणीवर. यू एस कॉंग्रेस मध्ये चर्चा होणार आजची ताजी बातमी.
https://www.theguardian.com/world/2023/jul/21/ufos-congress-alien-house-...
Two atoms are conversing: one
E-Joke
Two atoms are conversing: one has four electrons, the other only three. He says, “Damn! I lost an electron.” The other one says, “Are you sure?” And the one who has only three electrons answers, “I’m positive.” You almost laughed, didn’t you? No?
(No subject)
(No subject)
better keep an ion that.
better keep an ion that.
हो हा मस्त आहे.
Intelligent jokes असा सर्च दिला तर असे अजून अनेक मिळतील.
मामी
मामी
हा जोक मी सर्च केलेला नाही. मी पार्टिकल फिजिक्स वाचत होतो. त्यात हा मिळाला. लेखकाला सांगायचे होते कि वैज्ञानिक पण इतके एकसुरी ह्युमरलेस नसतात. मला आवडला म्हणून ह्या धाग्यावर लिहिला.
चालेल की. तुमच्या या जोकच्या
चालेल की. तुमच्या या जोकच्या अनुषंगानेच आठवलं म्हणून लिहीलं.
आता सूर्यावर स्वारी .
आता सूर्यावर स्वारी .
India's first space-based observatory to study the sun.
Aditya-L1 to be launched on September 2 at 11.50 hours from Sriharikota: ISRO.
The Aditya L1 Solar Observatory spacecraft will be launched on 2 September 2023 to explore the different solar activities in real time, and their influence on space weather.
Aditya L1 will be the first space-based Indian mission to study the sun. The expected budget of Aditya L1 is Rs 378 crore. However, the total cost of this solar mission has not been released officially by ISRO yet.
L1 पॉईंट म्हणजे पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला?
L2 विरुद्ध दिशेला. तिथे जेम्स
L2 विरुद्ध दिशेला. तिथे जेम्स वेब आहे.
L1 पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये, चंद्रा पलीकडे. पृथ्वीपासून १५ लाख किमी.
हे फारच भारी आहे.
हे फारच भारी आहे.
रच्याकने : "सूर्यावर स्वारी"
रच्याकने : "सूर्यावर स्वारी" हे अतिरंजित शिर्षक आहे.
सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये बुध आणि शुक्र आहेत. शुक्र आणि पृथ्वी मधील सर्वात कमी अंतर ३.८ कोटी किमी असु शकते.
आणि L1 पृथ्वी पासून १५ लाख किमी.
थन्क़ मानव. तेव्हा चेक नाही
थन्क़ मानव. तेव्हा चेक नाही केलेले.
"सूर्यावर स्वारी" म्हणजे भारा भागवत स्टाईल!
The L1 point of the Earth-Sun system affords an uninterrupted view of the sun and is currently home to the Solar and Heliospheric Observatory Satellite SOHO.
Of the five Lagrange points, three are unstable and two are stable. The unstable Lagrange points – labeled L1, L2, and L3 – lie along the line connecting the two large masses. The stable Lagrange points – labeled L4 and L5 – form the apex of two equilateral triangles that have the large masses at their vertices.
Solar Orbiter Overview
Solar Orbiter Overview
इथे वाचा.
https://www.nasa.gov/content/solar-orbiter-overview
आदित्य L1 बद्दल जास्त माहिती कुठे मिळेल?
हा पॉइंट कसा ठरवला जातो.
हा पॉइंट कसा ठरवला जातो.
आणि ह्या पॉइंट च व्यास किती आकाराचा असतो.
छान पोस्ट केशवकूल,
छान पोस्ट केशवकूल, माहितीपूर्ण आहे. 'आदित्य' बद्दल अजून वाचायला आवडेल. लिंक निवांत बघेन.
)
(एक गंमत -
आदित्य पृथ्वीच्या मानाने सूर्याच्या इतक्या जवळ आहे. तोही निरीक्षणासाठी.. त्यामुळे आदित्यसाठी 'जलते है जिसके लिये तेरी आंखो के दिये, ढूंढ लाया हुं वही गीत मैं तेरे लिये ' हे गाणं चपखल बसते आहे.
इ थे खाली जाऊन Adilya L1
इथे खाली जाऊन Adilya L1 Mission booklet डाऊनलोड करता येईल.
मानव पृथ्वीकर
मानव पृथ्वीकर
Thanks . Done.
Hemant
उद्या .
