भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घाव खोल असेल तर रेबीज चा पहिला डोस 48 तासाच्या आत डॉ च्या सल्ल्याने घ्या.ओरखडलेली जागा लगेच पाणी किंवा डेटॉल ने साफ केलीच असेल.घाव वरवर असेल तरीही डॉ ना दाखवाच.

घाव खोल असेल तर रेबीज चा पहिला डोस 48 तासाच्या आत डॉ च्या सल्ल्याने घ्या.ओरखडलेली जागा लगेच पाणी किंवा डेटॉल ने साफ केलीच असेल.घाव वरवर असेल तरीही डॉ ना दाखवाच. <<>>>> हो.

घरच्या माऊनेच नख मारलय. त्याचं वॅक्सिनेशन झालेलं आहे. फार खोल नाहीये बहुतेक घाव. पण लगेच टिटीचं आणि अ‍ॅन्टी रेबिज इन्जेक्शनचा पहिला डोस घेतलाय. शिवाय अ‍ॅन्टी बायोटीक्स सुरु केली आहे.

काल भारतातून परतलो आणी लगेच सिंबाला आणायला गेलो. काय खुश झाला पठ्ठा आम्हाला पाहून. नुसता आवाज दिला तर सरळ अंगावर ऊडीच मारली, मग काय माझा फोन जमिनीवर आणी सिंबाचे चाटणे सुरू. पुरता धुमाकुळ घातला.
घरी आलोतर घरभर पळत सुटला. ईतका आनंदी होता आम्हाला पाहून.

खरच अनकंडीशनल प्रेम काय असते हे अनुभवले …

हरितात्या, सिंबाला होम केअर ला ठेवले होते की पेट हॉटेल असतात तसे? आधी सवय केली होती त्याला? कसा राहिला?
हा सगळा अनुभव लिहा ना जरा.

सिम्बा बरा आहे. त्याला फिट्स मुळे पोटात cramp येतात. रोज रात्री २.३० ते ३.३० दरम्यान. पेनकिलर चालू केलेत होईल ठीक.

सिम्बाबद्दल वाचून खूप वाईट वाटते. मुका जीव तो.. किती सहन करतोय. लवकरच त्याच्या दुखण्यावर रामबाण उपाय सापडावा ही इच्छा.
मागे मी इथे लिहिले होते तसे होमिओपॅथिक उपाय करून बघता का? आमच्या सोसायटीत एकांच्या भूभूला व्हेट नी च होमिओपॅथिक कडे जायला लावले होते. ते भूभू एकदम बरे झालेय आता. रोज खाली फिरते.

आम्ही हॅरी ला पेट हॉस्टेल ला ठेवले होते येऊर इथे आहे ते. चांगला अनुभव आहे. २० दिवसांचे २०.०००झाले. (एसी चार्ज असल्याने)
दररोज फिरवण्याच, जेवत असतानाचे फोटो पाठवतात.

आमची भारत वारी आणि सिम्बाची तयारी ...

यंदा सगळ्यांनाच भारतात जायचे होते कारण कोविड नंतर कोणीच गेलं नव्हतं. तिकीट बुक करण्याआधी पहिली चर्चा सुरु झाली ती म्हणजे आमच्या बाळाची (सिम्बाची) सोय कशी करायची कारण दौरा निदान ३-४ आठवड्यांचा होता आणि त्याला कधीच इतके दिवस दुसरीकडे ठेवले नव्हते या आधी. तसा तो आधी doggy daycare ला एखाद रात्र ठीकठाक राहिला होता आणि घराजवळ एक घरगुती सांभाळणारा होता त्याच्या कडेपण १-२ रात्र राहिला होता परंतु आता प्रश्न बरेच दिवसांचा होता.

काही मित्रांच्या अनुभवावरून doggy daycare ला नाही ठेवायचे हे पक्कं झाले आणि मग २-३ महिने आठवड्यातून १-२ वेळेस घरगुती ठिकाणी ठेवणे सुरु केले. त्याच्या कडेपण एक कुत्रा होताच त्यामुळे सिम्बाला तिथे राहणे आवडायचे तरी पण सवय म्हणून मुद्दाम ठेवले.
मग निघण्याआधी आमच्या आधी सिम्बाचीच खरेदी झाली. त्याला महिनाभर पुरेल इतके खाणे, त्याचे चावायची खेळणी , नेहमीच्या सवयीच्या गोष्टी , त्याचा crate इत्यादी caretaker ला दिले तसेच त्याचे जेवण कसे बनवायचे याचा एक विडिओ पण दिला.
शेवटी जड अंतःकर्णनाने त्याला तिथे सोडून त्याचा संध्याकाळी आम्ही निघालो, मनात थोडी धाकधूक होती पण त्याला caretaker ने छान सांभाळला आणि मला रोज एकतारी फोटो आणि विडिओ तो पाठवायचा त्यावरून आम्हाला त्याची खुशाली कळत होतीच.

