विज्ञान जगतातील बातम्या आणि घडामोडी

Submitted by मामी on 13 April, 2022 - 02:00

जगातील आणि भारतातील विज्ञान जगतात घडणार्‍या घडामोडी, संशोधन, प्रयोग, शोध आणि इतर बातम्या या संबंधित नोंदी आणि चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

न्यूक्लियर इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स (NEMP एनईएमपी) हा अणु स्फोटामुळे निर्माण होणारा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा स्फोट आहे. परिणामी झपाट्याने बदलणारी विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रे विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक प्रणालीं मध्ये हानीकारक विद्युतप्रवाह आणि उच्च दाब व्होल्टेज निर्माण करतात.
इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स किंवा EMP चे मोठ्या प्रमाणावर विनाशकारी परिणाम होऊ शकतात. न्यूक्लियर इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स अटॅकमुळे किती विनाश होऊ शकतो याबद्दल फारसे माहिती नाही परंतु हे स्पष्ट आहे की होणारे नुकसान आपली आधुनिक जीवनशैली पूर्ववत होण्यास अनेक वर्षे आणि अगदी दशके लागतील. EMPमुळे सर्व इलेक्ट्रिकल सर्किट्स पूर्णपणे विस्कळीत होतील आणि मोठ्या प्रमाणावर हल्ला झाला तर आधुनिक जग पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता आहे, सध्या अनेक राष्ट्रे असे बॉंब बनवण्यात प्रयत्नशील आहेत.(Including India)
नेट वर शोध केल्यास भरपूर माहिती मिळू शकेल. वाचा आणि वेळ आली तर स्वतःचा बचाव
कसा करावा हे समजून घ्या.

लैंगिक भूक शमवण्याचे आमिष दाखवून खून!
जपान मध्ये jack-in-the-pulpit wildflowers कीटकांना सेक्सचं आकर्षण निर्माण करतात आणि नुसती फसवणूकच नाही तर त्यांचा खूनच पाडतात अशी काही निरीक्षणे सापडली आहेत.
ऑर्चिड आणि डेझी गटातिल काही वनस्पती आपल्या मादक गंधाने किंवा मादीला साधर्म्य असलेल्या रंगाने नर कीटकांना आकर्षित करुन त्यांना फसवतात. सेक्सची भूक भागत नाहीच, वर नेक्टरही मिळत नाही पण परागीभवनाचे कार्यभाग मात्र पूर्ण होतो. बिचारा नर त्या फुलावर आपले स्पर्म फुकट दवडतो. तशाच काही वनस्पती कीटकांना शब्दशः गिळंकृत करतात (घटपर्णी वर्गातील) हे आपल्याला ज्ञात आहेच.
पण ह्या संशोधनावर शिक्कामोर्तब झाले तर सेक्सच्या आमिषाने आकर्षित करुन खून करणारी ही पहिलीच वनस्पती ठरेल. .. म्हणजे आमिश आणि गिळंकृत या दोन्ही कृती एकत्र, एकाच उद्देशाने होणे.
शेवटी मानवात दिसणारं निसर्गात इतरत्र ही असलंच पाहिजे, हे खेदाने आलंच!

The Guardian US: Man who received landmark pig heart transplant died of pig virus, surgeon says.
https://www.theguardian.com/us-news/2022/may/06/man-landmark-pig-heart-t...
माणसाच्या शरीरात डुक्कराचं हृदय ट्रान्सप्लांट केलं होत, ती व्यक्ती कदाचित व्हायरस इन्फेक्शन होऊन गेली. यात अनेक एथिकल आणि समजा डुक्करांना होणारं इन्फेक्शन असं मानवात आणि ते स्प्रेड होऊ शकणारे असेल तर एका नव्या pandemic ला निमंत्रण ठरू शकेल असे अनेक मुद्दे आहेत.
तरी दोन महिने जगला हा खूप मोठा काळ आहे, आणि तो आधीच खूप आजारी होता त्यामुळे नक्की कशाने मेला हे सांगणं तितकं सोपं नाही.

अरे बाप रे! हे वाईट आहे. पण त्याचा डुकराच्या हृदयाशी काही संबंध नाही हा डिस्क्लेमर द्यायला पाहिजे. (म टा/लोकसत्ता वाले उगीच रानडुकराचं काळीज वगैरे बातमी करतील).

>>रानडुकराचं काळीज >> Biggrin
कुणाला भोसकले त्याची शिक्षा झाली भोगुन. आणि मेडीकल एथिक्स नुसार त्यात काही फरक ही पडू नयेशी सहमत.
नीजर्क- इमोशनली विचार करता तशी रिअ‍ॅक्शन होणं अर्थात स्वाभाविक आहे.

आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या कृष्णविवराची प्रतिमा मिळवण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे. याआधी M87 या दुसऱ्या एका दीर्घिकेच्या केंद्रस्थानी असलेल्या कृष्णविवराची प्रतिमा मिळवली गेली होती.
https://eventhorizontelescope.org/blog/astronomers-reveal-first-image-bl...

विश्व निर्मितीच्या लगेचच विश्वाची छायाचित्रेे मिळवण्यात शास्त्राद्यांना यशमिळाले आहे. ती बातमी इथे
https://www.ndtv.com/world-news/first-pic-of-earliest-galaxies-formed-af...

Confirm आहे का
सायन्स विषयी बातम्या आणि जाहिराती ह्यांच्या मध्ये काही फरक नाही
Confirm काही नसते फक्त आता माणसाला जे समजते त्या वर ते अंदाज असतात .
चीन नी सूर्य बनवला आशी बकवास head line असलेल्या बातम्या .सायन्स मधील मॅगझिन नी दिल्या होत्या.
चीन नी लहान प्रमाणात fusion reaction घडवून उच्च तापमान निर्माण केले ही खरी बातमी आहे.
सूर्य आणि ही बातमी काडी चा संबंध नाही.
माणसाला अजून पूर्ण सूर्य समजला पण नाही.

Hemant 33
सर मी अजाण बालक. मी कोण Confirm करणार? आता ही बातमी भारतातील झाडून सर्व माध्यमांनी दिली आहे. अर्थात हल्ली कुणाचा भरवसा नाही. मोठमोठे लोक सुद्धा दाबून ठोकतात. ही बातमी व्हाईट हाऊस मधून आली आहे, आता बायदान पण लगाव्ड करत असेल असे वाटत नाही.
पण अमेरिकेचेही काही खर नाही. मध्ये त्यांनी चंद्रावर माणूस उतरवला असे पण ठोकून संगितले होते अस बर्‍याच लोकांचे म्हणणे होते. कोविदचा विषाणू कुठे आपण पहिला आहे. पण आपण नर्स बाईचा चेहरा पाहून टोचून घेतले की नाही? कोवीड सुद्धा फ्राड आहे अस म्हणणारे आहेतच की. आपण काय सेफ साईड खेलायचे.

जेम्स वेब टेलिस्कोपमधून मिळालेल्या प्रतिमा बघून (आणि अर्थातच त्याबद्दल वाचून) अवाक व्हायला झालं आहे! १३.१ अब्ज प्रकाशवर्षं लांब असलेली गॅलेक्सी आहे त्यापैकी एका प्रतिमेत! ( महास्फोट किंवा बिग बँग हा १३.८ अब्ज वर्षांपूर्वी झाला असं मानलं जातं)

फारच कुतूहल चाळंवणारं आहे हे. बरीच आणि बऱ्याच अंगाने चर्चा सुरु आहे यावर अंतरजालावर. विश्वाच्या आजवर माहित झालेल्या (cmbr theory वरून गणिताने काढलेल्या) आकाराच्या आसपास अंतरावर दीर्घिका प्रत्यक्ष आढळणे व त्यांच्या इतक्या स्वच्छ प्रतिमा मिळवणे हि खूप मोठी अचिव्हमेंट आहे. जसजसे अधिक तपशील मिळत जातील तसतसे खूप रोचक गोष्टी समोर येतील.

रोचक. मी अजून फार खोलात वाचलं नाही, पण इतक्या दूरवरच्या गोष्टींची प्रतिमा कशी काय मिळाली? वाटेत असणाऱ्या इतर गोष्टींमुळे येणारा नॉइज्, जो पाहिजे असलेल्या प्रतीमेपेक्षा कित्येक पट जास्त असावा, तो कसा काढून टाकला? सगळंच आश्चर्यकारक आहे.

ह.पा., ही दुर्बीण अधोरक्त (इन्फ्रारेड) किरण वापरते. दृश्य प्रकाशाच्या आड जी कॉस्मिक डस्ट येते ती अधोरक्त किरणांच्या आड येत नाही (त्यांच्यासाठी ती पारदर्शक आहे). त्यामुळे जी वैशिष्ट्ये एरवी (दृश्य प्रकाशासाठी) झाकलेली असतात ती हा टेलिस्कोप 'पाहू' शकतो.

अच्छा. धन्यवाद वावे. ह्यावर एक व्हिडिओ नक्की तयार करा. माझ्यासारख्या लोकांना समजायला सोपे जाईल.