ओह! आदित्य L1 वर ऑलरेडी चर्चा
ओह! आदित्य L1 वर ऑलरेडी चर्चा सुरू आहे वाटते इथे. मी आत्ताच ही मराठी बातमी वाचली. यामध्ये बरेच तपशील दिले आहेत:
https://www.bbc.com/marathi/articles/c72e7zvqn24o
>> जलते है जिसके लिये
>> जलते है जिसके लिये
वाह! अगदी समर्पक गाणे सुचले
जलते है जिसके लिये तेरी आंखो
जलते है जिसके लिये तेरी आंखो के दिये, ढूंढ लाया हुं वही गीत मैं तेरे लिये >> अस्मिताने लिहिलंय म्हणजे काही तरी भारीच असणार. त्या लगान मधल्या भुरा स्टाईल अच्छा हे अछा है म्हणतो.

कोणाची आंखे, काय ढुंढुंन आणलं आणि कुठलं गीत कोण कोणासाठी गातोय असे अगदीच भाप्र पडल्यावर मेंदूची सायकल पार मोडीत काढल्यागत झालंय. परत आदित्य म्हणजेच सूर्य .... आणखी सायकल चालली. नको. अच्छा है अच्छा है!
त्या लगान मधल्या भुरा स्टाईल
त्या लगान मधल्या भुरा स्टाईल अच्छा हे अछा है म्हणतो >> माझ्या डोळ्यासमोर अंदाज अपना अपना मधला तेजा आला अच्छा है अच्छा है म्हणणारा.
जलते हैं जिसके लिये >>
अस्मिताने लिहिलंय म्हणजे काही
मेंदूची सायकल पार मोडीत काढल्यागत झालंय>>>>
अस्मिताने लिहिलंय म्हणजे काही तरी भारीच असणार.
>>>एवढा विश्वास टाकू नका कोणी. बरेचदा काहीही अर्थ नसतो.
हा सूर्य आणि हा
जयद्रथआदित्यरथ -----कोणाची आंखे, >>>पृथ्वीची
काय ढुंढुंन आणलं>>> ढुंढुंनला हसते आधी.
सूर्यावरील निरीक्षणाच्या नोंदी
कुठलं गीत>>> त्याच नोंदी ज्या पृथ्वीला हव्या आहेत पण पृथ्वीवरुन मिळणं कठीण आहे.
आदित्य L1 जवळ आहे सूर्याच्या म्हणजे स्वतः ताप सहन करणार आणि नोंदी (स्फोट, ज्वालामुखी, गॅमा रेज्, हेलियम -मिथेन-हायड्रोजनपासून ऊर्जा निर्मिती इ इ) आणून देणार, ज्या आपल्याला म्हणजे पृथ्वीवासियांना नेहमीच हव्या होत्या.
'अच्छा है अच्छा है' नाना पाटेकरचचं आठवतं.
केकू, अतुल आणि मानवदादा,
केकू, अतुल आणि मानवदादा,
लिंक्स वाचल्या. धन्यवाद.
हा पॉइंट कसा ठरवला जातो.>>>
Lagrange point असा बिंदू जिथे पृथ्वी आणि सूर्य यामध्ये आपसातल्या गुरुत्वाकर्षणाचे बल समसमान होऊन कमीतकमी इंधनात तरंगत राहून एकाच कक्षेत फिरत तपशीलवार अभ्यास करता येतो. दोन चुंबकामधे एखादी लोखंडी पिन तरंगत ठेवता येते तसं काहीसं.
अशी एकापेक्षा जास्त केंद्रं असू शकतात, त्यापैकी एकावर आदित्य वेधशाळेची तरंगती प्रयोगशाळा उभी (?) राहील. असे पाच पॉईंट्स दिसत आहेत. साधारण असा केंद्र निवडतात, जिथे या दोन्ही बलांमधले आकर्षण व प्रतिकर्षण समान असेल. त्यापैकी दोन अस्थिर असतात. कारण त्यांचा कोन 60° असून पृथ्वीच्या उलट्या दिशेला असतात. बरेचदा उल्का वगैरे नैसर्गिकरित्या L2, L3, L4 च्या कक्षेत तरंगत असतात. ह्या पॉईंट्सना स्वतःची स्वतंत्र कक्षा असते व ती बरीच रूंद असू शकते व दोन्ही कडच्या गुरुत्वीयबलाच्या संतुलनामुळे याला ठराविक परिवलनात अडकवून ठेवले जाते. चंद्र व पृथ्वी (पूर्ण ग्रहमाला) सुद्धा सूर्याच्या Lagrange points मधे आहेत. जणू सेल्फ प्रोपेलिंग सॅटेलाईट्स ?? इतकं पर्फेक्ट कसं झालं असेल हे ...!!
हे चुकीचे असेल तर सांगा कुणीतरी...