साडेतीन आठवड्यांनी परत आलो तेव्हा आम्हाला पाहून कसला खुश झाला होता सिम्बा, अगदी आमच्या अंगावरून उड्या मारून मारून चाटले आम्हाला सगळ्यांना.

तर माझ्या अनुभवावरून काही गोष्टी नमूद करतो ज्या कि तुम्हाला सगळ्यांना उपयोगी होतील,
१ - शक्यतोवर ३ दिवसांपेक्षा जास्त दिवस जाणार असाल तर doggy daycare हा पर्याय टाळता आला तर उत्तम. तिथे जास्त दिवस ठेवल्यास कुत्री टेन्स होतात आणि मग त्यांच्या तब्बेतीवर आणि मनावर खोलवर परिणाम होतो.
२ - घरगुती सांभाळणारे कुणी असेल तर अतिशय उत्तम
३ - अश्या संभाळणाऱ्याची त्यांना सवय लावा म्हणजे मग नंतर फार जड जात नाही
४ - तुमच्या पेटच्या खाण्यापिण्याच्या सवयी सोप्या सरळ ठेवा
५ - तुम्ही लांब असाल तेव्हा जमलंच तुमच्या पेटशी विडिओ कॉल वर बोला

अगदी आमच्या अंगावरून उड्या मारून मारून चाटले आम्हाला सगळ्यांना.>>> सो क्यूट!!

बादवे, ओडीनची काय खबरबात? इन्स्टावर पण फारसे अपडेट नाहीत. इथेही शांत.

आम्ही भुभु घेतला तर इन्डिया ट्रिपचे काय हा एक विचार आहेच...असो बाजारात तुरी आणी..
केअरटेकर कडे ठेवलत का सिम्बाला ?का तो येवुन डॉगसिटिन्ग करत होता?
विमानात नेता येत नाहि का?

ओडिन आणि त्याचा बडी रिओ ची मस्ती सुरू आहेच छानपैकी
पूर्वी आम्हालाच त्यांना पळवून दमवायला लागत होते आता तेच एकमेकांशी पकडापकडी, मारामारी, कुस्ती करून दमतात

रिओ बाळाचे तर उद्योग अजूनही सुरूच आहेत

गेल्या आठवड्यात इतका अशक्य कॉमेडी पडलाय तो
आता पाऊस झाल्याने भरपूर झाडी झुडपे वाढली आहेत आम्ही जातो त्या ट्रॅक वर
तिकडे रिओ कशाचा तरी वास आला म्हणून पळत गेला, झाडी संपताच एकदम मोठा ड्रॉप होता, तो काही त्याला दिसलाच नाही, सरळ गेला आणि भसकन खाली
कार्टून मध्ये दाखवतात तसं, मला म्हणजे हसावं का त्याची चिंता करावी हेच कळेना, तडफडत दुसरीकडून आला मग वरती आणि शेपटी हलवून ओके असल्याचे जाहीर केलं Happy

ओडिन चा त्रास म्हणजे मध्ये जोरदार पाऊस झाला तेव्हा चिखलाने भरलेले पाय घेऊन हिंडताना ओरडा खायचा त्यामुळे आता बाहेरून आला की बाथरूम मध्ये घुसतो आणि पाय धुवून घेतले की बाहेर जातो
आता पाऊस थांबलाय पण शिस्त म्हणजे शिस्त
त्याला सांगितलं की नाहीये चिखल लागलेला तरी नाहीच
पाय धुवुन घेतल्याशिवाय महाराज बाहेरच येत नाहीत Happy