अताच ही बातमी वाचली,
The Nobel Prize in Physics 2022 will be awarded to scientists Alain Aspect, John F Clauser and Anton Zeilinger "for experiments with entangled photons, establishing the violation of Bell inequalities and pioneering quantum information science,
म्हणजे "गुंतागुंत" (entanglement) ह्या बहुचर्चित विषयाला आता मान्यता मिळाली तर.
ह्यावर लिहिता येण्यासारखे भरपूर आहे.
ज्यांना रुची असेल त्यांनी Dance of the photons : from Einstein to quantum teleportation / Anton Zeilinger. हे पुस्तक जरूर वाचावे. हे पुस्तक माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकांना समजण्यासारखे आहे.

हा व्हिडिओ पाच वर्षं जुना आहे आणि बातमी तर त्याहूनही जुनी आहे. पण हिग्ज बोसॉन कणांचा शोध Large Hadron Collider (LHC) मधे कसा लागला हे ऐकायला मिळेल.

शीर्षकातील ऋग्वेदाचा अगदी सुरवातीला फक्त उल्लेख आहे. वक्त्याच्या करीयरमध्ये कलाटणी कशामुळे मिळाली या संदर्भात. त्या दृष्टीने शीर्षक खरंतर मिसलिडिंग आहे.

एक हृद्य प्रसंग १४.३८ च्या नंतर येतो. Happy

From Rigveda to Higgs Boson: A Journey in Science : https://www.youtube.com/watch?v=Nw2ONvI1j68

गुरुत्वीय लहरींच्या बाबतीतलं एक महत्त्वाचं संशोधन नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. अत्यंत कमी वारंवारिता (फ्रिक्वेन्सी) असलेल्या, म्हणजेच बराच मोठा टाईम पिरियड असलेल्या गुरुत्वीय लहरी ग्रहण करण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे. नॅनोहर्ट्झ मधे ही वारंवारिता आहे. एक हर्ट्झ म्हणजे
दर सेकंदाला एक लहर पूर्ण. मिलिहर्ट्झ म्हणजे १००० सेकंदात एक लहर. नॅनोहर्ट्झ म्हणजे जवळजवळ दहा वर्षांच्या कालावधीत एक लहर पूर्ण. इतक्या कमी वारंवारिता असलेल्या आणि प्रचंड तरंगलांबी ( कारण इथेही वेग प्रकाशाचा असतो तोच) असलेल्या लहरी ग्रहण करण्यासाठी पृथ्वीवर असलेल्या प्रयोगशाळा ( उदाहरणार्थ LIGO) पुरेशा नव्हत्या. त्यामुळे अवकाशात असलेल्या घड्याळांचा, म्हणजे स्पंदकांचा ( पल्सार्सचा) उपयोग करण्यात आला. गुरुत्वीय लहरींमुळे स्पंदकांकडून येणाऱ्या स्पंदनांमधल्या कालावधीत अत्यंत कमी फरक पडतो. पंधरा वर्षे सतत याचा अभ्यास करून त्यातून या कमी वारंवारिता असलेल्या (लो फ्रिक्वेन्सी) गुरुत्वीय लहरींचा पुरावा सापडल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे.
यात जीएमआरटी या पुण्याजवळच्या रेडिओ दुर्बिणीचाही वाटा आहे. स्पंदकांची निरीक्षणे आणि त्यांचा घड्याळासारखा उपयोग करण्यात जीएमआरटीचा सहभाग आहे.
या काही सोप्या शब्दांतल्या माहितीच्या लिंक्स.

https://www.space.com/gravitational-waves-astronomers-why-so-excited

https://indianexpress.com/article/cities/pune/punes-gmrt-first-indian-fa...

वाव! निसर्गातून उत्पन्न होणारे नॅनो हर्ट्स मोजू शकलो ही फारच मोठी अचीव्हमेंंट असावी. शेअर केल्याबद्दल धन्यवाद वावे.

वाह! फारच उत्तम. त्याचा उपयोग काय? काही कल्पना? कदाचित लिंकमधे दिलं असेल. वाचते. धन्यवाद वावे.

मला जे काही समजलं आहे त्यावरून-
जशी इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींची कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड आहे, तशी गुरुत्वीय लहरींची कॉस्मिक बॅकग्राऊंड शोधून काढण्यातली ही एक महत्त्वाची पायरी आहे.
अस्चिग चांगलं सांगू शकतील.

हा विषयात सध्या तरी प्राथमिक स्वरूपात माहिती प्राप्त आहे.
Detail माहिती अजून संशोधक लोकांनाच माहीत नाही.
गुरुत्व लहरी म्हणजे काय?
येथूनच आपली तरी सुरुवात आहे..
गुरुत्व लहरी म्हणजे काय?
त्यांचा उगम कोठे होतो?,
त्या कशा निर्माण होतात?
एक नाही अनेक प्रश्न आहेत.
मग त्या लहरी न ची तरंग लांबी कमी असणे किंवा जास्त असणे ह्याचा अर्थ काय?
असे अनेक प्रश्न
हे पुढचे प्रश्न चालू होतात

Pages