L1 का म्हटलंय आदित्यला तो तर अस्थिर पॉईंट आहे ना, टेक्निकली.
१) थ्री बॉडी प्रॉब्लेम
१) थ्री बॉडी प्रॉब्लेम म्हणजे दोन महाकाय आणि एक इटुकला पिटुकला त्यांच्यामध्ये घुटमळणारा. ह्यांचे गणित. लॅॅग्रंज आणि आयलर ह्या प्रसिद्ध गणितज्ञांनी सोडवले. दोन महाकाय "वस्तूंच्या" लठ्ठालठ्ठीत शहाणी माणसे "कुंपणावर " बसून राहतात. अश्या एकूण पाच जागा असतात. हे लॅॅग्रंज ने दाखवून दिले म्हणून लॅॅग्रंज बिंदू असे नाव पडले. ह्या बिंदूंवर बसून आपण दिग्गजांच्या हाणामारीचा आस्वाद घेऊ शकतो.
२) जिथे जिथे अशी स्थिति असते ( दोन महाकाय) असतात त्या प्रत्येक ठिकाणी असे पाच बिंदू असतात. ह्या बिंदूंवर दोनही महाकाय वस्तूंचे गुरुत्वाकर्षण बल समसमान असते.
३)ह्यापैकी L1, L2, L3 हे अस्थिर असतात. म्हणजे ते जणू टाईट रोप वकिंग करत असतात. त्यांचा तोल गेला तर ते कुठेतरी भरकटू शकतात. किंवा चकवा लागल्यासारखे आजूबाजूला फिरत राहतात. जर या ठिकाणी आपण आपला कृत्रिम उपग्रह/यान ठेवले असेल आणि ते भरकटले तर त्याला ताळ्यावर आणण्यासाठी इंधन लागते.
४) ह्याच्या उलट L4, L5, हे पार्किंग लॉट एकदम सुरक्षित! इथे तुम्ही तुमची गाडी लावून मजेत फिरू शकता. कोणीही मामा येऊन तुम्हाला दंड ठोकणार नाही वा टोचण लावून गाडी पळवणार नाही. तुम्हाला तुमच्या शहरातल्या अश्या L4, L5, जागा माहित आहेत काय?
५) आपल्या सूर्यमालेत सूर्य आणि प्रत्येक ग्रह ह्यांचे लॅॅग्रंज बिंदू आहेत. इतकेच नव्हे तर आपली पृथ्वी आणि चंद्र ह्यांचे पण लॅॅग्रंज बिंदू आहेत.
६) पैकी सूर्य आणि गुरु ह्या दुकलीचे लॅॅग्रंज बिंदू हे खास आहेत. ह्या जोडीच्या L4, L5 बिंदूंवर अक्षरशः हजारो लघुग्रह लपून बसले आहेत. ह्यांना ट्रोजन म्हणतात. एकूण L4, L5 म्हणजे अवकाशातील कचरा डेपो आहेत. पण हे L4, L5 तसे खूप कामाचे बिंदू आहेत. त्याबद्दल आता फक्त रुमाल टाकून ठेवतो!
हुश्श.
केशवकूल, छान माहिती आणि
केशवकूल, छान माहिती आणि सोप्या शब्दात
>> ह्यापैकी L1, L2, L3 हे अस्थिर असतात
कारण पृथ्वी सूर्य चंद्र यांना ते सर्वात जवळचे आहेत. त्यामुळे या तीन महागोलकांतील हालचाली मुळे थोडेफार जरी गुरुत्वीय बदल झाले (आणि सूर्यावर तर सतत होत असतात) तरी त्याचा परिणाम या तीन बिंदूवर होतो. त्यामानाने L4 आणि L5 दूर आहेत. तिथे याचा फार परिणाम होत नाही.
>> जणू सेल्फ प्रोपेलिंग सॅटेलाईट्स ?? इतकं पर्फेक्ट कसं झालं असेल हे ...!!
पृथ्वी सूर्य चंद्र हे खोल खड्डे (गुरुत्वाकर्षण मूळे निर्माण झालेले). आणि हे बिंदू म्हणजे या खड्ड्यांच्या दरम्यान असलेले उंचवटे. त्यामुळे या उंचवट्यांवर जो उभारेल तो सुरक्षित. खड्ड्यात पडण्याची भीती नाही. पण हे खड्डे हलत आहेत (एकमेकांभोवती फिरत आहेत). म्हणून हे बिंदू सुद्धा अर्थातच फिरत राहतील. विकिपीडियावर छान प्रेझेंटेशन आहे ते पाहता लक्षात येते:
Pages