माउई ची बीच वेकेशन झाली. इथे बीच वर डॉग्ज ना रिस्ट्रिक्टेड अ‍ॅक्सेस असतो मोस्टली, ठरविक बीच वर ठराविक दिवसात , अमूक वेळातच चालेल असे रुल्स असल्यामुळे त्याला बीच वर नेलेच नव्हते अजून. आता गेलो होतो ते टाउन मात्र पूर्ण डॉग फ्रेन्डली, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट्स, बीचेस सगळीकडे लाडावलेले डॉगोज बागडत होते. Happy माउई दिसत एवढासा असला तरी टेम्परामेन्ट जात्याच गार्ड डॉग सारखं आहे, त्यामुळे तिथे सतत अ‍ॅलर्ट वर होता, कुणी माणसे लाड्करायला जवळ आली तर अजिबात हात लावू दिला नाही की जवळ येऊ दिले नाही. आम्ही आपले कायम "सॉरी हां, तो जरा नव्या ठिकाणी जरा डीफेन्सिव /नर्वस असतो त्यामुळे भुंकला बर का" वगैरे अपोलोजिटिक मोड मधे Lol
maui0.jpgबाकी बीच वर माउईने पाण्याजवळ १-२ दा जाऊन पाहिले, लाटा आल्यावर मागे पळाला मात्र. नंतर मग बीच चेअर वर छात्रीखाली मस्त चिल करत बसणे पसंत केले. तुम जाओ हम कपडे सांभालते है मोड!! Happy
maui1_0.jpg
तिथे बीच वर भरपूर छोटे छोटे खेकडे होते. त्यातल्या प्रत्येक इन्डिविजुअल खेकड्यावर भुंकणे ही त्याची ड्यूटी असल्यासारखे भॉ भॉ सुरु होते! एकूण मजेत होता तिथे, पण शेवटी होम स्वीट होम!घरी परत आल्यावर जो काही आनंद झालाय! झूमीच आल्या एकदम.

प्रत्येक इन्डिविजुअल खेकड्यावर भुंकणे ही त्याची ड्यूटी असल्यासारखे भॉ भॉ सुरु होते!>>>smiley36.gif
त्याचा गॉगल वाला फोटो भारी आलाय. एकदम हिरो!!

त्याला सांगितलं की नाहीये चिखल लागलेला तरी नाहीच
पाय धुवुन घेतल्याशिवाय महाराज बाहेरच येत नाहीत>>> लोल!! एकदा शिकवला प्रोग्रॅम फिट झालाय ब्रेन मधे... आता माघार नाहि.

एकंदरीत माउई ची मज्जा झालेली दिसतेय बीचवर, छान

@प्राजक्ता - नेता येते विमानांनी परंतु खूप जास्त पेपरवर्क आहे आणि इतका प्रवास त्यांना झेपत नाही एकदम. टेन्स नको व्हायला म्हणून मग sedation द्यावे लागते. सिम्बा त्याच्या कॅरेटरच्या घरी छान राहिला

डॉग्ज ना ते २० पाउंड पेक्षा लहान असतील तर कॅबिन मधे सोबत नेता येते. लोकल प्रवासाला ठराविक आकाराच्या कॅरियर मधून त्यांना आपल्यासोबत च नेल्यामुळे बरेच सेफ असते. तरी पण सीट च्या खाली ती बॅग ठेवायची म्हणजे त्यांना तसे अनकंफर्टेबलच होते.
डॉग चे वजन २० पेक्षा जास्त असल्यास प्रॉपर कॅरियर आणून कार्गो मधे न्यावे लागते, जे फारसे सेफ नाही आणि ट्रॉमाटायजिंग पण असते.
लोकल फ्लाइट्स आणि इन्टरनॅशनल फ्लाइट्स चे नियम वेगळे आहेत. भरपूर मेडिकल चेकिंग वगैरे असते. या देशातून त्या देशात जाताना मेडिकल मधे त्यांना काही इन्फेक्शन वगैरे निघाले तर कन्ट्री आत येण्याची परवानगीच न देणे असेही ऐकलेले किस्से आहेत. तेव्हा देशात जाताना बरोबर नेण्याचा विचार पण करू नका. भरपूर पेट सीटर मिळतात कुठेही, त्यांच्या घरी /तुमच्या घरी येणारे हवे तसे मिळतील. त्यांच्याकडे ठेवायचे. तेच त्यांच्या भल्याचे आहे. आधी काही दिवस/ आठवडे त्या सिटर ची सवय करायची जरा, मग राहतात नीट.

शिस्त म्हणजे शिस्त : हहगलो:
इन्डिविजुअल खेकड्यावर भुंकणे >>>>

Lol किती गोड असतात ही प्रकरणं.

सॅमीचा नवीन विडिओ

https://youtube.com/shorts/sny_xNiQWTQ?feature=share

मुलगी म्हणते.. कधी एकदम प्लेफुली चावते नाहीतर दुसर्‍या क्षणी पेट करायला सांगते... स्प्लिट पर्सनालिटी असावी बहुतेक म्हणे Proud

70595848700__C29A1F55-2C43-4655-8E9F-3953FCF29CD5.jpeg

सध्या दुपारी खूप ऊन असल्याने आम्ही अशी मस्त ताणून देतो Lol

Pages